Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केजरीवाल, सिसोदिया आणि मंडळी
केजरीवाल, सिसोदिया आणि मंडळी भ्रष्टाचारात बरबटलेली आहेत ना? अरे टाका की तुरुंगात मग. तुमचंच सरकार आहे. तुम्हाला काय अडचण आहे? केजरीवालांसारखं कागदं नाचवत आरोप करायची काय गरज? >>>
या सर्वांवर संबंधीत राज्य सरकारे कारवाई करत आहेत हे वाचलं नाहीत वाटतं ??
उत्तर देण्यास काही राहीलं नाही की इग्नोर करा.
नजरचुकीने असे बिंदू इकडे-तिकडे होऊ शकतात.>>>>> काय जोक आहे. वा !! इन्कमटॅक्स कमिशनरची नजरचूक ??
मिर्ची, तुमच्या सारख्या सुज्ञ
मिर्ची, तुमच्या सारख्या सुज्ञ आणि अभ्यासु आयडी कडुन तरी अशी अपेक्षा नव्हती.
हल्ली अनेक ठिकाणी वाचतो आहे "सेन्सिबल पोस्टींच्या प्रतिक्षेत"
याचा अर्थ लिहिणार्याच्या विचारांशी जुळणारी पोस्ट की काय ?
वर स्पार्टाने दिलेल्या अनेक मुद्द्यांचे काय ?
केवळ विरोधी आहेत म्हणुन इग्नोर करणार तुम्ही ? आणि करायला सांगणार ?
कृपया लक्षात घ्या, मी हे केवळ वादासाठी लिहित नाहीये.
आक्रस्ताळ्या भाषेतही लिहित नाहीये.
जर त्या सर्व आरोपांबद्दल माहिती नसेल तर त्यात चूक नाही. निदान मी तरी मानत नाही.
किंवा माहिती आहे पण हे आरोप खोटे आहेत असे तुमचे मत असू शकते.
अर्थात हे सजेशन आहे, पटत नसेल तर सोडून द्या.
जरा आधीचा मुद्दा --- मला तर अजुनही वाटते की दिल्लीमधे परिस्थिती अस्थिर राहू नये. कोणीही बहुमताने यावे आणि स्थिर सरकार आणावे. आआप किंवा भाजप. अगदी अनपेक्षितरित्या कॉन्ग्रेस आले तरी हरकत नाही.
केवळ विरोधी आहेत म्हणुन
केवळ विरोधी आहेत म्हणुन इग्नोर करणार तुम्ही ? आणि करायला सांगणार ? >>> महेश, हेच तर कधीपासून चाललं आहे. मुद्देसूद वाद निदान मिर्ची घालू शकतील अशी अपेक्षा होती, परंतु त्यादेखील इतरांसारख्याच.
महेश आणि स्पार्टाकस, +++
महेश आणि स्पार्टाकस,
+++ "सेन्सिबल पोस्टींच्या प्रतिक्षेत"याचा अर्थ लिहिणार्याच्या विचारांशी जुळणारी पोस्ट की काय ? ++
++ मुद्देसूद वाद निदान मिर्ची घालू शकतील अशी अपेक्षा होती, परंतु त्यादेखील इतरांसारख्याच.++
१००००००००% अनुमोदन ,
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/SC-On-delhi/articleshow/39...
सरकारस्थापनेच्या मुद्द्याचा निकाल सुप्रीम कोर्टानेच लावला.
आता बाकीच्या मुद्द्यांच कोणी बोलू शकेल काय ?
केजरीवाल. Arvind Kejriwal did
केजरीवाल.
Arvind Kejriwal did this, the petitioners complain, to keep his financial net worth under a figure of Rs 1 crore and conceal his actual net worth running into several crore rupees
<<>>
केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या अॅफिडेव्हिटबद्दल बातमी शोधली.
According to the affidavit, the value of the movable and immovable assets of Kejriwal and his wife Sunita Kejriwal is worth Rs.2,10,48,389
ज्या प्लॉटची किंमत ५.५ लाख दाखवल्याचे सक्सेना-अगरवाल म्हणत आहेत ती ५५ लाख रुपये दाखवल्याचे बातमीत म्हटले आहे. मग बिंदू देण्यात नक्की चूक कुणाची झाली? चूक झाली की consciously, with an intention of deception असे केले?
या दोन शितांवरून भाताची परीक्षा करणे पुरेसे आहे, त्यामुळे अत्या द्वयीचे बाकीचे मुद्दे तपासून पाहायची गरज , इच्छा नाही.
उमेदवारांनी दाखल केलेली प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असतात. त्यामुळे "याविषयीही जाणून घेण्यास आवडेल :" हे इथे लिहायची गरज नाही. दुसर्याचा वेळ अशा थापेबाज बातम्यांत वाया घालवण्यापेक्षा स्वतःचा वेळ सत्कारणी लावून काय ते जाणून घेता येणे सहज शक्य होते. पण मग इथे कोणाला तरी जाब विचारल्याचा आणि उत्तरे देत नाही असा कांगावा करून जितं मया असे नाचण्याचा आसुरी आनंद कसा मिळावा?
तो एवढा मोठा इंग्रजी परिच्छेद इथे डकवणे हा वेस्ट ऑफ स्पेस आहे आणि तो वाचणे हा वेस्ट ऑफ टाइम.
<सरकारस्थापनेच्या मुद्द्याचा
<सरकारस्थापनेच्या मुद्द्याचा निकाल सुप्रीम कोर्टानेच लावला.
आता बाकीच्या मुद्द्यांच कोणी बोलू शकेल काय ?>
सुप्रीम कोर्टाच्या निकालावर तेवढे कोणी बोलू नये म्हणून किती ती धडपड! खरे तर याच मुद्द्यावर बोलायला हवे. काय काय म्हणाले सुप्रीम कोर्ट? नागरिकशास्त्राचे पाठ्यपुस्तक त्यांनी नीट अभ्यासले आहे की नाही?
मयेकर, बातमी वाचा नीट,
मयेकर,
बातमी वाचा नीट, सुप्रींम कोर्ट काय म्हणाले कळेल.
मयेकर, केजरीवालनी दिलेलं
मयेकर,
केजरीवालनी दिलेलं अॅफीडेव्हीट हे चुकीचं आहे ह्या मुद्द्यावरच सक्सेना-अगरवाल कोर्टात गेले आहेत. आणि तुम्ही केजरीवालचं अॅफीडेव्हीट बरोबर आहे हे धरुन चालले आहात यापेक्षा मोठा विरोधाभास कोणता ?? आणि बाकीच्या गोष्टींचं काय ? खोटा पत्ता देता येतो ?
तुम्हाला वाचायचं नसेल तर वाचू नका, पण या सगळ्या मुद्द्यांवरुन केजरीवाल यांची तपासणी सुरु आहे हो त्याचं काय. आणि नोकरीत असताना केलेल्या रजेच्या गडबडीचं काय ?
इथे वाद घालण्यापेक्षा माझा
इथे वाद घालण्यापेक्षा माझा वेळ मी सत्कारणी लावेन म्हणतो. कारण दगडावर डोकं आपटून डोकं फुटतं... दगडाला फरक पडत नाही. मला माझं डोकं फोडून घेण्याची इच्छा नाही.
नीट वाचलं नाही की न वेड
नीट वाचलं नाही की न वेड पांघऊन पेडगाव गाठताय?
संत्र सोलून त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून देतो.
सक्सेना म्हणतात : केजरीवालनी नेटवर्थ एक करोडपेक्षा कमी दाखवण्यासाठी खोटारडेपणा केला. बातमी म्हणते केजरीवाल नेटवर्थ २ करोड १० लाख. केजरीवाल करोडपती आम आदमी आहेत अश्या बातम्याही त्या काळात झळकल्या होत्या.
सक्सेना म्हणतात प्लॉटची किंमत ५.५ लाख रुपये (पाच पूर्णांक पाच लाख = पाच लाख पन्नास हजार) दाखवली. बातमी म्हणते किंमत ५५ पंचावन्न लाख दाखवली.
सक्सेनांनाही नीट वाचता येत नसावं.
सक्सेना अगरवाल कोर्टात गेले म्हणताय? The High Court had, however, refused to entertain the plea and directed the petitioners to approach a magisterial court for remedy.
ही ११ मार्चची बातमी आहे. त्यानंतर या दोघांनी काय केलं त्याबद्दलची काही बातमी दिसली नाही.
केजरीवाल यांच्या प्रतिज्ञापत्राबद्दल अशी काही केस सुरू असल्याची त्यानंतरची ही बातमी दिसली नाही.
म्हणजे मुडदाच नसताना गढे मुर्दे उखाडण्याचा प्रकार आहे.
त्यांच्या रजा प्रकरणाबद्दल मी आधी लिहिलेलं आहे. पुन्ह लिहून वेळ वाया घालवायचा नाही. या सक्सेना-अगरवाल परिच्छेदावर बराच वेळ वाया गेला माझा.
वाचा नीट, सुप्रींम कोर्ट काय
वाचा नीट, सुप्रींम कोर्ट काय म्हणाले कळेल. (ही लिंक आजच्या दिवसापुरतीच चालेल. रोजचे बुलेटिन तिथे अपडेट केले जाते).
The Supreme Court today asked the Centre to take a decision on dissolution of Delhi Assembly within five weeks. The Court questioned the continuance of the House in suspended animation when no party was coming forward to form the government. A five-judge Constitution Bench headed by Justice H L Dattu also asked as to why MLAs should be paid from taxpayers' money for sitting idle. The apex Court asked the Additional Solicitor General P L Narasimha to convey the feeling of the Court on the issue to appropriate authority. It asked the Centre what steps it has taken to explore the possibility of government formation during the last five months. However, it turned down the plea of Aam Admi Party, which had submitted that the apex court should pass an order so that elections in Delhi are held along with four other states later this year. The apex court said that it was for the appropriate authority to take a decision.
मिर्ची ताई साधारण २ आठवड्या
मिर्ची ताई
साधारण २ आठवड्या पूर्वि NDTV वर Truth Vs HYPE हा कर्यक्रम बघितला होता. दिल्ली च्या विज प्रश्नावर तो कार्यक्रम होता. त्यात सर्वात शेवटी आआप चे या विषयावरचे सल्लागार आहेत त्यांची छोटी मुलाखत दाखवली. त्यांनी पार्टी चे नाही पण स्वत:चे मत व्यक्त केले आहे. ते जरुर बघा.
NDTV च्या साईट वर त्याचे रेकॉर्डींग सापडावे. सहज मिळाले तर दुवा देइन. (आधी तो कसा द्यायचा ते शिकतो आणि समजुन घेतो.)
भ्या...मोठ्ठी पोस्ट लिहिली
भ्या...मोठ्ठी पोस्ट लिहिली होती, चुकून डिलीट झाली.
भरत, उलगडून सांगितल्याबद्दल धन्यवाद
ह्या लोकांना खरंच कळत नाहीये की न कळल्याचं सोंग आणत आहेत हे समजायला मार्ग नाही.
<<मिर्चीतै ईथुन पळून गेल्यात, त्या ईथल्या प्रश्नांना घाबरुन !!
मिर्चीनी आपचे दाखवायचे दात तेवढे पाहिले आहेत, त्याना खायचे दात दाखवतो आहे.>>
मोठ्ठा गैरसमज. कुठेही पळून गेलेली नाही. आणि हे सो कॉल्ड खायचे दात भरपूर पाहिले/वाचले आहेत.
हे घ्या. तुम्हाला आवडेल.
१. Arvind Kejriwal: India’s biggest scam(ster) – R.S.N. Singh
"“Arvind Kejriwal is not a political threat but a security threat to this country, his main objective being to destabilize India to perpetuate US agenda.” – Col. R.S.N. Singh"
२. ARVIND KEJRIWAL’S ANTI-NATIONAL REVOLUTION
शेकडो लेख आहेत असले. त्यातले बरेच वाचले आहेत. सोशल मिडियावरतर रोजच काहीतरी असतं. सगळं वाचूनही आणि "अरविंद केजरीवाल एक्स्पोज्ड" अशा सनसनीखेच मथळ्यांचे व्हिडिओज पाहूनही मला केजरीवालांच्या संघर्षावर विश्वास आहे. मोदी खोटं बोलत आहेत की केजरीवाल ह्यातील फरक कळण्याची विवेकबुद्धी माझ्याकडे आहे, आणि तिच्यावर माझा विश्वास आहे.
दुमत असू शकतं.
असले लेख वाचून केजरीवालांवर टीका करणार्यांनी त्यांचे व्हिडिओ, मुलाखती, भाषणे ऐकलेली नाहीत असं मला वाटतं. स्पष्ट, रोखठोक विचार आहेत त्यांचे. आणि त्यांच्या कृती त्यांच्या बोलण्याशी काँग्रुअण्ट आहेत.
"बहोत हुआ नारी पर वार" म्हणायचं आणि निवडून आल्यावर बलात्कारांवर चकार शब्द काढायचा नाही, बलात्काराचा आरोप असणार्यांना पाठीशी घालायचं, पारदर्शी राज्यकारभार म्हणायचं आणि निवडून आल्यावर मात्र 'राजकीय पक्ष माहितीच्या अधिकाराखाली येणार नाहीत' असं सांगायचं असलं छल-कपट मला कधी आवडलेलं नाही, आवडणार नाही.
असल्या नेत्यांपेक्षा - राजकीयदृष्ट्या कितीही चूक निर्णय असला तरी आणि त्याची मोठी शिक्षा भोगावी लागली तरी वचन पाळण्यासाठी राजीनामा देऊन, लगेच पुन्हा फेरनिवडणूका घ्या, त्यात आम्ही नक्की बहुमतात निवडून येऊ आणि बिल पास करवून घेऊ असं ठासून सांगणारा 'येडा मुख्यमंत्री' मला जास्त पटेल. माबुदोस.
<<यावर आलीच तर काय प्रतिक्रिया येईल ते देखील सांगतो.
अंतर्गत लोकापालात कोणीही दोषी आढळलेला नाही.!!!>>
दिल्ली उच्चन्यायालय म्हणजे अंतर्गत लोकपाल का? बरं.
<<काय जोक आहे. वा !! इन्कमटॅक्स कमिशनरची नजरचूक ??>>
अहो, त्या अगरवाल-सक्सेनांची नजरचूक. केजरीवालांनी ५५ लाख लिहिलंय. त्यांना ५.५ लाख कुठून दिसले तेवढं विचारून या.
<<मिर्ची, तुमच्या सारख्या
<<मिर्ची, तुमच्या सारख्या सुज्ञ आणि अभ्यासु आयडी कडुन तरी अशी अपेक्षा नव्हती.
हल्ली अनेक ठिकाणी वाचतो आहे "सेन्सिबल पोस्टींच्या प्रतिक्षेत"
याचा अर्थ लिहिणार्याच्या विचारांशी जुळणारी पोस्ट की काय ?
वर स्पार्टाने दिलेल्या अनेक मुद्द्यांचे काय ?
केवळ विरोधी आहेत म्हणुन इग्नोर करणार तुम्ही ? आणि करायला सांगणार ?>>
महेश,
प्रश्न विरोधी मतांचा नाही. विरोधी मतं अनेकांनी मांडली आहेत. नंदिनी, केदार, मनिष, यूरो, भरत, अश्विनी, तुम्ही स्वतः
इन फॅक्ट, धागा काढला तेव्हा सगळेच विरोधातच होते की. माझ्या परीने मी उत्तरं दिलीत. ज्यांना काही मुद्दे पटले त्यांनी नंतर त्याला बॅक-अप दिला. उदा- दिल्लीतील वीजप्रश्न. तिथे मयेकरांनी यूरोशी चर्चा केली. बाकीच्या मुद्द्यांवर अजूनही मतभेद असतील त्यांचे. असू दे की. मतभेद असण्यात काहीच वावगं नाही.
पण विचारवंत, शेनं सारखे आयडी १०-१० प्रश्नांचा गठ्ठा आणून टाकतात समोर. आणि सोडवा आता म्हणतात. शिवाय जे मुद्दे आधीच मांडून झालेत तेच परत. कैच्याकाय.
ते फॉरिन फंडिंगचं कितीवेळा लिहून झालंय. दिल्ली उच्चन्यायालयाने आपला नव्हे तर बीजेपी, काँग्रेसला दोषी ठरवलंय. तरी पुन्हा तेच.
फॉरिन फंडिंगच्या वावड्यांचा आप ला फायदाच झाला अर्थात Kejriwal thanks rivals for funding inquiry as AAP gets SIX TIMES more donations
"Impressed with AAP's transparency, one Shivam Sidana wrote: "You guys are the only hope for India's future. I donated and I have the right to do that because I am an Indian citizen. It's the first time I have donated in my life to any political party because I never saw such a transparent system."
करून बघा. एक रूपया जरी डोनेट केला तरी नाव येतं त्यांच्या साइटवर. मी जेव्हा दोनेट केले होते तेव्हा नेटबँकिंगची विंडो बंद करायच्या आत तिथे नाव, रक्कम सगळं आलं होतं.
<<या दोन शितांवरून भाताची परीक्षा करणे पुरेसे आहे, त्यामुळे अत्या द्वयीचे बाकीचे मुद्दे तपासून पाहायची गरज , इच्छा नाही.>> +१००
<<आणि बाकीच्या गोष्टींचं काय ? खोटा पत्ता देता येतो ?>>
अजिबात नाही. फक्त खोटं शिक्षण, खोटं वैवाहिक स्टेटस देता येतं
<<मिर्चीताई - तुम्हाला दिल्लीच्या निवडणुकीचे इतके काय पडले आहे. नाही झाली अजुन ६ महीने निवडणुक तर काय अडतय? राज्य कारभार चालूच आहे ना.>>
ऑथॉरिटी विदाऊट अकाउंटॅबिलिटी? अप्रत्यक्ष सत्ता? ही कसली लोकशाही? दिल्लीतील जनतेचे प्रश्न घेऊन त्यांनी कुणाकडे जायचं?
इ-रिक्शावाल्यांशी खेळ चाल्लाय, शिक्षकांच्या नोकर्यांशी खेळ चाल्लाय. त्यांनी काय करायचं? आणि आमदार लोक घरी बसून लोकांच्या पैशातून फुकट पगार खाणार?
मी ह्या सगळ्या प्रकाराकडे एक रिवोल्युशन म्हणून बघतेय, म्हणून मला उत्सुकता आहे काय-काय घडतंय ह्याबाबत.
.....आणि मला खात्री आहे की माझ्या नातवंडांना हा इतिहास शिकवला जाणार, तेव्हा जरा फर्स्ट-हँड अनुभव, माहिती असली तर जरा भाव खाता येईल त्यांच्यासमोर
युरो, http://www.ndtv.com/vid
युरो,
http://www.ndtv.com/video/player/truth-vs-hype/watch-truth-vs-hype-delhi...
हेच का?
पाहते नंतर.
स्पार्टाकस: अजून काय झालं आहे
स्पार्टाकस: अजून काय झालं आहे हो? अद्याप अंजली दमानिया, शांती भूषण, मयांक गांधी शिल्लक आहेत.
//
येऊद्यात. हा केजरीवाल भ्रष्टाचारात किती बरबटलेला आहे ते येऊच द्यात सगळ्यान्समोर
आधी किती चांगला वाटला होता....................बरबटवाल कुठला
<<मोहल्ला सभा म्हणजे मूर्खपणा
<<मोहल्ला सभा म्हणजे मूर्खपणा आहे. मी जर माझ्या पुण्यातल्या वॉर्ड मधे ५ कोटीचा निधी कसा वापरायचा ह्या बद्दल मोहल्ला सभा चालू आहे असे इमॅजिन केले तर माझ्या सारख्या सभ्य, टॅक्स भरणार्या, अतिक्रमण न करणार्या, कायद्याला घाबरणार्या लोकांच्या वाट्याला १ पैश्याचे विकासकाम येणार नाही>>
तुमची मोहल्ला सभाची कन्सेप्ट स्पष्ट नाही असं दिसतंय. एखादा व्हिडिओ पाहिलाय का? 'स्वराज'चं पुस्तक वाचलंय का?
एक ७ मिनिटांचा व्हिडिओ आहे. जरूर बघा. What Is Mohalla Sabha
आत्ता जे चालू आहे ते परफेक्ट आहे असं नाही म्हणायचं. त्यात सुधारणेला वाव असेल, सुधारणा केल्या जातील. पण मूळ कन्सेप्ट मस्त आहे.
आणि Collective wisdom is far superior than one man's intelligence. प्रश्न निघतील पण उत्तरंही सापडतील.
टोचाभौ,
सुरूवातीला आपल्याला असं वाटेल की आपल्यासारख्या करदात्यांच्या पैशातून निम्न स्तरातील लोकांना मदत होतेय, आपला पैसा वाया जातोय. पण मला सांगा, आत्ता सध्या आपल्या पैशाचं काय होतंय? बहुतांशी पैसा भ्रष्टाचारात जातोय. निदान तो व्यवस्थित वापरला जाईल.
आणि झोपडपट्ट्या किंवा निम्नस्तरातील इतर लोक ह्यांच्यासाठी सेवाभावी दृष्टीकोन बाजूला ठेवा. स्वार्थी विचार करा. समाजातील एक समूह वंचित राहिला तरी समाज अस्थिर होतो. वाढत्या वीजबिलांची किंवा झोपडपट्ट्यांतील लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागण्याची थेट झळ आपल्याला बसत नसली तरी बेसिक गरजा पूर्ण न होण्यापोटी वाढणारी गुन्हेगारी आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागत आहेत ना.
<<मिर्ची ताई हा भारत आहे. इथली लोक जर लोकशाहीच्या लायकीची असती तर गेली ६५ वर्षे असले चोर आमदार, खासदार का निवडुन आले?>>
अतिशय दुर्दैवी विचार. भारताला हुकुमशहा हवाय असं म्हणायचंय का तुम्हाला मग?
मिर्ची, सविस्तर
मिर्ची, सविस्तर प्रतिसादांबद्दल धन्यवाद !
आत्ता तरी काही मुद्दे नाही आहेत माझ्याकडून, असल्यास पुन्हा येईनच.
करदात्यांच्या पैशातून निम्न
करदात्यांच्या पैशातून निम्न स्तरातील लोकांना मदत होतेय>>>>> मिर्ची ताई. निम्न स्तरातील लोकांना मदत झाली तर मला आनंदच आहे. पण मोहल्ला सभातुन फक्त गुंड, कायदे तोडणार्या लोकांना मदत होईल. ती लोक हा सर्व प्रकार लोकशाहीच्या नावा खाली हायजॅक करतील.
हे पुढे खाप पंचायतीच्या वळणावर जाणार आहे.
थोड्या वर्षानी गल्लीतले वाद मोहल्ला सभेतच सोडवावेत अशी न्यायव्यवस्था पण चालू होइल.
अतिशय दुर्दैवी विचार. भारताला हुकुमशहा हवाय असं म्हणायचंय का तुम्हाला मग?>>>> तुम्हाला कळत नाहीये मी काय म्हणतोय ते. सद्ध्या ज्या प्रमाणे निवडुन आलेले लोक आणि न्-निवडुन आलेले राज्यकर्ते जसे नोकरशाही, न्यायव्यवस्था एकमेकांवर कंट्रोल ठेवावेत अशी अपेक्षा आहे, ते तशीच चालू रहावी. तुमचे लोकपाल ची कल्पना पण लोकशाहीच्या विरुद्ध आहे.
Collective wisdom is far superior than one man's intelligence>>>>>> ही भारता साठी अतिशय चुकीची कल्पना आहे. अतिलोकशाही करण हे घातक आहे, भारता सारख्या समाजाला ते उपयोगी नाही. तुम्ही इंग्लंड मधली लोक बघुन भारत आणि भारतीय काय आहेत विसरला आहात.
मध्यपूर्वेत एखादा सद्दाम, गडाफी, नासेर, मुबारक लागतो लोकांना ताब्यात ठेवायला, नाहीतर आता लोकशाहीच्या नावाखाली काय चालू आहे ते तुम्हाला दिसतेच आहे. भारताची परिस्थिती पण कमी प्रमाणात पण अशीच आहे.
केजरीवाल आणि त्यांच्या
केजरीवाल आणि त्यांच्या पक्षातील लोक हे स्पष्ट शब्दात सांगायचं तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले लोक आहेत असं माझं मत आहे.
सुस्वागतम ऋता पटवर्धन. नोंद
सुस्वागतम ऋता पटवर्धन.
नोंद घेतलेली आहे.
आपण इथले नोंदणीकारकून आहात का
आपण इथले नोंदणीकारकून आहात का ?
<<तुमचे लोकपाल ची कल्पना पण
<<तुमचे लोकपाल ची कल्पना पण लोकशाहीच्या विरुद्ध आहे.>>
हे जरा अधिक स्पष्ट करून सांगाल का?
<<केजरीवाल आणि त्यांच्या पक्षातील लोक हे स्पष्ट शब्दात सांगायचं तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले लोक आहेत असं माझं मत आहे>>
स्वागत ऋतातै.
केजरीवाल आणि त्यांचे लोक कसे आहेत ह्याच्यापेक्षा ते काय करत आहेत ह्यावर चर्चा करणं जास्त योग्य असं माझं मत आहे.
ऋता पटवर्धन
ऋता पटवर्धन
ताई म्हणण्याएवढी मी मोठी
ताई म्हणण्याएवढी मी मोठी नाही. बरीच लहान आहे.
सर्वप्रथम दिल्लीत स्पष्ट बहुमत नसताना आम आदमी पार्टीने सरकार बनवलं ही पहिली चूक होती. काँग्रेस ज्या सरकारांना समर्थन देते, ती सरकारे कायम अल्पायुषी ठरलेली आहेत. वेळ येताच काँग्रेस त्यांच्या पायाखालचं जाजम खेचून घेते. इतिहासात याची अनेक उदाहरणे दिसून येतात.
जनलोकपाल बिल हे तांत्रीक कसोट्यांवर टिकणार नाही आणि ते मांडण्याचा प्रयत्न चुकीचा आहे हे माहीत असूनही तसा प्रयत्नं करणं ही केजरीवाल यांची दुसरी चूक होती. त्यानंतर त्यांनी जो राजीनामा दिला ती तर घोडचूक होती. या राजिनाम्यामुळेच केजरीवाल फक्तं टीका करु शकतात, पण सरकार चालवण्यची त्यांची कुवत नाही हा संदेश देशभरातील जनतेत गेला. त्यातच लोकसभेच्या निवडणूका समोर उभ्या असल्याने पंतप्रधानपदाची स्वप्नं पडू लागल्यामुळे केजरीवालनी दिल्लीची सत्ता सोडली असा सरळ अर्थ लोकांनी काढला.
मुळात आपल्या पक्षाची कोणतीही यंत्रणा अस्तित्वातच नसताना लोकसभेच्या निवडणूकीत ४०० च्यावर जागा लढवण्याचा जो अव्यापरेषू व्यापार त्यांनी केला तो तर निव्वळ मूर्खपणाचा होता. दिल्लीत २७ आमदार असतानाही एकही खासदार ते निवडून आणू शकले नाही याला कारणीभूत त्यांची ही धरसोड वृत्ती असावी. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी राहून, लोकसभेपर्यंत जनहिताचे काही निर्णय त्यांनी राबवले असते तर निश्चीतच दिल्लीतून एक-दोन खासदार निवडून येण्याची शक्यता होती.
मिडीयावर आरोप हा असाच एक विचित्र पवित्रा होता. ज्या मिडीयाने अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून केजरीवालना प्रोजेक्ट केलं, त्याच मिडीयाशी त्यांनी पत्करलेलं शत्रुत्वं अंतिमतः त्यांच्याच मुळावर येणार हे उघड होतं. केजरीवाल फक्त आरोप करत सुटतात हे त्यातून पुन्हा अधोरेखित झालं.
सध्या केजरीवाल यांची अवस्था त्यामुळे न घर का ना घाट का अशी झाली आहे. ना दिल्लीची सत्ता हातात राहीली, ना लोकसभेत काही हाती लागलं. (चार जागांचा राजकीय दृष्ट्या काहीही उपयोग नाही). त्यामुळे दिल्लीची निवडणूक लवकरात लवकर व्हावी असा त्यांचा आटापिटा चालू असावा.
ऋता, तुम्ही मांडलेल्या जवळजवळ
ऋता,
तुम्ही मांडलेल्या जवळजवळ सगळ्याच मुद्द्यांवर भरपूर चर्वण झालेलं आहे. त्यामुळे काही लिहीत नाही.
<<इतिहासात याची अनेक उदाहरणे दिसून येतात.>>
"इतिहासाचे अवजड ओझे, डोई घेऊन ना नाचा
करा पदस्थल आणिक त्यांचे, चढूनी त्यावर भविष्य वाचा"
दहावीत असताना ऐकल्या ह्या ओळी.आत्ता आठवल्या.
केजरीवालांनी घोडचूका केल्या आहेत, त्यांना रूढार्थाने राजकारण येत नाही. खरंय.
आत्ता भाजपाचं केंद्रसरकार जे करतंय - मॅनिफेस्टोमध्ये ही भली मोठीमोठी वचने द्यायची, स्वप्ने दाखवायची आणि सत्ता मिळाल्यावर आधीच्या सरकारने केलं तेच काम करत रहायचं - असं काम केजरीवालांनी केलं असतं तर ते एकदम पटाईत राजकारणी झाले असते.....आणि मग माबोकरांना ह्या धाग्याचा अत्याचार सहन करावा लागला नसता कारण मग मी अज्जिबात आप ला पाठिंबा दिला नसता !
पण एक गोष्ट मान्य करावीच लागेल की राजकारण येत नसतानाही केजरीवालांनी दिल्लीत इतक्या जुन्याजाणत्या भाजपाला कात्रीत पकडलंय...वैध मार्गाने. इकडे आड, तिकडे विहिर...राजकारण स्वच्छ ठेवूनही रोचक,रंजक होऊ शकतं असं कधीच वाटलं नव्हतं मला.
केजरीवालनी भाजपला कात्रीत
केजरीवालनी भाजपला कात्रीत पकडलं आहे असं मला खरंच वाटत नाही.
मिर्ची ताई कलेक्टीव विस्डम
मिर्ची ताई
कलेक्टीव विस्डम म्हणजे काय?
भारतिय जनतेने केलेले मतदान?
प्रसार मध्यमातुन होणार्या बातम्या , र्चर्चा, मत प्रदर्शन ?
संसदेत होणार्या र्चर्चा ?
केजरीवाल मागवतात तसे SMS?
ऋता, मग भाजपा निवडणूका का घेत
ऋता, मग भाजपा निवडणूका का घेत नाहीये?
यूरो,
तुमच्या प्रश्नातील खोचकपणाकडे (असेलच तर) दुर्लक्ष करून लिहितेय.
मोहल्ला सभा मोठ्या-मोठ्या प्रश्नांवर निर्णय घेणार नाही. वर टोचा म्हणाले तसे भांडण-तंटे सोडवणं, पॅरॅलल न्यायव्यवस्था उभी करणं असलंही काही नाही.
तिथे फक्त मूलभूत गोष्टी वीज, पाणी, रस्ते, शाळा, दवाखाने असल्या गोष्टींची चर्चा होणार.
आमदार निधीमधून कुठली कामं होऊ शकतात ह्यावरही निर्बंध आहेत. वर लिंक दिली होती तो व्हिडिओ पाहिलात का?
Pages