Submitted by maitreyee on 9 July, 2014 - 11:03
ठिकाण/पत्ता:
प्लेन्सबरो न्यू जर्सी.
आपल्या प्राचीचं शुभमंगल गेल्या महिन्यात झालं. त्या वरातीमागून आपलं हे केळवणाचं घोडं !!
मेनू :
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + १ नॉन व्हेज स्टार्टर
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- निरामिष रस्सा स्मित
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - ??
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हतं पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात
खाणारी/ पिणारी डोकी :
एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५
तृआ : १
जीएस : २+०.२५
बुवा : २+१
चनस : १
दी : २+१
विकू : १
भगवती :१
शोनू : २+२
रोममेंबर: १
वर्हाड :४
एकूण (सद्ध्याच्या हिशोबानुसार) : २३+६+०.५
माहितीचा स्रोत:
वृंदा ताई आणि एबाबा :)
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, July 19, 2014 - 10:55 to 18:55
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाफ उघडला आहे. नाव नोंदणी करा
बाफ उघडला आहे. नाव नोंदणी करा . चित्रे वगैरे नंतर येतीलच
थोड्या वेळासाठी नक्कीच येईन..
थोड्या वेळासाठी नक्कीच येईन.. पूर्णवेळ कदाचित नाही..
चित्रे वगैरे नंतर येतीलच <<<
चित्रे वगैरे नंतर येतीलच <<< चित्रे हल्ली येत नाहीत माबोवर..
मेनू ठरवा पटापट.
मेनू ठरवा पटापट.
तुम्ही तिकडे आल्यास कुणी
तुम्ही तिकडे आल्यास कुणी रागवणार नाही, घाबरण्याची शक्यताही नाही.
कुजकट बोलणे, हेवेदावे वगैरे असेल पण त्याची तुम्हाला सवय आहे(च).
केव्हाही कळवा. न कळवता आलात तरीही कुणी स्वागत करणार नाही.
पुणेरी दहिवडे. १) केवळ आगाऊ
पुणेरी दहिवडे.
१) केवळ आगाऊ नावनोंदणी केली आहे अशाच उपस्थितांना मिळतील.
२) वड्यात डाळींबाचे दाणे, खोबर्याचे तुकडे, आले, मिर्ची हवे वा नको याबद्दलच्या आगाऊ सूचना आगाऊ केल्यास बहुमताप्रमाणे विचारात घेतल्या जातील.
३. वड्यांत दही कमी शिरल्यास
३. वड्यांत दही कमी शिरल्यास आम्ही जबाबदार नाही.
(ते गायीच्या स्वभावानुसार ठरतं असं 'शास्त्र असे सांगते'मधे लिहिलं आहे. गरजूंना पुस्तकाची रिसीट दाखवण्यात येईल. त्याचा चार्ज एक्स्ट्रा पडेल.)
४. एक्स्ट्रा दह्याचा एक्स्ट्रा चार्ज पडेल
५. एका सज्ञान (म्हणजे कायद्याने सज्ञान. अमेरिकन कायदा.) व्यक्तीला दोनाच्या वर वडे मिळणार नाहीत.
६. कायद्याने अज्ञान मुलांना प्रत्येकी एकच वडा मिळेल.
७. २ वर्षांखालील मुलांना फक्त चमचाभर दही मिळेल.
८. दह्याला आणि दह्यातील पदार्थांना नावे ठेवू नयेत.
हुकुमावरून.
अय्या, त्याच दिवशी नाथांचा
अय्या, त्याच दिवशी नाथांचा बड्डे आहे असं नविनच कळलं !!
अरे देवा!! मग थीम 'नाथ हा
अरे देवा!! मग थीम 'नाथ हा माझा' असणार आहे का?
नाथ हा माझाच - अशी असणार आहे.
नाथ हा माझाच - अशी असणार आहे.
बाकीचे 'नाथ' अनाथ पंथाला
बाकीचे 'नाथ' अनाथ पंथाला लागले असल्यामुळे नाव मागे घेण्यात येत आहे...
कोणाचं नाव मागे घेताय
कोणाचं नाव मागे घेताय गोगा?
(मागे घ्यायला आधी पुढे केलं होतं का? :P)
हो ना, फक्त स्वतःच्या
हो ना, फक्त स्वतःच्या करमणुकीचा विचार करतायत. जरा नि:स्वार्थीपणा दाखवा. त्या प्राचीला काय वाटेल
यांना काइंडनेसबद्दल सांगा.
यांना काइंडनेसबद्दल सांगा.
हा मी आलो. काईंडनेसचं कसं आहे
हा मी आलो.
काईंडनेसचं कसं आहे देसायनू.....
तो पुर्णपणे सापेक्षं असतो. जसं की इथल्या काकवांना पौष्टिक बकरे, बि करे हलाल करणे हा काईंडनेस वाटतो.
या सगळ्यात माझे पोस्ट अगदीच
या सगळ्यात माझे पोस्ट अगदीच एवेएठि संबंधित वाटत आहे. उडवून टाकू का? तेराव्या पानानंतर खरच एवेएठि आणि मेनूबद्दल चर्चा सुरू झाली की पुन्हा टाकतो.
६ माबोकर. म्हणजे टोटल डोकी व
६ माबोकर. म्हणजे टोटल डोकी व टोटल हृदये किती याचा ही हिशेब ठेवा वरती जसे लोक वाढतील (संख्येने) तसे.
तीन मेंब्रांना स्वतःचं हृदय
तीन मेंब्रांना स्वतःचं हृदय म्हणून नाही आणि त्यांनी उरलेल्या मेंब्रांची हृदयं कचाकचा खाल्ल्यानं ते पण अंमळ हृदयलेसच.
जीएस.. असुदे... नेहमीच्या
जीएस.. असुदे... नेहमीच्या (एकामेकांशी काहीही संबंध नसलेल्या ) पोस्टीत खपून जाईल...
बरं .. बारके किती मोठे किती? ते सांगा..
आम्ही २+१. गोगा, कोकणातल्या
आम्ही २+१.
गोगा, कोकणातल्या समुद्राला जागून काय ते Exotic आणा.
तुमचा काही सांस्कृतिक कार्यक्रम आहे की नाही ? हल्ली इथल्या काही काकवा एका राहूल रॉयसदृश आंग्ल नटाच्या कच्छपि लागल्या आहेत असे कळते. त्याविषयी काहीतरी येऊ द्या
अरेरेरेरेरेरेरे! ती कुठली हो
अरेरेरेरेरेरेरे! ती कुठली हो म्हण कुणाला तरी कशाची चव काय वगैरे....
त्याविषयी कोकणातल्या
त्याविषयी कोकणातल्या समुद्रातून काय येऊ शकेल या विचाराने मी इन्ट्रीग झाले आहे.
निळ्या डोळ्यांच्या माशाची
निळ्या डोळ्यांच्या माशाची आमटी की ऑटर्सची आमटी?
जीएस : मोठे २, बारके १ आंबोळे
जीएस : मोठे २, बारके १
आंबोळे : मोठे ३, बारके १
--------------------------------
एकूण : मोठे ५, बारके २
(तळटीप : या हिशोबात डोकी आणि हृदयं आणू नयेत. ही तोंडं आहेत. :P)
राहूल रॉयसदृश आंग्ल नटाच्या
राहूल रॉयसदृश आंग्ल नटाच्या >>>
या हिशोबात डोकी आणि हृदयं आणू नयेत. ही तोंडं आहेत. >>>
अजून मैचित्र्यपूर्ण काही झाले नाही का येथे? की तिला क्रिएटर्स ब्लॉक आलेला आहे.
एका राहूल रॉयसदृश आंग्ल
एका राहूल रॉयसदृश आंग्ल नटाच्या कच्छपि लागल्या आहेत असे कळते>>>>>>
जी एस.. इथे बर्याच लोकाना
जी एस.. इथे बर्याच लोकाना कोकणातला समुद्र चालत नाही (अपथ्य) त्यामुळे त्यातून काही आणणे शक्य नाही. मागाहून शिव्या पडतात मला..
अजून मैचित्र्यपूर्ण काही झाले
अजून मैचित्र्यपूर्ण काही झाले नाही का येथे? >>> कमिंग सून ....
ते दरवाज्यात थांबून " ??"
ते दरवाज्यात थांबून " ??" करणारे तिघे म्हणजे प्राची , व्हि ताई, आणि एबाबा आहेत याची नोन्द घ्यावी
चित्रंही 'वराती मागून... '
चित्रंही 'वराती मागून... ' आलं...
Pages