हे घडेल का महाराष्ट्रात ?
(माणिक मुंढे नावाच्या व्यक्तीचा लेख असलेली एक पिडीएफ फाईल मेल मधे आली होती, ती टंकत आहे येथे. मुंढे यांना संपर्क करू शकलो नाहीये, पण त्यांचा काही आक्षेप असेल असे वाटत नाही. त्यामुळे कृपया कोणत्याही कुरापती काढू नयेत ही विनंती).
झोप झालेली नसते त्यावेळेस अहमदाबाद येतं. सकाळ काहीशी निळसर वाटते. थांबल्यासारखी. दिवस उजाडण्यापुर्वी भरून राहिलेलं एक नि:शब्द जग. अहमदाबादला उतरतो, घ्यायला गाडी आलेली असते. मला गांधीनगरला जायच असतं. गाडीत बसतो. अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर कायम गर्दी असते. काही जण अजुनही झोपेतच असतात. पण गाडी गांधीनगर रस्त्याला लागली की शहर भर्र्कन संपल्यासारखं वाटतं. शहरात कुठेही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या होर्डिंग्ज दिसत नाहीत. अहो आश्चर्यम.
अहमदाबाद कुठे संपतं आणि कुठे गांधीनगर सुरू होतं हे लक्षात येत नाही. पण गाडी चकाचक रस्त्यांना लागली, ट्रॅफिकचे साईन बोर्ड सगळे जिथल्या तिथे दिसले, थोडीशी झाडी दिसायला लागली, स्वच्छ चौपदरी रस्ता लागला की आपण गांधीनगरमधे असल्याचं ओळखायचं. माझी आणखी एक खूण, गाडीने नर्मदेचा पाण्याने भरलेला कॅनॉल ओलांडला की गांधीनगरमधे पोहोचल्याची पक्की खूण पटते.मला ही जास्त जवळची वाटते, कारण हे शांतपणे वाहणारे पाणी सातपुड्याच्या डोंगरात पडलेले असेल ज्याने गुजरात समृद्ध होतोय.
गांधीनगर हे राजधानीचे शहर, पण गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबादच. सगळे बाजार, व्यवहार अहमदाबादमधेच. काही मोठी खरेदी करायची झाली तरी गांधीनगरहून अहमदाबादला आलेलंच बरं. २० कि.मी. पाऊणतासाचा रस्ता. अहमदाबाद-गांधीनगर म्हणजे दोन जुळी शहरे. सिकंदराबाद-हैद्राबाद, पुणे-पिंपरी चिंचवडसारखी.
जसे अहमदाबादमधे कुठल्या पक्षाचे पोस्टर्स दिसत नाहीत तसे गांधीनगरमधेही नाहीत. ना काँग्रेस, ना भाजपा, ना नरेंद्र मोदी. गेल्या तिन एक महिन्यांपासुन माझी कधी महिन्याला तर कधी पंधरा दिवसाला मुंबई-अहमदाबाद-गांधीनगर अशी फेरी असते, होत राहतील, आमचे एक घर सद्ध्या गांधीनगरला आहे.
गांधीनगरला होणार्या चकरांनी माझ्यात सर्वात मोठा बदल कोणता झाला असेल तर मला वाटते मोदींबाबत माझे मत पुर्णपणे बदलले. मत बनविण्याची माझी एक पद्धत आहे. कोणी कितीही सांगितले तरी इतरांच्या सांगण्यावरून माझे अमुक अमुक म्हणुन मत बनत नाही. एक तर प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो किंवा मग सारासार विचाराची फूटपट्टी लावतो. मोदींबाबतही तसेच.
मोदींबाबत पाच सहा वर्षांपासुन उलटसुलट बरच काही ऐकून झालय. त्यामुळे नैसर्गिकरित्या एक प्रतिमा डोक्यात तयार झाली. गुजरात दंगे घडवणारे मोदी. ते वास्तव आहेच. ते मोदीही नाकारणार नाहीत. पण तरीही मी मोदींच्या नेतृत्वाने भारावलोय.
गुजरातमधे सद्ध्या व्हायब्रंट गुजरात समिट सुरू आहे. हे पाचवे जागतिक संमेलन. जवळपास ८० देशातुन उद्योगपती गांधीनगरला तीन दिवसांसाठी एकत्र आलेत. गुजरातच्या विविध भागात गुंतवणूक होण्यासाठी मोदींनी सुरू केलेले हे संमेलन दरवर्षी भरते. एका व्यासपीठावर येण्याचे टाळणारे अंबानी बंधू मोदींच्या दोन्ही बाजुला बसलेले दिसतायत. एवढेच नाही तर टाटा, गोदरेज, महिंद्रा ही मंडळीही व्यासपीठावर आहेत. त्यांच्यासोबर देशोदेशीचे उद्योगपती गुजरातच्या गुंतवणुकीवर चर्चा करतायत. मोदींना हे जे जमलय ते केंद्राला तरी जमेल ?
गुजरात हे उद्योगी लोकांचे राज्य आहे. इथले लोक रेल्वेत टक्क्यांच्याच गप्पा मारतात हा माझा अनुभव. पण मोदींनी फक्त व्यापार्यांचेच हित सांभाळले का ? नाही. मोदींनी गेल्या काही काळात राबवलेल्या काही भन्नाट आयडीया त्याचा पुरावा. काही आठवड्यांपुर्वी गेलो होतो त्यावेळेस तिथे मोदींच्या 'स्वागतम'ची चर्चा सुरू होती. मी थोडीशी माहिती घेतली आणि अवाक झालो.
स्वागतमची आयडिया अशी. समजा तुमचे एखादे काम भूमी अभिलेख कार्यालयात आहे आणि तिथला अधिकारी ते करत नसेल तर ते काम घेऊन तुम्ही तालुका 'स्वागतम'मधे जायचे. तहसिलदार दर्जाचा किंवा वरिष्ठाकडे तक्रार द्यायची. समजा त्यानेही काम नाही केले तर 'जिल्हा स्वागतम'मधे जिल्हाधिकार्यांकडे जायचे. तिथेही तक्रारीची दखल घेतली नाही तर मोदींकडे जायचे. मोदी 'स्वागतम'मधे आलेल्या तक्रारी संबंधित विभागांकडे पाठविल्या जातात. संबंधित अधिकार्यांसह राज्यभरातले जिल्हाधिकारी, एसपी मोदींसमोर लाईव्ह असतात. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दर काही महिन्यांनी सीएम स्वागतम असतेच.
तक्रारदाराला मोदी बाजुच्या खुर्चीवर बसवतात आणि संबंधित अधिकार्याला जाब विचारतात, का रे बाबा या व्यक्तीचे काम का नाही झाले ? अधिकार्याने जर सांगितले की तक्रारदाराने आवश्यक असलेले कागदपत्रे पुरवली नाहीत तर मोदी तक्रारदाराला विचारतात. समजा चूक अधिकार्याची असेल तर मोदी तिथेच आदेश जारी करतात. आणि समजा तक्रारदाराने आवश्यक बाबींची पुर्तता केली नसेल तर त्याला तसे सांगतात, पण मोदी निर्णय देतात हे नक्की. विशेष म्हणजे हिरोगिरी करत नाहीत. म्हणजे उगीचच अधिकार्यांना झापत नाहीत. किंवा तक्रारदार सरळ मोदींकडेच आला असेल तर त्याला अगोदर संबंधित पहिल्या अधिकार्याकडे पाठवतात. तालुका स्वागतम मधे हे विशेष.
स्वागतम मधे जाऊन आलेल्या एका पोलिस अधिकार्याने सांगितलेला अनुभव अधिक बोलका आहे. एकजण मोदी स्वागतम मधे एका अनधिकृत बिल्डिंगची तक्रार घेऊन गेला. बिल्डिंग तर अनधिकृत आहेच पण सोसायटीतले लोक त्रास देतायत अशी तक्रार. मोदींनी संबंधित शहराच्या जिल्हाधिकारी आणि संबंधित पालिकेच्या अधिकार्यांना विचारले की तक्रारीत किती तथ्य आहे ? अधिकार्याला स्पष्ट उत्तर देता येईना. त्याची तारांबळ उडाली. मोदींनी एक साधा प्रश्न विचारला की बिल्डिंग अनधिकृत आहे की नाही ? अधिकार्याने अखेर सांगितले हो --- अनधिकृत आहे --- मग पाडली का गेली नाही ? मोदींचा पुढचा प्रश्न. कारण बिल्डिंगमधे सगळे दादा लोक राहतात. अधिकार्याचे उत्तर --- मोदींनी फॅक्सवरून बिल्डिंगचे सगळे कागदपत्रं लगेचच मागवून घेतली. वरिष्ठ अधिकार्यांनी ती तिथेच तपासली आणि अनधिकृत असल्याचे सांगितले. मोदींनी आदेश दिला की ही बिल्डिंग उद्या संध्याकाळपर्यंत पडली पाहिजे मग ती कुणाचीही असो आणि तसा रिपोर्ट सादर करा --- मोदींचा झटपट निर्णय.
या स्वागतमचा परिणाम असा आहे की कुठलाच अधिकारी एखाद्या व्यक्तीला भेटायचे टाळू शकत नाही. कारण भेट टाळली तर तो तक्रार मोदींकडे घेऊन जाईल अशी भीती. त्यातुन अधिकार्यांना फक्त भेट घ्यायचीय असे नाही तर तक्रारीचे निवारणही करायचेय म्हणजेच काहीही करून कामातुन सुटका नाही. आपल्याकडे हे कधी होईल ? आमदार, मंत्र्यांचा दरबार भरवला तर त्यात तेच गायब असतात आणि अधिकारी तिकडे फिरकत नाहीत.
मोदींनी इतर राबवलेल्या काही कल्पनांनी तर अवाक व्हायला होते. गुजरातला वाचते करायचे तर काय करावे ? मोदींनी सांगितले, ' वाँच्छे गुजरात '. म्हणजे राज्यातल्या सामान्य लोकांसह सगळे अधिकारी मग तो कारकून असो की सुपर क्लास वन. सगळ्यांनी कुठल्याही वाचनालयात जाऊन तासभर वाचायचे. काहीही वाचा पण वाचा. त्याची सुरूवात खुद्द मोदींनी केली. मोदीच गेले म्हटल्यावर मंत्री गेले, आख्खे मंत्रीमंडळ गेले म्हणजे अधिकारीही गेलेच, जावेच लागणार तसा अधिकृत आदेश असतो. अन्यथा कारवाई त्यामुळे दांडीला संधी कमी. वाचनाचा अहवाल अधिकार्यांना सादर करावा लागतो, त्यावर चर्चा होते. आपल्याकडे जसे ज्ञानेश्वरीचे पारायण होते तसे गुजरातमधे वाँछे गुजरातची पारायणे लागली. आख्खे गुजरात वाचत राहिले. एका कल्पनेने आख्खा गुजरात जोडला गेला. करिश्मा तयार होणार नाही तर काय ?
पुढच्या दोन आयडिया ऐकल्यानंतर तर तुम्हीही मोदींना दाद द्याल. मोदींनी ' गुणोत्सव ' नावाचा कार्यक्रम राबवला. म्हणजे राज्यातल्या सगळ्या अधिकार्यांनी मग तो क्लास वन असो की सुपर क्लास वन, प्रत्येक दिवशी पाच असे तीन दिवस १५ शाळांमधे जाऊन शिकवायचे. तीन दिवसांसाठी ही त्यांची अधिकृत ड्युटी. राज्याच्या मुख्य सचिवाचीही सुटका नाही. काय शिकवले त्याचा अहवाल सादर करायचा. कुठल्या अधिकार्याने कुठल्या शाळेत शिकवायचे याची अधिकृत लिस्ट दिली जाते. कुणीही उठून कुठेही जायचे नाही आणि पाट्या टाकून यायचे नाही. गावात गेल्यानंतर अधिकार्यांनी गावकर्यांशी बोलायचे. पुस्तके, गणवेषाचा प्रश्न असेल तर तो तिथेच सोडवायचा. परिणाम असा की राज्याच्या मुख्य सचिवालाही शाळेची काय स्थिती आहे हे कळते आणि लोकांनाही सरकार आपल्या शाळेत येते याचे समाधान वाटते. परिणाम गुजरातमधल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. मतदानाची टक्केवारी होती ९२ टक्के. सत्ता अर्थातच भाजपाचीच म्हणजेच मोदींचीच.
लोक आणि प्रशासन यांच्यातले अंतर मिटवायचे ? काय करावे ? मोदींनी सांगितले ' खेलोत्सव ' म्हणजे अख्ख्या गुजरातने खेळायचे. कल्पना चांगली आहे पण वाटते तितकी सोपी नाही. पैसा, व्यवस्था राबवावी लागते. पण ती हिट झाली. खेलोत्सवमधे अगोदर गाव पातळीवर लोक, स्थानिक नेते, अधिकार्यांनी खेळायचे. खेळ कुठलाही असो. खेळायचे. नंतर तालुक्यावर खेळायचे त्यानंतर जिल्ह्यावर नंतर विभागावर आणि नंतर फायनल राज्यपातळीवर. इथेही सगळे अधिकृत... खेळासाठी मोदी सरकार पैसे उपलब्ध करते. खेळणार्या अधिकार्यांच्या ड्युट्या तशा लावल्या जातात. गाव, तालुका, जिल्हा, विभाग सगळीकडे खेळ होतायत म्हणजेच आपोआपच मैदाने तयार झाली, असलेली सुधारली, नविन खेळाडू मिळाले. अधिकार्यांसोबत दोन हात करायची संधी लोकांना मिळाली. लोकांचा आणि अधिकार्यांचा उत्साह ओसंडून वाहणारा. काही अधिकारी त्यांच्या टीमची चर्चा करतायत हे दृश्यच मला सुखावणारं होतं. मोदी द ग्रेट.
आणखी एक गोष्ट सांगण्याचा मोह आवरत नाही. आता ज्या ठिकाणी व्हायब्रंट गुजरात समिट होतेय तिथेच मोदींनी महात्मा मंदिर उभारलंय. मंदिर म्हणजे गांधीजींचे मंदिर नाही तर त्यांच्या नावावर एक मोठी वास्तू उभी केली आहे, ज्यात समिट होत आहे. महात्मा मंदिराची उभारणीही भन्नाट झाली. मंदिराच्या पायाभरणीचा दिवस ठरवला. त्या दिवशी प्रत्येक गावच्या सरपंचाला गावची माती आणि पाणी घेऊन गांधीनगरला बोलावले. खुद्द मोदींनी प्रत्येक सरपंचाकडून माती-पाणी स्विकारले आणि त्यातून पायाभरणी झाली. प्रत्येक जोडप्याची व्यवस्थित आणून सोय केली. बोलावले आणि वार्यावर सोडले असे नाही. मोदींच्या एका कल्पनेने दूर गावत असलेला गावकरी आणि समिटमधे बसून चर्चा करणारा उदयोगपती जोडला गेला. चर्चा करणारे कुठल्या तरी दुसर्या जगातले लोक आहेत ही भावना त्या गावकर्यांच्या मनात येण्याऐवजी तो आपसूकच उद्योगपतींशी जोडला जातो. म्हणजे भारत आणि इंडिया मोदींनी एका कल्पनेने जोडण्याचा प्रयत्न केलाय.
गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही जुळी भावंडे. दोन्ही सुवर्णमहोत्सव साजरा करतायत. मला महाराष्ट्रात त्याचा फील आला नाही. गुजरातमधे त्याचा विसर पडत नाही. मी इथे एकही प्रश्न उपस्थित करणार नाही, कारण हे वाचल्यानंतर जे तुमच्या मनात येईल तेच माझ्या मनात आहे.
पुढची निवडणूक ज्यावेळेस येईल त्यावेळेस जर राहुल गांधींना मतदान द्यायचे की पंतप्रधानपदासाठी मोदींना तर मी मोदींची निवड करण्याचे निश्चित केलय. कारण दंगली कोण घडवत नाही ? पण एखादा तरी सुपर क्लास वन अधिकारी मग तो आयएएस असो की आयपीएस मला माझ्या गावात येताना पहायचय जे सद्ध्या अशक्य वाटते.
मग या अर्थी तर शीला दिक्षित
मग या अर्थी तर शीला दिक्षित सुध्दा सलग ३ वेळा निवडुन आली आहे...
शरदभाऊ मुद्दा इंटरेस्टींग
शरदभाऊ
मुद्दा इंटरेस्टींग आहे. राजकारण गेलं चुलीत.
वाचायला आवडेल.
महाराष्ट्राच्या विकासाला पण हे उदाहरण लागू होईल का ? पश्चिम घाटात जिथे विकास शक्य होता तिथे झालेला आहे. आता त्याचं ओझं झालय का ? ऊसाने प्रगती झाली, पण जमिनी उपजाऊ न राहण्याची सुरुवात झाली आहे. लिमिटेड बागात एकवटलेल्या विकासाचा फटका बसलेलं राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख होईल का ? या उदाहरणातून काय शिकणार ?
२०१४ च्या निवडणुकीमधे
२०१४ च्या निवडणुकीमधे त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येईल. नीतीश / मोदी / केजरीवाल / मुलायम / मायावती / ममता/ जयललिता / शरद पवार पैकी कुणी पीएम झाले तर काही नाही होणार. पण जर लालूप्रसाद यादव पीएम झाले तर मी त्यांच्याकडे जाऊन माझी कैफियत मांडणार.
हे महान लालूजी,
माझा मुलगा कामातून गेला आहे. लहानपणापासून आतल्या गाठीचा आणि पाताळयंत्री होताच तेव्हाच मी त्याला आवरायला पाहीजे होतं. पण मलाच चावेल असं वाटलं नाही. मला शेंडी लावून तो एका साईटवर गेला. तिथं विजय आंग्रे, भारतीय, गांधीलमाशी, ठो, कोकणस्थ, झोटिंग, वेताळ, माणुस, अजय सावरकर, असा अशा नावाने वावरू लागला. इथेही त्याची कपटनीती लक्षात आल्याने अनेकांनी त्याला हाकलून दिले. मग त्याला साईटवरून ब्लॉअ केले. तेव्हां त्याने भीष्मप्रतिज्ञा केली कि मी कधीच इथे येणार नाही. पण सवय जात नसल्याने लगेचच दुस-या दिवशी दुस-या नावाने हजर झाला. याने अण्णांच्या आंदोलनात अण्णांच्या विरोधात गेलेल्यांना अनेक आयडी काढून शिव्याशाप दिले होते. तर आता मोदींच्या विरोधात गेलेल्यांना शिव्या देत फिरतोय.
तेव्हां माझ्या या मुलाला अनेक आयडींमधून शोधून काढून त्याच्यावर इलाज करून माझ्या ताब्यात द्यावे ही विनंती. याने त्याच्यावर विश्वास ठेवलेल्या काही मित्रांचाही घात केलेला आहे आणि आता स्वभावाप्रमाणे उल्टाप्रचार करतो आहे. ते मित्र आता त्याचे कारनामे उघड करणार आहेत. कसाही वेडावाकडा असला तरी माझाच मुलगा असल्याने मी घबरलो आहे.
त्याला त्याच्या गुन्ह्यांची सजा देऊन येणा-या संकटापासून वाचवण्यासाठी आपण मदत करावी.
उदयन, गुजरातेत मोदींनी ज्या
उदयन, गुजरातेत मोदींनी ज्या उद्योगात लोकांचा इंटरेस्ट आहे, त्याला अधिक चालना दिली. बाकी बाबतीत गुजरात मागेच आहे. पण काँग्रेसने महाराष्ट्रात तेही केले नाही, ही खंत आहे. महाराष्ट्रात मुंबई पट्टा वगळता इतर क्षेत्राच्या ज्या गरजा आहेत, त्यांचा विचार केलाय का? तसं असतं तर दरवर्षी ऊस, कापूस यावर आंदोलन झालच नसतं. नाही का?
बाकी लघु-उद्योगात आपण कितीही वेगाने धावायचं म्हटलं तरी गुजरातच्या बरोबरिने यायला आपल्याला १५-२० वर्ष सहज लागतील, तसच इंजिनिअरिंग क्षेत्रात गुजरातलाही महाराष्ट्राची बरोबरी करायला वेळ लागेलच.
एकुण काय, सर्वांगिण विकासाचा विचार कोणी करताना दिसतच नाही. बहुदा पोट भरणे (जनतेचे किंवा स्वतःचे), या पलिकडे जाउन काही करायला वेळ, पैसा, नियोजन दिसत नाही, किंवा ते कागदावरच आहेत.
गुजरातच्या विकासाबद्दल तिथे
गुजरातच्या विकासाबद्दल तिथे प्रत्यक्ष फिरलेलेया एका माणसाचा लेख
जेव्हा कासव (कच्छ) धावू लागते!
जेव्हा कासव (कच्छ) धावू
जेव्हा कासव (कच्छ) धावू लागते!
ह्याला म्हणतात विकास,
कच्छ सारख्या वाळवंटात असे प र्यटकां साठी गाव वसवणे भारतात च काय पण अख्या आखाती देशात
ही घडलेल नाही. ईतकी चांगली व्यवस्था, चांगल्या सोई आणि चांगल प्लानिंग.
आता पर्यंत दुबईत जे होत तेच नेत्रदिपक असत असच सर्व साधारण चित्र मनात असे पण
हे मात्र डोळे उघड उदाहरण आहे. अस काही भारतात होऊ शकेल यावरच विश्वास नव्हता.
@ विचारवंत एका चांगल्या
@ विचारवंत
एका चांगल्या लेखाचा दुवा इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
गुजरात मॉडेल देशात इतरत्र
गुजरात मॉडेल देशात इतरत्र लागू होणार नाहीही कदाचित, पण तीव्र इच्छाशक्ती ही जगात कुठेही चमत्कार घडवू शकते. आणि मोदींकडे ती आहे.
भारत सरकारचे उत्तरदायित्व
भारत सरकारचे उत्तरदायित्व फक्त भारतात रहाणार्या भारतीय जनतेच्या मुलभूत गरजा, अपेक्षा, ईच्छा
पुर्ण करणे ईतकेच मर्यादित नसुन, भारता बाहेर रहाणार्या भारतीय नागरीकांच्या मुलभूत गरजा, अपेक्षा,
ईच्छा यांची पायमल्ली तर होत नाही हे पहाणे सुद्दा आहे.
जस अमेरिकन नागरीक कुठच्या ही देशात जाउन सांगु शकतो की तो अमेरिकन नागरीक आहे आणि त्याला
अमेरिकन सरकारचा पाठींबा आहे त्यामूळे कोणताही देश अश्या नागरीकांच काही ही वाकड करु शकत नाही.
तसेच फिलिपाइंस सारख्या छोट्या देशाच सरकारही नागरिकांच्या मागे ठाम पणे उभ रहाताना पाहीलेल आहे.
पण जर तुम्ही भारतीय दुतावासात गेला तर काय होत माहीत आहे. जर तुमच्यावर अन्याय होत असेल किंवा
पोलिस मागे लागले असतील तर तुमची बाजु ऐकुन घेण्याआधीच, तुम्ही काही तरी घोटाळा केला असलाच
पाहीजे हाच आक्षेप असतो. दुसरे, अश्या देशात भारतीयांची संख्याच ईतकी जास्त असते की त्या मानाने सेवा
द्यायला दुतावासत कर्मचारीच नसतात, त्यामुळे जे असतात तेही वैतागलेलेच असतात.
नाही म्हणायला आता पर्यंत भारत सरकारने युद्द घोषीत देशातील आपल्या नागरीकांना वाचवण्यासाठी
विमाने, बोटी पाठवलेल्या आहेत, पण तशी अपेक्षा सर्वच देशाच्या नागरीकाची त्या त्या देशाकडुन असते.
नविन सरकार आल तर सर्व स्तरांवरच्या सरकारी कर्मचार्यांच्या वर्तनात बदल अपेक्षीत आहे आणि समर्थ
सरकारच हे करु शकेल,
आता लोकसभेच्या विजयाचे रहस्य
आता लोकसभेच्या विजयाचे रहस्य काय असा लेख लिहा.
टोच्या ??
टोच्या ??
अ. एक पर्यटन स्थल विकसित
अ. एक पर्यटन स्थल विकसित केले तर इतका उदोउदो .
काय करणार, आता तर अख्या
काय करणार, आता तर अख्या देशाचीच सत्ता यांच्या हाती येतेय !!
उदो उदो करायला सज्ज रहा ! कडवे घोट प्यावे लागणार ब्बा !!
खालील लिंक मोदि द्वेष्ट्यांनी
खालील लिंक मोदि द्वेष्ट्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर पहावी; नंतर त्रागा करुन स्वतःचंच हसं करुन घेउ नये...
http://m.youtube.com/watch?feature=youtu.be&v=JIjMGNwStt0
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/modi-rally-in-varanasi/art...
ही बातमी काँग्रेस द्वेष्ट्यांनी आवर्जुन पहावी मग नंतर आयोगाच्या नावाने उर बडवत रहावे
काँग्रेस चा कपिल शर्मा
काँग्रेस चा कपिल शर्मा
https://www.youtube.com/watch?v=XwpXeOOMPE8
अमेरिकेचे अध्यक्ष : वाजले
अमेरिकेचे अध्यक्ष : वाजले किती?
पप्पू : मेड इन मिर्झापूर
-गा.पै.
त्यात चूकीचे काय बोलले आहेत
त्यात चूकीचे काय बोलले आहेत राहुलजी?
तुमच्यासारख्या ब्रायटनात बसून साहेबाच्या विजारी धुण्याची कामं ईमानेईतबारे करणार्यांना स्वदेशीचं महत्व कळणार नाही,
संघाचं स्वदेशीचं धोरण आहे म्हणतात ,मग आरेसेस आरजीला पाठिंबा देणार काय?
इडलीवाला, >> तुमच्यासारख्या
इडलीवाला,
>> तुमच्यासारख्या ब्रायटनात बसून साहेबाच्या विजारी धुण्याची कामं ईमानेईतबारे करणार्यांना स्वदेशीचं महत्व
>> कळणार नाही,
तरीच म्हंटलं आजून वैयक्तिक चिखलफेक कशी केली नाही माझ्यावर. किती वाजले तर ४ वाजले वा ५ वाजले असं उत्तर द्यायचं असतं. मेड इन मिर्झापूर हे उत्तर नाही. विनोदाचा आस्वाद घेण्यासाठी आकलनाची किमान पातळी असणं आवश्यक आहे.
आ.न.,
-गा.पै.
टीप : साहेबाच्या विजारी साहेबच धुतो. धुलाईयंत्रात टाकून. पण तुमचा जो जळफळाट होतो ना, त्यामुळे मला गुदगुल्या होतात.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/shockproof/artic...
हे घ्या अजुन एक रहस्य
रहस्य ,........... काही
रहस्य ,...........
काही महिन्यांपूर्वी राज्यात वीज दरवाढीमुळे नागरिक व उद्योजकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला होता. त्यानंतर राज्य सरकारने हस्तक्षेप करून अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याने दरवाढीला आळा बसला. त्यानंतर एक एप्रिल रोजी राज्यात वीज दरवाढ लागू झाली. मात्र, या अनुदानामुळे नागरिकांवर दरवाढीचा बोजा आलेला नाही.
अनुदान देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पैसे जनते कड्नच घेते !!
अनुदान देण्यासाठी महाराष्ट्र
अनुदान देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पैसे जनते कड्नच घेते !! >
मग भाववाढ झाल्यावर केकाटु नये कारण ते पैसे सुध्दा जनते कडुनच येतात
गिरे तो भी चारो टांग उपरच
गिरे तो भी चारो टांग उपरच तुम्हारी......
तुमच्या सारखी एक पाय वर
तुमच्या सारखी एक पाय वर करायची सवय नाही
इडलीवाला, आजाच्या युगात कोण
इडलीवाला,
आजाच्या युगात कोण स्वदेशी आहेत ? भारतने मागच्या वर्षी $१४४B ( ८,४०,००० कोटी )चे कच्चे तेल आयात केले. जे दळणवळणासाठी वापरले जाते. तुम्ही जे अन्न खाता त्याचा प्रवास , तुमचा प्रवास ह्या सगळ्या गोष्टी परदेशी तेलातुन होतात.
भारताचा GDP $1700 आहे. म्हणजे जर १ रुपया कमवत असाल तर ९ पैसे परदेशी तेलावर खर्च करता.
आम्ही साहेबाच्या विजारी धुण्याची काम करुन भारतात पैसे पाठवतो. भरताची अथर् व्यवस्था मजबुत करण्यात मदत करतो.
राहुल बाबानी मगच्या १० वर्षात काय केले? बर पुढच्या २५ वर्षात त्याचाकडे काय plan आहेत जे मेड इन मिर्झापूर वस्तु अमेरिकेत विकु शकेल. कपिल शर्मा सुध्धा असेच काहीतरी बोलुन लोकाचे मनोरजन करत असातो.
मी काँग्रेस द्वेष्ट्यां नाही ह्या पक्षाला १२५ वर्षाचा इतिहास आहे. पण जे सरकार बनेल त्यात स्वताच्या हिमतीवर आलेला leader हवा. आई- बाबा च्या पुण्यई नी आलेला नको असे माझे मत आहे. राहुल बाबा कडे पात्रता नसताना त्याला काँग्रेस उपाध्यक्ष बनवते हे पटत नाही.
कुत्रा हा विश्वासु म्हणुनच स
कुत्रा हा विश्वासु म्हणुनच स र्वमान्य आहे, पण चिखलात लोळणारा डुक्कर चारही पाय वर आनंदात मग्न असतो,
बेताल वक्तव्यांनी हा धागा नटत
बेताल वक्तव्यांनी हा धागा नटत आहे.
राजु ठाकरे तुम्हाला आनंदात
राजु ठाकरे तुम्हाला आनंदात बघून बरे वाटले.
आपण सगळे वैय्यक्तिक चिखलफेक
आपण सगळे वैय्यक्तिक चिखलफेक यापलिकडे बघुया का? शेवटी आपले उद्दिष्ट बलशाली भारताचे आहे. ते कोण साध्य करतो याच्याशी आपल्याला काय? आज मोदी जी स्वप्ने दाखवत आहेत ती इतर कुणीही साध्य करुन दाखवली तर आपल्याला मोदी काय राहुल गांधी काय किंवा प्रणव मुखर्जी काय किंवा किंवा पी चिदंबरम काय, काय फरक पडतो?
इथेही वैयक्तिक आणि पातळी
इथेही वैयक्तिक आणि पातळी ओलांडुन हल्ला सुरु आहे तर..वाइट वाटलं माबो एक चांगल करमणुकीचं माध्यम होतं (आता होतं असच म्हणावं लागेल )
तुमच्यासारख्या ब्रायटनात बसून साहेबाच्या विजारी धुण्याची कामं ईमानेईतबारे करणार्यांना स्वदेशीचं महत्व कळणार नाही,>>> हाच न्याय लावायचा असेल तर भारतातल्या ९९ % आयटी कुंपन्या साहेबाच्या (ब्रिटीश आणि अमरिकन) विजारी इथे आणुन स्वस्तात धुउन इस्त्री वगैरे करुन देतात..
बाकी चालु द्या ....
रच्याकने...
सर्व राजकारनी निवडणुकीच्या वेळी एक्मेकांवर चिखलफेक करतिल, पण सरकारे बनली कि गळ्यात गळे घालुन एकत्र होतील मग "तु खा..पण मला सुद्धा दे, नाहीतर मी बोंब मारणार" हे सुरु करतील..पडद्या आड हे सगळे एकत्र असतात हे कोणिही नाकारु शकनार नाही (अर्थात अपवाद असनारच)
पण तुमच्या आमच्या सारखे जे आत्ता एकेमेकांना विविध प्राण्यांची नावे देत सुटलेत ते नंतर असे राजकारण्यांसारखे एकत्र येनार काय?
Pages