Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे सोडा रे त्यांना... सगळं
अरे सोडा रे त्यांना...
सगळं घरातल्या सारखं वगैरे दाखवलं तर सिरियल कशाला पहायची... अर्धातास आपल्या घरातलेच प्रसंग सोफ्यावर पाय पसरून बघत बसा..
अर्धातास आपल्या घरातलेच
अर्धातास आपल्या घरातलेच प्रसंग सोफ्यावर पाय पसरून बघत बसा.. डोळा मारा>>>>:हहगलो:
घरात नेहेमी हेच रामायण महाभारत होत असते ना, आणी निदान या परक्या लोकाना मन मानेल तसे शाब्दिक झोडपता येते, घरच्याना कोण झोडपणार्?:खोखो:
अरे बापरे. बेफिंनी चौफेर
अरे बापरे.
बेफिंनी चौफेर फटकेबाजी केलेली आहे.
शिरेलीतील दम निघुन गेलेला आहे.
रश्मे
रश्मे
निदान या परक्या लोकाना मन
निदान या परक्या लोकाना मन मानेल तसे शाब्दिक झोडपता येते, घरच्याना कोण झोडपणार्?<<<
काही लोकं लग्नाच्या आधी का
काही लोकं लग्नाच्या आधी का नंतर घालतात कोणातरी देवी/देवाच्या नावाने तसला>> आधीचा गोंधळ वेगळा गो... पालक लोकं घालतात तो खरा गोंधळ (देवीदेवतांना आवाहन करायचं)लग्ना नंतर घालतात झंपे... नंतर खर्रा खुर्रा गोंधळ होऊ नये म्हणून...:) माझ्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडे घालायची पद्धत आहे, पण आमच्या कुठल्याच विधी धड केल्या नव्हत्या साखरपुडा आणि लग्न सोडून इंटरकास्ट लग्न म्हणून (हेही नसे थोडके )
बेफी काही खातापिताना किंवा हापीसात तुमच्या प्रतिक्रिया अज्जीबात वाचायच्या नाहीत असं ठरवलेय...
होसूमीयाघ आणि जुयेरे ह्यांची कथानके एकत्र झाली तर काय होईल असा एक काल्पनिक धागा काढावा असे मनात येऊन राहिले आहे.>> गुरू , हो जाओ शुरू
काल मेघना badminton खेळली आणि कणिक भिजवायची वेळ आली तेव्हा कंबर आणि हात लागले दुखायला >> तब्बेतीच्या मानाने फार्र्च बाबा नाजूक काम... अर्थात आधीच कामाची हौस त्यात पडला पाऊस!!!
बेफी , रश्मी .. रताळी ..
बेफी , रश्मी ..
रताळी .. गोगलकाय .. काय उपमा सुचतायत
मेघनासारख्या मुलींना आम्ही
मेघनासारख्या मुलींना आम्ही 'मंदाकिनी' म्हणायचो कॉलेजमधे असताना
का?
का?
मंद असतात काही काही मुली
मंद असतात काही काही मुली म्हणून बाकी काही नाही
अच्छा अच्छा! मला वाटले मेघना
अच्छा अच्छा! मला वाटले मेघना धबधब्यात वगैरे उभी राहिलेली दाखवली की काय!
हाहा मला वाटलेच असा प्रतिसाद
हाहा मला वाटलेच असा प्रतिसाद येऊ शकतो...
अंजली, ती मेघना कामाला मंद
अंजली, ती मेघना कामाला मंद आहे पण डोक्याने लई हुशार आहे.
हाऊ प्रेडिक्टेबल आय हॅव बिकम!
हाऊ प्रेडिक्टेबल आय हॅव बिकम! मला वाटते मी आता अश्या सिरियल्सच्या कथा लिहिण्यास पात्र झालेलो आहे.
बाकी प्राजक्ता माळीचं गाणं
बाकी प्राजक्ता माळीचं गाणं होतं, पावसात भिजतानाचं झी अवॉर्ड्समध्ये.
(No subject)
सारख सारख आजारि पडते आणि जाऊ
सारख सारख आजारि पडते आणि जाऊ आणि सासु जेवणाच ताट आगदि खोलि पर्यंत आणुन देतात.कित्ति ते नखरे.
मला तरि तो आ. दे. बावळट वाटू लागला आहे.
१.एक तर पदरच पेट्रोल कर्च करुन कशाला तिला त्या बागेपर्यंत घेऊन जायच????तुझ तू जा आणी येताना त्याला सोडायला सांग अस म्हणयच.
२.आता ते घड्याळ कशासाठि????ही पण बाई इतकि निर्लज्ज आणि निगरघट्ट आहे.अदु अदु म्हणत ते घड्याळ लगेच घातलि सुध्हा.आ. दे. भरपूरच पगार आहे असे वाटते.
आम्हि इतक राब राब राबतो तरि नवरा ह्या पदावर असलेलि व्यक्ति एक सेलेब्रेशन लक्शात ठेवलि तर शप्पत...आणी हा कशात काहि नाहि ते उगाच्,ते स्तडि तेबल काय्,ते पेन काय्,घड्याळ काय आणी ते कमि म्हणून कि काय्,पेट्रोल काय....बाप रे.
अवांतर : हम दिल....मध्ये अजय देवगण ने आपलि अस्वथता,प्रेमभंग,फसवणूक दाखवतान्,सुरेख काम केले आहे.उगच नस्ते गिफ्ट्,वगरे वायफळपणा नाहि त्यात.तिला स.खा. कडे नेण्याचि जवाब्दारि जरि घेतला तरि ऐश्वर्या(नंदिनी) ला गमवाव लागणार हे दु:ख त्याने आपल्या अभिनयातून छान सादर केले आहे.
ते काहि ह्या आ. दे. ला नाहि जमल. हो हो हो हो हो हो......अस बॅ.म्युसिक लाऊन बसल कि काम झाल.काम कमि आणि विचार करत बसणेच जास्त.पार देवदास हि लाजुन जाईल,असा हा उदा(देवदा)स बसलेला असतो.
ही सिरियल बघून एक मात्र नक्की
ही सिरियल बघून एक मात्र नक्की वाटत ... तो आधीचा आदित्य खुप हशार दिसतोय त्याने आधीच त्या मन्द मेघनाला टान्ग मारुन गेला.....आताचा आदित्यपण मधूनमधून सिग्नल देत असतो तु गेलीस तरि चालेल या घरातून
मेघनासारख्या मुलींना आम्ही
मेघनासारख्या मुलींना आम्ही 'मंदाकिनी' म्हणायचो कॉलेजमधे असताना >> +1
माझी एक साळसुद शंका! आपल्याला
माझी एक साळसुद शंका! आपल्याला या मालिका दाखवुन छळणारे, त्रास देणारे हे लोक, कुठल्याही मालिकेत आणि कुठल्याही खोलीत टी.व्ही. का दाखवत नाहित? स्वयंपाक झाल्यावर इतर काहिही काम न करणाऱ्या या बायका संबंध दिवस करतात तरी काय? गोखले किंवा देसाई कधी टी.व्ही. बघत नाहीत का?
देसाईंचा घरातल्या भिंतींना
देसाईंचा घरातल्या भिंतींना चौक भोक का आहेत.बरीच मोठि आहेत
मेघनाचे विचित्र भाव बघून अशी
मेघनाचे विचित्र भाव बघून अशी शंका येते की हिला बद्धकोष्ट तर नाही ना? सारख्या कपाळावर आठ्या असतात. सतत अरे, पण, नाही, काही नाही अशी मोजकेच शब्द बोलत असते. Engineering करत आहे काय, extra lectures असतात बघावे तेव्हा.
आम्हि इतक राब राब राबतो तरि
आम्हि इतक राब राब राबतो तरि नवरा ह्या पदावर असलेलि व्यक्ति एक सेलेब्रेशन लक्शात ठेवलि तर शप्पत...
ह्हगलो
(No subject)
आज ती परिक्षेला गेली.
आज ती परिक्षेला गेली. जाण्याआधी सासू सासर्यांना नमस्कार, देवाला नमस्कार, हातावर दही ठेवणे, वहिनीने लटके झापणे, नवर्याने हस्तांदोलन करून शुभेच्छा देणे व हे सगळे होत असताना भेदरलेला, रडवेला, टोकाच्या सद्गुणी सुनेचा चेहरा करून वावरणे हे प्रकार झाले.
कॉलेजमध्ये जुना आदित्य (मेघनाला कॉलेजमध्ये सोडून परत निघालेल्या) नव्या आदित्यकडे लक्ष न जाऊन मित्राला सांगत जातो की मेघनाने त्याला दिलेले जे पेन आहे ते पेन त्याच्याकडे असल्यामुळे पेपर सहज सोडवू शकेल.
दीवारमधील अमिताभचा बिल्ला पडल्यावरच त्याला गोळ्याबिळ्या लागू शकतात तसे ते पेन हारवले तरच जुना आदित्य तिच्या आयुष्यातून जाईल असे वाटत आहे.
टीप १ - वरील सर्व प्रसंग शेवटच्या सात आठ मिनिटांत घडले. आधी काय घडले ते माहीत नाही.
टीप २ - आज तिने एक हिरवा ड्रेस घातलेला होता व ह्या गोष्टीची तिला स्वतःला कल्पना होती की नाही हे समजू शकले नाही.
टीप ३ - तिला एखाद्या आय पी एल सामन्यात चीअरगर्ल म्हणून घेतले गेले तर ती टूर्नामेंट रद्द करून दाखवण्याची क्षमता तिच्यात आहे.
आभारी आहे.
(No subject)
बेफी
बेफी
अहो बेफि ते शिरा प्रकरण,
अहो बेफि ते शिरा प्रकरण, भरवाभरवी विसरलात काय? कहर झाला आज.
आज डोकेच फिरले ते रडणे, भरवणे
आज डोकेच फिरले ते रडणे, भरवणे बघून. आता नाही बघणार २ दिवस, पेशन्स संपला.
आज त्या अर्चनाचे काम मस्त
आज त्या अर्चनाचे काम मस्त होते आणि तिची तडफड योग्य होती. काय त्या मेघनाला vip treatment. मग ती त्या आदुकडे कशाला जाईल. इथे मस्त सगळे तिच्यासाठी राब राब राबतात. हिच्या चुकांवर सारखं सारखं पांघरूण घालतात.
शिरा भरवताना पण किती नाटक, खाऊन मला तर काही होणार नाहीना, असं विचारल्यावर त्या अर्चना किंवा विजयाने एक मुस्कटात लावायला हवी होती तिच्या. एकतर शिरा करायला लागला वरून भरवायचं, वरून हिने संशय घ्यायचा, हा शिरा खाऊन काही होईल का?. बापरे, सगळं असह्य झालं बघताना.
Pages