साहित्य -
एक रेफ्रिजिरेटर (चालू)
आईसक्यूब ट्रे (न गळणारा)
पाणी (प्यायचे)
कृती -
१. एका तांब्यात (हे एका प्रकारचे भांडे असते) पाणी घ्यावे.
२. स्वच्छ धुतलेल्या आईसक्यूब ट्रे मध्ये ते हळूहळू ओतावे*.
३. पाणी भरलेला हा ट्रे न हिंदकाळता फ्रीजच्या डीप फ्रीजर मध्ये ठेवावा. (कृतीचा हा भाग फार अवघड आणि महत्वाचा आहे. भरलेला ट्रे एका हातात धरुन त्यातले पाणी न सांडता दुसर्या हाताने आधी फ्रीजचा आणि मग डीप फ्रीजरचा दरवाजा उघडणे हे एक परिश्रमसाध्य स्कील आहे.)
४. आता डीप फ्रीजचा आणि मग फ्रीजचा दरवाजा बंद करावा.
५. तुमच्या फ्रीजच्या लायकी प्रमाणे आणि तुमच्याकडे किती वेळ सलग वीज असते त्याप्रमाणे कधीतरी बर्फ तयार होईल.
६. बर्फ वापरायच्या वेळी तो ट्रे डायगोनली पकडून धुणे पिळल्याप्रमाणे हाताची हालचाल करावी. हे करताना काळजी घ्यावी कारण काही चुकार आईसक्यूब्स एकदम उडी मारुन नको तिथे पडू शकतात.
७. अशा प्रकारे तयार झालेला बर्फ इतर अनेक कृतीत वापरता येतो उदा. हळूच कॉलरमागून शर्टात टाकणे इ.इ.
* ही स्टेप करताना पाण्याशी गोड बोलल्यास चांगले आणि त्याला शिव्या घातल्यास खत्रूड आकाराचे क्यूब्स तयार होतात म्हणे. http://rationalwiki.org/wiki/Water_memory
फक्त इच्छाधारी नागांनाच नव्हे तर पाण्यालाही मेमरी असते हेच यावरुन सिद्ध होते.
बर्फाच्या अनवट कृतीकडून
बर्फाच्या अनवट कृतीकडून सकाळ्च्या तांब्याकडे ( इथे मा. अग्नीपंख यांनी गुगलेले जलपात्र या अर्थी हे शब्द वापरले आहेत.)
या धाग्याची धाव (मी घसरण म्हणत नाहीये...कारण धाग्याचे गांभिर्य राखण्याचे आवाहन धागाकर्ता श्री. आगाऊ यांनी केलेले आहे) चालू आहे असं नाही का वाट्त ?
मनीष, ट्रे डाव्या हातात
मनीष, ट्रे डाव्या हातात धरायला सांगीतला असता तर बुप्रावादी आणि उजव्या तर परंपरावादी हे बरोबर ठरले असते. ट्रे हातात धरा दातात नको एवढाच मुद्दा.
मनीष, ट्रे डाव्या हातात
मनीष, ट्रे डाव्या हातात धरायला सांगीतला असता तर बुप्रावादी आणि उजव्या तर परंपरावादी हे बरोबर ठरले असते. ट्रे हातात धरा दातात नको एवढाच मुद्दा.>>>
आगाउ लै भारी
पण दातात तर तृण धरतात ना ? ट्रे का?
आगावा
आगावा
मी विचार करत आहे शोलेचा ठाकुर
मी विचार करत आहे शोलेचा ठाकुर कोणत्या हातात ट्रे पकडेल उजव्या की डाव्या
उत्तम रेसिपी आणि लेखन. इतर
उत्तम रेसिपी आणि लेखन. इतर उहापोह संपूर्ण वाचेनच पण आत्ताच्या एखाद्या पानावरुन घागर मे सागर (की तांब्या मे सागर ?) प्रकारचा अर्थबोध योग्य होतो आहे.
हिवाळ्यासाठी गरम बर्फावरही संशोधन चालू आहे असे कळते. सौर उर्जा रीव्हर्स वापरली जात असावी असा अंदाज आहे.
ट्रे हातात धरा दातात नको
ट्रे हातात धरा दातात नको एवढाच मुद्दा >>
गारेगार बर्फ करण्यात आले
गारेगार बर्फ करण्यात आले .परंतु थोडेच खाल्ले गेले .उरलेल्या दीड ट्रे बर्फाचे काय करावे? नासणार तर नाहीना?
शिळ्या बर्फाचे कोणते झटपट/ कमी तेल घालून पदार्थ करता येतील? (सांडगे/पापड सोडून)
ट्रे डाव्या हातात धरायला
ट्रे डाव्या हातात धरायला सांगीतला असता तर बुप्रावादी आणि उजव्या तर परंपरावादी हे बरोबर ठरले असते.>>>
जर ४-५ तासात बर्फ तयार झाला
जर ४-५ तासात बर्फ तयार झाला नाही तर फ्रिज उन्हात ठेवा. लगेच तयार होईल.
या बर्फाचे मन्चुरिअन करता येईल का?
(No subject)
बर्फाची लोणची ,मंचुरियन, करून
बर्फाची लोणची ,मंचुरियन, करून ,फ्युजन च्या नावाखाली धर्म बुडवायची थेरं आहेत. आप्ल्या महान संस्कृतीत हिमाला देवत्व दिलय अस वर कोणीतरी म्हटलय ना? व्यवस्थित आंघोळ करून शुचिर्भूत होउन तांब्याला नमस्कार करून श्लोक म्हणून पाणी ट्रेत ओतायची आप्ली परंप्रा बुडवायला टपलेल्या लोकांचा णिषेध!
बर्फाची लोणची ,मंचुरियन, करून
बर्फाची लोणची ,मंचुरियन, करून ,फ्युजन च्या नावाखाली धर्म बुडवायची थेरं आहेत. आप्ल्या महान संस्कृतीत हिमाला देवत्व दिलय अस वर कोणीतरी म्हटलय ना? व्यवस्थित आंघोळ करून शुचिर्भूत होउन तांब्याला नमस्कार करून श्लोक म्हणून पाणी ट्रेत ओतायची आप्ली परंप्रा बुडवायला टपलेल्या लोकांचा णिषेध!>>>>
इन्ना +१ अमा, तुम्ही लावलेला
इन्ना +१
अमा, तुम्ही लावलेला फोटो प्रताधिकारमुक्त आहे का?
Ice Dog??? khavavalaach
Ice Dog???
khavavalaach jaanar nahi mazyachyane
एकंदरित "तापलाय" बर्फ आमच्या
एकंदरित "तापलाय" बर्फ
आमच्या घरात समर व्हेकेशनमध्ये स्नो मॅन बनवायची टूम निघतेय (all credit goes to the world famous book "Snowman all year long") या रेस्पिने बनवायचा झाल्यास एका स्नो मॅनसाठी बर्फाचा अंदाज माबोकर्स देतील का
एका स्नो मॅनसाठी बर्फाचा
एका स्नो मॅनसाठी बर्फाचा अंदाज माबोकर्स देतील का>>>>>>>>>>>> त्या स्नो मॅनच्या उंची/रूंदीवर ते अवलंबून राहील.
आमचा स्नो मॅन डिझाइन फेजला
आमचा स्नो मॅन डिझाइन फेजला स्पाइडरमॅन इत़का उंच असतो. बर्फाचा ढिगारा गोळा करायला कष्ट लागताहेत असं लक्षात आलं की आम्ही हिमगौरीच्या सात बुटक्यांचं डिझाइन प्र्पोज करतो
ही रेस्पि मात्र कमी कटकटीची असल्याने असं वाटतंय की आमचा डिझाइन इश्यु न यावा. त्यामुळॅ पाचेक फुटी मध्यम बांध्याचा स्नो मॅन बनवावा म्हणतोय
स्नो मॅन ऐवजी हिममानव बनवा.
स्नो मॅन ऐवजी हिममानव बनवा. आणि सनातन भार्तिय सौस्कॄतीच जतन करा.
स्नो मॅनच का? डिस्क्रीमिनेशन.
स्नो मॅनच का? डिस्क्रीमिनेशन. णीषेध
अमित व आक्षेप घेणारे समस्त
अमित व आक्षेप घेणारे समस्त आमच्या पुस्तकाचं नाव बघा...नाही म्हणजे पुरावा आहे
अमित व आक्षेप घेणारे समस्त
अमित व आक्षेप घेणारे समस्त आमच्या पुस्तकाचं नाव बघा >> तुम्ही नवीन पुस्तक लिहा आणि विका. मराठी माणूस इथंच कमी पडतो.
पेट थेरपीने नाव सार्थ केलं
पेट थेरपीने नाव सार्थ केलं अगदी
पेथे, याचा हॉट डॉग करता येईल का?
सगळेच
सगळेच
गारेगार बर्फ मस्त झाल होता.
गारेगार बर्फ मस्त झाल होता. अता गरम गरम बर्फाची पण पाकृ येउ द्यात
कोणाला तरी तांब्याचे प्रचि
कोणाला तरी तांब्याचे प्रचि पाहिजे होते म्हणे !::अओ:
कुठे द्यावा कळलं नाही नीट, पण
कुठे द्यावा कळलं नाही नीट, पण त्यातल्या त्यात याच धाग्याला सुसंगत माहिती म्हणून इथे डकवते आहे - आधुनिक जगात मानवाने कृत्रिम गारवा कसा निर्माण केला आणि बर्फाच्या/गारव्याच्या सहाय्याने जगाचा चेहरामोहरा कसा बदलला त्याची रंजक गोष्ट
फ्रीज आधी किती डिग्री ला सेट
फ्रीज आधी किती डिग्री ला सेट करावा ?? बर्फ झाल्यानंतर रूम च्या तापमानाला आणायला लागेल का ?
अरे व्वा, मस्त आर्टिकल आहे
अरे व्वा, मस्त आर्टिकल आहे वरदा!
धाग्याला अगदीच सुसंगत आहे!
बर झाला धागा वर आला . थंडी
बर झाला धागा वर आला . थंडी संपायला आली आहे.
ही रेस्पि विस्मृतीत गेली होती .
उन्हाळयात ऐनवेळी धावाधाव करावी लागली असती .
Pages