साहित्य -
एक रेफ्रिजिरेटर (चालू)
आईसक्यूब ट्रे (न गळणारा)
पाणी (प्यायचे)
कृती -
१. एका तांब्यात (हे एका प्रकारचे भांडे असते) पाणी घ्यावे.
२. स्वच्छ धुतलेल्या आईसक्यूब ट्रे मध्ये ते हळूहळू ओतावे*.
३. पाणी भरलेला हा ट्रे न हिंदकाळता फ्रीजच्या डीप फ्रीजर मध्ये ठेवावा. (कृतीचा हा भाग फार अवघड आणि महत्वाचा आहे. भरलेला ट्रे एका हातात धरुन त्यातले पाणी न सांडता दुसर्या हाताने आधी फ्रीजचा आणि मग डीप फ्रीजरचा दरवाजा उघडणे हे एक परिश्रमसाध्य स्कील आहे.)
४. आता डीप फ्रीजचा आणि मग फ्रीजचा दरवाजा बंद करावा.
५. तुमच्या फ्रीजच्या लायकी प्रमाणे आणि तुमच्याकडे किती वेळ सलग वीज असते त्याप्रमाणे कधीतरी बर्फ तयार होईल.
६. बर्फ वापरायच्या वेळी तो ट्रे डायगोनली पकडून धुणे पिळल्याप्रमाणे हाताची हालचाल करावी. हे करताना काळजी घ्यावी कारण काही चुकार आईसक्यूब्स एकदम उडी मारुन नको तिथे पडू शकतात.
७. अशा प्रकारे तयार झालेला बर्फ इतर अनेक कृतीत वापरता येतो उदा. हळूच कॉलरमागून शर्टात टाकणे इ.इ.
* ही स्टेप करताना पाण्याशी गोड बोलल्यास चांगले आणि त्याला शिव्या घातल्यास खत्रूड आकाराचे क्यूब्स तयार होतात म्हणे. http://rationalwiki.org/wiki/Water_memory
फक्त इच्छाधारी नागांनाच नव्हे तर पाण्यालाही मेमरी असते हेच यावरुन सिद्ध होते.
गुगल महाशयांनी हे चित्र
गुगल महाशयांनी हे चित्र दाखवलेत 'तांब्या' असं शोधायला लावल्यावर.
यातिल क्रमांक ४ किंवा ५ हा प्रकार वरिल पाकृ करण्यासाठी वापरावा असा विचार चालु आहे. परंतु ह्या दोन पैकी कोणता फायनल करावा हा संभ्रम पडलाय.
अग्निपंख, तांब्यांबद्दलच्या
अग्निपंख,
तांब्यांबद्दलच्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायला हव्यात असे मत यानिमित्ताने इथे नोंदवितो.
मायबोलीचा अभ्यास वाढवा.
धन्नवाद!
परंतु ह्या दोन पैकी कोणता
परंतु ह्या दोन पैकी कोणता फायनल करावा हा संभ्रम पडलाय. >>> मुळ रेस्पीबरहुकुम करायचे असेल तर चार किंवा पाच वापरु नये असे माझे मत आहे.
हे भगवान...
हे भगवान...
पहिले चित्र फिरकीच्या
पहिले चित्र फिरकीच्या तांब्याचे आहे. तो फक्त आणि फक्त प्रवासात वापरला जात असे (अजूनही प्रवासात वापरणारे कुणी महाभाग असतील तर त्यांनी त्यांच्या चरणकमलांचे प्रचि इथे टाकावे). त्यामुळे तो तांब्या आगाऊला अभिप्रेत नसावा. नाहीतर पाकृमधे 'झाकण नीट उघडून घेणे' असं वाक्य टाकलं असतं
धन्यवाद वरदा, फिरकीचा
धन्यवाद वरदा, फिरकीचा त्यांब्या इथे अभिप्रेत नाही कारण हा लेखच 'फिरकी'चा आहे त्यात अजून तांब्याही तसाच कशाला?
कारण हा लेखच 'फिरकी'चा आहे
कारण हा लेखच 'फिरकी'चा आहे >>>
ह्या गारेगार बर्फाची पाकृ
ह्या गारेगार बर्फाची पाकृ वाचून फोडणी दिलेला बर्फ, पंचफोडण घालून बर्फ, दगडू बर्फ, शाही बर्फ, झटपट बर्फ, मायक्रोवेव्ह बर्फ अशा अनेक नव्या नव्या पाकृंची, किंवा किन्वा-बर्फ, बर्फाचे वडे, बर्फाची दा.कू. घालून कोशिंबीर इत्यादी अचंबित करणार्या पदार्थांची माबोवर गर्दी दाटू नये ही त्या गारेगार बर्फाचे चरणी सादर प्रार्थना!
अकु
अकु
फिरकीच्या लेखातल्या शखुबद्दल
फिरकीच्या लेखातल्या शखुबद्दल गिरक्या प्रतिसादात दिसत नाहित. ज्वलंत जाज्वल्य जागृत ़ जागरुक कोणीच/ काहिच नाही ?
अकु आप्पे
अकु आप्पे राहिले.
आप्पेपात्रातले सोप्पे बर्फ
बास झाल कि हे तांब्या प्रकरण
बास झाल कि हे तांब्या प्रकरण आणि गारेगार बर्फाची रेसिपी . एखाद्याची फिरकी घ्यायची म्हणजे किती घ्यायची . बरोबर वाटत नाही
आठवड्याचा एकदाच करुन ठेवला तर
आठवड्याचा एकदाच करुन ठेवला तर चालेल का? त्यातील पौष्टीक गुणधर्म कमी होतील का??
आठवड्याचा एकदम करून ठेवा पण
आठवड्याचा एकदम करून ठेवा पण कापून ठेवू नका. कापले कि पौष्टिक गुणधर्म कमी होतील
हा गारेगार बर्फ च्युईन्गम
हा गारेगार बर्फ च्युईन्गम म्हणून वापरता येईल. त्याची पाककृती पुढील प्रमाणे.
च्युईन्गम सारखा चघळण्यासाठी आधी बर्फाच्या पाण्यात थोडीशी पाकिटे चिटकवायची डिन्क पावडर, पिठीसाखर, व्हॅ किन्वा रोज इसेन्स घालुन ते पाणी चान्गलेच फेटुन घ्यावे. आणी मग फ्रिझ करावे.
तोन्डाला पण व्यायाम होईल.:स्मित:
विशेष सुचना: दाताला लागु देऊ नये. ते चिकटुन बसतील. आणी असे दिसतील.:फिदी:
हल्ली कशाचेही लोणचे घालतात.
हल्ली कशाचेही लोणचे घालतात. म्हणून एक कल्पना मनात आली............................
कहर आहे... बर्फाचे लोणचे.
कहर आहे... बर्फाचे लोणचे.
गजानन
गजानन
मी सिरिअसली बर्फाची काही नवी
मी सिरिअसली बर्फाची काही नवी कृती असेल असं वाटून उघडला
सगळ्यांनाच
बास झाल कि हे तांब्या प्रकरण
बास झाल कि हे तांब्या प्रकरण आणि गारेगार बर्फाची रेसिपी . एखाद्याची फिरकी घ्यायची म्हणजे किती घ्यायची
<<
त्या फोटोअमधल्या पहिल्या फिरकीच्या तांब्याबद्दल म्हणायचंय का तुम्हाला?
आज वाचलं हे बर्फपुराण...
आज वाचलं हे बर्फपुराण... सगळेच
रच्याकने, बर्फाचे लोणचे करता येते असं ऐकलं होत मी पणजीकडुन...बिनपाण्याचे बर्फाचे लोणचे
अन मग ते मुरवायला कुठे
अन मग ते मुरवायला कुठे ठेवायचे? नागपुरात घराच्या गच्चीवर?
इब्लिस नाही हो .त्या
इब्लिस नाही हो .त्या फोटोतल्या पहिल्या फिरकीच्या ताम्ब्याबद्दल बोलत नाहीये मी
सगळ्यांना कळलय मी कशाबद्दल आणि काय बोलतेय ते.
"अति तेथे माती " " थोडक्यात गोडी " या म्हणी कोणी ऐकल्या नाहीयेत का ?
लहान क्युब्ज झाले की मग
लहान क्युब्ज झाले की मग बर्फी म्हनायची का?
त्या फोटोअमधल्या पहिल्या
त्या फोटोअमधल्या पहिल्या फिरकीच्या तांब्याबद्दल म्हणायचंय का तुम्हाला?>>
नाही नाही 'सकाळ'च्या तांब्यांबद्दल आहे ते
नागपुरात घराच्या गच्चीवर? >>
नागपुरात घराच्या गच्चीवर? >> नाही नाही, अगदी कडक पथ्य पाळुन पाण्याचा अंशही न लागता तयार बर्फाचे लोणचे केले तर ते मुरायला गच्चीत ठेवावे लागत नाही म्हणे...
सकाळ चा तांब्या??? या काळात
सकाळ चा तांब्या???
या काळात कोण सकाळी तांब्या वापरेल???
उदयन, अजूनही अनेक ठिकाणी
उदयन, अजूनही अनेक ठिकाणी सकाळच्यावेळी घरातले लहान 'सकाळ' आणि मोठे तांब्या एकाच गोष्टीसाठी वापरतात.
तुमच्या प्रतिक्रियेला शहरी स्नॉबिशपणाचा वास येत आहे.
आगाऊ.. मी तुम्हाला एक या
आगाऊ.. मी तुम्हाला एक या कृतीच्या हमखास यशासाठी ट्रे फ्रीजरमध्ये ठेवताना उजव्या हातात धरायचा की डाव्या असा ज्येन्यूइन प्रश्न विचारला होता. तुम्ही अनुल्लेख केलात यातून तुम्ही अंनिस/बुप्रावादी आहात असं दिसतंय
अंनिस आणि अनिंस चा संबंध काय
अंनिस आणि अनिंस चा संबंध काय आहे?
Pages