जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्यु सारिका... Happy मला एका वेळेस फक्त ५-६ च मोदक खाता येतात...नॉर्मल साईझ चे...आत्ता पुरते तितके चालतील....

पानवेल म्हानजे काय?? खायची पानं असतात ती??? त्याची बाग असते?? मला माहीत नाही म्हणुन विचारतेय......आणि सोलापुरात गरम जास्त असते असं ऐकलय...मग कदाचीत त्यांच सोलापुर दुसरं असेल....

सोलापुर शिरेलीत ऐकुन आम्हाला चमकायला झाले. आमचे माहेर असुन जात नाही आम्ही उन्हाळात. ५ दिव्सातुन एकदा पिण्याचे पाणी येते.
हुश्श!

पानवेल म्हानजे काय?? खायची पानं असतात ती?? <<< होय... आणि त्या वेली इतर झाडांच्या आधाराने वाढतात.. लेखकाला थंड हवेचं ठिकाण 'सोलापूर' सुचावे हा विनोद आहे की काय हेही कळत नाही..

मला हि एक कळत नाहि,आजच्या जमान्यात अस कोण काका आहे जो ५ दिवस पुतणि + तिच अक्ख घर सहन करतोय...महागाई आणि व्यस्त जीवन ह्या गोष्टि लक्शात घेता,कोणिच कुणाचा घरि से ठाण मांडुन बसताना दिसणार नाहि.गेले ते दिवस,हे ह्याना कोण सांगणार.....

एक बर आहे, सगळ्या मालिकांतून ,काका लोक नेहमिच चांगले दाखवले आहेत

>>लेखकाला थंड हवेचं ठिकाण 'सोलापूर' सुचावे हा विनोद आहे की काय हेही कळत नाही<<

बहुधा विनोदच असावा. किंवा उन्हाने डोकं चालत नसावं(संवाद लेखकाचे, दिग्दर्शकाचे वगैरे).

(उन्हाळा खूप वाढलाय भारतात..)

>>>सोलापुर शिरेलीत ऐकुन आम्हाला चमकायला झाले. आमचे माहेर असुन जात नाही आम्ही उन्हाळात. ५ दिव्सातुन एकदा पिण्याचे पाणी येते.<<

टडोपा एकदम. Wink

बरं, कधीही हि सिरियल पाहिली की, वारंवार हेच मनात येते की, का चांगले ड्रेस नाही दिलेत मेघनाला व विजयाला? Proud
(कोणीतरी माझं दु:ख सांगा ना ...) Proud

मेघना जरा गुटगुटीत झालीय का?( आधी हा प्रश्ण विचारलेला, कोणीच चर्चा केली नाही... छ्या! ) Wink

मेघना जरा गुटगुटीत झालीय का?....जरा? आधिपासूनच आहे...अजून गुटगुटीत झाली तर बटबटीत दिसेल.
देसाई तिला पहिल्यांदा बघून येतात तेव्हा तिच्या गुटगुटीत असण्यावर चर्चाही करतात.

पण त्यांनी थंड हवेच्या ठिकाणी सोलापुरात जाऊया अस कुठे म्हटलंय. सोलापुरात सुट्टीला काकांकडे जाऊया एवढंच म्हटलं ना त्या विजयाने ?

पण त्यांनी थंड हवेच्या ठिकाणी सोलापुरात जाऊया अस कुठे म्हटलंय. सोलापुरात सुट्टीला काकांकडे जाऊया एवढंच म्हटलं ना त्या विजयाने ?>>>> पण त्या वर्णनावर १० मिन फुकट घालवली ना......आता तर आज पण त्या फंक्शन ला लेट येणार आहे...रडका चेहरा तसाच...आ दे तीला मस्त सुनवणार आहे....असच पाहीजे असच पाहीजे.... Wink

पण त्यांनी थंड हवेच्या ठिकाणी सोलापुरात जाऊया अस कुठे म्हटलंय. सोलापुरात सुट्टीला काकांकडे जाऊया एवढंच म्हटलं ना त्या विजयाने ?>>>> पण त्या वर्णनावर १० मिन फुकट घालवली ना......आता तर आज पण त्या फंक्शन ला लेट येणार आहे...रडका चेहरा तसाच...आ दे तीला मस्त सुनवणार आहे....असच पाहीजे असच पाहीजे.... Wink

आणि त्यांनी थंड हवेच्या ठिकाणी सोलापुरात जाऊया अस नाहीच म्हटलय...तिथल्या पानवेलीच्या बागेत गारवा असतो...अस म्हटलय...

विषेश काही झालं नाही.
आ न आणि मेघनाने गप्पा मारल्या (काय असतील ते जाणकारांना सांगायला नको)
सगळे नटुन थटुन बसलेले मेघनासाठी तरी मेघना आली नाही मग घरातले कसे कावले असतील आणि ते संवादही जाणकारांना सांगायला नकोतच.
मग आदे मेघना ओरडला आणि लगेच हिने सांगितलं की तिला आ न भेटलेला. मग त्याचे एक्स्प्रेशनही जा सां न!

इतकंच झालं!

सुटीत सोलापूरला जाण्यात काय वाईट आहे?? सगळ्यांचच आजोळ किंवा नातलग महाबळेश्वर, सापुतारा, नैनीतालचे असु शकत नाहीत ना?? Wink आम्च्या शाळेच्या सगळ्या उन्हाळ्याच्या सुट्टया सोलापूरात गेलेल्या आहेत Happy

बाकी ती सुतकी चेहर्‍याची मेघना आणि २४/७ तिला सावरणारा आदित्य पहायचा आता कंटाळा आलाय. गेल्या ५० एपिसोडपासुन सिरियल खाणे-पिणे, सणवार आणि मेघनाचे मुड सांभाळणे यातुन पुढे गेलेलीच नाहिये.

शिर्षकगीतासाठी सगळ्यांना अनुमोदन Happy

बरोबर आहे शुभांगी. Wink
लोकं उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात नाही का जात? किती मरणाचं उकडतं तिकडे... तरी गाड्या भरभरून लोकं जातात की नाही?

मंजू, आताही खूप वाटत जाव पण आमचच दुर्दैव, रजेचा प्रॉब्लेम फक्त आम्हालाच असतो ना ग Sad
ह्म्म, कोकणाबद्दल अनुमोदन.

Pages