निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील फोटो दिनेशदांकडून.
रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
सगळे चला आंबोलीला. या दिवसात
सगळे चला आंबोलीला. या दिवसात आंबोली म्हणजे स्वर्ग आहे अगदी. दुपारी थोडे गरम होते, पण तरीही फॅनची गरज पडत नाही. बाकी सकाळ संध्याकाळ मस्त असते हवा. आई सध्या आहे ना तिकडे.
साधना, इथे वाचुन खरच आंबोली
साधना, इथे वाचुन खरच आंबोली बघायची इच्छा होतेय. पण तिकडे तर पावसाळ्यात जातात ना?
मी दोन तीन वेळा पहिला पाऊस
मी दोन तीन वेळा पहिला पाऊस अंबोलीला अनुभवलाय... एकदा तर साधना आणि मंडळीसोबत भर पावसात अंबोली अनुभवली...
परवा "अनुभव" चित्रपटातले ( संजीव कुमार , तनुजा ) चे गीता दत्तचे, "मेरी जाँ, मुझे जाँ न कहो" बघत होतो.
मुंबईचा पाऊस आठवला. यू ट्यूबवर असेल हे गाणे. ( जिप्स्या, लिंक दे रे )
माझे आणि पावसाचे काय नाते आहे कुणाच ठाऊक.. इंचॉन ( कोरीया ), अक्रा ( घाना ), सिडने ( ऑस्ट्रेलिया ),
मबाले ( युगांडा ), किलिमांजारो ( टांझानिया ) फ्रँकफुर्ट ( जर्मनी ) अदीस अबाबा ( इथिओपिया ) ब्रसेल्स ( बेल्जियम ) या सर्व ठिकाणी मी एकेक दिवसच होतो.. आणि तिथला पाऊस अनुभवला !
आर्या, अंबोलीला सगळ्यात आधी
आर्या, अंबोलीला सगळ्यात आधी पाऊस पडतो. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वगैरे.
माझे आणि पावसाचे काय नाते आहे
माझे आणि पावसाचे काय नाते आहे कुणाच ठाऊक.. >>>>>> हे घ्या दिनेशदा .....
पावसाचे ! ( http://www.manogat.com/node/16759 )
प्रेषक फिनिक्स (बुध., २७/०५/२००९ - १४:४९)
दूर कोणी नाव घ्यावे पावसाचे
त्या क्षणाला गाव व्हावे पावसाचे
गंध मातीचा शिरे श्वासांमधूनी
दरवळूनी गात्र गावे पावसाचे
तेच दाटे माझिया डोळ्यात पाणी
गोत्र माझेही असावे पावसाचे
ओंजळीने थेंब झेलावे असे की
अंतराला दान जावे पावसाचे
पाखरांचे पंख घ्यावे दूर जावे
चेहऱ्याला रंग ल्यावे पावसाचे
स्पर्श त्याचा माळराने धुंद सारी
हात माझे कां नसावे पावसाचे
ही कुणाच्या चाहुलीने जाग येई
अंगणी पाऊल यावे पावसाचे
किती छान, शशांक !
किती छान, शशांक !
शशांकजी मस्त गाणे.
शशांकजी मस्त गाणे.
कसा ठडा ठंडा कुल कुल वाटते कि
कसा ठडा ठंडा कुल कुल वाटते कि नाही हे सारे वाचून!!!
प्रज्ञा मम.
प्रज्ञा मम.
स्पर्श त्याचा माळराने धुंद
स्पर्श त्याचा माळराने धुंद सारी
हात माझे कां नसावे पावसाचे
वा!!
पडतो. मे महिन्याच्या शेवटच्या
पडतो. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वगैरे.
<<
अर्रेव्वा! मग तर जाय्लाच हवे.
यावेळेस शोभा नि मी नक्की!
<<तेच दाटे माझिया डोळ्यात पाणी
गोत्र माझेही असावे पावसाचे<< अहा! किती सुंदर!
मस्त कविता. धन्यवाद शशांक इथे
मस्त कविता.
धन्यवाद शशांक इथे शेअर केल्याबद्दल.
शशांक कसलं गोड गाणं आहे हे..
शशांक कसलं गोड गाणं आहे हे..
खूप छान छान वाटत राहिलं वाचून संपल्यावरसुद्धा..
शशांक , मस्त कविता.
शशांक ,
मस्त कविता.
शशांक , छान कविता.
शशांक , छान कविता.
व्वा शशांकजी, अगदी समर्पक
व्वा शशांकजी, अगदी समर्पक कविता!
ह्या घ्या चिंचा
१.
२
चिंचा वा.
चिंचा वा.
सरिवा चिंचा..... तोपासु.. :
सरिवा चिंचा..... तोपासु..:) :
सारिवा, पाप लागणारेय तुम्हाला
सारिवा, पाप लागणारेय तुम्हाला
(No subject)
(No subject)
http://youtu.be/TFN8rzOGSqM ह
http://youtu.be/TFN8rzOGSqM
ही मुझे जा ना कहो मेरी जा ची लिन्क .....दिनेशसाठी . माझंही अत्यंत आवड्तं गाणं. फक्त उघ्ड्ता आली का सांगा.
सरिवा चिंचाचे आकडे अफलातून. आणि गुलाबी पेरू साठी काय मरायचोआम्ही शाळ्करी वयात!
साधना आमंत्रण मिळालेलं आहे.... बीवेअर ऑफ गेस्ट्स नाऊ!
शशांक कविता मस्तच!
मानुषीताई फोटो क्लासच.
मानुषीताई फोटो क्लासच.
थॅन्क्स अन्जू...ज्या
थॅन्क्स अन्जू...ज्या रस्त्यावर मी वॉक ला जाते त्या रस्त्यावरच्या दुतर्फा असलेल्या खराट्यांचं असं रूप बघायला मिळेल माहिती नव्हतं. सगळा परिसरातला निसर्ग जादूची कांडी फिरवल्यासारखा बदललाय.
मानु, फोटो खूपच सुर्रेख
मानु, फोटो खूपच सुर्रेख आलेत.. थंडीमुळे गारठलेले वृक्ष काळपट खराट्यासारखे उदास दिसतात खरंच... आता फुलांनी सजलेली आहेत नुस्ती.. मस्त!!!
आज स् छुवान प्रांता ची
आज स् छुवान प्रांता ची राजधानी ,' छंग तू ' ला उडून जातोय... उत्तरेकडील हे ठिकाण तेथील सीनिक ब्यूटी करता प्रसिद्ध आहे.. रात्री अजून मायनस १,२ टेंपरेचर आहे..
स् छुवान चे सॉस भारतात लोक्प्रिय आहे.. बोलो क्या??
वर्षू तुला चायनात जाऊन सर्दी
वर्षू तुला चायनात जाऊन सर्दी झालीये ़ का? नाही म्हट्लं अक्छी क्छू करतीयस!
तुला नक्की काय म्हणायचय म्हराटीत सांग ना!
http://youtu.be/tR-2xq6q5KA.....दिनेश हे पण माझं आवडतं गाणं गीता दत्तचं.
मानु
मानु
मानुषीताई
मानुषीताई
मानुषी, काय मस्त बहर आहे.
मानुषी, काय मस्त बहर आहे. जिथे थोडा काळच उन्हाळा असतो तिथे झाडांना असे भराभर फुलावेच लागते.
आधी फुले आणि मग पाने... आणि हो तीच लिंक.. शेमारूची १०१ जून्या गाण्यांची सिडी आणलीय. सर्व मस्त आहेत.
वर्षू, शेज्वान सॉस का ? तिथली मूळ चव नक्कीच वेगळी असणार.
Pages