निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू,ही तर कंटकारी म्हणजे Solanum xanthocarpum.आयुर्वेदात प्रामुख्याने श्वसनसंस्थेच्या विकारात वापरतात.इतरही औषधी उपयोग आहेत.याला छोटी वांग्यासारखी पिवळी फळे येतात.

आम्हाला सुट्टी शनवारी.. Happy

जिस्प्या वर्णनावरुन शिरीषच आहे. झाडावर लक्ष ठेव. फुले सुकली की खुप मोठ्या चप्पट शेंगा लागतात त्याला. अगदी लगेच लक्षात येतील अशा. रेनट्रीला येत नाहीत असल्या शेंगा.

कुंडीत माती न वापरता त्याजागी तळाला उसाचे चोयटे/वाळलेले गवत्[नारळाच्या शेंड्या त्यावर पालापाचोळा,भाज्यांची देठे ,चहाचा चोथा ,उरलेले अन्न,वगेरे कचरा वापरतात त्यात चमचाभर "कल्चर" [जसे दही बनविण्यासाठी दूधाला विरजण लावतो] घालतात.यामुळे खत तयार होते यात अळ्या-किडे,कुजका वास अजिबात येत नाही.तसेच हे गांडुळ खत ही नाही. हे कल्चर घरी कसे तयार करता येईल.पुण्याला सदाशीव पेठ /नारायण पेठेत एक गच्चीवरची बाग खूपच छान फुलवलेली पाहिली.त्यांच्याकडे हे कल्चर विकतात.या पद्धतीने झाडाला उत्तम फळे -फुले लौकर येतात .
या कल्चर बद्दल अधिक माहिती मिळेल का ? आरती ने या संदर्भात लिहीलेली माहिती वाचली आहे.पण हे विकत मिळणार्‍या कल्चर्/विरजणाबद्दल माहिती हवी आहे.

कोणा कशी कळावी, वेडात काय गोडी
ती प्रेममूढतेची, सुटती न गूढ कोडी..

लहरीवरी फिरावे, जळी घेत हेलकावे
तूडवीत कंटकाची, ती वाट नागमोडी...

कवि अनिलांची रचना आहे, कुमार गंधर्वांनी गायलीय.. कंटकावरून आठवली Happy

आणखी एक कडवे आहे ना ?
मी सहसा रिक्षा फिरवत नाही पण बालितल्या फोटोंचा शेवटचा भाग आज लिहिला आहे. अवश्य बघा.

हल्लो हल्लो... हो नक्की परतणार तोपर्यन्त!!! कच्चे लिंबु को याद करनेका शुक्रिया!!! ( आजच अरेबिक जेवण झाले त्याचा पर्णाम Wink )

साधने, निसर्ग ही उलटतो ना... त्या ढगफुटीत पाण्याचे लोंढे कसे सुसाट धावत सुटले, मधे झाडांचा अडसर नसल्यामुळे.. त्या भागात झाडं, नाही जंगलं तोडून टाकून हॉटेलं उभारलीयेत ती सर्व गेली मोडून, वाहून.. नै??

दिनेशदा खूप वर्षात नाही ऐकलं ते गाणं, पूर्वी रेडीओवर ऐकलंय, तुम्ही लिहिल्यावर आठवलं. लहान होते तेव्हा पण काही गाणी राहतात मनात. अजून आहे एक किंवा दोन कडवी. आठवणीतील गाणीमध्ये आहेका हे गाणं बघेन.

हो ग वर्षू, माणसानेच झाडे तोडुन हॉटेले बांधली ना. नसती बांध्जली किंवा एवढी हाव न करता काही ठेवली असती तरी फटका थोडा कमी बसला असता.

कोणा कशी कळावी, वेडात काय गोडी !
ती प्रेममूढतेची, सुटती न गूढ कोडी !

सोडून नावगावा
शोधावया विसावा
तुडवीत कंटकांची, ती वाट नागमोडी !

लहरीवरी फिरावे
जळि घेत हेलकावे
जाणोनि लोटिली मी, या वादळात होडी !

दिसती अजाण भोळे
परि हे फितूर डोळे
माझ्या मनोगताची, करितील ग चहाडी !

हसले कुणी हसू दे
रुसले कुणी रुसू दे
राही कबूतरांची दारा-घरात जोडी !

राजा बढेंनी लिहिलेय असे वाचले.

पण यात कबुतरे का आली????? आम्हाल मांजरांची जोडी चालेल.

वर्षू.. मंगोलियात जाणार का ? खुप जाहीराती बघितल्या इथे मी !

अन्जू.. कुमारांचेच आणखी एक गाणे होते.

प्रेम केले, प्रेम केले, काय हा झाला गुन्हा झाला
अंतरीची भावना, सांगू कुणा, सांगू कुणा..

साधना, नेक्स्ट भेटीत तू, जिप्सी आणी दिनेश चं गाणं ऐकलंच पाहिजे...
,'आम्हाल मांजरांची जोडी चालेल,'... शी... Biggrin

दिनेशदा ते 'प्रेम केले प्रेम' आहे यु ट्युबवर पण 'कोणा कशी कळावी' नाहीये.

माझं सर्वात आवडतं गाणं 'ऋणानुबंधाच्या', हे रेडीओवर सकाळी लागायचे बरेचदा, कुमारजींचच आहे.

अजून एक 'स्वीकारा ही पुजा आता उठी उठी गोपाळा', मला वाटतं हे अभिषेकींचं आहे.

अजून एक 'स्वीकारा ही पुजा आता उठी उठी गोपाळा', मला वाटतं हे अभिषेकींचं आहे >>> हे ही कुमारजींचच आहे. Happy माझी आवडती दोन - अजुनी रुसूनी आहे आणि सावरे आयै जै हो सावरे..

साधना, नेक्स्ट भेटीत तू, जिप्सी आणी दिनेश चं गाणं ऐकलंच पाहिजे...

माझे गाणे ऐकण्याची इच्छा केलीस म्हणजे तुला हौतात्म्य पत्करायचंय हे माझ्या लक्षात आलं.. ठिकाय.. नो प्रोब्लेम..

पण सोबत जिप्स्या न दिनेशची का गं वाट लावतेयस????? त्यांनी का म्हणुन शिक्षा सहन करायची???

बाप रे ....ते झाडांवर खिळे .....भयानकच.
साधने........मां़जरांची जोडी...यू आर म्हंजे अगदी टू मच Proud अगं कुमारजींच्या गाण्ञाबरोबर त्या फनी कॅट व्हिडीओजमधली मां़जरं तीही गाणारी दिसायला लागली ना मला. विथ ड्यू रिस्पेक्ट टू कुमारजी. मी त्यांची प्रचंड फॅन आहे.
वर्षू तूही लेकीकडे?

कुमारजींच्या गाण्यात मला नेहमीच माळव्यातला निसर्ग दिसतो.. मी तो कधीच न पाहिल्याने कायम गूढ वाटत राहिले आहे.

भायखळा स्टेशनसमोर फुलझाडांची दुकाने आहेत तिथे नक्की मिळेल. दादरला धुरू हॉलजवळ, चेंबूरला मार्केटजवळही अशी दुकाने आहेत.

अन्जू... मागे आपण रागांच्या भावांबद्दल बोललो होतो. पण निसर्गातले बाकीच्या घटकांनी पण संगीतक्षेत्रात
योगदान दिलेले आहे. सर्व सूरांच्या प्रेरणा हे निसर्गातले आवाजच आहेत. मोराकडून षडज, कोकिळेकडून गंधार, बैलाकडून ऋषभ, मेंढ्याकडून मध्यम...

अगदी काही रांगाच्या वा धूनांच्या मागेही निसर्ग आहेच. पं. शिवकुमार शर्मा यांचे संतूर आणि काश्मिरमधील एखादी व्हॅली, बिस्मिल्ला खान साहेबांची शहनाई आणि बनारसमधला गंगाघाट, कुमारांचे निर्गुणी भजन आणि माळव्यातली एक धूसर पहाट, केसरीया बालमा अशी आर्त साद आणि राजस्थानमधल्या वाळवंंटात हरवलेला बालम, मेरे साजन है उस पार अशी नावाड्याची साद आणि बंगालमधली संथ वाहणारी रुंद नदी, महाराष्ट्रातील अनवट गडकिल्ले आणि तशीच शाहीराही डफावरची थाप, गुजराथमधली सुगी आणि त्या आनंदात रंगलेला रासगरबा, उंटाच्या पाठीवरची हलती बैठक आणि एखादा टप्पा.. या सर्व प्रतिमा किती जुळतात ना !

Pages