जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता जिर्‍याची कोशिंबीर, आणि पैठणी या दोन नवीन भानगडी का?
आत्ता मला कळाले, आदेश भौजिंचा शो एव्हडा हिट्ट का ते.
तो आदे नको तिला पण त्याने आंणलेली पैठणी बळंच नेसली ते

पाणी आण असे सासूने सांगितल्यावर लिंबू सरबत आणते ती हल्ली! वर म्हणते सरबताने जरा एनर्जी येईल त्याला.

सरबताने एनर्जी येण्याची वेळ आलीय त्या आदित्यवर!

नेसणार एकदाची पैठणी पुढच्या भागात! पहिल्या रात्रीसाठी आदित्यने तिला घेतलेली व लपवून ठेवलेली! संपणार एकदाची ही मालिका! >>>मालिका अशीकशी एकदम संपेल...... तिचा गोंधळ अजून देसाई कुटुंबाला कळायचा आहे मग प्रत्येकाची त्यावर प्रतिक्रिया, रडारड्,राग, चर्चा ....मग ती घरी बाबांकडे निघून जाईल....आता मेघनाच्या बाबांनाही वाटत आहे कि मेघनाने सुखी व्हावे. ते तिला म्हणातील 'तुला हवं ते कर'...... मग या बाईला साक्षात्कार होईल कि तिचं आ दे वर प्रेम आहे.

मला वाटले आज तिला पैठणीत बघून आदित्यला राग येईल.....एकीकडे आ न च्या नावाने झुरते आणि दुसरीकडे आ दे ला बरं वाटेल असं वागते म्हणून.

आज माई म्हणते, "सहज हरण होते नाम घेता फुकाचे"

आज माई म्हणते, "सहज हरण होते नाम घेता फुकाचे">>>>> माई काय सगळ्यांनीच चुकीचे म्हटले. Happy
नाना कसे नव्हते आज त्यांनी एवढे श्रीखंड बनवले ना सगळ्यांसाठी.

मेघनाने आदेच्या हाताला हात लावून गुढीची पूजा केली. बा़की तोंड तसेच ठेवले...
कुडाळकरीण 'बाबाजी लक्ष असू द्या' असं म्हणाल्या..
देसाई जेवण तयार करत आहेत.. नेहमीप्रमाणे...
मग जेवताहेत... नेहमीप्रमाणे...
(खरोखरच 'हरण' म्हणाली)

हरण Rofl

कोणीतरी जेवता जेवता देवाचं नाव घेतलं आणि त्याचं हरणात रुपांतर झालं असं मी इमॅजिन करूनही पाहिल Uhoh Lol

ह्या सिरियलीच काही भवितव्य नाही.... तो डायरेक्टर आता खरेच गोंधळलाय...

डायरेक्टर कन्फ्युज की सिरियल कशी ढकलायची, मेघना कन्फुज आ. दे हवा की आ,न , तर इथे आ. दे. कन्फ्युज मेघना नक्की कोणाकडे जाईल? आता किती वेळ हि सिरियल कन्फ्युज होवुन आम्ही तरी बघायची. Proud

मेघनाने बाळसे धरलय ह्या मधल्या काळात मात्र..... डीप्रेशनमध्ये दोन घास ज्यास्त गिळतेय वाटतं. आजकाल गुटगुटीत वाटतेय.;)

सिरीयल बघत नाहीच!!! पण इथले अपडेट्स वाचतेय... यांच्या थोपू पानावर हा दुवा देण्याचा अपार मोह होतोय... सुधारणा झाल्या तर इथल्या उत्साही प्रेक्षक वाचकांसाठी चांगलंच आहे. Happy
हरण??? मी पण २ मिनीटं कन्फ्युज होऊन (ऑफीसात हळूच्चकन डोळे मिटून हात जोडून बोलून पाहीलं.. लहानपणच्या विस्मरणात गेलेल्या काही सवयी!! Happy वर गुगलूनही पाहीलं )

आता पुढच्या भागांत कधीतरी त्या हरणाची देसाई फेम स्टोरी घुसडून देतील... अमका लहान असताना चुकून 'हवन'च्या ऐवजी 'हरण' म्हणाला आणि मग तेव्हापासून देसायांकडे सगळे हरणच म्हणू लागले. मेघना ते सगळं नवलाईने ऐकेल आणि घश्यातल्या घश्यात हसेल.

या सिरियलीतल्या साड्यांचे एक बरे असते, फॉलपिको नको, मॅचिंग ब्लाऊज सुद्धा कायम रेडी..कम्माल. आमच्याकडे जुन्या साड्यांचे सुद्धा मॅचिंग सापडायचे मारामार

या सिरियलीतल्या साड्यांचे एक बरे असते, फॉलपिको नको, मॅचिंग ब्लाऊज सुद्धा कायम रेडी..कम्माल. आमच्याकडे जुन्या साड्यांचे सुद्धा मॅचिंग सापडायचे मारामार>>>> आणि सापडले तरी तेव्हाच्या आणि आत्ताच्या फिटींगची तर बोंबाबोंब...टक तरी नाहीतर उसवणे तरी...

काल ती विजया कसली घाण दिसत होती....साडी मस्त होती पण ती पुरुष दिसत होती साडीतला......
तीचे केस अगोदर पासुनच बावळटा सारखे कापलेले होते काल अजुनच लहान दिसले.....अजुन बावळट दिसत होती...
एकटा आदित्यच काय तो मला सुसह्य आहे तिथे.. Happy

काल ती विजया कसली घाण दिसत होती....साडी मस्त होती पण ती पुरुष दिसत होती साडीतला......<<<

मला वाटते तुम्ही डोळे तपासून का घेत नाही? तुम्हाला विजया पुरुष दिसायला लागलीय, मी काका दिसायला लागलोय.

तुम्ही काकाच आहात बेफिकिर.....काकी कस म्हणु??? चालत असेल तर मला प्रॉब नाही काकी म्हणायला.... Wink

<<या सिरियलीतल्या साड्यांचे एक बरे असते, फॉलपिको नको, मॅचिंग ब्लाऊज सुद्धा कायम रेडी..कम्माल. आमच्याकडे जुन्या साड्यांचे सुद्धा मॅचिंग सापडायचे मारामार>> +१ Lol

मधुगंधाचे चाहते आहेत ह्या बीबीवर अनुश्का , जरा जपून.

मला तर ती चपात्या करत शूटींगला आलीय वाटते, कॉटनचे ड्रेस, फ्रीझी हेअर आणि म्हणे
डीझाईनर.

Pages