मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्मानी
ओ मेरे शाहेखुबा ओ मेरी जाने-ए-जनाना असंच आहे ते.
जनाना म्हणजे स्त्री. जान्-ए-जनाना म्हणजे प्राणप्रिय सखी.. Happy

>>मान त्याची माझी आवळा Happy

मी आधी कदाचित हे पोस्ट केलं असेल, आठवत नाही, पण परवा परत हे गाणं ऐकलं आणि आठवण झाली......देव आनंद आणि (मला वाटतं) साधना ह्यांचं गाणं....एक बूत बनाऊंगा तेरा और पूजा करूंगा.....मला बरेच दिवस "एक भूत बनाउंगा तेरा" असं ऐकायला यायचं......

तसंच संजीव कुमार आणि जया भादुरीचं "बीती ना बिताई रैना बिरहाकी -- रैना" ह्यात मधला शब्द काय आहे? छाई असावा असं वाटतं पण नीट ऐकला तर "छाई" नाही....

ते असं आहे -

बीती न बिताई रैना बिरहा की जाई रैना
भीगी हुई अंखियों ने लाख बुझाई रैना...

रैना म्हण़जे रात्र. इथे एक आय डी आहे ना!

बिरहा की जाई रैना म्हणजे विरहातून जन्मलेली रात्र

ITgirl, Ashwinimami, varshu neil - धन्यवाद.

विरहातून जन्मलेली रात्र असा अर्थ आहे होय. तरी मी म्हटलं की "जाई" असेल तर "बिरहा की ना जाई रैना" असं असायला हवं Happy

शम्मी कपूरचं एक गाणं आहे, ते मी बरेच दिवस असं ऐकत होते "जूनका मौसम मस्त महिना". मग कळलं की ते "झूमता मौसम, मस्त महिना" आहे. Happy

जूनका मौसम मस्त महिना". >>>>>>>>>>>>>>>>>>:हाहा: लय भारी

हाहा.. जून का मौसम पण मस्त, झूमता महिनाच की...

बरेच दिवस मला:
"लकडी की काठी, काठी पे घोडा
घोडे की दुम पे जो मारा हथोडा."
हे गाने असे ऐकु यायचे
"लकडी की काठी, काठी पे घोडा
घोडे की दुम पे जो मारा है टोला."

मला एका पेक्षा एकचे गाणे असे एकु यायचे...' एका पेक्षा एक रे.. नंतर पाय शेक रे..'

नंतर पाय शेक रे..'>>>>>>>>>>>>>>>>>:हहगलो:

नंतर पाय शेक रे..'>>>>>>>>>>>>>>>>>:हहगलो:

नंतर पाय शेक रे..'>>>>>>>>>>>>>>>>>:हहगलो:

दक्षिणा, अगं ते जाने जानाना च आहे. मी काल यू ट्यूब वर पुन्हा नीट ऐकलं. दुसरं म्हणजे हेच गाणं आशा पारेख सुद्धा म्हणतांना दाखवलीये. आता ती जॉय मुखर्जीला प्राणप्रिय "सखी " म्हणेल असं नाही वाटत.

आई ग.....जॉय मुखर्जी हा मानव प्राणी "सख्या" पेक्षा "सखी" च जास्त दिसायचा. Happy ह्याच वर्गातला दुसरा प्राणी म्हणजे विश्वजीत!

हे मी मागे कदाचित पोस्ट केलं असेल इथे....आठवत नाहीये....एक गाणं आहे ते मी असं ऐकायची "हुजुरे वाला, जो हो इजाजत, तो हम ये सारे जहासे कह दे". माझे बाबा म्हणतात ते "हुजुरे आला" आहे. म्हणजे "आला हजरत" वगैरे सारखं. मी परत ऐकलं तरी मला "हुजुरे वाला" असंच ऐकायला येतं. काय आहे कोणास ठाऊक.

>>>"हुजुरे वाला, जो हो इजाजत, तो हम ये सारे जहासे कह दे".

स्वप्ना. मी हेच गाणे वो दोरेवाला... असे ऐकायचो.... Happy
----------------------------------------
मै जिंदगी का साथ निभाता चला गया ...

ते "मौसम बीता जाय" ऐकलय का कुणी ? मला ते मोसम्बी ताजाSSSय ऐकू यायच.

ते हुजुरे वाला च आहे त्या गाण्यात. मात्र 'हुजुरे आला ' असा वेगळा शब्द आहे. पेज ३ मधल्या हृशिता भट्ट वर चित्रीत झालेले व आशा भोसलेनी गायलेल्या गाण्यात (बेकरार कर डाला, छलका चाहतोंका प्याला ) 'हुजुरे आला' शब्द ओळीच्या शेवटी स्पष्ट ऐकू येतो. अर्थ दोन्हीचा जवळ जवळ एकच असावा.

shanky, amitdesai Happy robeenhood धन्यवाद!

मला "उडन खटोलेवाले राही" "उडंख टोले वाले राही" असं ऐकू यायचं. शेवटी एकदाचं ते गाणं पाहिलं आणि आईने दिलीप कुमार ज्या विमानातून जाताना दाखवलाय ते त्या राज्यात पडतं. आणि उडन खटोला म्हणजे विमान असा खुलासा केला. Happy तरी ते विमान पडल्यामुळे खटोला हा खटारा चे हिंदी रूप आहे असा संशय बरेच दिवस राहिला.

तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है....
....
तेरे बगैर जहां में कोई कमी सी थी
भटक रही थी जवानी अंधेरी राहों में
तू फुल दिल को मिला आके तेरी बाहोंमें..

हे ऐकलंय का? कित्येक वर्षानी ते 'सुकून' आहे हे कळलं.. तोपर्यंत असंच ऐकत होतो...

विनय

'चंद्र आहे साक्षीला' मी असं आत्ता आत्तापर्यंत असं म्हणायचो -

'पान जागे, फूल जागे
जागी ही शकुंतला..'

मागे एक दर्दभरे गाणे होते, त्यात असे होते की
जीवन पथ पर जीवन साथी
साथ चले है, मूंह ना मोरो

ते मला नेहेमी 'साथ चले है मैना मोरू' असे वाटायचे नि मग मी बराच वेळ विचार करीत बसे की या हिन्दी सिनेमात चिमणरावांचे मैना मोरू कुठून आले?

Happy Light 1

साथ चले है, मूंह ना मोरो

ते मला नेहेमी 'साथ चले है मैना मोरू' असे वाटायचे

>>>

कैच्या कै. काही स.म्बंध आहे का? एकदम वेगले शब्द आहेत. पण ओढून ताणून विनोद करण्यासाठी काहीतरी पुड्या सोडू नका. अगदी 'रसिया' (रशिया ) असे गायल्यावर मला इथिओपिया ऐकू आले असे म्हणण्यासारखे आहे ते.

तरीही तुम्हाला तसे ऐकू आले असल्यास तो आ.का.दो.समजावा Proud

माझ्या लहानपणी सैगलचे 'आ लौट के आजा मेरे मीत' हे गाणे एक काका त्यांच्या कार्यक्रमात
'आ लौट के आजा मेरे ट्यांउ, तुझे मेरे ट्यांउ बुलाते है
मेरा सुना पडा है ट्यांउ ट्यांउ, तुझे मेरे ट्यांउ बुलाते है'
असे म्हणायचे.

बाकी 'जय-वीरू' या चित्रपटातील 'तैनू ले...के जाना' हे गाणे 'तान्हुले केजण्णा' असे ऐकत होतो, त्यामुळे हे केजण्णा कोण असा प्रश्न पडत होता.

'जय-वीरू'??? ह्या शोलेमधल्या व्यक्तिरेखा आहेत हे ठाऊक आहे. हा पिक्चर कधी आला बुवा?

होय, जय-वीरू हा एक पडिक चित्रपट याच वर्षी मधल्या काळात येऊन गेला! यात फरदीन खान आणि कुणाल खेमू या दोघांच्या भूमिका होत्या. चित्रपट पाहिला नाही ,पण हे गाणे बर्‍यापैकी गाजले.

Pages