Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आणि ही मेघना पोटातून नाही
आणि ही मेघना पोटातून नाही बोलत, ओठातून वर वर बोलते घशातून गुटर्गु केल्यासारखं..
घशातून गुटर्गु केल्यासारखं >>
घशातून गुटर्गु केल्यासारखं >> डोळ्यासमोर घशातुन गुटर्गु असा आवाज काढणारी मेघना आली.
पण असा आवाज काढतांनाही तिच्या चेहेर्यावर शुन्य भाव आहेत.
बादवे त्या गिरीश ओकांच्या
बादवे त्या गिरीश ओकांच्या मुलीला नक्की कोण काय बोल्लं? मी नाही पाहिला तो एपि.
त्यावरुन चर्चा करण्यात परत अक्खा एपि घालवणार हे लोक.
>>>गिरीश ओकांच्या मुलीला
>>>गिरीश ओकांच्या मुलीला नक्की कोण काय बोल्लं? मी नाही पाहिला तो एपि<<<<
काही नाही गं, अति लाडावल्ली कारटी आहे ना, मग तिला अचानक तिची मेघना समोर चेष्टा केलेली सहन होत नाही. आणि दुसरे म्हणजे जरा जेलसी झालेली असते की मेघनाचे कौतुक खूप काहीही चुका केल्या तरी....
आज काय झाल ?
आज काय झाल ?
आज मेघनाने कबूल केलं कि पल्लव
आज मेघनाने कबूल केलं कि पल्लव पडला तेव्हा मीच तिथे होते आणी फोनवर बोलत असल्यामुळे माझं दुर्लक्ष झालं वगैरे वगैरे. मग विजयाची नवर्यावर चिडचिड तुला माहित असून तू सांगितलं नाहीस. आदित्यने मेघनाला पाठीशी घातल्याचेही तो सांगतो मग घरच्यांचं त्याच्यावर तोंडसुख वगैरे वगैरे.
म्हणजे आत्ता मेघनाला आदित्य
म्हणजे आत्ता मेघनाला आदित्य पाठीशी घालणार नाही तर देव बिव बनून. तिलाच तिच्या चुकांबद्दल ऐकून घ्याव लागेल . चला चांगली प्रगती आहे
मेघनाला आदित्य पाठीशी घालणार
मेघनाला आदित्य पाठीशी घालणार नाही>>>> अरे देवा..कठीण आहे..त्या मख्ख आणि हुप्प चेहर्याच्या मेघनेच्या तोंडातून शब्द फुटत नाही अर्धावेळ....ती कसली आपल्या चुका कबूल करतेय.... आदित्य आणि घरचे म्हणत राहतील " बोल गं घुमा", त्यावर ही बया म्हणेल ( स्वगतच हां प्रकट नाही, अवास्तव आशा बाळगू नयेत) "कशी मी बोलू"
अबोलीजाह्नवी, स्वगतच हां
अबोलीजाह्नवी,
स्वगतच हां प्रकट नाही, अवास्तव आशा बाळगू नयेत. +१
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=DiHDy00EbSg
इथे या मालिकेचे पुर्ण Tital track +lyrics आहे.निहिरा जोशी आणी स्वप्निलने खुप मस्त गायलय,मला याचे lyrics
आवड्ले.
आदित्यने मेघनाच्या बाबांना मस्त झापल.मेघना हळूहळू प्रेमात पड्तीये आदित्यच्या.
धन्यवाद रानभुल. मलाही खुप
धन्यवाद रानभुल.
मलाही खुप आवडते ते.
ही सिरीयल इतर सिरील पेक्शा
ही सिरीयल इतर सिरील पेक्शा वेगळी वाटतेय. (सध्यातरी)
ही सिरीयल इतर सिरील पेक्शा
ही सिरीयल इतर सिरील पेक्शा वेगळी वाटतेय. (सध्यातरी)>> अनुमोदन.
मला कालचा सुकन्या आणी तिच्या मुलीमधला संवाद आवड्ला.सुकन्याने कीती छान समजुन घेतली मेघनाची बाजु.
गिरिश ओक आणी सुकन्या याच्यातले संवाद पण छान असतात.
मला पण आवडते हि मालिका
मला पण आवडते हि मालिका
मला पण आवडते ही
मला पण आवडते ही मालिका.
सुकन्या मोने १ नंबर. संवाद ही खूप छान आहेत. आदित्यचे पात्रही खूप चांगले झाले आहे.ललित बदाने या अभिनेत्याने छान पेलली आहे ही भुमिका. याला आधी कधी कुठे पाहिला नाही. बहुधा पहिलाच रोल आहे.पण कुठेही
नवशिका वाटत नाही तो.
उदय टिकेकरांचा रोल ही मस्त. बुवाच्या आहारी गेलेली व्यक्ती त्यांनी छान उभी केली आहे.
बाबाजी म्हणतानाची अॅक्शन हिट.
माझ्या ऑफिसमध्ये बहुतेक सगळे
माझ्या ऑफिसमध्ये बहुतेक सगळे जण आता आपल्या बॉसला बाबाजी म्हणतात आणि कायम "बाबाजी, लक्ष्य असु द्या" असे म्हणतात. अर्थातच, त्यांच्यासमोर नाही.
मेघना अशी तिच्या त्या बाबाजी
मेघना अशी तिच्या त्या बाबाजी भक्त बापामुळे झालीये....आणि त्याच्या कडे पाहून कोणाचाही यावर लगेच विश्वास बसेल. आणि मला वाटत कि मेघनाच पात्र छान लिहिलेलं आहे. अश्या मुली असतात....मी पाहिल्यात अश्या.
आदित्य देसाईवर लऊ झालय
आदित्य देसाईवर लऊ झालय आपल्याला..ह्योच नवरा पायजेल. आणि एकंदर देसायांचं घर पण मस्त आहे. मेघनाला बाबाजी बाबाजी च्या तावडीतून अगदी मोकळं मोकळं वाटत असणार.
आदित्य कामानिमित्त बाहेरगावी जाणार या कल्पेनेने, मेघना जी काही हिरमूसून गेलिये, जाम गोड वाटलं..छानच फुलत चाललिये मैत्री किंवा त्यापेक्शा अजुन काहीतरी छान.
परवाच्या एपिसोडात ती एकटीच बस
परवाच्या एपिसोडात ती एकटीच बस स्टॉपवर उभी दाखवली आहे. आणि एक माणूस घिरट्या घालत होता. काय भानगड होती ती? मी एकिकडे ऑफिसच्या कॉलवर असल्याने नीट पाहू शकले नाही. मला घ्यायला ये असा फोन केलेला असतो का तिने आदित्य देसाईला? की नेहमी प्रमाणे लागत नसतो?
त्या मेघनाच्या आईचं कॅरॅक्टर
त्या मेघनाच्या आईचं कॅरॅक्टर करणार्या कलाकार कोण आहेत ?
कसले पर्फेक्ट भाव आहेत ना त्यांच्या चेहेर्यावर
दबलेल्या, वैतागलेल्या, काहीच से नसलेल्या इ.
कसले पर्फेक्ट भाव आहेत ना
कसले पर्फेक्ट भाव आहेत ना त्यांच्या चेहेर्यावर
दबलेल्या, वैतागलेल्या, काहीच से नसलेल्या>>>> आणि टीपीकल सरकारी ऑफिस काकू वाटतात.
मालिकेला आता जरा सूर सापडलाय
मालिकेला आता जरा सूर सापडलाय असं वाटतय !
देसाईज तर धमाल करताहेत छान अभिनय करून.
आता परीक्षा ललित-प्राजक्ताची तर आहेच पण दिग्दर्शक इ. ची पण आहे.
उगीच पाणी घालून गंमत घालवायला नको !
कालच्या एपिसोड मध्ये आदित्यनी
कालच्या एपिसोड मध्ये आदित्यनी आण्लेलं गिफ्ट आणि प्रोमोज मधलं गिफ्ट वेगवेगळं होतं ना ?
कालच्या एपिसोड मध्ये आदित्यनी
कालच्या एपिसोड मध्ये आदित्यनी आण्लेलं गिफ्ट आणि प्रोमोज मधलं गिफ्ट वेगवेगळं होतं ना ?>>>> येस रावी, प्रोमोजमध्ये स्टोन्सचे इअरिंग्ज दाखवले होते आणि एपिमध्ये स्टोन+मोती कॉम्बीनेशचे इअरिंग्ज दाखवले.... जाम घोळ घालत आहेत झी वाले.
आजच्या महाराष्ट्र टाइम्स
आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेल्या लेखाची लिंक खाली देत आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/movie-masti/tv/Babaji/moviearticl...
जाम घोळ घालत आहेत झी वाले.+१
जाम घोळ घालत आहेत झी वाले.+१
कालच्या एपिसोड मध्ये आदित्यनी
कालच्या एपिसोड मध्ये आदित्यनी आण्लेलं गिफ्ट आणि प्रोमोज मधलं गिफ्ट वेगवेगळं होतं ना ? >>
हो, गिफ्ट तर वेगळ होतंच , शिवाय आदित्यचा शर्ट पण वेगळा आहे दोन्ही वेळी.........
आदित्यनी आण्लेलं गिफ्ट आणि
आदित्यनी आण्लेलं गिफ्ट आणि प्रोमोज मधलं गिफ्ट वेगवेगळं होतं ना ? >>
>>>>>>>> आणि तो हैद्राबादला जाण्याअगोदर मला मिस करशील ?? असा प्रश्न मेघनाला विचारतो ते पण एपिसोड न प्रोमो मध्ये वेगळ वेगळ दाखवल आहे.
पण मेघना-आदी जोडी मस्त काम करते. गिरीश ओक, सुकन्या छान अभिनय करतात.
अन बाबाजी तर मस्तच!!!
मेघनाची आईसारख्या काकू असतात
मेघनाची आईसारख्या काकू असतात ना, नवरा एकदम दादागिरी करणारा.. सरकारी ऑफीसात नोकरी करत असूनसुद् अजागळ पणे रहाणाय. ( मला हे पात्र बघून एक जोशी काकू आठवल्या)
अगदी असतत असले लोक. मीहि असे
अगदी असतत असले लोक. मीहि असे अतिभक्त लोकल्खूप जवलून पहिलेत.पर्व च्य एपिसोद मधल मेघनच्य आइच
वाक्य अग्दी छन वतल"हो सुखिच आहोत अपन"
या अतिश्रधळू लोकन्वरून एक किस्सा अथावाला.
मझ्या आत्या च्या ओलखितले एक कुतुम्ब त्यात तिन व्याक्ति,आइ बाबा आणि मुल्गा. टिघन्चे ३ वेगले गुरु.
तिघान्च वेगळच बाबाजि बाबाजि. माझि आत्या त्यन्च्याकदगेकाहि काम सथी गेलि होती. लिविन्ग रूम च्या दराजवळ असलेल्य खूर्चित बसयला जाते न जाते तोच बाइ ओरदल्या कि नका नका त्या खूर्चित नक बसू. त्याच काय आहे ना कालम्हाणे आम्हि खूर्चि हलवलि. आनि योगयोग बघा मझ मुल्गा रत्री आल कमवरून आनि म्हनला ही खूर्चि हलवलि म्हनूनच बाबाजीन लगले. (त्याच्या गुरुन्चा पाय मोड्ला होता)
त्या कुटुम्बियान्चे अनुमान असे कि म्हाने ते बाबाजि अद्रुश्या रूपत य खूर्चिवर येउन अमच्यावर क्रुपद्रुश्ती थेवतात त्या दिवशि ते अद्रुश्या रूपत आले आनि बसयल गेले तेवच खूर्चि हलवलि तर ते पदले आनि त्यान्च पाय मोद्ल(खरोखर् ) तेवपसून म्हाने आम्हि ही खूर्चि हलवत नाही आणी कोणाला बसूही देत नही.
Pages