तर मंडळी...
२०१३ची पुणे मॅराथॉन १ डिसेंबरला आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु झालेलं आहे. अजूनही हातात जवळजवळ पावणे दोन महिने आहेत. तार आजच स्पर्धेत भाग घ्यायचा असं ठरवून टाका आणि तयारीला लागा..
विश्वास ठेवा.. पुण्यातल्या रस्त्यांवर गुलाबी (किंवा तत्सम) थंडीत आपल्यासाठी थांबवलेल्या ट्रॅफिककडे तु.क. टाकत पळायला लय भारी वाटतं.. !
ही वेबसाईट : http://www.marathonpune.com/index.html
बर्याच प्रकारच्या रेस आहेत. ६ के मध्ये तर नक्कीच भाग घेऊ शकता. १० के सुद्धा अवघड नाही.. अधेमधे चालायचं..
१. तुम्ही आत्तापर्यंत कधीच पळापळी केली नसेल तर हीच वेळ आहे !!
२. तुम्ही नेहेमी पळापळी करत असाल तर प्रश्नच नाही..
३. तुम्ही अनियमितपणे पळापळी करत असाल तर ती नियमित करण्यासाठी ह्या सारखी चांगली वेळ नाही.
त्यामुळे आळस झटका आणि पळायला लागा..
फिनीश लाईनला एक माबो गटग करून टाकू.. हाकानाका... ह्या धाग्याचा वापर तयारी बद्दलची चर्चा करण्यासाठी करू..
तर कोणकोण येणार ? पटापट हात वर करा !
(ह्या धाग्याचा किती उपयोग होईल माहित नाही.. पण म्हटलं काढून तरी बघू.. )
पराग, मनःपूर्वक अभिनंदन!
पराग, मनःपूर्वक अभिनंदन!
मॅरथॉन पळणार्या सगळ्या मायबोलीकरांचं अभिनंदन!
तुम्ही संयोजकांना फीडबॅक देणार का या गैरसोयींबद्दल?
मॅरेथॉनमध्ये भाग घेणार्या
मॅरेथॉनमध्ये भाग घेणार्या सगळ्यांचं अभिनंदन.
नाही जमत संयोजन तर आयोजितच कशाला करायचं म्हणते मी. अठ्ठावीसावं वर्ष आहे म्हणे हे.
पराग, कोणतं अॅप वापरलंस तू?
मस्त रे पराग.. तुझे आणि
मस्त रे पराग.. तुझे आणि बाकिच्या मॅराथॉन पळालेल्या माबोकरांचे अभिनंदन
पराग, Congrats Yo! आता
पराग, Congrats Yo! आता पुढच्या वेळी हायड्रेशन बेल्ट आणि फ्युएल पॅक्स लावून पळ. इथे पाणी, गेटरेड असून मी नेलेल्या पाण्यावरच पळलो. पाहिजे तेव्हा!
ते मुजिक, -हीदम आणि कदम बद्दल लिहायचे होते. पळताना हिप-हॉपला पर्याय नाही. मेंदू विचार करून थकायला न देण्याकरता हिप-हॉप -हीदम/रिपीट बीट्स लय भारी, पण त्याच तालावर कदम चालू राहतात. बाकी, शिव्यांचा काय अर्थ कळावा लागतो का? आपण ते 'मित्रा, पळ ... मातृमित्रा... च्यामारी अजून जोरात' असे ऐकायचे. बिगी, 2Pac, बस्टा, ड्रे, जे-झी, NWA, स्नूप, एम, रेज अगेन्स्ट द मशीन आणि अजून खूप... I owe you! Peace y'all...
इतर सर्वांचेही अभिनंदन!
मॅरेथॉनला गेलेल्या सर्वांचे
मॅरेथॉनला गेलेल्या सर्वांचे अभिनंदन!!
मॅरथॉन पळणार्या सगळ्या
मॅरथॉन पळणार्या सगळ्या मायबोलीकरांचं अभिनंदन!
धन्यवाद सगळ्यांना..
धन्यवाद सगळ्यांना..
विजिगीषु >>> लय भारी !
मेंदू विचार करून थकायला न देण्याकरता >>> मेंदू विचार करून थकायला वगैरे लागला की मुद्दाम त्याला भरकटवावं. मी मॅराथॉनच्या धाग्यावर लिहिलं होतं.. डे ड्रिमींग करावं! की आपण मस्त तंद्रीत जातो.. आजूबाजूचं काही कळत नाही.. मग 'जाग' आली की बरच अंतर काटलेलं असतं
मृ.. हो कळवणार तर.. त्यांच्या साईटवर फिडबॅकची जागा असेल तर तिथे नाहितर इमेल तरी नक्की करणार ! आज पेपरांमध्येही ढिसाळ संयोजनाबद्दल लिहून आलय.. विजेत्यानेही ट्रॅकवरच्या ट्रॅफिकबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
नाही जमत संयोजन तर आयोजितच कशाला करायचं म्हणते मी >>> अगदी अगदी आडो ! पुणे रनिंग सारख्या संस्थांना द्यावं संयोजन. ते उत्साहाने चांगलं तरी करतात..
आम्ही रनकिपर आणि माय ट्रॅक अशी दोन अॅप्स वापरली होती.
Congrats Parag and everyone
Congrats Parag and everyone who participated. Enjoy the 'Runner's high' as long as it lasts. That is the best feeling. And yes, the weather was perfect yesterday. Disappointed to read about the mismanagement.
Rest well.
Vidya.
पराग, इन्ना, हार्पेन आणि इतर
पराग, इन्ना, हार्पेन आणि इतर सगळ्या (अजून कोण कोण काल पळालं माहित नाही...) मॅरेथॉन रनर्सचं अभिनंदन.
काल घरचे नेट गंडले होते
काल घरचे नेट गंडले होते त्यामुळे आज लिहित आहे. मी पण माझी पहीली वहिली हाफ मॅरॅथॉन पुर्ण केलीच... मला चांगले २ तास ३३ मिनीटे ५१ सेकंद्स लागले.
http://results.bazumedia.com/event/results/event/event-6523
ह्या लिंकवर नाव किंवा बिब नं टाकले असता वेळ दिसू शकते. आपापल्या मित्रमंडळींपैकी कोणाचे बघायचे असल्यास उपयोग करावा.
पराग, सॉरी मी तुझी फोनची मेल शनीवारी रात्री उशीरा बघीतली त्यामुळे फोन केला नाही.
इथे प्रोत्साहन देणार्या सगळ्यांना अनेकानेक धन्यवाद!
मस्त पराग! अभिनंदन पळणार्या
मस्त पराग! अभिनंदन पळणार्या सार्यांचे. मी शेवटच्या क्षणापर्यंत आशा सोडली नव्हती, पण शेवटी नाही जमलं. आजारामुळे रविवार पूर्ण दिवस झोपून. असो. पळायची थोडीफार सवय झाली आहे, आणि ती कंटिन्यु करण्याची इच्छा आहे- हा त्यातल्या त्यात या सार्या उपद्व्यापातून झालेला फायदा.
अभिनंदन, हर्पेन
अभिनंदन हर्पेन
अभिनंदन हर्पेन
धन्यवाद भरत
धन्यवाद भरत
हर्पेन भाय अभिनंदन
हर्पेन भाय अभिनंदन
हर्पेन आणि पराग अभिनंदन!!!
हर्पेन आणि पराग अभिनंदन!!!
पराग, अभिनंदन तुम्हा सगळ्या
पराग, अभिनंदन तुम्हा सगळ्या मॅरेथॉनमध्ये पळणार्यांचं!
यावर्षी मी जून पासूनच पळायचे असे नक्की ठरवलेय. याआधी २००६ ला मॅरेथॉन पळलो होतो. त्यावेळी क्लायंट व्हिजिट नसेल तर नक्की पळणार! आता मुंबई मॅरेथॉनचा बाफ काढतो म्हणजे आणखीही पळणारे भेटतील.
धन्यवाद साजिरा, निवांत, मी
धन्यवाद साजिरा, निवांत, मी नताशा आणि गजानन मुंबई मॅरॅथॉनचा बाफ लवकर काढाच !
मस्त. सर्व धावपटूंचे अभिनंदन!
मस्त. सर्व धावपटूंचे अभिनंदन!
मॅरेथॉनमध्ये पळणार्यांचं
मॅरेथॉनमध्ये पळणार्यांचं अभिनंदन. पराग तुमच पण मेडल साठी विशेष अभिनंदन.
हर्पेन आणि पराग अभिनंदन!!!
हर्पेन आणि पराग अभिनंदन!!!
पिन्की ८०, मेडल सगळ्यांना
पिन्की ८०, मेडल सगळ्यांना मिळालं.. मी काही नंबरात वगैरे नाही आलोय..
गजानन, नक्की काढ बाफ. मुंबईला यायचं होतं खरं ह्या वर्षी पण विचार करेपर्यंत रजिस्ट्रेशन बंद झालेलं होतं
हो, मुंबई मॅरेथॉनचं
हो, मुंबई मॅरेथॉनचं रेजिस्टेशन खूप आधीपासून सुरू होतं. शिवाय (पुण्यात असतं का नाही माहीत नाही पण) तुम्ही टाईम्ड रनर असल्याचा पुरावा द्यावा लागतो.
मी इथे बाफ काढला आहे. http://www.maayboli.com/node/46616
पराग, हर्पेन, तुम्ही रन पवई रन मध्ये या!
मला इकडे यायला जमलं नाही गेले
मला इकडे यायला जमलं नाही गेले काही दिवस. दिवाळीआधी थोडीफार सरावाला सुरुवात केली होती. दिवाळी, पाहुणे, नंतर पायाला झालेला फोड, बरं नसणं यामुळे सराव करायला मिळाला नाही. काही झालं तरी एक डिसेंबरला जायचंच, काही नाही तर सहा किमी चालून पूर्ण करू असं ठरवलं होतं. काल सिटीपोस्टापर्यंत चालत - पळत, मग तिथून स्वारगेटपर्यंत चालत आणि तिथून नेस्टे पळत असं केलं. पुढच्या वर्षी नक्की भाग घेणार, आणि पळत पूर्ण करणार!
पराग, हर्पेन, खूप खूप
पराग, हर्पेन, खूप खूप अभिनंदन!
मॅरथॉन पळणार्या सगळ्या
मॅरथॉन पळणार्या सगळ्या मायबोलीकरांचं अभिनंदन!
गौरी दॅट्स द स्पिरीट, मस्तच,
गौरी दॅट्स द स्पिरीट, मस्तच, अभिनंदन....
मो, सिंडरेला धन्यवाद
गौरी सहीच !!! मो, सिंडी
गौरी सहीच !!!
मो, सिंडी धन्यवाद.
सर्व मॅराथॉन धावकांचं
सर्व मॅराथॉन धावकांचं अभिनंदन.
पराग, मस्त लिहिलं आहेस. (ते गाण्याच्या पॉजमधे बुटांचा-श्वासांचा आवाज फार आवडलं. डोळे मिटून, खोलीतला पंखा बंद करून इमॅजिन केलं मी कसं वाटत असेल ते)
पराग, साजिरा आणि मंडळी येत्या
पराग, साजिरा आणि मंडळी येत्या रवीवारी टिळक टँक वर ट्रायथ्लॉन आहे, मी भाग घ्यायचा विचार करतोय, अजून कोणी माबोकर आले तर हवेच आहेत
Category - 1 Kids of Steel (jr) (Under 18 years)
Official Sprint Triathlon - Swim 750 Mtrs - Cycle 20 Kms - Run 5 Kms
Category - 2 Real Steel (sr) (Above 18 years)
Official Sprint TriathlonSwim 750 Mtrs - Cycle 20 Kms - Run 5 Kms
Category - 3 4-10-4
(Open for all)
Novice TriathlonSwim 400 Mtrs - Cycle 10 Kms - Run 4 Kms
अधिक माहिती खालील दुव्यावर टिचकी मारून मिळवू शकता
http://miitriathlon.com/eventdetails.htm?eventid=2#
गौरी, सही!
गौरी, सही!
Pages