पुणे मॅराथॉन २०१३

Submitted by Adm on 8 October, 2013 - 02:00
ठिकाण/पत्ता: 
पुणे

तर मंडळी...
२०१३ची पुणे मॅराथॉन १ डिसेंबरला आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु झालेलं आहे. अजूनही हातात जवळजवळ पावणे दोन महिने आहेत. तार आजच स्पर्धेत भाग घ्यायचा असं ठरवून टाका आणि तयारीला लागा..
विश्वास ठेवा.. पुण्यातल्या रस्त्यांवर गुलाबी (किंवा तत्सम) थंडीत आपल्यासाठी थांबवलेल्या ट्रॅफिककडे तु.क. टाकत पळायला लय भारी वाटतं.. !

ही वेबसाईट : http://www.marathonpune.com/index.html

बर्‍याच प्रकारच्या रेस आहेत. ६ के मध्ये तर नक्कीच भाग घेऊ शकता. १० के सुद्धा अवघड नाही.. अधेमधे चालायचं..
१. तुम्ही आत्तापर्यंत कधीच पळापळी केली नसेल तर हीच वेळ आहे !!
२. तुम्ही नेहेमी पळापळी करत असाल तर प्रश्नच नाही..
३. तुम्ही अनियमितपणे पळापळी करत असाल तर ती नियमित करण्यासाठी ह्या सारखी चांगली वेळ नाही.

त्यामुळे आळस झटका आणि पळायला लागा..
फिनीश लाईनला एक माबो गटग करून टाकू.. हाकानाका... ह्या धाग्याचा वापर तयारी बद्दलची चर्चा करण्यासाठी करू..

तर कोणकोण येणार ? पटापट हात वर करा !

(ह्या धाग्याचा किती उपयोग होईल माहित नाही.. पण म्हटलं काढून तरी बघू.. Happy )

माहितीचा स्रोत: 
http://www.marathonpune.com/index.html
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
रविवार, December 1, 2013 - 06:51 to 09:51
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्पेन जबरी ! कुठे पळतोस तू ?

विद्या.. लास्ट डेटबद्दल अजून तरी काही आलेलं नहई वेबसाईटवर..

मी आज सकाळी २.५ किलिमिटर पळालो आणि मग पाऊस सुरु झाला..

चिनूक्स, साजिरा, देवा, भानुप्रिया, पौ.. तुमची प्रॅक्टीस कशी सुरु आहे ? अपडेट्स द्या इथे..

बाकी पुण्यातले पुणेकर... येताय ना? Happy

पराग, मी सध्या ज्या 'द पुणे मॅरॅथॉनर्स क्लब' च्या काही सदस्यांबरोबर पळतो ते नेहेमी खरेतर रेसकोर्स येथे सराव करत असतात. पण त्यातले काहीजण सध्या ट्रायलॅथोनमधे भाग घ्यायच्या हेतूने पोहोण्याच्या शिक्षण / सरावाकरता टि़ळक तलावावर येत असतात. आम्ही टिळक तलावापाशी आपापल्या गाड्या लावतो आणि मग तिथून साधारणपणे स. ६ वा. धावायला सुरु करतो. रस्त्यावरूनच धावतो. प्रभात रस्ता, लॉ कॉलेज मर्गे बी एम सी सी वरून डेक्कन येथुन कर्वे रस्त्यावरून परत टितपाशी अशी फेरी ४ किमीची होते. गुरुवारी व रवीवारी मात्र रेसकोर्स येथे जात असतो.

आज मी ४ किमी धावलो. आज काही ना काही कारणामुळे नेहेमी जे ६-७ जण असतो ते येणार नव्हते, सुरुवातीला मी एकटाच होतो पण अर्ध्या वाटेत एक मित्र (तो ऊलटा पळत आलेला) भेटला. मग बरोबरच फेरी पूर्ण केली. (पावसात धावायला अजूनच मजा येते) आमच्या सोबत पळणार्‍यांमुळे मी पळायला शिकलो असे म्हटले तरी चालेल. पावले कशी टाकावी, बूट कोणते चांगले, पळायच्या आधी व नंतर करायचे व्यायाम हे सर्व शिकायला मिळते आहे.

गटानी एकत्र धावण्याची मजा काही औरच... (आजच सुरुवातीस एकटे पळायला लागल्याने याचे महत्व फारच प्रकर्षाने जाणवते आहे) जर कोणाला आमच्या बरोबर पळायचे असेल तर त्यांचे स्वागतच आहे.

अडीच काय, चार काय (तेही किमि!!) मी २०० मीटर पळाले तरी धाप लागतेय मला. त्यामुळे इथे काही अपडेट्स लिहिणार नाही, तुमचे मात्र वाचेन कौतुकाने Happy

पौ.. खूप दिवसांनी पळत असशील तर धाप लागणारच.. पण इथे अपडेट्स नक्की लिही... न चुकता.. अपडेट्स चांगले दिसावे म्हणून तू हळूहळू टप्पा वाढवशील.. इट वर्कस... Happy
पळताना आपल्या स्टेप्स आणि श्वास ह्यांचा एक रिदम आणायचा की मग पुढचं पळणं सोपं होतं.. (ह्याबद्दल चमनने सविस्तर लिहिलं आहे बघ मॅराथॉन धाग्यावर) शिवाय माझा असा अनुभव आहे.. (फक्त पळतानाच नाही तर पोहोणं, खेळणं, डोंगर चढणं सगळ्याच बाबतीत) की सुरुवातीला त्रास होतो.. सिंहगड चढताना पहीलीच चढण नको होते अगदी !! पण नंतर फुफुस्स युज्ड टू होतात आणि श्वासाची पण एक लय लागते.. मग जास्त त्रास होत नाही.. तर ते ही एकदा ट्राय कर नक्की..
मी आजपण सलग चौथ्या दिवशी पळून आलो.. छान वाटतय आता.. उद्या पासून अंतर वाढवेन..

बाकीचे सिमोल्लंघन करून आले का आज ? Happy

येस्स... मी पण इन १० कि.लो साठी धावणार....!!!
@ पराग - माझ्या पायाला लिगामेंट इन्जुरी झाली होती २ वषापुवी.

आता अधुन मधुन दुखतो. काहि टिप्स देऊ शकाल का काळजी घेण्यासाठी....?

हर्पेन जबरी ! मी शनिवारी, रविवारी साधारण ३/३.५ किमी आणि काल सिंहगड चढलो (पळत नाही अर्थात Happy )

वर्षादेसाई, पाय दुखत असेल तुम्ही भाग घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हे उत्तम.. !

पराग, अरे आजचे (दर मंगळवारचे) पळणे एकदम सावकाश (ईझी रन) असल्याने मजाच असते, भरपूर गप्पा मारत टप्पे पार पाडत असतो आम्ही Happy
गडकिल्ले, टेकड्या चढल्याचा पण मस्त फायदा होतो Happy

पराग,
आमचे डॉक्टर कधीच परवानगी नाहि देणार...!!! Sad म्हणुन विचारलं तुम्हाला Wink
मी गडकिल्ले चढते ६ महिन्यातून एकदा... Proud

Finally, ran 3 Kms after 6 months. Happy Feels good. There is no motivator like the running itself. Happy
Vidya.

मी ६की पलनार आहे. १० की चि एछा होति पण अमेरिके मधुन मेडीकल सर्टिफिकेट पाथवणे शक्य नाहि. सर्वान्ना शुभेछा.

मस्तच की विद्या mgeeta, सुरुवात झालीच आहे आता पळत रहा Happy
आज इंडीयन फाईल प्रकारे ४.४ किमी आणि साधे २.२ किमी असे एकूण ६.६ किमी धावलो.

गेल्या रवीवारी लाँग रन ला जाऊ शकलो नाही / गेलो नाही (कारण त्या दिवशी असणार्‍या रक्तदान शिबीराचे, आयोजन आणि स्वतः केलेले रक्तदान) सोमवार धावण्याचा नसतोच; आज १० किमी धावलो.

मंडळी अजून कोण किती धावतंय; आता दिवाळीत परत खाडे होतील तर उठा आणि पळायला लागा...
आम्ही पळताना दमायला झाले की म्हणतो तसे म्हणतोय
"खुशीसे - भागते रहो, और आगे - और तेज" Happy

kaal fakt 1.5 miles(2.5km) dhavle. aaj 3 miles jaycha plan aahe. Lets see if it happens. Hows everyone else doing? Anyone getting up early, running late at evening. I have seen people run at middle of the night in Chicago or even at noon. So if one can find time at midnight or noon, they should plan for a run and try to make it happen. Proud Easier said than done, but no harm in saying. Happy
Vidya.

3Miles nahi jamle.... had to stop at 2.5. Sad So around 4 kms for the day.
Vidya.

वा वा तयारी जोरात सुरु की लोकांची.. !
मी आज सकाळी लवकर उठलो पण अचानक कंटाळा आला आणि गेलोच नाही पळायला.. ह्या आठवड्यात दोन दिवस गेलो होतो..पण अंतर काही वाढत नाहीये अजून माझं.. म्हणजे उत्साहं येत नाहीये ते करायला.. Sad

धागाकर्त्याला (आणि इतरांना प्रोत्साहन देणार्‍याला) जांभळे चेहरे करण्यास मनाई आहे... Wink

बक अप, बक अप... येत्या ७-८ दिवसांत अंतर वाढेल बघ तुझं... Happy

मी गिव्ह अप केलं Sad या आधी कधीच धावले नाहीये. पण यंदा मनापासून ट्राय करायची इच्छा होती. प्रयत्न सुरूही केले होते. एक तर मला स्टॅमिना नाही, त्यामुळे सुरूवात खूप कमी अंतरानेच केली होती, एकदम एक्झर्शन केलं नाहीच. तरीही, पळण्याने दिवसभर थकल्यासारखं व्हायला लागलं आणि रात्री झोपताना, अरे बाप्रे उद्या पळायचंय ही चक्क भीती! मी एन्जॉय नाही करते पळणं असं लक्षात आलं. त्यामुळे थांबले.

पळणार्‍या लोकांचं अर्थातच मनःपूर्वक कौतुक आणि शुभेच्छा Happy

पूनम,
तळजाईच्या टेकडीवर जा. तिथे अनेक लोक पळत असतात. सुरुवातीला दहा पावलं पळ. आणि गाणी ऐकत पळ. म्हणजे चांगली धिनच्याक गाणी. खर्‍यांची नकोत.

चिनूक्स प्लस वन. धिन्च्याक गाण्यांनी खरेच मोटिव्हेशन येते. त्या ठेक्या बरोबर पळले जाते. माय बेस्ट विशेस आर विथ ऑल द रनर्स. पाणी, ज्यूस लिंबूपाणी इलेक्ट्रॉल जवळ ठेवायला विसरू नका.
यू विल बी डिहाय्ड्रेटिन्ग इन धिस ऑक्टो वेदर. ( अगदीच आंटी पोस्ट. पर क्या करें)

पौ.. गिव्ह अप का ??? पळताना दमत असशील तर चाल.. परवा म्हणालीस ना की ६ किमी चालू शकशील म्हणून..
आणि खूपच दमत असशील तर चालणं + पळणं असं दोन्ही करू शकतेस...
गाणी ऐक नक्की.. इनफॅक्ट मी पण सध्या ऐकत नाहीये.. ते सुरु करणार आहे उद्या पासून...

खर्‍यांची नकोत. >>>:हाहा:

विद्या.. सहीये Happy

ललिता.. Happy

Finally a mile stone, 3 miles. Goal is to get at least one 6 mile before the 10K. Sorry I keep writing in English because even if I change the language preference, it gets typed in English.
Hows everyone else doing?
Vidya.

मी धावतोय त्यामुळे धन्यवाद मो Happy
आज १० किमी धावलो. माझी धाव त्याच्या पुढे जातच नाहीये अजून तरी Sad पण येत्या रवीवारी १५ किमी धावायचा प्रयत्न करणार...

या रविवारी आमच्या हापिसातर्फे मगरपट्ट्यात ५ किमी ची wellness race आहे. त्यात मी भाग घेणार आहे. तो प्रयत्न यशस्वी झाल्यास ६ किमी ला रजिस्टर करीन म्हणतो.

सध्या practice म्हणून साधारण ४-५ किमी चा चालण्याचा सराव चालू आहे. Running कितपत जमेल याची मात्र शंका आहे ..... Happy

पावले कशी टाकावी, बूट कोणते चांगले, पळायच्या आधी व नंतर करायचे व्यायाम हे सर्व शिकायला मिळते आहे.

बूट कोणते चांगले त्याबद्दलही लिहा. बाहेर म्हणजे रस्त्यावर वापरण्यासाठी की ट्रेड्मिलसाठीही तेच चालतील ?

जेम्स बॉण्ड, बूट कोणते चांगले, हे, कोठे धावायचे आहे (रस्त्यावर का ट्रेडमिलवर) या पेक्षा आपली पावले कशी आहेत, फ्लॅट फूट / आर्च फूट आर्च किती आहे ई. अनेक गोष्टींना जास्त महत्व देऊन / त्यांना आधारभूत धरून ठरवतात.

मी स्वतः नवशिकाच आहे पण ढोबळमानाने अंदाज येण्याकरता खालील लिंक पहा.
http://www.runnersworld.com/shoeadvisor

ह्या पैकी आपण / आपले धावणे ओव्हर किंवा अंडर प्रोनेटर या पैकी कुठल्या प्रकारचे हे ठरवण्याकरता आपले बरेच वापरून झालेले बूट कुठे आणि कसे झिजले आहेत हे बघतात.

ह्या व्यतिरिक्तही ही साईट भरपूर आणि चांगली माहिती देते.

Pages