पुणे मॅराथॉन २०१३

Submitted by Adm on 8 October, 2013 - 02:00
ठिकाण/पत्ता: 
पुणे

तर मंडळी...
२०१३ची पुणे मॅराथॉन १ डिसेंबरला आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु झालेलं आहे. अजूनही हातात जवळजवळ पावणे दोन महिने आहेत. तार आजच स्पर्धेत भाग घ्यायचा असं ठरवून टाका आणि तयारीला लागा..
विश्वास ठेवा.. पुण्यातल्या रस्त्यांवर गुलाबी (किंवा तत्सम) थंडीत आपल्यासाठी थांबवलेल्या ट्रॅफिककडे तु.क. टाकत पळायला लय भारी वाटतं.. !

ही वेबसाईट : http://www.marathonpune.com/index.html

बर्‍याच प्रकारच्या रेस आहेत. ६ के मध्ये तर नक्कीच भाग घेऊ शकता. १० के सुद्धा अवघड नाही.. अधेमधे चालायचं..
१. तुम्ही आत्तापर्यंत कधीच पळापळी केली नसेल तर हीच वेळ आहे !!
२. तुम्ही नेहेमी पळापळी करत असाल तर प्रश्नच नाही..
३. तुम्ही अनियमितपणे पळापळी करत असाल तर ती नियमित करण्यासाठी ह्या सारखी चांगली वेळ नाही.

त्यामुळे आळस झटका आणि पळायला लागा..
फिनीश लाईनला एक माबो गटग करून टाकू.. हाकानाका... ह्या धाग्याचा वापर तयारी बद्दलची चर्चा करण्यासाठी करू..

तर कोणकोण येणार ? पटापट हात वर करा !

(ह्या धाग्याचा किती उपयोग होईल माहित नाही.. पण म्हटलं काढून तरी बघू.. Happy )

माहितीचा स्रोत: 
http://www.marathonpune.com/index.html
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
रविवार, December 1, 2013 - 06:51 to 09:51
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल का परवा झालेली एक मॅराथॉन साठी आम्च्या कंपनीने जोरदार जाहिरात केल्याने (व फुकट टी-शर्टच्या आमिषाने Wink ) बरेच कर्मचारी पळायला गेले.
आत्ता या मॅराथॉनसाठी नाव नोंदणी करावी असं म्हणतोय. Happy

इथेही टीशर्ट मिळेल ना.. फक्त आपल्याच रजिस्ट्रेशनच्या पैशांनी.. ! गेल्यावर्षी त्यांनी बनियन दिले होते.. त्यावरून लोकांनी बरीच ओरड केली..त्यामुळे ह्यावर्षी बरं काहितरी देतील अशी अपेक्षा आहे..

चिनुक्स.. रजिस्ट्रेशन करून टाक.. पैसे भरलेले असले की अपोआप जाग वगैरे येते सकाळी.. Wink

मला पण जाम इच्छा होतेय हे एकदातरी करून बघायची! पण जमेल की नाही ते मात्र अजिबात माहिती नाही!

जरा कोणीतरी मोटिव्हेट करा ना!

सही.. माझ्याही 'टू डू' लिस्ट मधे आहे मॅराथॉनमधे भाग घेणं. कधी जमतंय बघू.

पराग आणि चिनूक्स .. सध्या मी पुण्यात नाहिये नाहितर मी पण तुम्हाला दिसलो असतो उद्यापासून Wink

भानुप्रिया,

मोटीव्हेशनसाठी खालील लिंका वाचून काढा..

http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839

आणि हा धागा सर्व प्रतिसादांसकट :
http://www.maayboli.com/node/33436

साजिरा, हर्पेन सही ! Happy

मनिष. .:P

बरं.. आज सकाळी उठून कोण कोण चालून / पळून आलं ?
अपडेट्स टाका..

मी साधारण २० मिनीटे चालून आलो.. उद्यापासून पळेन म्हणतोय..

आपल्यासाठी थांबवलेल्या ट्रॅफिककडे तु.क. टाकत पळायला लय भारी वाटतं.. ! >>> Lol

बक अप, पब्लिक!

डन, येतेय मी!

१० किमी चा रन करणार!

माझा सरावाचा वेळ, संध्याकाळचा. चिनुक्स, नवरा पण येणारे रे!

पराग, धन्स, वाचतेच आता!

मी पण येणार !!
माझ्या वेट लॉस प्रोजेक्टला आणखी इन्स्पिरेशन मिळेल Happy
बाय द वे , मी रोज १ ताश चालतो , पण पळायचा अजिबात सराव नाही .
१० किमी जमेल का मला ?

पळायचा सराव कर ना मग आता हळूहळू.. सध्या १ तास चालत असशील तर उद्या ५५ मिनीटे चाल आणि ५ मिनीटे पळ.. असं करत वाढव.. पाय किंवा बाकी काही दुखत वगैरे नाही त्याकडे लक्ष ठेव फक्त.. नेटवर बर्‍याच टीप्स मिळू शकतील अजून..

आणि तसही पूर्ण चालत १० के केलीस तरी काहीच हरकत नाही..

धन्यवाद पराग .
थोडा हावरेपणा होतोय , पण हाफ मेरेथॉन जमेल का ?
स्टेमिना हा इश्यु नाहीये फारसा . पण शेवटून पहिला येऊ नये Happy

आज कोण कोण गेलं पळायला? रस्ता शोधायला? रस्ता दाखवायला? Happy

केदार, सुरुवातीला पाय थोडे दुखतील, कदाचित क्रॅम्पही येतील. सहन होत असेल, इतर काही त्रास होत नसेल तर रोज पळण्याचा वेळ थोडा थोडा वाढवा. स्टॅमिना हळूहळू वाढत जाईल.
सरावाच्या आधी काय खायचं, नंतर काय खायचं याच्या टिप्स नेटवर मिळतील. त्यातील तुम्हाला पाळण्यासारखं जे असेल ते रोज करा. स्टॅमिना आणि शरीरातील ताकद वाढवायला याचा खूप उपयोग होतो.

केदार.. फु.स. असा की आधी कुठल्या रनिंग इव्हेंटमध्ये भाग घेतला नसेल किंवा पळायचा सराव नसेल तर डायरेक्ट हाफ करू नकोस.. Happy
१० ने सुरुवात कर.. पुढच्या कुठल्यातरी इव्हेंटमध्ये हाफ कर.. कारण फक्त स्टॅमिना नाही बाकी शारीरिक (आणि मानसिकही) तयारी आवश्यक असते.. हळूहळू पळणं वाढव.. एकदम मोठा पल्ला नको...

AS said earlier, in for 10K. Half sathi ajibat practice nahiye ya veli. 10 K chi nakki karen. Happy
Practice monday pasun suru. Feeling good already.

-Vidya.

Whats the last date for registration? Anyone knows? And if I cant pay it in bank, any online payment methods?
Vidya.

पौर्णिमा - भाग न घेता यायला काय झाले? आणि चॅरिटी रन(च) करू शकेन असे (आत्ताच) वाटत असेल तर मग १० / १५ किमी पण पळू शकणार...:)

मी एका महिन्याच्या सरावामुळे १५ किमी पळू शकलो गेल्या रवीवारी. त्याआधी आयुष्यात कधी धावलो नव्हतो. मग आपल्याकडे जवळ जवळ २ महिने आहेत सरावाला.

आज कोण कोण किती किती पळले, मी आज ६.६.किमी धावलो.

मंडळी 'धावाल तर धावाल' (म्हणजे आत्तापासून सराव कराल तर मॅरॅथॉन मधे धावाल)

Pages