तर मंडळी...
२०१३ची पुणे मॅराथॉन १ डिसेंबरला आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु झालेलं आहे. अजूनही हातात जवळजवळ पावणे दोन महिने आहेत. तार आजच स्पर्धेत भाग घ्यायचा असं ठरवून टाका आणि तयारीला लागा..
विश्वास ठेवा.. पुण्यातल्या रस्त्यांवर गुलाबी (किंवा तत्सम) थंडीत आपल्यासाठी थांबवलेल्या ट्रॅफिककडे तु.क. टाकत पळायला लय भारी वाटतं.. !
ही वेबसाईट : http://www.marathonpune.com/index.html
बर्याच प्रकारच्या रेस आहेत. ६ के मध्ये तर नक्कीच भाग घेऊ शकता. १० के सुद्धा अवघड नाही.. अधेमधे चालायचं..
१. तुम्ही आत्तापर्यंत कधीच पळापळी केली नसेल तर हीच वेळ आहे !!
२. तुम्ही नेहेमी पळापळी करत असाल तर प्रश्नच नाही..
३. तुम्ही अनियमितपणे पळापळी करत असाल तर ती नियमित करण्यासाठी ह्या सारखी चांगली वेळ नाही.
त्यामुळे आळस झटका आणि पळायला लागा..
फिनीश लाईनला एक माबो गटग करून टाकू.. हाकानाका... ह्या धाग्याचा वापर तयारी बद्दलची चर्चा करण्यासाठी करू..
तर कोणकोण येणार ? पटापट हात वर करा !
(ह्या धाग्याचा किती उपयोग होईल माहित नाही.. पण म्हटलं काढून तरी बघू.. )
कशी चालूए लोकहो प्रॅक्टिस? ऑल
कशी चालूए लोकहो प्रॅक्टिस? ऑल द बेस्ट सगळ्यांना! टीशर्ट, मेडल (मिळालं तर, किंवा जे काही मिळेल ते) यांचे फोटो टाका, नंतर अनुभवकथनही करा
पराग सविस्तर फीड्बॅक साठी
पराग सविस्तर फीड्बॅक साठी धन्यवाद!
माझा पण टी शर्ट कालच आला, दर्जा चांगला आहे त्यामुळे ह्या वर्षी बाकी पण सुधारणा असतील असे धरून चालायला (पळायला) हरकत नाही
पौर्णिमा शुभेच्छांसाठी धन्यवाद, अत्यंत गरज आहे!
झालंय असे की मागच्या आठवड्यात बॅड्मिंटन खेळताना डाव्या पायाचा गुढगा दुखावला गेला आहे तो अजून संपुर्णतः नीट बरा व्ह्यायला तयार नाही. साधारण ३ सेशन्स मिस करून आज (फार घाम येत होता आणि जास्त ताण नको म्हणून) फक्त ४ किमी पळलो.
पण मला येत्या रविवारी अर्धमॅरॅथॉन धावायची आहे, तर लोकहो (करत असाल तर) माझ्या रिकव्हरी करताही प्रार्थना करा
Harpen all the best. Anyway
Harpen all the best. Anyway before half marathon, only 4Km is good. Dont run beyond 5-6K week before half. Also load up on carbs. I also searched on about.com for last minute prep for half marathon/first half marathon. Then there was also a good article on recovery from half marathon. I can send it to you in an email. I have a PDF for it.
Vidya.
मी नाव नोंदवलं १५ लाच, पण
मी नाव नोंदवलं १५ लाच, पण टीशर्टसाठीच ऑप्शन मला दिसलाच नाही. आता मित्रमंडळ ऑफिसात थेट गेलो तर टी शर्ट मिळतो का?
चालायची बर्यापैकी सवय असली तरी पळायची नव्हती. सध्या तळाजाईवर संध्याकाळी पळायची प्रॅक्टिस करतो आहे, पण ४-५ किमी च्या वर गाडी सरकायला तयार नाही. बाकी अंतर हळू / जोरात चालणं. तशात परवापासून सर्दी आणि खोकल्याने आजारी पड्लो. एकंदर अवघड दिसतं आहे भवितव्य.
धन्यवाद विद्या, मी मेल पाठवली
धन्यवाद विद्या,
मी मेल पाठवली आहे, पिडीएफ च्या प्रतिक्षेत. अगोदरच धन्यवाद देऊन ठेवतोय
हर्पेन , लवकर बरे व्हा.
हर्पेन , लवकर बरे व्हा. माझ्या सगळ्या हाफ मॅरेथॉन पळणार्या मित्र्मंडळींचा सल्ला म्हणजे पहिल्या १५ किमी नंतर उरलेला गेम मनाचा असतो .
पुणे रनिंगच्या फेबू पेज वर १०० किमी पळणार्या शेट्टी दांपत्याबद्दल लिहिल होतं ,ते देखिल पोडियम फिनीश, वय ५१ ,४७ . आणि पळायला सुरवात पण ८ वर्षापुर्वीच केलिये. मी अवाक झाले वाचूनच.
रच्याकने , मेडल नाही तरी शर्यतींमधे भाग घेतल्याची प्रशस्तीपत्रक , टिशर्ट अन बीब मात्र जमा करतेय मी. शाळेतल्या दिवसांची आठवण आली.
धन्यवाद इन्ना, १५ किमी नंतर
धन्यवाद इन्ना, १५ किमी नंतर माईंडगेम हे अगदी खरे आहे, मी सरावादरम्यान २१ किमी पळून झाले आहे आणि त्या गेममधे मनाला जिंकू शकेन असा आत्मविश्वासही वाटतो आहे
पण आता प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी धावता येणे / धावू शकणे / स्वतःला फिट ठेवणे हे ही तितकेच किंबहुना त्याहूनही जास्त महत्वाचे आहे हे ही कळतंय
पुणे रनिंगच्या फेबू पेज वर १०० किमी पळणार्या शेट्टी दांपत्याबद्दल लिहिल होतं ,ते देखिल पोडियम फिनीश, वय ५१ ,४७ . आणि पळायला सुरवात पण ८ वर्षापुर्वीच केलिये. मी अवाक झाले वाचूनच.
अगदी अगदी
मी अगदीच भाग घेऊ नाही शकलो / पूर्ण नाही करू शकलो तर बीब आणि टी शर्ट्चा फोटो टाकेन इथे
हॅल्लो जनता... झाली का तयारी
हॅल्लो जनता... झाली का तयारी ?
सगळ्यांना माहित असेलच.. जे पळणार आहे त्यांनी आज पासून भरपूर (म्हणजे अगदी खूप.. ४/५ लिटर रोज) पाणी प्या.. ऑफिसात असाल तर डेस्क वर बाटली भरून पित रहा..
बॉडी हायड्रेटेड असणं खूप गरजेचं आहे म्हणजे क्रॅम्प्स वगैरे येत नाहीत.
शिवाय उद्या रात्री भरपूर कार्ब्स असलेलं जेवण घ्या.. पास्ता किंवा तत्सम.. पळायच्या आधी केळं खा..
मी जर १० के संपवून नेहरू स्टेडियमला आलो तर भेटूच नक्की.. हर्पेन माझा नंबर पाठवतो.. तुम्ही तिथले सगळे कॉर्डिनेट करा..
ऑल द बेस्ट !
पळणार्या सर्व मंडळींना ऑल द
पळणार्या सर्व मंडळींना ऑल द बेस्ट!!!
ऑल दी बेस्ट सगळ्यांना.. होउं
ऑल दी बेस्ट सगळ्यांना..
होउं द्या पळून...
भरपूर पाणी प्यायला सुरुवात
भरपूर पाणी प्यायला सुरुवात केली आहे, हे पास्ता किंवा तत्सम.. मधल्या तत्सम मधे काय काय मोडते, विशेषतः भारतीय आणि शाकाहारी...
मी जर १० के संपवून नेहरू स्टेडियमला आलो तर भेटूच नक्की.. >>> ह्याचा अर्थ काय?
पण तरी फोन नंबरची वाट बघतो.
अजून कोण कोण नक्की पळणार आहे. इन्ना, गौरी, साजिरा, देवा, अविनाश ?
ऑल द बेस्ट लोकहो. नंतर
ऑल द बेस्ट लोकहो. नंतर टीशर्ट, मेडल आणि पळण्याचे अनुभव, बाकीच्यांच्या फजित्या, स्वतःची दैना अथवा ऊर भरून आलेले क्षण (;)) वगैरे अवश्य लिहा.
शुभेच्छा!
ह्याचा अर्थ काय? >>> अरे १०
ह्याचा अर्थ काय? >>> अरे १० के ची फिनीश लाईन वेगळीकडे आहे नेहरू स्टेडीयमला नाही.. बंड गार्डन जवळ. गेल्यावर्षी आम्ही तिथून नेहरू स्टेडियमला आलो होतो.. ह्यावर्षी तसं करू की नाही माहित नाही.. कदाचित परस्पर घरी जाऊ.. पण जर आलो नेहरू स्टेडियमला तर भेटू नक्की.
तत्सम >>> एनी कार्ब्स.. पोळी, भाकरी वगैरे.
सर्व धावणार्या उत्साही
सर्व धावणार्या उत्साही मंडळींना आपापली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा.
पराग - ओके, मग या वेळेस
पराग - ओके, मग या वेळेस भेटायचे जाऊच दे, मला स्टार्ट पॉईंट्ला सोडायला कोणी नाहीच मिळाले तर शर्यत संपल्यावर नेस्टे वरून गाडी आणायला डेक्कन कॉलेजला जावे लागणार आहे. आणि नेस्टेला स्पर्धा संपणारे अजून कोणी असतील असेही वाटत नाहीये
पौर्णिमा - स्वतःच्या फजितीवरच लिहावे लागेल की काय अशी भिती वाटत्ये. पण तरी भाग घेणारे
मी चॅरिटी रन साठी ६ कि.मी.
मी चॅरिटी रन साठी ६ कि.मी.
~साक्षी
All the best Sakshi
All the best Sakshi
वरण्फळ ़ खा ,भारतीय पास्ता.
वरण्फळ ़ खा ,भारतीय पास्ता.
पळणार्या सगळ्या मंडळींना
पळणार्या सगळ्या मंडळींना शुभेच्छा.
हेडरमध्ये वेळ १७:२१ ते २०:२१ अशी दिसतेय. पुणेकर सक्काळी पळत नाहीत का?
पुणे मॅरथॉनच्या संकेतस्थळ स्पर्धेला १६ तास ४० मिनिटे आहेत असे दाखवतेय.
नक्की वेळ काय आहे?
मयेकर.. खरच की! वेळ कशी काय
मयेकर.. खरच की! वेळ कशी काय बदलली कोण जाणे.. जाऊ द्या.. उद्याच आहे इव्हेंट..
१० के सकाळी ६:५५ ला आहे.. हाफ ६:४५ ला...
पळणार्या सर्व मंडळींना
पळणार्या सर्व मंडळींना हार्दिक शुभेच्छा.
काळजी घ्या.
सगळे पळाले का? सगळ्यांचे
सगळे पळाले का? सगळ्यांचे अभिनंदन.
सगळ्यांचे अभिनंदन. रूनी हो..
सगळ्यांचे अभिनंदन.
रूनी हो.. मी तरी पळालो.. काही प्रॅक्टीस न करताही अगदीच सोपी गेली ही रेस.. नंतर डिटेलवार लिहितो..
हां तर मॅराथॉन पार
हां तर मॅराथॉन पार पडली!
सकाळी उत्तम हवा होती. म्हणजे थंड, ढगाळ पण ह्युमिड नाही, ढगाळ असल्याने ऊन नाही. एकंदरीत पळायला एकदम योग्य. खंडूजी बाबा चौकात ६:३० ला जाऊन पोचलो. बरीच फोनाफोनी करून पुरब हॉटेलच्या बाहेर सगळे एकत्र भेटलो. (साजिर्या, तुलाही फोन केला होता.. मग तो कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर होता... आला होतास ना तू?)
फुल मॅराथॉन रेस सुरु व्हायच्या आधी पाच मिनिटांपर्यंतही खंडूजी बाबा चौकात ट्रॅफिक सुरुच होता. शेवटी 'खासदार साहेबांना' माईक वरून पोलिसांना सांगावं लागलं. तेव्हा तो ट्रॅफिक थांबला. फुल मॅराथॉन वेळेत सुरु झाली. नंतर १०के म्हणजे आमची रेस सुरु होणार होती. ती चक्क पाच मिनीटं लवकरच सुरु झाली. त्यामुळे मी स्टार्ट लाईन क्रॉस केली तेव्हा घड्याळाअत ६:५४ झाले होते. गेल्यावर्षी सर्दीमुळे मला लकडी पुल ओलांडाताना नाक बंद वगैरे होऊन त्रास झाला होता. पण ह्या वर्षी तसं काही नव्हतं. अलका टॉकीजच्या चौकापासूनच मस्त रिदम मिळाला. कानात रॉक ऑन, बलम पिचकारी वगैरे वाजत असताना श्वास आणि स्टेप्स सिंक झाल्या. (काल मोबाईल मध्ये ढीन्चॅक गाण्यांची नवीन लिस्ट बनवल्याचा फायदा झाला!) कुंटे चौकाच्या आसपास पोचलो तरी पहिल्या किमीचा बोर्ड दिसेना! शेवटी सिटी पोस्ट,बेलबाग चौक वगैरेही मागे पडल्यावर मैल मार्कर शोधायचा प्रयत्न सोडून दिला (आणि ते खरच नव्हते..म्हणजे अधेमधे होते.) पुढे टींबर मार्केटच्या इकडे उजवीकडे वळल्यावर जरा रिदम गेला. तिकडे गेल्यावर्षी प्रमाणेच बॅंड वगैरे होते. त्या पूर्ण रस्त्यावर सेव्हन लव्हज चौकापर्यंत पूर्ण चढ असल्याने वेग चांगलाच मंदावला. मग सोलापूर रस्त्यावर पुला खाली उतार आहे. अआणि पुन्हा चढ आहे. हा चढ संपला की एमजी रोड वर डावीकडे वळायचं होतं. तिथून मात्र थेट ब्लू नाईल पर्यंत पुर्ण उतार आहे. मघाशी गेलेला रिदम इथे परत आला. एमजी रोड वर सकाळी अगदी पीन ड्रॉप सायलेन्स असतो. हे गेल्यावर्षीही जाणवलं होतं. मधे गाणं संपल्यावर एक क्षण जेव्हा पॉज होता तेव्हा फक्त पळणार्याच्या बुटांचे आणि श्वासाचे आवाज एकव्हडच ऐकू येतं होतं आणि तो आवज फार भारी वाटतो! एमजी नंतर एसजीएस मॉलच्या इथे उजवीकडे वळायच्या ऐवजी यंदा पुढच्या चौकात आत वळवलं. पुढे बंड गार्डन रस्त्याला लागल्यावर मी परत जरा पेकलो. पण तितक्यात ९ किलोमिटरचा माईल मार्कर दिसला. (मला दिसलेला हा एकच!) तो पाहून एकदम स्फुरण चढलं आणि मी श्वासाची लय परत साधली. गेल्यावर्षी मंगलदास रोडवर उजवीकडे वळलो होतो. पण यंदा तसं नव्हतच सगळे सरळच चालले होते. पळतोय पळतोय पण शेवटचा किलोमिटर संपता संपेना! कमान वगैरेही दिसेना. दोन व्हॉलेंटीयर उभे होते त्यांनी शेवटी मी विचारलं. तर ते म्हणाले आलीच आहे पुढच्या चौकात. मग अचानक एक घोळका होता आणि तिच फिनीश लाईन होती म्हणे. मग तिकडे मेडल मिळालं. साधारण १ तास ५ मिनीटं वगैरे लागली. यंदा फारशी काहीच तयारी न करताही गेल्यावर्षीपेक्षा कमी वेळ लागला. पायही फारसे दुखत वगैरे नाहीयेत. बाकीचे व्यायाम सुरु होते त्याचा फायदा झाला. आमचे दोन मित्र हाफ मॅराथॉन पळणार होते त्यांना चिअर करायला म्हणून रिक्षेते गुडलक चौकात आलो. कदाचित हर्पेनलाही पाहिलं असेल. गुडलक चौकात जाऊन गुडलक कॅफेत न जाता त्याचा अपमान कशाला करायचा म्हणून मग तिथे जाऊन खाल्ल आणि जाळलेल्या कॅलरीज भरून काढल्या!
यंदाही स्पर्धेचे व्यपस्थापन अत्यंत ढिसाळ होते!
१. रेस चालू असताना पोलिस वाहनांना रस्ता क्रॉस करू देत होते. गुडलक चौकात एक रनर रिक्षेला धडकता धडकता वाचला आणि त्या पोलिसालाच जाऊन धडकला.
२. मैल मार्कस, वेळ दाखवणारी घड्याळं वगैरे कुठेच नव्हती. (किंवा कुठे होती कोण जाणे!) खरतर पळताना मोटीवेशन म्हणून ह्या गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते!
३. १० के सांगून जवळजवळ पावणे अकरा के पळवलं. शेवटचा किलोमोटर संपता संपेना. मोबाईल अॅपवर एकूण अंतर १०.७५ आलं.
४. १०के वाल्यांचा फिनीश लाईनपाशी कमान वगैरे काही नव्हतं. खरतर लांबून फिनीश लाईन दिसत रहाणं ही अत्यंत गरजेचं असतं.
५. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनीश लाईनवर पाणी नाही ह्याला काय म्हणावं कळत नाही! खरतर तिथे केळी, अंडी, एनर्जी बार वगैरे गोष्टी असतात. ते जाऊ द्या पण किमान पाण्याची सोय तरी करावी! नंतर जवळच्या एका दुकानदाराने आपल्या दुकानातलं पाणी बादलीत भरून आणून ठेवलं होतं. ड्राय फिट टीशर्टचे मिळून चांगले घसघशीत ८०० रूपये घेतले असताना, निदान पाण्याची तरी सोय करणं अपेक्षितच होतं. मी ट्रॅकवर कधी पाणी पित नाही पण तिथली पाण्याचे बुथही खूपच कमी होते.
एकंदरीत 'कालचा गोंधळ बरा होता.' म्हणायची परिस्थिती होती.
ड्रायफिट टीशर्ट, सोव्हिनीयर टीशर्ट आणि मेडल मात्र चांगलं आहे.
बाकीच्यांनीही आपापले अनुभव नक्की लिहा. पहिल्यांदा पळणार्यांनी तर लिहाच!
जे पळणार नव्हते ते ही बरेच जण वेळोवेळी इथे येऊन चौकशी करत होते, प्रोत्साहन देत होते त्या सगळ्यांना धन्यवाद! पुढच्या वर्षी अजून जास्त संख्येने माबोकर सहभागी होऊ.
अभिनंदन पराग.
अभिनंदन पराग.
वा, मस्तच पराग. अभिनंदन
वा, मस्तच पराग. अभिनंदन सगळ्या धावपटूंचं.
मस्तच अभिनंदन......
मस्तच अभिनंदन......
अतिशय बेजबाबदार संयोजन
अतिशय बेजबाबदार संयोजन
त्यापेक्शा पुणे रनिंग्च्या स्पर्धेत पळायला मजा येते. अजून लहान पल्ल्याच्या शर्यती पळतेय तोवर पुणे रनिंग बरोबर. यदाकदाचित हामॅ पर्यन्त पोचले तर मुंबईत पळायच अस ठरवलय.
मस्त रे पराग, अभिनंदन!
मस्त रे पराग, अभिनंदन!
अभिनंदन पराग!
अभिनंदन पराग!
Pages