तर मंडळी...
२०१३ची पुणे मॅराथॉन १ डिसेंबरला आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु झालेलं आहे. अजूनही हातात जवळजवळ पावणे दोन महिने आहेत. तार आजच स्पर्धेत भाग घ्यायचा असं ठरवून टाका आणि तयारीला लागा..
विश्वास ठेवा.. पुण्यातल्या रस्त्यांवर गुलाबी (किंवा तत्सम) थंडीत आपल्यासाठी थांबवलेल्या ट्रॅफिककडे तु.क. टाकत पळायला लय भारी वाटतं.. !
ही वेबसाईट : http://www.marathonpune.com/index.html
बर्याच प्रकारच्या रेस आहेत. ६ के मध्ये तर नक्कीच भाग घेऊ शकता. १० के सुद्धा अवघड नाही.. अधेमधे चालायचं..
१. तुम्ही आत्तापर्यंत कधीच पळापळी केली नसेल तर हीच वेळ आहे !!
२. तुम्ही नेहेमी पळापळी करत असाल तर प्रश्नच नाही..
३. तुम्ही अनियमितपणे पळापळी करत असाल तर ती नियमित करण्यासाठी ह्या सारखी चांगली वेळ नाही.
त्यामुळे आळस झटका आणि पळायला लागा..
फिनीश लाईनला एक माबो गटग करून टाकू.. हाकानाका... ह्या धाग्याचा वापर तयारी बद्दलची चर्चा करण्यासाठी करू..
तर कोणकोण येणार ? पटापट हात वर करा !
(ह्या धाग्याचा किती उपयोग होईल माहित नाही.. पण म्हटलं काढून तरी बघू.. )
इथे लिहिणार्या सगळ्यांना
इथे लिहिणार्या सगळ्यांना धन्यवाद! हा धागा वाचला म्हणून भाग घेतला मी.
चॅरिटी रन साठी मेडल पण नसतं
चॅरिटी रन साठी मेडल पण नसतं बहुते़क. ज्या NGO बरोबर आमची कंपनी काम करते, ती NGOच आम्हाला सर्टिफिकेट देते. म्हणजे मागच्या वर्षीही दिलं होतं.
मी सुद्धा ६ कि. मी. आरामात पूर्ण केली. मी थोडाच वेळ धावले आणि उरलेला वेळ भराभर पण एकाच गतीने चालण्याचा प्रयत्न केला. साधारण ५० ते ५५ मिनीटांत अंतर कापले. माईल मार्कर एकही दिसला नाही. चालण्याची बर्यापैकी सवय असल्याने पायही जास्त दुखले नाहीत. (म्हणजे थोडे दुखले ) स्वारगेटच्या चौकात नेहमीसारखंच ट्रफिक चालू होतं. शेवटी सगळ्या रनर्सनीच मधे घुसून ट्रफिक थांबवले.
एकंदरीत अनुभव ठिक.
~साक्षी.
अभिनंदन साक्षी, आणि गौरी असे
अभिनंदन साक्षी,
आणि गौरी असे इथे वाचून धावल्याबद्दल विशेष कौतुक, आभार, अभिनंदन वगैरे
Pages