पुणे मॅराथॉन २०१३

Submitted by Adm on 8 October, 2013 - 02:00
ठिकाण/पत्ता: 
पुणे

तर मंडळी...
२०१३ची पुणे मॅराथॉन १ डिसेंबरला आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु झालेलं आहे. अजूनही हातात जवळजवळ पावणे दोन महिने आहेत. तार आजच स्पर्धेत भाग घ्यायचा असं ठरवून टाका आणि तयारीला लागा..
विश्वास ठेवा.. पुण्यातल्या रस्त्यांवर गुलाबी (किंवा तत्सम) थंडीत आपल्यासाठी थांबवलेल्या ट्रॅफिककडे तु.क. टाकत पळायला लय भारी वाटतं.. !

ही वेबसाईट : http://www.marathonpune.com/index.html

बर्‍याच प्रकारच्या रेस आहेत. ६ के मध्ये तर नक्कीच भाग घेऊ शकता. १० के सुद्धा अवघड नाही.. अधेमधे चालायचं..
१. तुम्ही आत्तापर्यंत कधीच पळापळी केली नसेल तर हीच वेळ आहे !!
२. तुम्ही नेहेमी पळापळी करत असाल तर प्रश्नच नाही..
३. तुम्ही अनियमितपणे पळापळी करत असाल तर ती नियमित करण्यासाठी ह्या सारखी चांगली वेळ नाही.

त्यामुळे आळस झटका आणि पळायला लागा..
फिनीश लाईनला एक माबो गटग करून टाकू.. हाकानाका... ह्या धाग्याचा वापर तयारी बद्दलची चर्चा करण्यासाठी करू..

तर कोणकोण येणार ? पटापट हात वर करा !

(ह्या धाग्याचा किती उपयोग होईल माहित नाही.. पण म्हटलं काढून तरी बघू.. Happy )

माहितीचा स्रोत: 
http://www.marathonpune.com/index.html
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
रविवार, December 1, 2013 - 06:51 to 09:51
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

For Knee pain, I had tried these exercises last time. Squats, lunges, stretches help reduce knee pain and also to build muscles.
http://www.fix-knee-pain.com/knee-exercises/stretches/itb-stretches/
Arun, if you are able to walk 4-5Kms, you will surely do well in the race. If one can walk at a consistent pace for long, that is good enough for distances like 5-10kms.
Harpen, are you planning a half marathon? 10K practice run sounds good. Happy

Well, keep it up everyone. I want to go out for a long run on weekend. Lets see if I can.
Vidya.

होय विद्या, मी अर्ध-मॅरॅथॉनसाठीच तयारी करतोय.

ITB stretches च्या लिंक करता धन्यवाद. मला माझ्या एका मित्राने हे केव्हाच सांगितले होते पण माझ्याकडूनच आळशीपणा झालाय पण आता मात्र मी नक्की चालू करेन हे व्यायाम प्रकार Happy

हो अस म्हणतेय तरी. घरातले उरलेले पळतायत. १५ ़ किमी. ंमी अजून पाचावरच आहे. तेवढ्यालाच ४० मिनिट लागतायत. पण आवडतय पळायला.
Happy

अरे वा इन्ना, पळणे आवडतंय ना मग पळत रहा, अंतर आपोआप वाढेल. Happy

मी पण होतो अमानोरा मधे. मी १५ किमी पळलो. ९७ मिनिटे आणि काही सेकंद, म्हणजे १ तास ३७ मिनिटे. माझ्या मागच्या १५ किमी च्या वेळेपेक्षा ३ मिनिटे कमी लागला. ५ किमी चे सर्किट ३ वेळा पळायचे होते.

नंदिनी - मी तरी रस्त्यांवरूनच पळतो. आपल्याकडे लांब पल्ल्याच्या शर्यतींकरता इतके मोठे बिनडांबरी ट्रॅक्स आहेत तरी कुठे!

Harpen, If you have a smart phone with data plan, you can try RunKeeper app. It updates you on every 5-10 mins interval about your pace, distance etc. Also do you carry water, cap, glasses etc for lng distance? It has helped me earlier esp in hot weather.

Thanks Vidya, since I run with a group, some one or other keeps that track and yes of course we do keep ourselves hydrated. Also it s advisable to eat banana / dates etc before long run.

लोकहो,
पुणे मॅराथॉन रजिस्ट्रेशनची डेडलाईन उद्या आहे !!!! मला आधी ३० नोव्हेंबर वाटत होतं..
त्वरा करा आजच रजिस्टर करा... ही लिंक..
https://www.eventavenue.com/attReglogin.do?eventId=EVT4227

धन्यवाद पराग, पैसे भरून नावनोंदणी केली (एकदाची) Happy अर्धमॅरॅथॉन साठी केली आहे.
मंडळी, अजून कोण कोण अर्धमॅरॅथॉन पळणार आहात?
किती किती पळणार आहात (नोंदणी केलीत) ते लिहा इथे. कृपया ही विनंती Happy

Sad I cannot be there for registration. Online registration didnt work. Sad I am going to miss this one. Unless there is some last minute entry allowed after 12th November.
Vidya.

आयुष्यात कधीही चारशे मीटारपेक्षा जास्त पळालेले नाही मी. हा धागा बघून उत्साहाने ६ किमीसाठी नाव नोंदवलंय. "couch to 5 K" च्या प्लॅनप्रमाणे धावायला (?) सुरुवात केलीय. आत्ताशी त्यातला पहिला आठवडा पूर्ण झालाय. जमेल तेवढं पळायचं, उरलेलं चालायचं असा विचार आहे.
रस्त्याच्या हार्ड सरफेसवर पळायची मला भीती वाटते अजून. वजन जास्त आहे, पळायची सवय नाही, आणि अजून जुनेच बूट वापरते आहे, त्यामुळे ग्राऊंडवरच्या जॉगिंग ट्रॅकवरच चाललाय प्रयत्न. रस्त्यावर सराव करायलाच हवा का?
इथल्या रथी-महारथींच्या सरावाविषयी वाचून हे लिहायला नको वाटत होतं खरं तर. पण तुम्ही सगळ्यांनी अगदी पहिल्यांदा धावायला सुरुवात कशी केली? दुसरा काही व्यायाम करतच होता, फिटनेस होता आणि मग धावायला लागलात, का कसं? माझ्यासारख्या नुकत्याच रांगायला लागलेल्यांसाठी काही खास सूचना?

गौरी, मी आख्ख्या आयुष्यात मिळून गेले महिना-दिडमहिना जो काही सराव करतोय तोच माझा धावण्याचा अनुभव असल्याने मी जे सांगतोय तो तज्ञाचा सल्ला म्हणून विचारात घेऊ नये. फक्त माझे शिकणे शेअर करतोय.

मला कळलेल्या माहिती नुसार, ८-१० किमी पर्यंतचे अंतर धावताना बुटांचा जोड जुना असला तरी फार झिजलेला नसेल फार फरक पडत नाही.
मॅरॅथॉनमधे रस्त्यांवरून धावतात, त्यामुळे थोडातरी सराव (आठवड्यातून एकदा तरी) रस्त्यावरून धावण्याचा करावा. पण जोरात धावू नये, ढांगा छोट्या टाकाव्या.
अगदी रोजच्या रोज पळायची गरज नाही, किंबहुना एका दिवसा आड पळावे व न पळत्या दिवसांत योग, मसल स्ट्रेंथनिंग व्यायाम असे करावे. http://www.runnersworld.com/ या साईट वर इतर व्यायाम प्रकारांबाबत सुद्धा माहिती दिलेली आहे. आपली तुलना इतर कोणाशीही करू नये. (लांब अंतर स्पर्धेत मधे मधे थोडेसे अंतर चालावे लागले तरी तो वैयक्तिक पराभव वगैरे मानू नये)

कोणालाही एक महिन्याच्या सरावानंतर ६ किमी धावणे अगदी सहज शक्य आहे. आणि मला खात्री आहे की आपणही ते करू शकाल Happy

धन्यवाद हर्पेन! साईट बघितली. खूप उपयुक्त माहिती आहे.
सद्ध्या एका दिवसाआड धावायला जाते आहे. योगासनं रोज होतात. इतर पूरक व्यायाम आता सुरू करेन.
सद्ध्या एक तारखेला सहभागी होणं आणि सहा किमी पूर्ण करणं एवढंच उद्दिष्ट ठेवलंय.

हैद्राबाद एयर्पोर्ट जवळ डेकॅथलॉन नावाच एक दुकान॑ सापडल. तिथे ट्रेल्/ रोड , ५,१०,१५,४२ ़ किमी. साठी शूज पाहिले. (घेतले पण Happy ) हे असे वेगवेगळे शूज असतात हेच मुळात माहित नव्हत मला. दर ६०० ़ किमि न्म्तर शूज बदलावे अस ं म्हणाला तिथला गाइड. धावणे सूरु केल्यावर च कळतय ़ की शास्त्रशुद्ध पळायला शिकल पाहिजे.

हैद्राबाद एयर्पोर्ट जवळ डेकॅथलॉन नावाच एक दुकान॑ सापडल. तिथे ट्रेल्/ रोड , ५,१०,१५,४२ ़ किमी. साठी शूज पाहिले. (घेतले पण Happy ) हे असे वेगवेगळे शूज असतात हेच मुळात माहित नव्हत मला. दर ६०० ़ किमि न्म्तर शूज बदलावे अस ं म्हणाला तिथला गाइड. धावणे सूरु केल्यावर च कळतय ़ की शास्त्रशुद्ध पळायला शिकल पाहिजे.

या स्पर्धेचे खूप गोड अनुभव आहेत गाठीला... नक्की भाग घ्या, मी धावलो नव्हतो पण पंच म्हणून काम करण्यासाठी पात्रता परीक्षा देवून दोन वर्ष फिल्डवर पंचकाम करायला मिळाले हे खूपच आनंददायी होते.

गेट..सेट....रेडी ..गो

मला घ्यायचेत शूज. जिथे दुकानदार तुम्हाला चांगला सल्ला देऊ शकतील आणि व्हरायटी मिळेल असं दुकान पुण्यात कुठे आहे का? माझा पाय थोडा मोठा आणि रुंद आहे. त्यामुळे जनरली जे मिळेल ते घ्यावं लागतं - फारसा चॉईस राहत नाही. Sad

काल साईट बघितली ... ६, १० किमी आणि अर्धमॅराथॉनसाठी नावनोंदणीची मुदत वाढवली आहे त्यांनी ... १५ नोव्हेंबरपर्यंत.

लोकहो, कोण कोण किती किती पळणार आहे ते लिहा ना, मी अर्धमॅरॅथॉन मधे भाग घेतलाय जी वेगळीकडून चालू होणार आहे (खंडूजीबाबा चौकातून नाही) आणि नेहरू स्टेडीयम मधे संपणार आहे. अजून कोणी आहे का अर्धमॅरॅथॉन मधे भाग घेणारे?

रच्यकने - आज एका आठवड्यानंतर पळलो, अंतर १० किमी.

अर्ध नाही.. शेवटी १० केच.. ! पण नेहरू स्टेडियमला भेटू नक्की संपल्यावर..
दिवाळी नंतर आळाशीपण पुन्हा सुरु झालाय ! मी थोडी फार प्रॅक्टीस करेन.. बाकीचं त्या दिवशी जे काय होईल त्यावर सोडून देणारे ! Happy
कोणी कोणी रजिस्टर केलं अ़जून ?

अरे काय हे पराग, असो, नेस्टे वर भेटूया.
अजून कोणी कोणी, किती किती अंतरासाठी नाव नोंदवले आहे ते लिहा.

पुणे मॅरॅथॉनच्या गेल्या काही वर्षातल्या आयोजनाविषयी काही नकारात्मक गोष्टी ऐकू येत आहे, जसे गलथान कारभार (हा या वर्षीचा माझाही अनुभव आहे वेब साईट वर दिलेला ऑफिसचा फोन नंबर फिरवला असता ही सेवा तात्पुरती खंडीत केली आहे असे ऐकू येतय), स्वयंसेवक अपुरे पडतात. लहान शर्यती संपतात पण मोठ्या शर्यती संपूर्ण संपायच्या आत (बरेच स्पर्धक राहिले असतानाच) रहदारी चालू करून देतात ज्याचा त्रास होऊ शकतो, वगैरे वगैरे ठराविक कालावधीत शर्यत संपवणार्‍यांनाच सर्टीफिकेट मिळते (हे सगळीकडेच असते पण इथे ती वेळ फार कमी असते उदा. २१किमीसाठी १ तास ३० मि. म्हणजे एका किमी साठी ५ पेक्षा कमी मिनिटे लागायला हवी) टी शर्ट खराब असतो, मागच्या वर्षी बनियनच दिले होते वगैरे वगैरे

तर हे खरे आहे का? मागचा अनुभव असणारे आहेत का इथे कोणी.

अर्थात मी २१किमी मधे भाग घेतलाय तर धावणार आहेच, पण उगाच धावायचे असेल (इतके धावून देखिल सर्टीफिकेट मिळणार नसेल) तर तशी मनाची तयारी केलेली बरी म्हणून विचारतोय.

हर्पेन.. हे सगळं अगदी खरं आहे.. गेल्यावर्षी तरी नियोजन अतिशय ढिसाळ होतं. मी दहा के पळालो होतो.

स्वयंसेवक अपुरे पडतात. लहान शर्यती संपतात पण मोठ्या शर्यती संपूर्ण संपायच्या आत (बरेच स्पर्धक राहिले असतानाच) रहदारी चालू करून देतात ज्याचा त्रास होऊ शकतो, >>> हो हे बरोबर आहे. शिवाय चॅरीटी रनच्या मार्गावर दिशादर्शक बाण किंवा स्वयंसेवक काहीच नव्हते. त्यामुळे लोकं साडेतीन किमी ऐवजी जवळजवळ सहा किमी पळून नेहरू स्टेडीयमला पोहोचली.

टी शर्ट खराब असतो >>> गेल्यावर्षी टीशर्ट नव्हताच. साधा बनियन लोगोचा छप्पा मारून दिला होता.. आम्ही तो फरशी पुसायला वापरला थोडे दिवस !

ह्यावर्षी त्यांनी आयोजन सुधारण्यासाठी बालेवाडीला ओपन मिटींग वगैरे बोलावली होती. तिथे राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अ‍ॅथलीट येऊन सल्ले देऊन गेले म्हणे. शिवाय रूट पण बदलला त्यांच्या सल्ल्यांप्रमाणे. यंदा टीशर्टसाठी तिनशे रुपये जास्त घेतले. आज टीशर्ट घरपोच आले. चांगल्या दर्जाचे आहेत. त्यामुळे यंदाची स्पर्धा गेल्यावर्षीपेक्षा बरी असेल असं वाटतय !

साजिर्‍या नाव नोंदवलस का? बाकी कोणी कोणी केलं ??

Pages