निसर्गाच्या गप्पा (भाग १६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 October, 2013 - 03:53

निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्र निगकर्स!
व्वा! शशांक मस्त लिंकआणि माहिती.
मानुषी, हे देऊळ असेच राहिले पाहिजे.>>>>>>>>>>दिनेशदा +१००. बहुतेक ते लोक भडक ऑइल पेन्ट वगैरे नाही देणार.
आर्या बातमी तेव्हाच वाचली होती. ओक्के........शशांकसारखे हबीब शेख पाहिले.
आज सकाळी सकाळी आवारात तुंबळ युद्ध झालं. लुई विरुद्ध घूस. घूस इतकी मोठी आणि अ‍ॅग्रेसिव्ह होती...मला भीति वाटायला लागली. लुईला जर तिने काही केलं तर?
१५ मि. झटापट, पाठलाग चालू. अंगणात एक बर्ड ऑफ पॅरडाइजचा मोठा आडवा वाफा आहे. त्यात ती घूस गेली. लुईने तिथे जाऊन वाफ्याची वाट लावली.
शेवटी शरदच्या मदतीने त्याला जेरबंद करण्यात यश आलं. मग घूस शेजारच्याच एका बिळात अदृश्य झाली. संपूर्ण आवारात जमिनीखालून आरपार बिळं केली आहेत.

उठा निगकर्स!........... गारठले की काय?
की अजून जिप्सीभौंच्या लग्नातून मोकळे नाही झाले? Proud

संपूर्ण आवारात जमिनीखालून आरपार बिळं केली आहेत. >>>>> मानुषी, लवकर काही तरी जालीम उपाय कर या घुशींसाठी - बाजारात उंदीर-घूस मारण्यासाठी एक औषध मिळते बघ (बहुधा झिंक ऑक्साईड का असेच काही तरी आहे - काळ्या रंगाची पूड असते) ते तयार भज्यांवर घालून ती भजी बागेत विखरुन टाक - याचा नक्कीच फायदा होईल घुशी मारण्याकरता ......

उठा निगकर्स!........... गारठले की काय? >>>>> खरंच, सध्या इकडे कोणी फिरकतंच नाहीये !!! काय झालंय सार्‍यांना ???????????????

सध्या आमच्या बागेत कुंती/ कामिनीला खूप कळ्या लागल्यात. अतिशय सुगंधी व देखणे फूल असते हे...
(फोटो आंतरजालावरून साभार)

Common name: Orange Jasmine, Chinese box • Hindi: Kamini कामिनी • Manipuri: কামিনী কুসুম Kamini kusum • Tamil: வெங்காரை Vengarai • Telugu: Nagagolungu • Marathi: कुन्ती Kunti • Kannada: Kadu karibevu • Malayalam: Maramulla
Botanical name: Murraya paniculata Family: Rutaceae (citrus family)
Synonyms: Murraya exotica (माहिती http://flowersofindia.net/ या साईटवरुन साभार)

1Murraya Paniculata - Mock Orange.jpgMurraya2.jpgMurrayaPaniculataWs800.jpg

मला हे झाड खुप आवडतं.. माझ्याकडे होते रोपटे. अतिशय सुगंधी. मला दुर्बुद्धी झालि आणि गावी घेऊन गेले. तिथे ते मरुन गेले Sad

आता मी इथुन रामराम ठोकुन गावी जाईपयंत तिथे काहीच लावण्यात राम नाही.

आमच्याकडे कोकीळ जागे झालेत. सध्या एखादी अर्धवट लकेर घेऊन गळा अजुन फुटला का नाही त्याची चाचपणी चाललीय...

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5612852277867975760&Se...

"इसॉन' या धूमकेतूने पृथ्वीच्या कक्षेमध्ये प्रवेश केला असून, जगभरातील खगोलप्रेमींना येत्या महिन्याभरामध्ये आकाशामध्ये मोठी "आतषबाजी' पाहण्याची संधी मिळणार आहे. या धूमकेतूचे वर्णन "शतकातील धूमकेतू' असे करण्यात आले असून, तो सध्या उघड्या डोळ्यांनीही पाहता येतो आहे.

हं.........पण शशांक लुई मोकळा असतो ना कधी कधी म्हणून जालिम उपायाची भीति वाटते. आणि आजूबाजूला(आमच्या आवाराबाहेर) इतकी घाण आणि गचपण आहे ना की आम्ही आतून कितीही साफ केलं तरी काही उपयोग नाही.
कुंती खूपच देखणी आहे.
तुळशीचं लग्न आणि घरातले आकाश कंदिल( आता आज काढून टाकायचे आहेत.)
ही शरदने काढलेली रांगोळी.

या शरदने नव्याने रंगवलेल्या तुळसकुंड्या.



गुरुजी विवाह विधी करताना.

खराब फोटो क्वालिटी(सेलफोनातले)

वा मानुषी, तुमच्याकडे तुळशीचे लग्न अगदी साग्रसंगीत लावताना दिसते आहे. माझ्या लहानपणीचे आठवते आहे - आई-वडिल अगदी उत्साहाने ती सर्व तयारी करुन तो सोहळा पार पाडत ....

आता मोठेपणी दिवाळी ही इतर दिवसांसारखीच वाटते, नाही का ? लहानपणीची मज्जाच वेगळी .... गेले ते दिन गेले ....

शशांक, माझ्या गोव्याच्या घरी गेटजवळ कुंती होती. गेट उघडताना वरून सुगंधी चांदण्याची बरसात !
त्या घरीच तुळशीचे लग्न साग्रसंगीत लागायचे. वृंदावन घरमालक स्वतः रंगवत असत. चक्क आमंत्रण देत असत लग्नाचे. तिथे दिवाळीपेक्षा या लग्नाला जास्त महत्व देतात.

मला धुमकेतूने नेहमीच फसवले आहे. एखाद्या पि़ंजलेल्या कापसाचा पुसटसा गोळा यापेक्षा चांगले दर्शन अजुन घडलेले नाहीय. Sad हॅलेचा धुमकेतूही मला दिसला नाही Sad Sad

मला धुमकेतूने नेहमीच फसवले आहे. >>> माझ्या आठवणीत १९६५ का ६६ चा खूप मोठ्ठा धूमकेतू अजून आहे... पहाटेला वडिलांनी मुद्दाम उठवून दाखवलेला - पूर्व क्षितीजावर - एखाद्या प्रचंड सोनेरी खराट्यासारखा ...

मध्यंतरी हॅलेचा दिसला होता पण फारच छोटा होता - कसाबसा दिसायचा.... त्यात आपले शहरी आकाश - इतके सिटीलाईट्स असतात की साधे तारे दिसायचीही मारामार ....

आकाशदर्शनाला शहरापासून चांगले १००-१५० कि मी लांब (जिथे सिटीलाईट्स अजिबात असता कामा नये) आणि अमावस्येच्या आसपासची रात्र पाहिजे - कसले भारी आकाश दिसते म्हणून सांगू - नवीन पहाणार्‍याचा (इस्पेशली शहरी माणसाचा) तर विश्वासच बसत नाही की एवढे तारे आकाशात दिसतात ???????

शशांक तो ६५/६६ सालातला मलाही आठवतोय. माझे वय ३ वर्षाचेच असणार पण लख्ख आठवतोय. १९८५ चा मी हैद्राबाद मधून बघितला होता.

साधनाला, वांगणी जवळच आहे. पण आता काय होतं, अशी एखादी जागा समजली कि लोकांच्या झुंडीच्या झुंडी जातात तिथे. ( कासचे तसेच झालेय. माझ्या लहानपणी येता जाता सातार्‍याला एस टी जेवणासाठी थांबायची. त्यावेळी कासचे नावही ऐकले नव्हते आम्ही. )

तुमच्याकडे तुळशीचे लग्न अगदी साग्रसंगीत लावताना दिसते आहे. >>>>>>. शशांक क्रेडिट गोज टु धाकटी जाऊ! तिचं म्हणणं ...............जेव्हापासून आम्ही(म्हणजे यात पुढाकार तिचाच.) तुळशीचं लग्न सुरू केलं तेव्हापासून घरातल्या सगळ्या मुलींची लग्नं पटापट पाठोपाठ झाली.
मग आता आम्ही ते चालूच ठेवलं आहे. खूप प्रसन्न वाटतं. विशेषतः गुरुजींनी सांगितल्यावर तुळशीला छोट्या हिरव्या बांगड्या, सगळे सौभाग्यालंकार घालताना!

सुसंध्याकाळ.

१९८५ च्या धुमकेतूच्या वेळी मला पण आईवडीलांनी जागे ठेवण्याचा प्रयत्न केला होता पण तेंव्हा मी नावाला जागृत नव्हते. Lol

मानुषी आमच्याइथे पण तुळशीचे लग्न जोरदार असते. शनिवारी झाले.

यंदा डिसेंबर महिन्यात १३डिसेंबरच्या रात्री व १४ डिसेंबरच्या पहाटे उल्कावर्षाव दृष्टीस पडणार आहे असे लोकसत्तामध्ये वाचले होते.. साधारण मिथून तारका समुहातून हा उल्कावर्षाव होतो म्हणे.. तेव्हा अगोदरच माहिती काढून ठेवा.. नि त्यानुसार आकाशनिरीक्षण करा... नक्कीच आस्वाद घ्याल.. Happy

आमच्या तुळशीच्या लग्नाची तर मी पत्रिका पण बनवली होती Proud
आणि आईला सांगितल की यावेळेपासुन दरवर्षी तुळशीच्या नवर्‍याचं नाव बदलायचं
मागच्यावर्षी दामोदर होतं
यावर्षी माधव केलं Proud

रिया.

मी आधी इथे लिहिली होती, तरी परत कथा लिहितोय.

सती वृंदाचा नवरा अतिपराक्रमी होता. तिचे त्याच्यावरचे प्रेम हेच त्याचे बल होते. विष्णुला काही केल्या
त्याचा पराभव करता येईना. तेव्ह्या त्याने तिच्या नवर्‍याचेच रुप घेऊन तिला भ्रष्ट केले.
विष्णूची हि चलाखी तिच्या लक्षात आली आणि तिने त्याला दूषणे द्यायला सुरवात केली.
त्यावेळी मी तुझ्याशी लग्न करीन असे वचन दिले. तिच्या राखेचे ( तिने नवर्‍याचे शीर हातात घेऊन आत्मदहन केले ) रुपांतर तुळशीत झाले व विष्णु तिच्यासाठी शाळीग्रामाच्या रुपात राहिला.

वृंदा तशी चलाख होती. तिने हे वचन सहज स्वीकारले नाही. तुला आधीच एवढ्या बायका, मग माझे स्थान काय ? असे तिने विचारले. त्यावेळी तुझे स्थान मीठाचे राहील, असे तो म्हणाला. म्हणून नेवैद्यावर मीठ न वाढता,
तुळशीचे पान ठेवतात.

( या मीठ न वाढण्याला, अगस्ति ऋषींचा आणि देवाला मीठाला जागायला भाग पाडणे असाही संबंध आहे )

दिनेशदा Happy
मीही ऐकलीये ही कथा
तिचा पती म्हणजे विष्णु हे माहित आहे म्हणूनच माधव (त्याचच एक नाव) ठेवलं Happy
नाही तर आणखी भारी नावांची लिस्ट तयार आहे माझ्याकडे Proud

विष्णू सहस्त्र नाम आहेत कि !

कुंती, सीता(वेणी/ आसवे ) , रुक्मीणी, कमला, हर(सिंगार), हरी(प्रिया), गौरी(चे हात), गायत्री यांच्या नावाची फुले आहेत.
हि यादी आणखी वाढवता येईल का ? मला आता आठवत नाहीत.

( सिंगापूरला बेनेझीर आणि मार्गारेट थॅचर यांच्या नावाची ऑर्किड्स पण बघितली होती. )

यू ट्यूबवर वाईल्ड अरेबिया या नावाने बीबीसीचा माहितीपट २ भागात आहे. अवश्य बघा.
बीबीसीच्या प्रत्येक माहितीपटाचे चित्रीकरण बघून असे वाटते कि यापेक्षा चांगले चित्रीकरण असूच शकत नाही.
हे माहितीपटही त्याला अपवाद नाहीत. दुसर्‍या भागात कोळी समुद्रात जाळे टाकून मासे पकडतात असे दृष्य आहे, त्याचे तर संकलनही अफलातून आहे. जाळ्यातून सुटू पाहणार्‍या माश्यासारखा कॅमेरा फिरलाय.

दुसर्‍या भागात माझ्या आवडत्या ओमानमधल्या धोफार या भागातले चित्रीकरण आहे. आम्ही ओमानमधे असताना याच डोंगरातले पाणी पित असू. एकतर हा भाग डोंगराळ आहेच शिवाय भारतीय मौसमी वार्‍यामूळे या भागात नियमित पाऊसही पडतो. वर्षाचा काही काळ हा भाग हिरवागार असतो ( त्यावेळी तिथे खरीफ उत्सव असतो. हो आपला खरीप हा शब्द मूळ अरेबिक आहे. )

मानवाच्या उत्क्रांतीच्या पहिल्या टप्प्यात जेव्हा इथिओपियातून, लाल समुद्र ओलांडून मानव उत्तरेकडे सरकला, त्यावेळी या भागानेच पाण्याची सोय केली होती.

वरच्या दृष्याशिवाय एका कोळ्याने अंगावरचा पाण्याचा थेंब झटकून टाकायला केलेल्या प्रयासाचे अप्रतिम चित्रण आहे. तरसाने / लांडग्याने केलेल्या शिकारीची दृष्ये कदाचित त्रासदायक ठरतील बघायला, पण बाकी
माहितीपट अगदी बघाच.

विष्णू सहस्त्र नाम आहेत कि !
>>>
येस आता सुरुवात झालीये.. हळू हळू सगळी नावं वापरु!!!!
तरिही हजार नावं होणार नाहीत म्हणा पुर्ण!

मस्त चालंलंय इथे. मी बर्‍याच दिवसांनी डोकावले. झटका आल्यागत जोरदार बागकाम सुरू केलंय - विशेषतः भाजीपाला. या आठवड्यात रतनशीमध्ये जाऊन बी-बियाणं आणलं, मोठ्या कुंड्या आणल्या, शेणखतं आणली.

आतापर्यंत कारली, वाटाणे, कलौंजी (कांद्याचं बी), लाल भोपळा, चवळीची पालेभाजी, मेथ्या, पुदिना, कोथिंबीर, टोमॅटो, बेसिल, पालक लावले आहेत. यातला बेसिल आणि पालक सोडून बाकी सगळ्या भाज्यांच्या बिया घरच्या घरी उपलब्ध होत्या. आणलेल्या कारल्यातल्या पिकलेल्या बिया, भोपळ्याच्या बिया, मेथीदाणे, धणे, खराब झालेले टोमॅटो, कलैंजी, वाटाणे लावले. चवळीची पालेभाजी केव्हापासून आपोआप येत आहे. त्यालाच बिया लागतात आणि त्या पडून अजून भाजी येत राहते. पुदिना बाजारातून आणल्यावर त्याची पानं काढून काड्या लावल्या आहेत. बेसिल आधीचा होताच अजून थोड्या बिया मिळाल्या म्हणून आणून लावल्या.

आधीचं आलं, गवती चहा, मायाळू आणि अळूची पानं आहेतच. आणि अजून कॅप्सिकम (ढोबरी मिरची) , टिंडे आणि लेट्युस लावायचं आहे.

मध्यंतरी दार्जिंलिंगच्या एका टी- इस्टेट वर सॅलड खाल्लं त्यात नॅस्टरटियम (Nasturtium) या झाडाची पानं आणि फुलं देखिल होती. आयडिया प्रचंड आवडली. म्हणून त्याच्या बिया आणल्या आहेत. दिसायलाही सुरेख आणि सॅलडलाही उपयोगी. भारीच उत्सुक आहे आता ......

त्यावरून आठवलं की आपण फारच कमी फुलं खातो. गुलाबाच्या पाकळ्या, शेवग्याची आणि कुड्याची फुलं, केळफूल आणि भोपळ्याची फुलं ... मला तरी इतकीच माहित आहेत / आठवताहेत. त्यात आता वरच्या नॅस्टरटियमच्या फुलांची भर पडली. मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया मध्ये झुकिनीच्या फुलं आतमध्ये काही स्टफिंग भरून ग्रिल करून वापरताना दिसतात. शिवाय इतरही अनेक फुलं सजवण्यासाठी आणि मग अर्थात खाण्यासाठी वापरताना दिसतात. मी घरी लावलेला भोपळ्याचा वेलही त्याची फुलं वापरण्याकरता आहे.

(मी खाण्यासाठी वापरण्यात येणारी फुलं यावर वेगळा बाफ काढला आहे. कृपया ती चर्चा इथे करा. )

रच्याकने, मला तोंडल्याचा वेल हवाच हवा आहे. कोणाकडे/कुठे असल्यास जरूर सांगा. शिवाय मला रॉकेट लीव्हज लावायचे आहेत. त्याच्या बिया कुठे मिळतील काही कल्पना?

सध्या थंडी असूनही आमच्याकडे ही फुले फुललीएत...

Common name: Bleeding Heart Vine, Bleeding Glory Bower, Bag Flower
Botanical name: Clerodendrum thomsoniae Family: Verbenaceae (verbena family)
( माहिती http://flowersofindia.net/ वरुन साभार)

फोटो आंतजालावरुन साभार ....
$T2eC16R,!y8E9s2fjKweBRZBKY0fMw~~60_35.JPGbleedingheartvinewhiteverti.jpg

Pages