Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34
मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रतिसादाची वाट पाहत आहे.
प्रतिसादाची वाट पाहत आहे.
मोकिमी, लिम्बु तिम्बु, प्लीझ
मोकिमी, लिम्बु तिम्बु, प्लीझ प्रतिसाद द्या.
खुप प्रतिसाद आहेत या धाग्यावर
खुप प्रतिसाद आहेत या धाग्यावर आणि मी या वेब वर नवा आहे त्यामुळे सगळे प्रतिसाद वाचले नाहीत त्याबद्दल क्षमस्व....मला फलज्योतिषात खुप इंटरेस्ट आहे....मी नवी सांगवी, पुणे येथे राहतो आणि माझ कार्यालय डेक्कनला आहे...नवी सांगवी किवा शिवाजीनगर पुणे परिसरात फलज्योतिष शिकविणारे चांगले शिक्षक कोणास माहित असल्यास क्रुपया मला सांगा...
रवींद्र , क्लास लावण्याच्या
रवींद्र , क्लास लावण्याच्या आधी तुम्ही ज्योतिष विषयक पुस्तके वाचली आहेत का? जर वाचली नसतील तर व.दा भट , म. दा भट ह्याची पुस्तके जरूर वाचा . बरेच काही शिकता येईल .
अन्विता जी, माझ्याकडे एक दोन
अन्विता जी, माझ्याकडे एक दोन पुस्तके आहेत. लेखकांची नावे आठवत नाहीत…. पण ती पुस्तके वाचताना मला बरेच प्रश्न पडतात त्याचे निराकरण ती पुस्तके करत नाहीत… म्हणून हा प्रपंच
ता. क. :- माझ्याकडे व. दा. आणि म. दा. भटांची पुस्तके नक्कीच नाहीत…. ती नक्कीच विकत घेईन….
मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद…
अन्विताजी प्रतिसादाची वाट
अन्विताजी प्रतिसादाची वाट पाहत आहे.
वसुधा एसः जन्मदीनान्कः
वसुधा एसः
जन्मदीनान्कः १९/११/१९८० जन्मवेळः पहाटे ४.३० जन्म स्थळ: मन्चर्(पुणे)
लग्न तुळ, लग्नी बुध, शुक्र अर्ध्या अंशावर, व्ययात गुरू शनि युति, द्वितियात रवि, तृतियात मंगळ, चतुर्थात केतू/दशमात राहू, चंद्र षष्ठात मीनेला. हर्षल नेप द्वितीयात वृश्चिकेला, प्ल्युटो व्ययात २९ अंश सबब राशीभेदाने पण प्ल्युटोशुक्र युति,
>>>> नोकरीत स्थिरता कधी येइल?
चंद्रकुंडलीकडून, सध्याचे मिथुनेतील चतुर्थातील गुरुभ्रमण उपयुक्त ठरेल, गोचर शनि मीनेला आठवा असला तरी दशमस्थानावरील त्याची तिसरी नजरही उपयुक्त ठरेल. पुढील वर्षीच्या मे पर्यंत स्थिरतेकडेच वाटचाल अपेक्षित.
>>>> अर्थिक परिस्थिति कधि बद्लेल?
२०१६ मध्यानंतर न भुतो न भविष्यती असा बदल अपेक्षित आहे. केवळ आर्थिक नव्हे तर व्यक्तिमत्व/विचारधारा/धोरणे इत्यादी सर्वच बाबतीत बदल घडून येईल व तो सकारात्मक असेल.
अवांतरः
लग्नकुंडलीकडून व्ययातील गुरुशनि युति स्वभावात एकप्रकारची विरक्तिकडे झुकणारी उदासिनता/निरिच्छा जाणवते जी शुक्राच्या तुळ लग्नाला पोषक नाही, आणि त्याच्या एकदम विरोधाभासी अशी प्रथमेश/अष्टमेश शुक्र व प्ल्युटो यांची युति प्रथमव्ययातुन होत असल्याने विशिष्ट बाबतीत कायम द्विधा स्थिती असेल. याचबरोबर लग्न तुळ शुक्राचे, तर चंद्ररास मीन गुरूची हे षडाष्टक व्यक्तिमत्वात आंतरिकरित्या दोन विरोधात्मक इच्छा/आकांक्षांचे भाग करते, अशी गरज नाही की ते बाहेरच्यांना जाणवेल. यावर गुरू या शुभ ग्रहाची/प्रत्यक्ष सद्गुरुंची/श्रीदत्ताची उपासना मात देऊ शकते.
द्वितीयातील रवि स्पष्टवक्तेपणा देतो. मात्र द्वितिय/व्यय स्थानात रवि/शनि हे पापग्रह असल्याने दृष्टीदोष /वाचादोष /दातांचेविकार यापैकी काही एकाचे अस्तित्व असू शकते
(चू.भू.दे.घे. - कारण हल्ली स्टिन्ग ऑपरेशन प्रमाणे अशीच एखादी कुंडली देऊन, मग बघा यान्ना इतकेही सांगता येत नाही वगैरे करण्याचे प्रकार संभवत असल्याने, अशाच प्रकारची वरील कुंडली असण्याची शक्यताही गृहीत धरुन मी माझे वरील नि:ष्कर्ष/भाष्य बदलण्याचे स्वातंत्र्य राखून ठेवतो आहे, जेव्हा की प्रश्नात गृहित पूर्वस्थितीप्रमाणे जातक काही एक उद्योगव्यवसाय करतो आहे/हयात आहे/बौद्धिकदृष्या वरील प्रश्न विचारण्याच्या क्षमतेत आहे/व वरील प्रश्न जातकालाच पडले आहेत असे मानले असे.)
धन्यवाद अन्विता जी, वरिल
धन्यवाद अन्विता जी,
वरिल माण्सने जर hardware and networking course kela तर त्याला काही फायदा होएल का?
वसुधा एस , तुमच्या कुंडलीचे
वसुधा एस , तुमच्या कुंडलीचे विश्लेषण मी केलेले नाही. limbutimbu ह्यांनी केले आहे. त्यामुळे धन्यवाद त्यांना द्या.
ओह्ह!!!! मला माफ करा
ओह्ह!!!!
मला माफ करा लिम्बुतिम्बु.
धन्यवाद .
वरिल माण्सने जर hardware and networking course kela तर त्याला काही फायदा होएल का?
माझ्या सख्ख्या भावाचा विवाह
माझ्या सख्ख्या भावाचा विवाह करायचा आहे. अरेंज मॅरेज असल्याने 'पत्रिका' दाखवून करावे असा माझ्या आईचा आग्रह आहे. आलेले एक स्थळ सर्वदृष्टीने योग्य वाटते आहे. मात्र ज्योतिषाच्या दृष्टीकोनातून हे दोघे एकमेकांना अनुरूप ठरतील का याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
मुलगा:
जन्मतारिख - ३१/१२/८६ वेळ - सकाळी ९.५० ठिकाण - मुंबई.
मुलगी:
जन्मतारिख - २४/१२/८८ वेळ - पहाटे ३.२९ ठिकाण - वेंगुर्ले.
>>> hardware and networking
>>> hardware and networking course kela <<<<<
द्वितीयातील नेपच्युन व षष्ठातील चंद्र यांचा नवपंचम बघता असा काही इलेक्ट्रॉनिक्स्/इलेक्ट्रिकशी संबंधीत कोर्स करण्यास काहीच हरकत नाही, नक्किच उपयोग होईल.
अन्विता, अहो मग माझ्या विश्लेषणाचे तुम्ही परिक्षण करा की
शिवाय तुम्ही कृष्णमूर्ति पद्धतीनेही बघु शकाल
धन्यवाद लिम्बुटिम्बु
धन्यवाद लिम्बुटिम्बु जी.
पुढील वर्षीच्या मे पर्यंत स्थिरतेकडेच वाटचाल अपेक्षित<<<<<
म्हन्जे २०१४ च्या ना?
जन्मदीनान्कः ०१/०९/१९८३ जन्मवेळः रात्रौ ११.३० जन्म स्थळ: पारनेर्(अहमदनगर)
ही वरिल माण्सच्या बाय्कोचे details.
hyane tyacha auyshyat kahi pharak padto ka?mhane ekmekanmule kahi pharak padto ka?
लिंबूभाऊ मागच्या वर्षी आणि
लिंबूभाऊ मागच्या वर्षी आणि ह्यावर्षी ही तुम्हाला मी विपू करून प्रश्न विचारलेत
माझा नंबर कधी लागणार आहे
limbutimbuji , तुम्ही छानच
limbutimbuji , तुम्ही छानच लिहिले आहे आणि तुमचा अनुभव पण माझ्याहून जास्तच आहे . कृष्णमुर्ती पद्धतीने पण शुक्र ( महादशा स्वामी) तृतीय स्थान देतोच आहे . त्यामुळे कोर्स करणे चांगलेच आहे. तसेच अंतर्दशा स्वामी दशमाचा कार्येश आहेच . तसेच राहू मंगळाच्या दृष्टीत आहे. त्यामुळे मंगळाची पण फळे देईल . फक्त कोर्स नीट पूर्ण केला पाहिजे. तसेच शुक्र अष्टमाचा एकमेव कार्येश आहे हा पण एक मुद्दा आहे.
Name : Pradip Birthdate ;
Name : Pradip
Birthdate ; 11/05/1979
birthTime : 10:00 PM
Birth Place : Nagpur
Name: Ashwini
BirthDate : 27/07/1982
Birth place :Nagpur
Birth time 2:30 AM
आर्थिक परीस्थितीत कधी सुधारणा होउ शकते?.....
स्वत:चे घर होण्याचे...योग आहेत का?
अन्विता.., लिम्बुभाउ....प्लीज प्रतीसाद द्या?
मी_केदार ___/\___
मी_केदार ___/\___ एक्स्ट्रीमली सॉरी, पण आता बघतो वेळ कसा मिळतोय ते, अन सान्गतो.
मला काहि वर्षांपुर्वी. माझे
मला काहि वर्षांपुर्वी. माझे डाॅक्टर कम ज्योतिषी ह्यांनी पत्रिका बघुन माझे माहेर पाणयाच्या काठी होते का? माझ्या माहेरी आवळयाचे झाड. होते का असे
प्रश्न विचारले होते ह्या गोष्टी पत्रिकेवरुन कळतात का??
आवळ्याच्या झाडाबद्दल माहित
आवळ्याच्या झाडाबद्दल माहित नाही पण पाण्याजवळचे
घर कळू शकते . चतुर्थस्थान व त्याच्या अधिपती वरून.
अन्विता धन्यवाद पण त्यांनी
अन्विता धन्यवाद पण त्यांनी असे पण सांगितले कि माझ्या घरी कोणीतरी दत्तभक्त आहे जे खरे आहे . ह्या आणी अश्या काही गोष्टीवरून माझा पत्रिकेवर अधिकच विश्वास बसला . फक्त ते सांगणारी व्यक्ती योग्य हवी असे वाटते . तसेच आत्तापर्यत त्यांनी सांगितलेले एकूण एक भविष्य माझ्याबाबतीत खरे ठरले आहे . ह्यात कुठलीही अतिशोयोक्ती करत नाहीये .
हा बहुतेक अंतःस्फूर्तीचा भाग
हा बहुतेक अंतःस्फूर्तीचा भाग असावा, पण पत्रिकेतून इतके डिटेल सांगणे मी तरी कधी नाही वाचले.
पत्रिकेत चतुर्थ स्थानात चंद्र
पत्रिकेत चतुर्थ स्थानात चंद्र वा कर्क रास असेल तर पाण्याजवळ घर असते. म्हणजे घराजवळ विहीर, तलाव, नदी वा तत्सम पाण्याचा साठा असतो. अतीशयोक्ती नाही तर पत्रिका चेक करुन बोअर मारली तर नक्कीच पाणी लागु शकेल. कर्क रास आणी त्याचा मालक चंद्र हे जलाचे म्हणजे पाण्याचे कारक/ मालक असतात. कर्क म्हणजे खेकडा, तो पाण्यातच रहातो.
गमभन दत्तभक्त माणुस म्हणजे त्या व्यक्तीच्या पत्रिकेत गुरु हा ग्रह पंचम स्थानात वा नवम स्थानात धनु/ कर्क राशीत असु शकतो. पंचम स्थान हे उपासनेचे स्थान आहे, त्यात गुरु असणे हे गुरुबळ असण्याचे संकेत असतात, आणी खरच ही माणसे नशीबवान असतात.
गमभन ते ज्या पद्धतीत ह्या
गमभन ते ज्या पद्धतीत ह्या गोष्टी सांगतात ते बघून मला पण तोअंतःस्फूर्तीचा भाग वाटायचा . पण रश्मी सांगतात त्या प्रमाणे खूप चांगला अभ्यास असेल तर हे सांगता येत असावे .
रश्मी नक्की काय म्हणताय कळले नाही . माझ्या पत्रिकेवरून त्यांनी सांगितले कि घरात कोणीतरी दत्तभक्त माणुस आहे . माझे वडील दत्तभक्त होते म्हणजे नक्की कोण नशीबवान मी का जी व्यक्ती दत्तभक्त होती ती ?
राशी , ग्रहाचे कारकत्व तसेच
राशी , ग्रहाचे कारकत्व तसेच योग ह्याबद्दल चांगला अभ्यास असेल तर तर्क लावता येतात . ज्योतिषशास्त्रात प्रश्नकुंडली ह्या विभागात ह्या सर्वांचा (तर्काचा)खूप उपयोग होतो.
लिम्बुटिम्बुजी प्रतिसादाची
लिम्बुटिम्बुजी प्रतिसादाची वाट पाहत आहे.
आर्थिक स्थिती कधी सुधारेल हा
आर्थिक स्थिती कधी सुधारेल हा प्रश्न बरेच लोक विचारतात . पण त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करताय का ? जर हो तर मग तुमची पत्रिका , ग्रह , दशा , गोचर इ. वरून त्या प्रयत्नांना यश येईल का? हे बघता येते.
ज्योतिषशास्त्र हे कर्मसिद्धांतावर बेतलेले आहे . म्हणजे आधी कर्म करणे अतिशय महत्वाचे आहे. कोणते काम करावे किंवा आपल्या पत्रिके प्रमाणे कोणते क्षेत्र आपल्याकरता चांगले हे बघता येते व त्याप्रमाणे प्रयत्न करावेत . पुढे येणाऱ्या महादशा त्या कामाला (क्षेत्राला ) अनुकूल आहेत कि नाही हे पाहता येते.
अचानक धनलाभ , वडिलार्जित property वगेरे गोष्टी आहेत . परंतु स्व:कष्टाने मिळवलेल्या पैशाची गोष्टच वेगळी असते . यामुळे आधी प्रामाणिक प्रयत्न करणे महत्वाचे.
अन्विता जी माझ्या प्रश्नाच
अन्विता जी माझ्या प्रश्नाच उत्तर द्याल का?
कि पत्निच्या पत्रिकेचा पतिच्या अयुशवर काही परिणम होतो का?
अन्विता, प्रयत्न तर
अन्विता, प्रयत्न तर प्रामाणीकपणे सुरुच आहेत... पण प्रयत्नांना म्ह्णावे तसे यश..नाही..
काही ना काही अड्चणी येउन ...अपयश येते...म्ह्णुन प्रश्न विचारला...
रवींद्र , क्लास लावण्याच्या
रवींद्र , क्लास लावण्याच्या आधी तुम्ही ज्योतिष विषयक पुस्तके वाचली आहेत का? जर वाचली नसतील तर व.दा भट , म. दा भट ह्याची पुस्तके जरूर वाचा . बरेच काही शिकता येईल .>>>>>>
अन्विता जी, कोणत्या पुस्तकापासून सुरुवात करू????
पतीच्या करियर च्या दृष्टीने
पतीच्या करियर च्या दृष्टीने पत्नीच्या पत्रिकेचा तसा काही परिणाम नसतो . पत्नीची धन स्थाने बलवान असतील तर
मग पत्नीच्या नोकरी मुळे किंवा काही वडिलोपार्जित property ह्या दृष्टीने फायदे होतात .
Pages