Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34
मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अन्विता, मी संपर्का मधून मेल
अन्विता,
मी संपर्का मधून मेल पाठवला आहे. उत्तराची प्रतिक्षा करत आहे.
धन्यवाद!
आन्विता वक्रि गुरु बद्द्ल
आन्विता वक्रि गुरु बद्द्ल महिति द्या.
dmughda , कोणताही वक्री ग्रह
dmughda , कोणताही वक्री ग्रह जर दुसर्या कोणत्या ग्रहाच्या ( विशेष करून पापग्रहांच्या )कुयोगात असेल तर अशुभ फळे देण्याची शक्यता दाट असते . नुसता वक्री गुरु कदाचित गुरूच्या कारकत्वात असलेल्या गोष्टीमध्ये अडचणी / नुन्यता आणेल . ते सुद्धा इतर योग तसे असतील तर. उदा: गुरु संतती चा कारक ग्रह आहे. जर पंचम स्थान आणि पंचमेश जर बिघडले असतील तर वक्री गुरु मुळे अजूनच संतती सुखात बाधा येईल .
गुरु वक्री असण्यापेक्षा तो स्तंभी ( motionless ) असणे अजूनच अशुभ परिणाम देतो .
पत्रिकेत एकटा ग्रह कोणताही परिणाम देत नसून सगळ्या ग्रहयोगाचा तो एकत्रित परिणाम असतो .
माझ्यामते पत्रिका हि गत जन्माच्या कर्मांचा आरसा असतो. ह्या जन्मी तुम्हाला चांगली कर्मे करून अशुभ योग टाळता येतात किंवा त्याची तीव्रता तरी कमी करता येते .पत्रिका पहिली नाही तरी चालेल पण नेहेमीच सत्कर्म जरूर करावीत .
सध्या आम्ही सर्व कोणत्या नं
सध्या आम्ही सर्व कोणत्या नं कोणत्या आर्थिक शाररिक आणि मानसिक संकटातून (हे सर्वांनाच असतं पण आमच्या घरातल्यांच जरा वेगळच चालू आहे) सहन नकरण्या पलीकडे जातोय.
आमची आत्याने एकां गुरुजीना ह्या होणाऱ्या त्रास विषयी विचारलं असता त्यांनी तुमच्या घरासमोर असलेया ओटीवर देव गाडले गेले आहेत ते बाहेर काढा (हे गुरुजी खुप लांब राहतात कधीही आमच्या घरी आले नाहीत की आत्याला ह्या देवा विषयी माहिती होत) तर हा त्रास बंद होईल अस संगीतालय.
खुप पूर्वी आमच्या घरा समोर एक कडूनिंबचे झाड होते, त्या झाडाखाली कोणी तरी देव आणून ठेवले होते कालपरत्वे दुर्लक्ष झाल्यामुळे ते देव जमिनी खाली गाडले गेले, अस आमच्या घरातले सांगतात (निटस फक्त एका आत्याआजीला आठवतंय)
१. मला विचारायचं की असं काही असतं कां ?
२. असेल तर निवारण कसं करता येईल ?
३. त्या जागेवर खोदकाम करून बघावे लागेल कां ?
४. जरी केलं आणि चुकीच्या जागी खोदकाम करून देव सापडलेच नाही तर कांय ?
५. किवां खोदकाम न करता काही उपाय आहे कां ?
प्लीज काही तरी उपाय सांगा
मी_केदार, त्या गुरुजींनाच
मी_केदार,
त्या गुरुजींनाच विचारून बघा. जर ते जमत नसेल तर कुणी उन्नत देवभक्तास आणून त्याच्या वा तिच्या कडून खोदकामास सुरवात करवून घ्या. फक्त पहिली कुदळ मारली तरी चालेल. मग बिनधास्त खोदकाम सुरू करा. गाडले गेलेले देव आपोआप मार्ग दाखवतील.
आ.न.,
-गा.पै.
केदार करुन तर बघा. मात्र ती
केदार करुन तर बघा. मात्र ती जागा आधी ज्यान्च्या मालकीची आहे, त्याना तसे सान्गुन त्यान्ची परवानगी घ्या.
काही लोकाना पत्रिका पाहुन किन्वा न पहाताही असे अन्दाज येतात. तर काहीचा अजीबात विश्वास नसतो. माझी पत्रिका पाहुन एका ज्योतिश्यानी माझे वडील कुठे कामाला होते, घर दार इत्यादीची सम्पुर्ण माहिती सान्गीतली होती. वास्तवीक ते आणी मी त्यापूर्वी कधीही एकमेकाना भेटलो नव्हतो. आणी तसेही ते दुसर्या गावात असल्याने त्याना त्याची माहिती नव्हतीच.
मात्र हे केल्यानन्तर तुम्हाला काय अनूभव आले ते पण जरुर न विसरता लिहा. आणी ते देव जर तुमच्या घरातले नसतील ( म्हणजे पूर्वजान्चे) तर ते एखाद्या मन्दिरात नेऊन ठेवा. वा पूजा करुन विसर्जन करा. लिन्बुभाऊ सान्गु शकतील यावर.
मला फक्त एक प्रश्न आहे कि जर
मला फक्त एक प्रश्न आहे कि जर ते देव आहेत तर ते लोकांना त्रास कसा देतील ? फार तर कोणाच्या तरी स्वप्नात येउन दृष्टांत देतील. तिथे देव असतील किंवा नसतील हा भाग वेगळा पण ते तुम्हाला होणार्या त्रासाला कारणीभूत का असतील ?
त्याना तिथल्या अडगळीतुन काढुन
त्याना तिथल्या अडगळीतुन काढुन ज्यान्चे आहेत त्या घरात वा मन्दिरात विधीवत स्थापन करावी अशी ईच्छा असेल. काही वेळेस दृष्टान्त होतोच असे नाही. देव नाही त्रास देत, पण जर केदार यान्च्या पूर्वजानी तिथे ठेवले असतील अडगळ नको म्हणून, तर कदाचीत परत वर काढा असे म्हणत असतील. नको असलेल्या मुर्तीन्ची शक्यतो विधीवत पूजा करुनच विसर्जन वगैरे केलेले बरे असते.
रश्मी , त्यांना होणार्या
रश्मी , त्यांना होणार्या त्रासाच्या निवारणार्थ त्यांना त्या गुरुजींनी देव काढायला सांगितले आहे . ह्याचा अर्थ कि देव गाडले गेले आहेत म्हणून तुम्हाला हा त्रास होत आहे असाच होतो ना.
ती जाग आमची स्वतःची आहे,
ती जाग आमची स्वतःची आहे, अत्ता ज्या त्रासतुन जातोय त्यावरून खोद्काम सुरु करवे असच वाटतंय, पण वडीलांचा यावर अजिबात विश्वास नाही, तीजागा वापरात असल्याने त्यांचा ह्या गोष्टीला विरोध आहे (त्याजागेवारच एक भिंत, लादी बसवलेली आहे )
केदार यान्च्या पूर्वजानी तिथे ठेवले असतील >>> नाही आमच्या घरातल्यांनी ते देव ठेवलेले नाहीत इतर लोकांनी आणून ठेवलेले आहेत
धन्यवाद सर्वांचे
धन्यवाद आन्विता
धन्यवाद आन्विता
पत्रिकेतील
पत्रिकेतील शनि
http://anaghabhade.blogspot.in/
अन्विता बरोबर, मला तसेच
अन्विता बरोबर, मला तसेच म्हणायचे होते. सॉरी केदार मला वाटले की तुमच्या पूर्वजानी देव तिथे ठेवले की काय.
रश्मी , केदार ह्यांचे स्वत:
रश्मी , केदार ह्यांचे स्वत: चे जरी देव असते तरी मला नाही वाटत कि त्यामुळे त्यांना त्रास झाला असता . देव माझे काही वाईट करेल / करतोय म्हणून उपासना / पूजा करावी हे बरोबर नाही वाटत. देवाची भक्ती हि भीतीपोटी करू नये असे वाटते . मनापासून प्रेमाने करावी. देव कोणाचे उगाचच वाईट का करेल ?
बर्याच ठिकाणी अमुक तमुक देवाचे केले नाही तर मग काहीतरी वाईट होईल म्हणून मग ज्या काही प्रथा आहेत म्हणजे कुळधर्म, गौरी इतर काही व्रत वगेरे भीतीपोटी केले जाते मनापासून नव्हे . मला वाटते कि मनापासून प्रेमाने केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहचते .
अन्विता देव नाही कुणाला त्रास
अन्विता देव नाही कुणाला त्रास देत, कारण ते शेवटी भावाचे भुकेले. पण घरात किन्वा मन्दिरात जशी नेहेमी पूजा होते, तशी जर त्या गाडले गेलेल्या देवान्ची झाली नाही तर ते कुठल्या न कुठल्या रुपाने दृष्टान्त देणारच.
त्याना कुठला त्रास द्यायचाच नाहीये, पण निदान वर काढुन विधीवत स्थापना वा विसर्जन व्हावे अशी त्यान्ची ईच्छा असणार. ज्या मूर्ती स्वयन्भू प्रकट होतात, त्याना स्थापन केले जातेच ना. जमिनीत अनिष्ट शक्ती पुरल्या जातात, देव नव्हे. मला ते उलगडुन सान्गता येत नाहीये.:अरेरे:
ओ लिन्बुभाऊ जिथे गरज आहे तिथे उत्तरे द्या ना, उगाच काय त्या पप्पु आणी नमो मध्ये रस्सीखेच करताय.
ह्याचा अर्थ गाडलेल्या देवाची
ह्याचा अर्थ गाडलेल्या देवाची पूजा झाली नाही तर ते त्रास देणार म्हणजे मग माणसात आणि देवात काय फरक राहिला ना . देव जर निघाले तर जरूर पूजा करा पण त्रास झाला म्हणून काढले असे होते ना.
आमच्या नात्यात एका व्यक्तीस अशा पद्धतीचे देव मागच्या अंगणात जमिनीखाली सापडले पण त्यांना कोणता त्रास होत नव्हता . त्या सांगतात कि त्यांना स्वप्न पडले कि देव तिथे आहेत आणि खणल्यावर खरच होते. ते देव त्यांनी देवघरात ठेवले त्यांच्या .
मला एवढेच म्हणायचे आहे कि त्यांना होणारा त्रास देव असतील तर त्यांच्या मुळे नसेल .
मला एवढेच म्हणायचे आहे कि
मला एवढेच म्हणायचे आहे कि त्यांना होणारा त्रास देव असतील तर त्यांच्या मुळे नसेल .>>>> मला पण काही समजत नाहीये मी काहीच केलं नाहीये पण त्रास माझ्या मुलांस कां
बर्याच वेळा ' आपण काही कोणाचे
बर्याच वेळा ' आपण काही कोणाचे वाईट केले नाही मग आपले का वाईट होते आहे? ' हा प्रश्न पडतो पण त्याचे उत्तर बर्याच वेळा पूर्व जन्मात दडलेले असते . त्यामुळे तुम्ही जास्त विचार करून त्रास करू नका . तुमच्या मुलाचे birth details आणि प्रश्न मला मेल करा ( अर्थात तुम्हाला करावेसे वाटले तर ) .
शक्य आहे अन्विता.
शक्य आहे अन्विता.
केदार घरात कुणाला साडेसाती
केदार घरात कुणाला साडेसाती असेल तर बाकी विचार सोडुन द्या. कारण साडेसातीतच माणसाला आपले परके असे अनूभव येतात. शारिरीक, आर्थिक आणी मानसीक त्रास होतात. त्यातुन माणुस शिकतो. देवावर श्रद्धा ठेवा, सर्व काही ठीक होईल. अन्विताच्या पर्यायाचा विचार करुन बघा.
तुमच्या मुलाचे birth details
तुमच्या मुलाचे birth details आणि प्रश्न मला मेल करा ( अर्थात तुम्हाला करावेसे वाटले तर ) . >>>> मी तुम्हाला २५/१०/२०१३ रोजी ईमेल केला होता तुमचे उत्तर पण मिळाले, पण अजूनही त्रास चालूच आहे. मी आज परत तुम्हाला मुलीचे डीटेल्स पाठवतो
धन्यवाद
हो बरोबर आहे . आत्ता आठवले .
हो बरोबर आहे . आत्ता आठवले . तेच म्हणत होते मी कि पूर्व जन्माशी काही गोष्टी पत्रिकेत दिसतात जसे तुमच्या पत्रिकेतील गुरु .तेव्हा मी असे लिहिले होते कि,
लहान मुलाच्या दृष्टीने काही चांगली कामे करा. म्हणजे अनाथाश्रामना देणगी ( यथाशक्ती) तसेच अनाथाश्रमासाठी काम करणे इ. गोष्टी करा. तसेच दत्त उपासना किंवा तुमच्या कोणत्याही आराध्य देवतेची / कुलदेवतेची उपासना करा म्हणजे तुम्हाला मन:शांती मिळेल. अर्थात उपसानेबाबत तसे मी काही अधिकारवाणीने सांगू शकत नाही .पण जास्त पत्रिकेत गुंतू नका. ज्योतिषशास्त्र हे काळजी करत राहण्यासाठी नाही. काळजी घ्या .काळजी करू नका.
ह्यापेकी तुम्ही काही केले आहे का?
देवावर श्रद्धा , विश्वास आणि सत्कर्म ह्या जोरावर आपण संकटांशी नक्कीच सामना करू शकतो .
दत्त उपासना किंवा तुमच्या
दत्त उपासना किंवा तुमच्या कोणत्याही आराध्य देवतेची / कुलदेवतेची उपासना करा म्हणजे तुम्हाला मन:शांती मिळेल. >>>> हो हे सुरूच आहे, पण आता नेटाने अजून करतोय तुम्हाला अजून काही सुचल्यास कळवा प्लीज
धन्यवाद
ज्योतिषशास्त्र हे काळजी करत
ज्योतिषशास्त्र हे काळजी करत राहण्यासाठी नाही. काळजी घ्या .काळजी करू नका.>> अतिशय आवडलेले वाक्य! अन्विता, तुम्ही खुप संयत भाषेत तुमचे विचार मांडता.
अविकुमार, धन्यवाद !
अविकुमार, धन्यवाद !
नोकरी/ व्यवसाय संदर्भात ज्या
नोकरी/ व्यवसाय संदर्भात ज्या मेल्स येतात त्यात आधी शिक्षण काय झाले आहे ? आधी कुठे नोकरी / व्यवसाय केला आहे का ? कुठल्या क्षेत्रात काम करायला आवडते ?
अशी स्वत: बद्दलची / व्यक्तीबद्दल काही माहिती लोक लिहित नाहीत नाहीत . फक्त birth details पाठवून job कधी मिळेल असे विचारतात . इतर माहिती दिली कि त्याप्रमाणे पत्रिका बघत येते . उदा . जर घरासंबंधी ( Interior Designers etc ) व्यवसाय/ नोकरी असेल तर ती स्थाने महादश स्वामी पण द्यायला पाहिजे .
त्यामुळे सगळे details देऊन मग प्रश्न विचारावा . त्याप्रमाणे पुढील दशा/ गोचर इ . विचार करता येतो व पत्रिका पण त्या क्षेत्राच्या दृष्टीने बघता येते.
अन्विता, मी संपर्का मधून मेल
अन्विता,
मी संपर्का मधून मेल पाठवला आहे. उत्तराची प्रतिक्षा करत आहे.
धन्यवाद!
नोकरी/ व्यवसाय संदर्भात ज्या
नोकरी/ व्यवसाय संदर्भात ज्या मेल्स येतात त्यात आधी शिक्षण काय झाले आहे ? आधी कुठे नोकरी / व्यवसाय केला आहे का ? कुठल्या क्षेत्रात काम करायला आवडते ?
अशी स्वत: बद्दलची / व्यक्तीबद्दल काही माहिती लोक लिहित नाहीत नाहीत . फक्त birth details पाठवून job कधी मिळेल असे विचारतात . इतर माहिती दिली कि त्याप्रमाणे पत्रिका बघत येते . उदा . जर घरासंबंधी ( Interior Designers etc ) व्यवसाय/ नोकरी असेल तर ती स्थाने महादश स्वामी पण द्यायला पाहिजे .
त्यामुळे सगळे details देऊन मग प्रश्न विचारावा . त्याप्रमाणे पुढील दशा/ गोचर इ . विचार करता येतो व पत्रिका पण त्या क्षेत्राच्या दृष्टीने बघता येते.
ह्म्म बरोबर आहे.
नविन सभासद आहे, थोडे फार
नविन सभासद आहे, थोडे फार ज्योतिष बघतो, ज्योतिष विषयक चर्चा ( अ.नि.स पद्धती चे वाद विवाद नाही ) करायला आवडेल.
सुहास तुमची झटपट ज्योतिषी
सुहास तुमची झटपट ज्योतिषी बनण्याची पाककृती टाका बर! लोकांना अशा पाककृत्या नक्की आवडतात.
Pages