ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर्याच वेळा birth details कळवताना लोकं गोंधळ करतात . विशेषत: जन्मवेळ !
am ऐवजी pm किंवा pm ऐवजी am लिहितात यासाठी 24 hour format मध्ये जन्मवेळ लिहिली तर गोंधळ होणार नाही . उदा : रात्री १२ नंतर ४५ मिनिटे जन्म असेल तर ००:४५ लिहावे , दुपारी १२:४५ असेल तर १२:४५ तसेच रात्री ८ वाजता जन्म असेल तर २०:०० असे लिहावे . जेणेकरून तुमच्याकडून चूक होणार नाही व माझाही वेळ वाचेल .

एक ज्योतिषांच्या मते घरात कुठेही मृत व्यक्तीची प्रतिमा लावू नये... त्याने त्या मृत व्याक्तीस गति मिळत नाही आणि ते आपल्यातच गुंतून राहतात व त्रासही देतात म्हणे.... ह्यात काही तथ्य आहे का... मला नाही वाटत ह्यात तथ्य...

किट्टु,

त्या ज्योतिषांचं बरोबर आहे. घरात मृत व्यक्तीचे चित्र उघड्यावर लावले तर ते चित्र मृताच्या पुढील प्रवासात अडथळा बनू शकते. लिंगदेह तिथे विनाकारण आकर्षित होऊ शकतो. (होईलच असं नाही) असा लिंगदेह चित्रात बद्ध झाला तर सुटण्यास न मिळाल्याने घरातील व्यक्तींना त्रास देतो. त्यामुळे खबरदारी म्हणून मृताचे चित्र उघड्यावर लावू नये. बंदिस्त जागी असे चित्र ठेवल्यास मृतास अडचण होत नाही.

आ.न.,
-गा.पै.

तसेही आपल्याला फोटो पाहून आठवणी येत राहतात, व मन अस्वस्थ होते, शिवाय व्यर्थ चर्चा घडत राहतात.... फोटो उपडे ठेवून द्यावेत.

@ गा पै.. पण आपलेच लोक आपल्याला का बरे त्रास देतील.... जिवंतपनी देतील नव्हे देतातच ती गोष्ट वेगळी... Uhoh

किट्टु,

आपले लोक जिवंतपणी असतात तेव्हा 'आपले' असतात. पण मृत्युनंतर परिस्थिती बदलते. पुढची गती मिळणे अत्यावश्यक असते. नाहीतर मृताच्या लिंगदेहाला त्रास होतो. तो त्रास त्याच्या जवळच्या नातेवाईकांवर आपोआप ट्रान्सफर होतो. खरंतर ती एक प्रकारची हाक किंवा विनवणी असते.

आ.न.,
-गा.पै.

हम्म्म्म.... काही कळत नाही... पूर्वी घरात गेलेल्यांचा फोटो नाई लावल तर नाव ठेवत असत... " काय पन लोकं आहेत साधा फोटो पन नाही लावला घरात..." वगैरे वगैरे.... पूर्वी कशाला आताचीच गोष्ट सांगते.. माझे बाबा जाऊन वर्षच झाले... बाबांचा एक फोटो करून घेतला... सागळे म्हनाले इतका लहान क बरे केला फोटो चांगला मोठा करायचा की.... आता मला सांगा फोटोची साईज महत्वाची का भावना... Uhoh

१. पाण्यातल्या आसरा म्हणजे नक्की कोण? त्यान्च्यामुले infertility / abortion असे problems येतात अस म्हणतात. यावर उपाय काय//?

२> माझ्या सासरी मुन्ज्याचे दैवत असल्यामुळे काळे कपडे घातलेले चालत नाही. जर कोणी तस केल तर कहितरी अपाय होतो असे म्हणतात. खरच यात किती तथ्थ्यआहे/? खुप इच्छा असुनही विषाची परिक्षा बघायला नको म्हनुन मी काळे कपडे वापर णे टाळते.

लिम्बुजी , mnc, Anvita pl. मार्गदर्शन करावे

@ Anvita

Aamchya lagnala aata 9 warshe purna hot aahet. Pan ajun issue nahi. Gynacologist chya mate doghanchyathi kahi prob. nahi.(unexplained infertility). Ya aadhi abortion etc. kahich history nahi..Mi concieve hou shaken ka? aani kadhi? Waiting for your guidance.

Details- Husband- Birth date-30-11-1975
Time-4.44am Saturday
Sthal- Aurangabad
Nakshatra-

wife- Birth date- 4-4-1981
Time- 3.25 pm Saturday
Sthal- Kandhar, Nanded
Nakshatra-Uttara Bhadrapada

पाण्यातल्या आसरा म्हणजे जलदेवता. या ७ असतात, म्हणून त्यांना सात आसरा असेही म्हणतात. म्हसोबा, वेतोबा अश्या देवतांच्या श्रेणीत या येतात.
गावातल्या पाणवठ्याच्या जागी, काही विहीरी, झरे या ठिकाणी त्यांचा वास असतो असे म्हणतात. तिन्ही सांजा, दुपारी अश्या वेळेस त्या क्रीडा करत असतात म्हणून त्याठिकाणी जाऊ नये असे म्हणतात.

बस मला एवढीच माहिती आहे याविषयी.

अन्विता तुझ्या ब्लॉगवर लिहीलेस की दशास्वामी जर पंचमाचा बलवान कार्येश असेल नोकरी सुटण्याची शक्यता अधिक .पंचमाच्या जोडीने जर २, ६,१०,११ चा पण कार्येश असेल तर आधीची नोकरी सोडून दुसरी नोकरी मिळते . तसेच नवम स्थान पण दशमस्थानाला व्यय स्थान असल्याने नोकरी संबंधात वाईटच फळे देते .
वर दिलेली सर्व उदाहरणे कृष्णमुर्ती पद्धतीनेच दिली आहेत . पण ह्या विरोधी भावांच्या दशेचा मात्र अनुभव येतोच .

साध्या पत्रिकेत ( कृष्णमुर्ती पद्धतीत पण ) सबलॉर्ड म्हणजेच उपनक्षत्र स्वामी ना? माझ्या पहाण्यात एक पत्रिका आहे ज्यात पन्चमाचा जो सबलॉर्ड आहे, तोच दशम आणी दुसर्‍या स्थानाचा पण सबलॉर्ड आहे. मग आधीची नोकरी सुटली तर नवीन मिळते का? मात्र महादशा पन्चम, धन वा दशम स्थानाची नाहीये. ती सप्तम आणी अष्टम स्थानाची आहे.

हो , उपनक्षत्र स्वामी म्हणजेच सबलॉर्ड.
रश्मी मी ते दशा स्वामी बद्दल लिहिले आहे . तू पत्रिकेतील पंचम स्थानाच्या सबलॉर्ड बद्दल लिहिले आहेस .
महादशा जर ७,८ असेल तर नोकरी मिळणे अवघड आहे आणि दशास्वामी अष्टमाचा बलवान कार्येश असेल तर नोकरी बदलणे सुखकारक होतच नाही. त्यामुळे शक्यतो बदलू नये .
पंचमाचा संबंध दशमाशी म्हणजे नोकरी चे स्वरूप शिक्षण , stocks , कला , क्रीडा ह्या संदर्भात असू शकते .

अष्टमाचा बलवान कार्येश म्हणजे उदा: समज बुधाची दशा आहे बुध दशमात कन्येत आहे पण चंद्राच्या हस्त नक्षत्रात आहे .चंद्र अष्टमात कर्केत तर मग ह्याचा अर्थ बुध अष्टमाचा बलवान कार्येश आहे. अशावेळेस बुध अष्टमचीच फळे अधिक देणार .
( अर्थात त्यासाठी कृष्णमुर्ती पद्धतीने बनवलेली पत्रिका पाहिजे )

Pages