ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन्विता जी

आपल्या ब्लॅाग वर अनाहूत म्हणुन प्रश्न विचारला त्यावर आपण काही शंका विचारलीत पण अनाहूत हा पर्याय काढुन टाकलात. निकड असलेला माणुस विश्वासानी येतो.

मी हा व्यवसाय (त्या साठी कोणतेही पैसे घेत नाही) म्हणून करत त्यामुळे उगाचच timepass म्हणून विचारणारे लोकांचे प्रश्न टाळण्यासाठी अनाहूत हा पर्याय काढला आहे.
अनाहूत म्हणून विचारलेला प्रश्न कोणत्या उद्देशाने विचारलेला आहे ते काळत नाही . त्यामुळे तो काढून टाकला. बाकी काही नाही. उलट आता मी माझा email id टाकला आहे. ज्या योगे ज्यांना संपर्क साधायचा आहे ते संपर्क करू शकतात .

नमस्कार,अन्विता,

नाव : सुजाता तुकाराम घादिगा व्कार
जन्म तारीख: २४ ऑगस्ट १९८६
जन्म वेळ : ०६.०० pm
जन्म ठिकाण : अन्धेरि (मुंबई)

१) विवाह योग कधी आहे ?
२ मुल्गा कसा असेल?

माझ्या कुंडली बददल थोडे मार्गदर्शन करावे प्लीज.
उत्तरचि वाट पाहत आहे.

suj तुम्ही मला तुमचे details मेल केलेत तर मला मेल वर उत्तर देत येईल. शक्यतो प्रश्न ओपेन फोरम वर discuss करू नयेत .

लिम्बुतिम्बुजी, अन्वितजी,मिलिन्द्जी उत्तराचि वाट पाहत आहे.

अन्वितजी please provide your email id

अन्विता जी, मी व. दा. भटांची कुंडली तंत्र आणि मंत्र भाग १ व २ पुस्तके शोधली पण मला मिळाली नाहीत… तुम्ही सांगाल का , ती पुण्यात कुठे मिळतील ???

होय रोहिणी बुक डेपोच. चंद्रकांत शेवाळे ग्रहांकित चे संपादक त्यांचे ते दुकान आहे. तिथे ज्योतिषविषयक सर्व पुस्तके मिळतात.

तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
हे येणारे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना भरभराटीचे , आनंदाचे ,इच्छापुर्तींचे आणि निरोगी जावो .

अन्विता,

नमस्कार,

रंग संगती ची ज्योतिष शास्त्राततली संगती अजुन लागली कि नाही ? मध्ये बराच काळ गेला, आठवत आहे का ?

राजपूर ,
अजून त्याविषयी काही वाचनात आले नाहीये . भट्टाचार्य ह्यांचे cosmic ray therapy वरचे पुस्तक वाचायचे मनात आहे बघू कधी जमते ते .

वक्री ग्रहांच्या बाबतीत काय अनुभव आहेत ?
मला वाटते पत्रिकेतील कुयोगाची तीव्रता वक्री ग्रहांमुळे वाढते .limbutimbu , नितीनचंद्र , इतर ज्योतिष जाणकार आपले काय अनुभव आहेत.

पत्रिकेत पितृदोष असणे म्हणजे काय?

(नेट वर शोधले असता अशी माहिती मिळाली- पितृदोष : पितरांची कर्मे पूर्ण करावी लागतात...
म्हणजे काय्?चांगली-वाईट का दोन्ही? आणि पुर्वज म्हणजे कोण? आई कडील का बाबांकडील? )

कृपया शंकानिरसन करावे.

रवि - राहू युती असणे हे पितृ दोषाचे मुख्य कारण धरतात तसेच नवम स्थान हे पितरांचे स्थान आहे त्यामुळे हि युती जर नवमात असेल तर पितृ दोष आहे असे मानतात .
पूर्वजांनी केलेल्या वाईट कर्मांचे ( पापांचे ) फळ पितृदोष असणाऱ्या व्यक्तीस भोगावे लागते मग ते लग्न , शिक्षण , आरोग्य , आर्थिक चिंता ह्या पेकी कोणत्या तरी स्वरूपात असते . अर्थात मला ह्यातील फार माहित नाही. जे थोडे फार वाचनात आले ते लिहिले आहे.
ह्याच्या निवारणार्थ काही विधी असतो का त्याबद्दल मला फारसे माहित नाही .
जाणकार मार्गदर्शन करू शकतील .
मला वाटते कि आपल्यातर्फे कायम आपली कर्म चांगली ठेवावी .

मला वाटते कि आपल्यातर्फे कायम आपली कर्म चांगली ठेवावी . >>> +१
त्याचे फळ आपल्या पुढील पिढिस मिळते ...

प्रतिसादाअबद्दल धन्यवाद. Happy

Pages