Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34
मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज गुरू पालट! अनेकजण या
आज गुरू पालट! अनेकजण या दिवसाची वाट पाहत असतील...
परंतु गुरू आजपासून जवळपास महिनाभर अस्तंगत अवस्थेत असेल. (म्हणजे रवी बरोबर असेल.)
या अवस्थेत तो कसे फल देईल, यावर जाणकारांनी आपापली मते द्यावीत ही विनंती.
.
.
अन्कुरी - उत्तर दिले आहे.
अन्कुरी - उत्तर दिले आहे.
.
.
धन्यवाद गुन्डोपन्तजी.
धन्यवाद गुन्डोपन्तजी.
ज्याच्या कुन्ड्ली मधे लग्न
ज्याच्या कुन्ड्ली मधे लग्न स्थानी मन्गळ असतो त्याचा तोटा काय असतो ? कारण लोक मन्गळाची पत्रिका बघून नकार देतात बहुदा लग्नासाठी. त्याचा काही फायदाही असतो का? आणि जर समजा मन्गळ मेष किन्वा व्रुष्चिकेत असेल तर काय परिणाम असतात?
या बाफाचे भाग्य कधी उदयास
या बाफाचे भाग्य कधी उदयास येतं आणि कधी अवकळा असते ते कोणत्या ग्रहाच्या कोणत्या वृत्तीनुसार ठरतं?
ज्याच्या कुन्ड्ली मधे लग्न
ज्याच्या कुन्ड्ली मधे लग्न स्थानी मन्गळ असतो त्याचा तोटा काय असतो ? कारण लोक मन्गळाची पत्रिका बघून नकार देतात बहुदा लग्नासाठी.>>>>
लग्न स्थानी मंगळ असता, त्याची ७ वी दूष्टी सप्तम स्थाना वर पडते. सप्तम स्थान हे जोडिदर/ विवाहाचे स्थान आहे. मंगळ हा पापग्रह मानला गेला आहे. त्या मुळे विवाह उशीरा होणे / पत्नी शी न पटणे इ. गोष्टी होवु शकतत. पण त्या करीता मंगळा ची पत्रिका म्हणुन नकार देणे योग्य नाही. मंगळ जर तुमच्या लग्न कुंडलित १,४,७,८ व १२ ह्या स्थानात असेल तर कुंडली मंगळाची आहे असे म्हणतात. तो कुठल्या स्थानात आहे त्या वर त्याचे फळ असते. नुसता तो मेषेत आहे का व्रूष्चिकेत ह्या प्रमाणे त्याचेफळ ठरत नाही. मेषेत/ वूष्चिकेत असेल तर तो उच्चीचा ( कारण स्वराशीत) असे ढोबळ विधान ठीक आहे. पण तिकडे इतर ग्रह कुठले, त्यांचा भाव ( स्थान) कुठ्ले, युती आहे का इ.इ. फार महत्वाचे आहे. तसेच लग्न स्थानी मंगळ्ह्याचा अर्थ की तुमच्या व्यक्तिमत्वावर मंगळाचा अंमल आहे. मंगळ हा तामसी वृत्तीचा ग्रह आहे. "कर की धडक"" बेधडक", "सेनापती" म्हणजेच काय कृती वर भर देणारा, पराक्रमी ग्रह आहे. अश्या लोकांचे पूर्व ग्रह पक्के अस्तात. त्या मुळे ते खुप कृतिशील, प्रसंगी भडकु सुध्धा असतात....
ज्याच्या कुन्ड्ली मधे लग्न
ज्याच्या कुन्ड्ली मधे लग्न स्थानी मन्गळ असतो त्याचा तोटा काय असतो ? सुम. त्यांना बहुदा तोटा नसतो... पण त्यांच्या बरोबर जे असतात त्यांना यांच्या संतापाचे झटके बसू शकतात.
कर्तूत्ववान असतात. मंगळ उच्चीचा असेल धाडसीपणाने अनोळखी वाटा चोखाळून स्वतःचा आणि कुटुंबाचा उत्कर्ष घडवून आणतात. मंगळाची व्यक्ती ही प्रेमही तेव्हढेच दिलखुलास करते हे लक्षात ठेवा! राग वगैरे फार काळ मनात ठेवू शकत नाहीत. ही डूख धरणारी जमात नव्हे, जे काय असेल ते रोख-ठोख आणि तेथल्या तिथे!
बाकी वर मोहन की मीरा यांनी चांगले विवेचन दिलेच आहे.
हा पोपटाचा बीबी अजुन सुरु
हा पोपटाचा बीबी अजुन सुरु आहे? ते थोतांड वगैरे वाद झडूनही.. अजुन सुरु आहे?
कुंडली मंगळाची असेल तरी खालील
कुंडली मंगळाची असेल तरी खालील कारणांनी निर्बली असल्यास तो निर्दोष मानला जातो. म्हणजेच लौकिकार्थाने ती कुंडली मंगळाची मानली जायला नको!
१. नीच राशीत असलेला मंगळ - म्हणजे कर्क राशीत असला तर तो निर्बली होतो - फल देत नाही.
२. शत्रू राशीत असलेला मंगळ - म्हणजे मिथुन व कन्या रास
या शिवाय असेही मत मांडले जाते की, प्रथमात मेषेचा, चतुर्थात वृश्चिकेचा, सप्तमात मकरेचा, अष्टमात सिंहेचा, द्वादश स्थानात धनु राशीचा मंगळ निर्दोष मानला जातो.
यासाठी भावचलित कुंडली(च) वापरावी अशा मताचा मी आहे.
आशा आहे यातून काही प्रश्न सुटतील आणि मंगल कार्ये मार्गी लागतील!
मंगळ-शनि किंवा मंगळ-राहू असे
मंगळ-शनि किंवा मंगळ-राहू असे एकत्र १,४,७,८ व १२ स्थानात असले तर मंगळ दोष नलिफाय होतो असं वाचलं कुठेतरी. खरं आहे का ?
गुंडोपंत, मी ३९ व्या पानावर
गुंडोपंत,
मी ३९ व्या पानावर प्रश्न केला आहे. कृपया उत्तर द्याल का?
अर्पणा १,४,७,८,१२ या
अर्पणा १,४,७,८,१२ या स्थानांमध्ये शनि असेल तर... राहू नाही. (दोघांचे फल बरेचसे सारखे असले तरी ते एकच ग्रह नाहीत!)
राहू प्रथम किंवा सप्तमात असायला हवेत मग ती स्थिती प्रतिकारक होते. तसेच लग्नी किंवा सप्तमात गुरू असावा त्याची सप्तमावर पुर्ण दृष्टी असावी.
मग विवाह जुळवायला हरकत नाही. पण तरीही कुंडली पुर्णपणे पाहावी नक्षत्र आधारीत गुणमेलन करावे आणि मगच पुढे जावे.
--
क्षमा करा गमभन, प्रश्न नजरेतून सुटला होता.
पण तुम्हाला नक्की काय हवे आहे? निव्वळ ग्रह आणि स्थान फलादेश तर सहजच मिळेल पण तो योग्यच असेल असे सांगता येणार नाही. पण तुमची राशी, नक्षत्र काय हे ही पहिले पाहिजे. पुर्ण कुंडली समोर असल्याशिवाय काय माहिती देणार?
धनु मूलत्रिकोणरास आहे शिवाय मंगळ या मित्र ग्रहासोबत आहे. गुरूमुळे हे स्थान सुधारले आहे. गुरू आणि मंगळाची द्वितियावर दृष्टी यामुळे मारक स्थान सुधारले. ग्रह किती अंशावर कोणत्या नक्षत्रात आहे ते ही कळले पाहिजे. या व्यतिरिक्त अजून काही सांगणे मला प्रशस्त वाटत नाही.
धन्स गुंडोपंत, अहो क्षमा
धन्स गुंडोपंत,
अहो क्षमा वगैरे कशाला? इथे येणार्या प्रतिसादांची संख्या आणि तुमचा वेळ ई. मर्यादा समजू शकतो.
मला एकाने सांगितले की गु+मं तेही ८ व्या घरात त्यामुळे माझा मोठा अपघात होऊन मृत्यू होईल. जरा धक्काच बसला होता ते ऐकुन.
ग्रह कोणत्या नक्षत्रात आहेत ते नाही माहित. कुंडलीत नाही दिलेय ते.
रच्याकने, मलाही ज्योतिष
रच्याकने, मलाही ज्योतिष शिकायचे आहे पण नोकरीमुळे एका शहरात मुक्काम जास्त वेळ नसतो. त्यामुळे कधी एकदा मुंबईत (जन्मगावी :)) सेटल झालो तर मग शिकता येईल.
जेमस्टोन विषयी कोणाचा काय
जेमस्टोन विषयी कोणाचा काय अनुभव आहे?
आजकाल बरेच बघते , कोणाना कोणाच्या हातात अंगठ्या दिसतात...
काय कळत नाही... पन हे खरेच खडे वगैरे घालणं फायदेशीर असते का?
गमभन, ज्योतिषी नवखा
गमभन,
ज्योतिषी नवखा असणार!!
असो, धक्का बसून गेला आहे, काय करणार?
सर्वसाधारणपणे मृत्युचे भाकित वर्तवले जात नाही, तर आयुष्य योग वर्तवला जातो. हे धक्का बसू नये म्हणूनच.
आपण (म्हणजे सगळे आपण त्यात मी ही आलोच!) आयुष्य फार ग्रँटेड घेतो. आयुष्यात मृत्यु हा महत्त्वाचा भाग विसरूनच जातो!
वाईट गोष्टी कुणालाच आवडत नाहीत. पण म्हणून त्या होतच नाहीत असे कुठे आहे?
हे ही कधी तरी घडणारच आहे. जे घडणारच आहे त्याला कोण काय करणार?
असो. आता मी प्रश्न विचारतो - कोणता मृत्यु चांगला?
१. वर्षानुवर्षे अंथरुणावर खिळून, आयुष्य नकोसे होऊन आलेला?
२. काही क्षणात?
आता कसे वाटते आहे 'एकाने' सांगितलेले भविष्य?
मात्र जे कर्म केले आहे त्याचे भोग भोगल्या शिवाय जीवनातून सुटका नसते हे ध्यानात ठेवलेले बरे!
अटळ गोष्टींचा कसला आला धक्का गमभन?? निवांत रहा!
आजचा दिवस आताचे क्षण मस्त आहेत तेच महत्त्वाचे... बाकी गेले उडत!
(काही खास प्रश्न नसले तर सध्या तुमची कुंडली मांडत नाही. कळावे.)
पुण्यात ज्योतिष विद्या
पुण्यात ज्योतिष विद्या शिकायची आहे .. वीक एंड चे क्लासेस आहेत का ?
मनापासून शिकवणारा हवा ..पुस्तकी नको
येथे ज्योतिष विषयक प्रश्नांची
येथे ज्योतिष विषयक प्रश्नांची विचारणा केली गेली.
त्यावर अभ्यास करून उत्तरे दिल्यावर - साधे धन्यवाद देण्या इतकीही तयारी नसावी?
गुंडोपंत काय हवेतून उत्तरे काढत नाहीत. प्रत्येक कुंडलीचा अभ्यास करावा लागतो. योगांचा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी गणिते मांडावे लागतात, तासंतास खर्ची पडतात. पण यानंतर (काही अपवाद वगळता) एक 'साधा धन्यवाद' ही देता येऊ नये?
मिलिंद आणि लिम्बुजी येथे का पत्रिका बघेनासे झाले ते लक्षात आले!
अहो गुंडोपंत, असे निराश होऊ
अहो गुंडोपंत, असे निराश होऊ नका. तुम्ही ज्यांना उत्तरे दिलीत ते लोक माबोवर लोगिन झाल्यावर त्यांना धागा जर दिसला तरच ते उत्तर देणार ना? जर धाग्यावर पोस्ट नसेल तर तो धागा मागच्या पानावर जातो. अशावेळी तो आधी शोधावा लागतो.
(अर्थात ज्याला विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराची घाई आहे, तो माणुस धागा रोज पाहात असणार... )
अहो साधनाताई, गुंडोपंत कसले
अहो साधनाताई,
गुंडोपंत कसले निराश होतात...
काय झाले की, काही जणांनी इमेल्स वर संपर्क साधला होता.
उत्तरे दिल्यावर साधे, 'उत्तरे मिळाली' इतके कळविण्याचे सौजन्यही दाखवले नाही.
जर चुकली असतील तर तसेही कळवावे ना.
कारण त्यामुळे चूक कुठे आहे याचा शोध घेता येतो.
कदाचित त्यांना न पटणारी उत्तरे मिळाल्याने रागावले असावेत
असो, चालायचेच! व्यक्ती तितक्या प्रकृती.
माझेपुढे एक प्रश्न उपस्थित
माझेपुढे एक प्रश्न उपस्थित झाला आहे.
जातक स्त्री आहे. २०१० अन नोव्हे.२०१२ मधे ब्रेनट्युमरची ऑपरेशन झाली आहेत व सध्या स्कॅनिन्गनन्तर तिसरे ऑपरेशन सुचविले आहे. प्रश्न आहे तो कुन्डलीवरुन खरोखर असा काही विकार्/व्याधी, ऑपरेशनची शक्यता, व हे किती काळ पर्यन्त चालत रहाणार असा आहे. डॉक्टरान्चे म्हणण्यानुसार, ट्युमरचा काही भागच काढता येतोय व मेन्दुला चिकटलेला भाग काढता न आल्याने तिथे पुन्हा पुन्हा ट्युमर वाढून हे परत परत करावे लागेल.
ऑपरेशनच्या खर्चामुळे तसेच मानसिक ताणामुळे जातक हातघाईस आलेला आहे.
सुरुवात प्रथमच आलेल्या एका फिट मुळे डॉक्टरी तपासणी केली गेल्यामुळे तत्काळ ऑपरेशन सुचवले गेले ते २०१० मधे झाले.
पुढे जन्मवेळेचा तपशील देतो आहे.
जन्म दिनांक 03/10/1969 वेळ ०.४० (२ ची रात्र, उजाडती ३)
मिथुन लग्न मिथुन रास
प्रथमेश बुध चतुर्थात कन्येला वक्रि/अस्ती रविगुरुहर्शल सोबत युतित आहे. त्रुतियात शुक्र केतु, लाभात अष्टमेश/भाग्येश शनि. भाग्यात राहू, ष्ष्ठात नेपच्युन, प्ल्युटो चतुर्थात २ अंशावर अशी स्थिती आहे. महादशा शनिची आहे.
कृपया ज्योतिषतज्ञांनी यावर मार्गदर्शन करावे.
माझे रिडिंग नुसार, जरी सप्तमात मंगळ असला, व अन्य सर्व ग्रह एकमेकांशी निरनिराळ्या अंशात्मक योगात असले तरीही, "मेन्दुविषयक ऑपरेशन" वा मूळातच ऑपरेशन मला तरी जाणवत नाही. फीट बाबत मात्र जातकाचे लहान भावाला लहानपणापासून फिट्स येतात. बाकी सर्व स्थानचि फले शुभच मिळालेली आहेत. जर ऑपरेशनचे हे त्रान्गडे नसतेच, तर ही कुन्डली अत्युत्कृष्ट दर्जाची ठरते, मग ऑपरेशन व ते ही जीवाला धोका असणारे, प्रचंड प्रमाणात पैसा शांती नष्ट करणारे भोगायला का लागावे? कुंडलीमधे हे कसे काय दृगोच्चर होते आहे?
येऊनजाऊन द्वितियेश चंद्र द्वितियाचे व्ययात म्हणजे प्रथमात अनावश्यक खर्च दर्शवतोय. पण तरीही मेन्दुचा ट्युमर व तिसरे ऑपरेशन हे कारण?
कृपया जाणकारांनी ज्योतिषविशयक मत व्यक्त करावे ही विनंती.
जन्म स्थान सांगाल का?
जन्म स्थान सांगाल का?
डॉक्टरान्चे म्हणण्यानुसार,
डॉक्टरान्चे म्हणण्यानुसार, ट्युमरचा काही भागच काढता येतोय व>>> हो रे लिम्बु भाउ,.
जरा इकडे तिकदे जास्त झालं तर माणसाचं काहिही होउ शकतं.
रिस्क फॅक्टर जास्त आहे अशा ऑपरेशन मध्ये.
माझ्या सासुबाईंच ऑपरेशन झालं तेव्हा डॉक्टरानी दिलेल्या कल्पनेनुसार रिस्क फॅक्तर खालील प्रमाणे.
१) अर्धांगवायु (पॅरालिसीस ?)
२) स्म्रुती भंश
३) ऐकु येणे / दिसणे ह्या क्षमता कमी होण्याची शक्यता.
बा द वे, ह्या ट्ञुमरचं अनॅलिसीस झालय का?
हा मॅलीगन्ट आहे का?
ज्योतिषशास्त्र तुम्ही लोकं बघालच.
देव त्याना लवकर बरे करो ही प्रार्थना.
मोकीमी, जन्मस्थळ पुणे
मोकीमी, जन्मस्थळ पुणे आहे.
झकोबा, वैद्यकीय बाबतीत मी अनभिज्ञ आहे.
पण मला किमान या दोषाचे (मेंदुस इजा-दोष, ऑपरेशन-जखमा, परिणामस्वरुप अर्धान्गवायू वगैरेचे) काहीएक संकेत कुंडलीमधे मिळायला हवेत ना? येऊनजाऊन भावचलितात मंगळ सप्तमातुन मागे षष्ठात येतो. वैताग असा की "आर्थिकदृष्ट्या फसण्याचे" संकेतही मिळत नाहीयेत कुंडलित. काय खरे अन काय खोटे?
कदाचित कुंडली वाचनात मीच चूकत असेन, तर मला निदान तसे तरी कळूदे म्हणून इथे प्रश्न मांडला आहे.
गुंडोपंत, तुम्हाला संपर्कातून
गुंडोपंत, तुम्हाला संपर्कातून email पाठवला आहे. बघाल का प्लीज?
लिंबुराव, नक्षत्र व त्यांचे
लिंबुराव,
नक्षत्र व त्यांचे चरणस्वामी विचारात घेतले आहेत का?
त्रिशांश कुंडली विचार हे दोन मुद्दे मला सुचवायचे आहेत.
लिंबुकाका ....
लिंबुकाका
....
लिंबु काका विपु बघा....की
लिंबु काका
विपु बघा....की इकडे लिहु ते सांगा.
Pages