गणपती बाप्पा मोरया!
चला, आपला आवडता चारोळ्यांचा खेळ खेळूया!!
मात्र त्या आधी जरा नियमही समजून घेऊया!!!
१. आधीच्या चारोळीतल्या शेवटच्या ओळीतला एक शब्द घेऊन नवी चारोळी रचायची आहे
२. तुम्ही घेतलेला शब्द तुमच्या चारोळीतल्या पहिल्या ओळीत यायला हवा.
३. केवळ स्वरचित चारोळ्या लिहाव्या.
४. एकाचवेळी दोन एंट्र्या झाल्यास पाहिजे ती एंट्री पकडून पुढे खेळ चालू ठेवता येईल.
उदाहरणादाखलं खालील चारोळ्या पहा -
तुझी ओळ माझी ओळ
ओळीत ओळ गुंफू या
भेंडी चढण्या आधीच
पुढची चारोळी रचू या
___
रचूया पुन्हा मनाच्या विटा
काळजाचं लिंपण करूया
तुझ्या माझ्या साथीने सख्या
पुन्हा प्रेममहाल घडवूया
___
पुन्हा सख्या बरसू दे पाऊस हळूवार
पुन्हा प्रेम बहरू दे अगदीच अलवार
तुझ्या माझ्यातली दूरी काही क्षण विसरूया चल
पुन्हा स्वप्ने फुलू दे पूर्वी सारखीच बहरदार..
आणि सो ऑन...
खेळताना घेतलेला शब्द रिपीट झालेला चालणार नाही .. म्हणजे दुसर्या आणि तिसर्या चारोळीची शेवटची ओळ पहा.. यात 'पुन्हा' हा शब्द दोन्हीकेडे आलाय तेंव्हा चौथी चारोळी 'पुन्हा' हा शब्द घेऊन रचायची नाहीये.
लीलया पाककृती येती
लीलया पाककृती येती भरभर
नेहमीच्या प्रतिक्रियांची भरती
माबोवर फोटो झळ्कती सुंदर
जेवणात मात्र असेल मनोहर !
:दिवे:
आधीच मर्कट तशात मद्य
आधीच मर्कट तशात मद्य प्याला
तशात तयाला विंचवाने दंश केला
कसे आवरावे त्याला कुणालाच कळेना
आसाराम नावे पृथ्वीवर ख्यात पावला..
हे कायच्या काय..
आहे मनोहर तरी गमतो उदास कळेना
आहे मनोहर तरी गमतो उदास
कळेना कसा विसरलो लोणच्यास
जौद्या! ढकलतो मुखी दोन घास
पळतोच अन् मग चहा ढोसण्यास
चुलीवर उकळतो तो चहा कळकट
चुलीवर उकळतो तो चहा
कळकट लुंगीवालाही तोच हा
चहाच्या पार्टीत दुपारच्या पारी
रोजच त्याला बघतोच हां!
चहा घेऊनी आला कळकट
चहा घेऊनी आला
कळकट लूंगीवाला
त्याबरोबर खायला काय-
आज दुपारच्याला?
शुगोल, लाला टांगेवाला आठवला
शुगोल, लाला टांगेवाला आठवला वाटतं.
माझी एक जुनी वात्रटिका आठवली तीच टाकते.
दुपारच्या झोपेच्या वेळी खणखणतो यांचा खलबत्ता
भलत्या वेळी दार ठोकुनी विचारती जन यांचा पत्ता
चहात त्यांच्या साखर अमुची, विडीस त्यांच्या अमुची काडी
उसनवारिची हद्द, तयांच्या लेंग्यामध्ये अमुची नाडी!!
नाडीवाले वैद्य , वैद्य
नाडीवाले वैद्य , वैद्य गल्लेवाले
वैद्य माणसांचे, वैद्य औजारांचे
वैद्य व्यायामाचे, वैद्य आहाराचे
इथे भरले सगळे वैद्य सल्लेवाले
इथे प्रत्येक फ्लॅट्चं दार
इथे प्रत्येक फ्लॅट्चं दार बंद
अन प्रत्येकजण घरात बसून आहे,
शेजार्याची बेल वाजल्यावर मात्र
आयहोलमधून पाह्ण्याचा छंद आहे!
काय फुकाचे सल्लेवाले खरे तर
काय फुकाचे सल्लेवाले
खरे तर कामाचे गल्लेवाले
बाळी त्यांची मायबोली
आता नवतरुणी झाली
नवथर तरुणी चारूगात्री अप्सराच
नवथर तरुणी चारूगात्री
अप्सराच या भूवर उतरी..
चढू लागते जशी संतरी
स्वप्ने भलती दिसती रात्री
स्वप्ने केवळ दिसती
स्वप्ने केवळ दिसती रात्री?
कंबख्त मग ती कसली संत्री!
दिवसा जी दाखवील तारे
तिचीच वाटे मजला खात्री!
कविता कधी लिहीणं सोडा,
कविता कधी लिहीणं सोडा, वाचलीही नाही. पण एका प्रतिभावान कवीचा चारोळ्यांच्या धाग्यावर होतो म्हणून दोन पैसे लावतोय
आता उघडू वाटे बाफ
आता दवडू थोडी वाफ
शब्द असे कि जळते बाण
काळीज धसते लागे धाप
मधेच दोन एण्ट्र्या आल्या कि
मधेच दोन एण्ट्र्या आल्या कि !!
तुमच्या हातून दोन पैसेसुद्धा
तुमच्या हातून दोन पैसेसुद्धा पटकन सुटेनात!
आम्ही डागडुजी पटकन करतो. हॅ
आम्ही डागडुजी पटकन करतो. हॅ हॅ हॅ हॅ !!!
वाटे जे मजला तेच वाटते का
वाटे जे मजला
तेच वाटते का तुजला?
खात्री नाही त्याची अजूनी
या पंचविशीतल्या लग्नाला!
आठवणींना सांगू लागे गुपीत
आठवणींना सांगू लागे
गुपीत रानचा वारा
सय जुनी ती अता सतावे
नयनी वाहती धारा
या संत्र्याची महती
या संत्र्याची महती न्यारी
पहिल्या धारेची नागपुरी
रात्री घ्यावी किंवा दुपारी
उडतो पायलट अधांतरी
कायद्याची लावून धारा नकाच देऊ
कायद्याची लावून धारा
नकाच देऊ एकही चान्स
आसुमल तर करतोय आत्ताच
सुटकेचा लुंगीडान्स
खटोबा, आपण भेंड्या खेळणे
खटोबा, आपण भेंड्या खेळणे अपेक्षित आहे. थोडी वर नियमावलीकडे नजर टाका
विस्मया यांची चारोळी बाद असावी असा माझा अंदाज आहे.
पण असो. तुमच्या पासून पुढे सुरू ठेवू.
मा़झी का बरं एण्ट्री बाद
मा़झी का बरं एण्ट्री बाद ?
काळीज धसते लागे धाप
या ओळीतला लागे हा शब्द घेतला होता. त्या दरम्यान दुसरी चारोळी आली असेल.
ओह. मग ठीकेय. ** सुटकेचा
ओह. मग ठीकेय.
**
सुटकेचा आटापिटा
गाठ पडे ठका ठका
जेठमलानी आला धावून
बापूला ये जोर फुका..
बापूंच्या खांद्यांवर सनातन
बापूंच्या खांद्यांवर
सनातन ओझे
विसर्जन मिरवणुकीत
बुद्धाचे रोजे..
( हलके घ्या लोक्स. बुद्ध म्हणजे क्षणस्थ कुणीपण )
Pages