गणपती बाप्पा मोरया!
चला, आपला आवडता चारोळ्यांचा खेळ खेळूया!!
मात्र त्या आधी जरा नियमही समजून घेऊया!!!
१. आधीच्या चारोळीतल्या शेवटच्या ओळीतला एक शब्द घेऊन नवी चारोळी रचायची आहे
२. तुम्ही घेतलेला शब्द तुमच्या चारोळीतल्या पहिल्या ओळीत यायला हवा.
३. केवळ स्वरचित चारोळ्या लिहाव्या.
४. एकाचवेळी दोन एंट्र्या झाल्यास पाहिजे ती एंट्री पकडून पुढे खेळ चालू ठेवता येईल.
उदाहरणादाखलं खालील चारोळ्या पहा -
तुझी ओळ माझी ओळ
ओळीत ओळ गुंफू या
भेंडी चढण्या आधीच
पुढची चारोळी रचू या
___
रचूया पुन्हा मनाच्या विटा
काळजाचं लिंपण करूया
तुझ्या माझ्या साथीने सख्या
पुन्हा प्रेममहाल घडवूया
___
पुन्हा सख्या बरसू दे पाऊस हळूवार
पुन्हा प्रेम बहरू दे अगदीच अलवार
तुझ्या माझ्यातली दूरी काही क्षण विसरूया चल
पुन्हा स्वप्ने फुलू दे पूर्वी सारखीच बहरदार..
आणि सो ऑन...
खेळताना घेतलेला शब्द रिपीट झालेला चालणार नाही .. म्हणजे दुसर्या आणि तिसर्या चारोळीची शेवटची ओळ पहा.. यात 'पुन्हा' हा शब्द दोन्हीकेडे आलाय तेंव्हा चौथी चारोळी 'पुन्हा' हा शब्द घेऊन रचायची नाहीये.
फक्त दोनच शब्द ठरवून बोलले
फक्त दोनच शब्द
ठरवून बोलले ठेवणीचे
बाकी सारं आलबेल आहे...
पण कोडं सुटेना मनीचे...
मनाची कोडी असतात खुपच
मनाची कोडी असतात
खुपच सोप्पी
आपण उगाच खेळतो
त्यान्च्याशी लपाछपी.
'पत्र सांगते गुज मनीचे' मस्त
'पत्र सांगते गुज मनीचे'
मस्त पाकृ करुया
हायकू झाले, प्रचिही झाले
आता चला चारोळ्या रचुया
उगाच काही च्या काही
_________________________
अर्र्र्र्र! हे बाद आहे!
तरीही ठेवते
लपाछपी खेळण्यातच खरी गंमत
लपाछपी खेळण्यातच
खरी गंमत आहे,
आणि राज्य घेण्यातच
खरी हिम्मत आहे.
भावना खेळतात लपाछपी मनाचा
भावना खेळतात लपाछपी
मनाचा कप्पा ओलावतो
तुला मात्र नेमक्या सापडतात त्या
हा 'धप्पा' मला हेलावतो
_________________
पुन्हा बाद!
मी खेळतच नाही बुवा
आणि राज्य घेण्यातच खरी हिम्मत
आणि राज्य घेण्यातच
खरी हिम्मत आहे.
>>
वाह!
रिये, धन्यवाद!
रिये, धन्यवाद!
हिम्मत कशाला हारतेस होणार
हिम्मत कशाला हारतेस
होणार नाहीस बाद
तुझ्याही चारोळ्या येऊदेत
देऊ आम्ही दाद
(हे रीया साठी)
भारीये
भारीये
आम्ही मायबोलीकर, आमची प्रिय
आम्ही मायबोलीकर,
आमची प्रिय हि साईट,
वेगवेगळ्या चारोळ्या रचून,
करतो आम्ही हाईट.
संपादित
संपादित
तरी करतोच आहे काळजी चिमण्या
तरी करतोच आहे काळजी चिमण्या कळ्यांची
जरी डसण्यास आले स्पर्श शिशिराचे मुळांशी
सुकाया लागल्या शाखा, पिकाया पानजाळी
उरी कवळून आहे स्वप्न हिरवे पावसाळी
पानगळीतुन हिरवे फुटते नियम
पानगळीतुन हिरवे फुटते
नियम निसर्गाचा अतूट
शिशिराच्या मिठीत शिरता
आधी रंगांची लयलूट..
****
खपवून घ्या..
वाह इब्लिसदादा! आप भी?
वाह इब्लिसदादा! आप भी?
चांगली आहे की. खपवता कशाला?
चांगली आहे की. खपवता कशाला?
मस्त आहेत दोन्ही चारोळ्या
मस्त आहेत दोन्ही चारोळ्या
शिशिराच्या मिठीत शिरता आधी
शिशिराच्या मिठीत शिरता
आधी रंगांची लयलूट.. >>
मस्त!
रंगू माजे रंगू कधी येशील
रंगू माजे रंगू कधी येशील घरी?
साठ्ली किती भांडी जरा बगशील तरी?
चायपानी देते, गडे आटप धुणी
तुज्याबिगर हात्! जिनगानी सुनी!
मस्त.
मस्त.
..
..
बाद झाली वाटतं..
बाद झाली वाटतं..
सुनीच्या जिनगानीत आला
सुनीच्या जिनगानीत आला सुन्या
ष्टोरी का व्हिलन सुनीका बापू बन्या
दिवस महिन्याचा हिशोब सांगी कन्या,
धूमधडाक्यात लगीन लावले, बन्याबापू का पोपट बन्या
(एडीटः व्हिलन ऐवजी बन्याबापू टाकलाय शेवटल्या ओळीत.)
__/\__
__/\__
अहो, के. अंजली, राहू द्या की.
अहो, के. अंजली, राहू द्या की. चालणार आहेत एकाहून अधिक आलेल्या.
इब्लिस
स्वातीतै काढून टाकली मी ती.
स्वातीतै काढून टाकली मी ती. अर्धवट सुचली मग काय..
नवीन पोपट जुनाहि झाला आता
नवीन पोपट जुनाहि झाला
आता फेमस रिक्षावाला
बाप्पा गेले जरि गावाला
विसरतील ना या त्रासाला
रंगात रंगूनी रंगीत झाली
रंगात रंगूनी रंगीत झाली झाडे
अन पानफुलांची रंग ल्याली कवाडे
तो पाहून त्यांना हसतो स्निग्ध असा की
>>
अभिसारिका मी, वाहवले त्याजकडे
अंजली, सुचली तशी पूर्ण केलिये
अंजली,
सुचली तशी पूर्ण केलिये तुमची. राहू द्यायला हवी होती.
विसराल ना, या त्रासाला? पोपट
विसराल ना, या त्रासाला?
पोपट रिक्षा फेव्हिकॉलला.
पण पुढल्या वर्षी लौकर यावे,
माफ कराव्या मर्कट लीला !
इब्लीस छान केलीत पूर्ण
इब्लीस छान केलीत पूर्ण तुम्ही.. आवडली..
फक्त इथे तो" मी सर्वेश्वर किंवा देव या अर्थाने घेतलेला इतकासाच फरक..
Pages