गणपती बाप्पा मोरया!
चला, आपला आवडता चारोळ्यांचा खेळ खेळूया!!
मात्र त्या आधी जरा नियमही समजून घेऊया!!!
१. आधीच्या चारोळीतल्या शेवटच्या ओळीतला एक शब्द घेऊन नवी चारोळी रचायची आहे
२. तुम्ही घेतलेला शब्द तुमच्या चारोळीतल्या पहिल्या ओळीत यायला हवा.
३. केवळ स्वरचित चारोळ्या लिहाव्या.
४. एकाचवेळी दोन एंट्र्या झाल्यास पाहिजे ती एंट्री पकडून पुढे खेळ चालू ठेवता येईल.
उदाहरणादाखलं खालील चारोळ्या पहा -
तुझी ओळ माझी ओळ
ओळीत ओळ गुंफू या
भेंडी चढण्या आधीच
पुढची चारोळी रचू या
___
रचूया पुन्हा मनाच्या विटा
काळजाचं लिंपण करूया
तुझ्या माझ्या साथीने सख्या
पुन्हा प्रेममहाल घडवूया
___
पुन्हा सख्या बरसू दे पाऊस हळूवार
पुन्हा प्रेम बहरू दे अगदीच अलवार
तुझ्या माझ्यातली दूरी काही क्षण विसरूया चल
पुन्हा स्वप्ने फुलू दे पूर्वी सारखीच बहरदार..
आणि सो ऑन...
खेळताना घेतलेला शब्द रिपीट झालेला चालणार नाही .. म्हणजे दुसर्या आणि तिसर्या चारोळीची शेवटची ओळ पहा.. यात 'पुन्हा' हा शब्द दोन्हीकेडे आलाय तेंव्हा चौथी चारोळी 'पुन्हा' हा शब्द घेऊन रचायची नाहीये.
नाही भेटले
नाही भेटले तुक्याला
नाम्याचीही नाही भेट
द्वारवंटी उभी अंजू
देवा आता येई थेट...
भरत, इब्लिस, साजिरा, मेधा,
भरत, इब्लिस, साजिरा, मेधा, स्वाती सुंदर चारोळ्या!! मजा आली.. एखाद्या आयोजित मैफिलीत आल्यासारखं वाटलं. वा वा!
थेट कसं सांगू तुला राधे
थेट कसं सांगू तुला
राधे मनातलं गुपित
ओठावरचे शब्द पुसे
माझी बासरीही शापित
देवा आता भेटू जरा मुद्दाम
देवा आता भेटू जरा
मुद्दाम ठरवून एखाद वेळ
एरवी तू गर्दीत एकटा...
अन् माझाच मला नसतो मेळ...
सॉरी आशूडी... शापित सार्या
सॉरी आशूडी...
शापित सार्या उनाड वाटा
रेतीवरल्या भ्रामक लाटा
अंतर काही कापत नाही
काळीज चिरते जाता जाता!
काळिज माझं धडधडलं, चारोळ्या
काळिज माझं धडधडलं,
चारोळ्या सगळ्या वाचून
एक पेक्षा एक हुशार,
मी मात्र बालवाडीत अजून.
अजून गंध तुझा दरवळतोय
अजून गंध तुझा दरवळतोय अंगभर
मेंदीचा सुवास बांगड्यांची खळबळ
नाजूक पारिजाताला जीवाभारी
पहाटवार्याची हलके सळसळ!
'पहाट्वार्याला कळेल ना आपलं
'पहाट्वार्याला कळेल ना
आपलं गुपित गुलाबी गोड'
चंद्र निजायच्या आतच फुलाला
भ्रमर म्हणाला 'मिठी सोड!'
सोड नाद हा खुळ्या
सोड नाद हा खुळ्या स्वप्नाचा,
विठोबाच्या पायी
कळे अर्थ जीवनाचा.
काठ म्हणाला बिल्डींगला माझी
काठ म्हणाला बिल्डींगला
माझी 'मिठी' पटकन सोड
26 जुलैनंतरही
अजून किती घेऊ लोड?
* बाद. अन्कुरीची घ्या.
काय लोक, भारी लिहिताय सगळे.
काय लोक, भारी लिहिताय सगळे. तुम्हाला _________________/\________________.
26 जुलैनंतरही अजून किती घेऊ
26 जुलैनंतरही
अजून किती घेऊ लोड?>>>
मस्त
माझ्या प्रीतफुला , प्रीत
माझ्या प्रीतफुला ,
प्रीत जागवू मधुरतेचि ,
ठेवू साक्ष सागराची
भव्य ,दिव्य ,स्वप्नांची I
माझ्या प्रीतफुला , प्रीत
माझ्या प्रीतफुला ,
प्रीत जागवू मधुरतेचि ,
ठेवू साक्ष सागराची
भव्य ,दिव्य ,स्वप्नांची I
कर जुुळती
कर जुुळती दिव्यत्वापुढती
प्रकाशालाच सारे पुजती
संपता तेलच दिव्यातले
ज्योती लपती मुक्याच वाती
लपतील कोठे
लपतील कोठे भूमीवरीही,
अपराध्याला भितीच जगती,
आता सुटले, तरीही त्यांना,
देवाघरी नसते मुक्ती.
मुक्तीसाठी करावा लागतो फार
मुक्तीसाठी करावा लागतो
फार फार कायास
राम राहीला बाजूला
तु तर दामाचा दास
तू ही निघून जा ना त्याच्या च
तू ही निघून जा ना
त्याच्या च सारखा
बरसून बरसून नको ना
भिजवूस जुन्या च जखमा
देवाघरचे रंग अनोखे उतरून येता
देवाघरचे रंग अनोखे
उतरून येता भूमीवरती
फुला फुलांची रांगोळी ते
हिरवाईवर अंथरती
रांगोळीच्या रंगामध्ये न्हाऊन
रांगोळीच्या रंगामध्ये
न्हाऊन गेली सांज-रात,
दुपारच्या उन्हाला इन्द्रधनूच्या
रंगाची बरसात........
हिरवाईचा गालीचा, पसरला
हिरवाईचा गालीचा,
पसरला आसमंतात,
निवले डोळे,
मन झाले शांत-निवांत.
बरसार करूया आनंदाची, बाग
बरसार करूया आनंदाची,
बाग फुलवुया समाधानाची,
गरुजूंच्या सुखासाठी
मुठ उघडूया मदतीची.
माझी पोस्ट करेपर्यंत
माझी पोस्ट करेपर्यंत अन्कुरीची आली, त्यामुळे माझी बाद समजा.
अन्जु अंकुरीची बाद कारण
अन्जु अंकुरीची बाद कारण तिच्या पहिल्या ओळीत ' हिरवाईवर अंथरती' यातलं काही आलेलं नाहीये
मी आधीच्या चारोळ्या अजुन वाचल्या नाहीयेत,..... आत्ता हे लक्षात आलं म्हणून सांगितलं
हो रिया, मीपण परत नियम वाचले
हो रिया, मीपण परत नियम वाचले त्यात शेवटच्या ओळीत असलेले शब्द असेच लिहिलेय. अन्कुरीची चारोळी बाद असली तरी छान आहे. तूपण छान लिहितेस रिया.
मी पण बाद.
मी पण बाद.
थँक्स अंजू पण मी इथे नाही
थँक्स अंजू
पण मी इथे नाही लिहिणार जोपर्यंत कोणी अडत नाही तोपर्यंत
तुम्ही खेळा पुढे
नियमानुसार शोभातैचीही चारोळी बाद ठरते पण कोणी पुढे लिहीत नसेल तर त्या चारोळीपासुन पुन्हा सुरुवात करा
मन झाले शांत-निवांत.
किंवा
मुठ उघडूया मदतीची.
यातलं काही तरी घेऊन लिहा
मुठभर मातीसाठी देह तिचा
मुठभर मातीसाठी
देह तिचा तडफडला
अंतराळवीरान्गणेचा
प्राण हवेत विरला
प्राण हवेत विरला तरी, ती
प्राण हवेत विरला तरी,
ती मुळीच हरली नाही.
तिने केलेल्या कार्याने,
देश तिला विसरणार नाही.
विसरणार नाही म्हन्जे
विसरणार नाही म्हन्जे काय?
आठवण तरी कुठे येते
जीवामागून जीव जातात
आमची फक्त यादी वाढते..........
Pages