गणपती बाप्पा मोरया!
चला, आपला आवडता चारोळ्यांचा खेळ खेळूया!!
मात्र त्या आधी जरा नियमही समजून घेऊया!!!
१. आधीच्या चारोळीतल्या शेवटच्या ओळीतला एक शब्द घेऊन नवी चारोळी रचायची आहे
२. तुम्ही घेतलेला शब्द तुमच्या चारोळीतल्या पहिल्या ओळीत यायला हवा.
३. केवळ स्वरचित चारोळ्या लिहाव्या.
४. एकाचवेळी दोन एंट्र्या झाल्यास पाहिजे ती एंट्री पकडून पुढे खेळ चालू ठेवता येईल.
उदाहरणादाखलं खालील चारोळ्या पहा -
तुझी ओळ माझी ओळ
ओळीत ओळ गुंफू या
भेंडी चढण्या आधीच
पुढची चारोळी रचू या
___
रचूया पुन्हा मनाच्या विटा
काळजाचं लिंपण करूया
तुझ्या माझ्या साथीने सख्या
पुन्हा प्रेममहाल घडवूया
___
पुन्हा सख्या बरसू दे पाऊस हळूवार
पुन्हा प्रेम बहरू दे अगदीच अलवार
तुझ्या माझ्यातली दूरी काही क्षण विसरूया चल
पुन्हा स्वप्ने फुलू दे पूर्वी सारखीच बहरदार..
आणि सो ऑन...
खेळताना घेतलेला शब्द रिपीट झालेला चालणार नाही .. म्हणजे दुसर्या आणि तिसर्या चारोळीची शेवटची ओळ पहा.. यात 'पुन्हा' हा शब्द दोन्हीकेडे आलाय तेंव्हा चौथी चारोळी 'पुन्हा' हा शब्द घेऊन रचायची नाहीये.
संयोजक , पहिली चारोळी देणार
संयोजक , पहिली चारोळी देणार का? की वर दिलेली तिसरी चारोळी घेऊन धागा गुंफायचा आहे?
तिसर्या चारोळीतील शब्द घेतले
तिसर्या चारोळीतील शब्द घेतले तरी चालतील.
स्वप्ने भिजर्या
स्वप्ने भिजर्या डोळ्यांआड
तरंगतात पण वहात नाहीत
सख्या अताशा माझे ऋतू
तुझी वाट पहात नाहीत!!!
तुझी वाट पहात नाही सोपं आहे
तुझी वाट पहात नाही
सोपं आहे म्हणायला
जरा वेळ जाताच डोळे
लागतात वाटेकडे वळायला
डोळे वाटेकडे वळतात, मन
डोळे वाटेकडे वळतात,
मन भूतकाळात हरवत,
आठवणींचे चित्रपट पहात,
मन माझं हरवून जातं .
मनात फुलला गंधीत वाफा तुझ्या
मनात फुलला
गंधीत वाफा
तुझ्या स्मृतींचा
अत्तरचाफा..!
हरवून जावं वाटतं खरं पुन्हा
हरवून जावं वाटतं खरं
पुन्हा जुन्या आठवणींत
बाहूल्यान् रिबिनीन् गोट्यान् खडे
बोचकं जपलंय वळचणींत...!
सॉरी... अंजलीचा प्रतिसाद
सॉरी... अंजलीचा प्रतिसाद पहायच्या आधीच माझा पडला. माझा प्रतिसाद डिलिट करू का आता?
नको मुग्ध्मानसी तसाच राहुदे..
नको मुग्ध्मानसी तसाच राहुदे.. आता इथून पुढे लिहूयात की
अत्तराचा वास उडून गेला
अत्तराचा वास
उडून गेला वार्यावर
पण आठवला की
मन नसतं थार्यावर
मन म्हणजे ओला
मन म्हणजे ओला भिरभिर
झाडांमधला खटयाळ वारा
मन म्हणजे पागोळ्यांच्या
शिरशिर रेशीम पाऊसधारा..
पाऊसधारा घेऊनी आला, ऊनाड वारा
पाऊसधारा घेऊनी आला,
ऊनाड वारा नाचू लागला,
झाडे, वेली, निसर्ग सारा,
भिजूनी हा चिंब जाहला.
पण आठवला की मन नसतं
पण आठवला की मन नसतं थार्यावर!
ग्रेट!
चिंब जाहला देह सारा, मन मात्र
चिंब जाहला देह सारा,
मन मात्र कोरडेठाण
संसाराचा झाला पसारा,
प्रेमाला कर्तव्याची आण.
व्वा! मस्त गुंफण..
व्वा! मस्त गुंफण..
प्रेमाला नाही रंग रूप, नाही
प्रेमाला नाही रंग रूप,
नाही जात पात,
प्रेमाशिवाय व्यर्थ आहे,
जीवनाचा सारीपाट.
जीवनाचा स्वतःचा नसतोच काही
जीवनाचा स्वतःचा
नसतोच काही अर्थ
आपण द्यावा आकार
नाहितर सगळं व्यर्थ!
व्यर्थ बडबड करून काही, मिळत
व्यर्थ बडबड करून काही,
मिळत नाही मान,
त्यासाठी असावे लागते,
तितकेच खरे ज्ञान.
वा सगळ्या चारोळ्या सुंदर
वा सगळ्या चारोळ्या सुंदर आहेत.
जागू, तुझी पण चारोळी येउदे
जागू, तुझी पण चारोळी येउदे ना.
असायला हवे खरे तितकेच खरे
असायला हवे खरे
तितकेच खरे ज्ञान
आणि त्याबरोबर
वास्तवाचेही भान
वास्तवाचे भान हवे, इतिहासाचे
वास्तवाचे भान हवे,
इतिहासाचे ज्ञान हवे,
भविष्याचा विचार करून,
आचार-संस्कार समृद्ध हवे.
जे तुला हवे , ते मलाही
जे तुला हवे , ते मलाही ठावे
तरीही आपण गप्पच का रे
कारण अजून तसेच तर आहे
मनातलं ओठावर यायला वेळ लागतो
ओठ विलगले तुझे जरासे अन
ओठ विलगले तुझे जरासे
अन शब्दवेली उमलून गेल्या
न समजूनही मजला काही
डोळ्यांच्या कडा मात्र ओलावून गेल्या
डोळ्यांच्या ओलावलेल्या
डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा,
सांगतात काही बघ तुला,
क्षणभर तरी थांब माझ्यासाठी,
माझ्या प्रीतफुला.
वाह!
वाह!
प्रीतफुलावरनं चारोळी
प्रीतफुलावरनं चारोळी
माझ्या पण घेऊ शकतेस की
माझ्या पण घेऊ शकतेस की
ह्म्म तोच विचार चालू आहे..
ह्म्म तोच विचार चालू आहे..
तूझ्या चारोळ्या कुठेत रिया?
शेवटच्या ओळीत जरा जास्त शब्द
शेवटच्या ओळीत जरा जास्त शब्द ठेवा मंडळी
Pages