१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.
मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.
इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.
लोला, तुझ्या म बची रेसिपी
लोला, तुझ्या म बची रेसिपी वेगळी /व्हेरिएशन्सवाली आहे का? रंग थोडा वेगळा वाटला.
लोला, मस्त आहे म.ब तुझ्या म
लोला, मस्त आहे म.ब
तुझ्या म बची रेसिपी वेगळी /व्हेरिएशन्सवाली आहे का? >>> काय व्हेरिएशन्स केली सांगशील का, प्लिज
प्रसादा साठी आता तळलेल्या मोदका नंतर म.ब चाच नंबर आहे
मी १४ औंसाच्या स्वीटन्ड
मी १४ औंसाच्या स्वीटन्ड कन्डेन्सड मिल्कच्या डब्याला ३ कप मिल्क पावडर घातली. मिश्रणात वेलचीपूड, थोडी दालचिनीपूड आणि केशर घातलंय. साखर घातली नाही. वर लिहीलंय त्यापेक्षा २-३ मिनिटं जास्त (१-१ मिनिट असं करत) मायक्रोवेव केलं आहे.
ऑफिसमध्ये सर्वांना आवडली.
धन्यवाद सायो.
छान दिसत आहे .. >> थोडी
छान दिसत आहे ..
>> थोडी दालचिनीपूड
मला चव आवडणार नाही ..
दालचिनी पूड ऑफीसातल्या
दालचिनी पूड ऑफीसातल्या जनतेसाठी केलेलं कस्ट्मायझेशन वाटतय. सशल +१
इथल्या गोड पदार्थातली चव
इथल्या गोड पदार्थातली चव आठवली का? तशी अजिबात आली नाही आहे.
बुंदीच्या लाडवातली लवंग दालचिनी आठवा.
>> इथल्या गोड पदार्थातली चव
>> इथल्या गोड पदार्थातली चव आठवली का?
नाही ..
मला स्वतःला लवंग, दालचिनी, सुंठ हे तिखट (नॉन-गोड) मसाल्याचे पदार्थ वाटतात .. म्हणूज ते घातलेले गोड पदार्थ (साखरभात, मुरंब्याला मुंग्या लागू नयेत म्हणून त्यात घातलेली लवंग, आलेपाक किंवा सुंठीची चव लागणारे लाडू वगैरे) मला अजिबात आवडत नाहीत ..
काही अमेरिकन पदार्थांतल्या दालचिनीची सवय झाली आहे .. माफक प्रमाणात दालचिनी घातलेली असेल तर ते आवडतात ..
मला आल्याच्या वड्या खोप
मला आल्याच्या वड्या खोप आवडतात त्यामुळे इथे सशल -१
बुंदीच्या लाडवातली दाल्चिनीची चव काही आठवत नाही. खायला हवा लाडू किंवा तुझ्या म. ब.
मलईबर्फीत दालचिनी? हे
मलईबर्फीत दालचिनी? हे वालाच्या बिरड्यात टोमॅटोपेक्षा भंकस आहे.
४०० वी पोस्ट सगळे फोटो जबरि
४०० वी पोस्ट
सगळे फोटो जबरि !
मी पण काल केली. अहाहा, मस्त
मी पण काल केली. अहाहा, मस्त चव लागते!!
असा मावेमधे करून बघितलेला पहिलाच पदार्थ. जरा मऊ झाल्या, त्यामुळे नीट वड्या पाडता नाही आल्या. बहुतेक माझे मिल्क पावडरचे प्रमाण थोडे चुकले असेल, कप म्हणजे कुठला घ्यावा असे कन्फ्युजन झालं होतं.
धन्यवाद सायो सोप्या आणि झट्पट होणार्या रेसिपीबद्दल. सगळ्यांच्या टीप्सचा (विशेषकरून सिंडरेला आणि मृण्मयीने टाकलेल्या स्टेप्सच्या फोटोंचा) उपयोग झाला.
मी जो कंन्डेन्स्ड मिल्कचा डबा आणला होता त्याला पत्र्याचे झाकण होते. ते कसे उघडायचे याची काही युक्ती आहे का? मी सुरीला बत्त्याने ठोकून उघडले
कॅन ओपनर्स येतात. गूगल करून
कॅन ओपनर्स येतात. गूगल करून बघा ईमेज. भारतात ही मिळत असतील.
मिश्रण सैल वाटलं तर अजून मि
मिश्रण सैल वाटलं तर अजून मि पा घालायची - पुन्हा जरा मावेत ठेवायचं. थापण्यापूर्वी कितीही वेळा हे करु शकता.
थापण्यापूर्वी कितीही वेळा हे
थापण्यापूर्वी कितीही वेळा हे करु शकता. >>> ओह्ह्ह.. हो का! मी थापायला घेतले तेव्हा वाटलं होतं असे करावे का पण धीर झाला नाही म्हटले उगाच बिघडायचे. धन्यवाद लोला.
मलई आंबा बर्फी, पेढे आणि
मलई आंबा बर्फी, पेढे आणि मोदक. कृती शोधून साहित्य काय, किती घ्यायचं बघून करायची वेळ आली इतक्या दिवसांनी केली त्यामुळे मलाच शोनाहो झालं असो, पुर्वाच्या सँवि बर्फीच्या कृतीत दिलं आहे तसं आंब्याचा पल्प आटवून घातला. खूपच भारी चव आली आहे.
अहाहा, मस्त पिवळेधम्मक
अहाहा, मस्त पिवळेधम्मक दिसतायत पेढे.
सायो, फोटोत रंग वेगळा आलाय
सायो, फोटोत रंग वेगळा आलाय प्रत्य्क्षात छान केशरी झालेत पेढे.
कसले तोंपासु फोटो आहेत या
कसले तोंपासु फोटो आहेत या धाग्यावर!!!
सिंडरेला, खूप मस्त वाटताहेत पेढे.
सिंडी क्लास आलाय फोटो.
सिंडी क्लास आलाय फोटो.
भारी दिसताहेत पेढे आणि मोदक.
भारी दिसताहेत पेढे आणि मोदक.
कसला भारी कलर आला आहे
कसला भारी कलर आला आहे बर्फीला.. व्वाव !!!!
ह्या वेळेस पण म.ब केली होती गणपतीला.. सगळ्यांना खुप आवडली..
सायो परत एकदा धन्यवाद
सिंडे, मोदक, पेढे, बर्फी
सिंडे, मोदक, पेढे, बर्फी सर्वच खूप सुंदर!!
प्रमाण लिहिणे.
घरी आंब्याच्या पल्पची बाटली आहे. सीमाचा कलाकंद आणि हे मोदक करून बघावेत अशी मनीषा आहे.
शिंडीबाय, कातिल फोटो हाय!
शिंडीबाय, कातिल फोटो हाय!
मंजू, मँगो पल्प अर्धा
मंजू, मँगो पल्प अर्धा (मेझरिंग) कपला थोडा जास्त घेतला आणि आटवून निम्मा केला. बाकी प्रमाण मूळ कृतीत आहे तेच.
आई गं , कसला लाळगाळू फोटो
आई गं , कसला लाळगाळू फोटो आहे. मोदक, पेढे सगळचं टेम्टिंग दिसतयं.
कातिल फोटो. पुढच्या गटगला
कातिल फोटो. पुढच्या गटगला करुन आणशील(च?)
पुपो आणि उ मो करण्यातून वेळ
पुपो आणि उ मो करण्यातून वेळ झाला तर नक्की आणेन
अशक्य सुंदर फोटो आहे तो
अशक्य सुंदर फोटो आहे तो सिंडी.
भारी फोटो. माझा धीर आणखीनच
भारी फोटो.
माझा धीर आणखीनच खचतो अशाने.
म.ब.ची ५०० पोस्ट्सकडे वाटचाल सुरू आहे.
बाई, मावेच्या नादी लागू नका.
बाई, मावेच्या नादी लागू नका. गॅसवर करा की.
~ एका मावेभयभगिनीचा सल्ला.
Pages