तुझं माझं जमेना

Submitted by sonalisl on 29 May, 2013 - 09:07

महेश मांजरेकरांची झी मराठी वर सुरु झालेली मालिका ...'तुझं माझं जमेना'. त्यांच्याच 'मातीच्या चुली' या सिनेमा सारखी आहे. संपुर्ण कथा माहित आहे तरी ही मालिक बघायला (तूतिमी बघून कंटाळलेल्या मला) छान वाटते.....

Tuza-Maza-Jamena-New-Serial-Zee-Marathi-Serial.jpg

ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मयेकरजी मी जेव्हापासून ही सिरियल पहायला सुरूवात केलीये तेव्हापासून तरी दिप्तीचं कुटुंब स्थिरस्थावरच दिसतंय मला
त्यांचे सगळे वेडेपणे करून झालेत होय आधीच? धन्य आहे Proud

बाकी मनवाची तब्ब्येत इतकी बिघडली ते तिच्या साबु-साबांना न सांगण्याचा अत्यंत मुर्ख डिसिजन घेतलाय या शिरेलित. कितीही वाकडं असलं तरी अशा कठिण प्रसंगांना सगळं विसरून सगळे लोक एकत्र येतात हे दाखवलं असतं तर जरा चांगला संदेश पोचला असता जनमानसात.

दक्षे +१,
आणी मि.लिमयेंना ईतकं बरं नव्हतं , तरीही मनवा किंवा तिच्या घरचे कुणीही गेलं नाही बघायला किंवा साधा फोन पण नाही केलेला.. मनवाचे बाबा काल घरी आलेल्या लिमयांनाच विचारत होते कशी आहे तब्येत आता तुमची? यायचं राहुनच गेलं, Uhoh
तर मनवाची आई नेहमीप्रमाणे खायला काही करु का हेच्याच मागे..अशक्य आहे सिरीयल..

<मि.लिमयेंना ईतकं बरं नव्हतं , तरीही मनवा किंवा तिच्या घरचे कुणीही गेलं नाही बघायला किंवा साधा फोन पण नाही केलेला> मि. लिमयेंना किती बरं नव्हतं? मिसेस लिमये बंगलोरहून तातडीने परत आल्या त्या त्यांच्या शेजारी न बसता परक्यासारख्या समोर खुर्चीवर बसल्या. त्याही मुलाला तू नीघ ऑफिसला वगैरे सांगून मगच नवर्‍याकडे वळल्या.पण मग नवर्‍याला 'मुलाने मला निपुत्रिक केले तुम्ही विधवा करायला निघालात' असा डायलॉग फेकून मारला. नवर्‍याला अगं तसं नाही यापलीकडे काही बोलता आले नाही.

सध्या दिग्दर्शकाचा 'आपण रिमाची अभिनयक्षमता दाखवून घेवू' असा एक ट्रॅक चाललाय.

तर मनवाची आई नेहमीप्रमाणे खायला काही करु का हेच्याच मागे>>> आता घरी व्याही आले तर त्यांचा पाहुणचार नको का करायला? Happy
पण इतकं विचारून त्यांना भांडभर पाणीही प्यायला दिलं नाही Wink

कालच्या भागात जोशीबुवा लईच आवडले.

पात्र अनावश्यक खुप बडबडात आणि कधी कधी तर् साने गुरूजींच्या गोड गोष्टी किंवा कानेटकरी नाटकातले संवाद असतात.
आजच ते बापट कुटुंब "बाबा ताणल तर रबर तुटत हे तर नाजुक नात..."
लगेच तो बाबा " शरीवारच्या जखमा...मनावरच्या जखमा भरण ..."
मला टीव्ही फोडण्याचा मोह झाला.

मान्जरेकर रिटायर केव्हा होताय ? खूप वाट पहातोय हो ! ही सिरीयल म्हण जे नवीन नाटक कंपनी असते ना तसे चाललंय! सगळेच हौशी कलाकार - लेखक दिग्दर्शक नट - गणपती आलेत टाळ्या वाजवू ? का एकदा कोकणात च्क्कर मारता ?

ही मालिका जर त्यांनी आउटसोर्स केली असेल तर त्यांच्याकडून काढून मला करायला द्या. मोबदला कमी घेवूनही काम/ मालिका उत्तम करून देईन. गॅरंटीने.

काय हे !! किती दिवसांनंतर हि मलिका पाहिली आज......फारच वाईट वाट्ले Sad

त्यावर उतारा म्हणून राहिबा पहावी लागली Sad Sad

हो. दीप्तीने शुभेच्छा न दिल्याच्या विचारात असताना मोटरसायकल अपघात होऊन तो गेला असे दाखवले आहे.

ओ नो....चांगल्या सीरीयलीत अस काही काय दाखवतात....घरातले टेन्शन कमी व्हावे म्हणुन टाईम पास सीरीयल बघावी तर तिथे ही असं कशाला घुसवतात??? तु तु मै मै परत चालु करावी अस वाटतयं...जुने एपिसोड तर जुने..पण मस्त होते ते...

अभिजीतला टीव्हीमालिकेत रस्ता अपघातात मरण्यासाठीच घेतात का? ये मेरी लाइफ है मध्ये पण त्याने रंगवलेले पात्र असेच लग्न की एंगेजमेंटच्या दिवशी मेले होते.

मला वाटलच इतके दिवस दुर्लक्षिलेला हा धागा अभिजीतच्या मृत्युनंतर जीवंत होइल......

कुठल्याहि सिरियल किंवा सिनेमामधे अभिजित केळ्कर शेवटपर्यंत टिकण कठीण आहे. का कोणास ठाउक पण तितकासा मनात भरत नाहि.

ह्या सिरियलमध्ये असा पॅटर्नच आहे की काय. मागे पण वैभवचा अ‍ॅक्सिडंट असाच दाखवला होता, भांडण करुन ड्राईव्ह करताना दुसरेच विचार करत होता म्हणून. असो वाईट वाटल हे खरं.

खुप आधी तो जरा स्मार्ट दिसायचा पण आता तो का कुणास ठाउक पण बावळट दिसतो.......कॉन्फिडंस नसलेल्या माणसासारखा.......अनिकेत विश्वास राव ची सीरीयल होती....नाव नाही आठवत पण सुहास जोशी, मनवाचे बाबा, हर्शदा खानविलकर आणि मनवाची आई पण होती.......त्यात अभिजीत चांगला वाटायचा...

अनिश्का... अगदी खरय त्याने खरच लक्ष दिल पाहिजे स्वतःकडे
एकतर त्याची उंची कमी आणि त्यामानाने रुंदी हॅहॅहॅहॅहॅ (पुलंच्या असा मी असा मी मधला शिंपी नाव नाही आठवत :() Proud Lol

चावी?
कुठल्या पुणेरी लिमये कुटुंबात किल्लीला चावी म्हणतात?

अतिशय सुमार संवादलेखन >>>>>> स्वरुप अनुमोदन. पण सध्या एकुणच सगळ्याच शिरेलीच्या संवादलेखकांना प्रशिक्षणाची गरज आहे. जेवण बनवलं/बनवते, हे तर अगदी कॉमन झाल आहे, आणि आडनाव तर अस्सल साजुक तुंपातली असतात लिमये, मराठे, जोशी, आपटे वगैरे. Sad

अतिशय सुमार संवाद लेखन......>>>>>> प्रचंड अनुमोदन.....आणखी एक खटकलेलं वाक्य.......
' अमका तमकीच्या प्रेमात आहे' असं कुणी म्हटलेलं ऐकलेलं किंवा वाचलेलं नाही आजपर्यंत.
अमक्याचं तमकीवर प्रेम आहे किंवा अमका तमकीच्या प्रेमात पडला आहे किंवा अमका तमकीचं एकमेकांवर प्रेम आहे असं का नाही लिहित कोणी?

एरव्ही चा पाचकळपणा एकवेळ ठीक अहे. सगळ्याच शिरेली मध्ये असतो तो. पण त्या अभिजित केळकर ला तसा आडवा पाडून, त्यात सगळ्यांचं रडणं-विव्हळणं, त्यात ती दीप्ती अभिजीत च्या डेड बाव्डी ला happy बर्थडे गाते वगैरे… किती तो भडकपणा!!! डोक्याला शॉट! Angry

आता नाहीच पाहणार तुमाज! लै झालं! Angry

इथे खुप जण असं म्हणत आहेत की जे संवाद आहेत ते चुकीचे आहेत..पुण्यात असं कोणी म्हणत नाहीत...पण मुंबईत असेच बोलले जाते.....आणि सीरीयलीत ते आलय कारण मांजरेकर मुंबईकर आहेत...

Pages