Submitted by उद्दाम हसेन on 30 July, 2013 - 14:29
तुम्हाला आवडलेल्या (घाबरवलेल्या) हिंदी / इंग्लीश/ मराठी भीतीदायक चित्रपटाबद्दलचं हितगुज इथे करावं.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो, सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज तर
हो, सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज तर मी कथा ऐकुनच टरकुन (कदाचित किळस वाटेल असेही वाटले म्हणुनदेखील) तो न पहायचा निर्णय घेतला.
deep blue sea मधे खुप भिती वाटली म्हणुन माझ्यासाठी भयपटच आहे तो.
माझ्या नवरायचा एक कलीग भयाण
माझ्या नवरायचा एक कलीग भयाण असे कोरियन चित्रपट बघतो. त्याच्या कडून कळलेले द चेसर , द रेड शूज , द होस्ट.
द होस्ट चांगला वाटला , पहिलाच कोरियन चित्रपट बघितल्यावर मला जरा कोरियन चित्रपटांबद्दल आदर वाटला . निर्मितीमुल्ल्य ही खूपच उच्च्य दर्जाची आहेत.
द रेड शूज : अतिशय हॉरर पूर्ण बघू शकले नाहि.
द चेसर बघण्याचे धाडस केले नाहि.
अक्षय कुमार हिरो असलेला एक
अक्षय कुमार हिरो असलेला एक सिनेमा होता. पण त्यात आशुतोश राणाचा अभिनय इतका भयानक होता की आम्ही रात्री टुरिंग टॉकिजवर रात्री सिनेमा पाहून घरी जाताना प्रचंड भीती वाटत होती. त्या सिनेमाचं नाव आठवत नाही. पण आशुतोश राणा भयानकच. लहानपणी विराना, बंद दरवाजा, जानी दुश्मन या चित्रपटांनीही जाम टरकवली होती. आता ते चित्रपट पाहून हसू येते. द ममीचा पहिला भाग पाहिल्यानंतरही त्यावेळी भिती वाटली होती. आता काही वाटत नाही.
मला ही आशुतोश राणाची त्या १/२
मला ही आशुतोश राणाची त्या १/२ पिक्चरस मुळे भीती वाटते. कशी आपली रेणुका शहाणे राहात असेल त्याच्याबरोबर तीलाच ठाउक.
चाइल्ड्स प्ले ची आठवण करून
चाइल्ड्स प्ले ची आठवण करून दिल्याबद्दल आभार. तीनही भाग पाहीलेत. स्केरी मूव्हीज का अशाच काहीशा नावाचा एक मूवी होता. एकाच मूवीत तीन कथा असलेला. भयानक होत्या कथा. त्यातला एक हॉरर मूवीजचा डायरेक्टर प्रॉडक्शनने सुचवलेल्या बंगलीत जाऊन राहतो ती कथा सर्वात भयानक.
स्क्रीम १,२,३ कुठल्या क्रमाने पाहीलेत लक्षात नाहीत. पण भयाण आहेत.
आणखी एक मूवी आहे, नाव आठवत नाही. एका ब्लॅक कुटुंबाला एका व्हिलामधे व्हेकेशन घालवायची ऑफर मिळते. त्याचं ते अजस्त्र कुलूप, भलंमोठं मेकॅनिझम आणि बाहेरचं एकाकी भीतीदायक वातावरण ( कि दोन मूवीज एकमेकात मिक्स करतोय मी ?) ..मी हा मूवी एकट्याने पूर्ण पाहू शकलो नाही.
Kiranu | 7 August, 2013 -
Kiranu | 7 August, 2013 - 09:13 नवीन
स्केरी मूव्हीज का अशाच काहीशा नावाचा एक मूवी होता.
>>
याची अॅड पाहुन मला वाटायचे की तो विनोदी (kind of parody) चित्रपट आहे.
__________________________________
टोच्या | 7 August, 2013 - 08:17 नवीन
पण त्यात आशुतोश राणाचा अभिनय इतका भयानक होता की आम्ही रात्री टुरिंग टॉकिजवर रात्री सिनेमा पाहून घरी जाताना प्रचंड भीती वाटत होती.
>> आपल्याला "दुश्मन" तर म्हणायचे नाही? इतका भितीदायक नव्हता तो. आशुतोश राणाचा अभिनय
मात्र भयानक होता.
अक्षय कुमार हिरो असलेला एक
अक्षय कुमार हिरो असलेला एक सिनेमा होता. पण त्यात आशुतोश राणाचा अभिनय इतका भयानक होता की आम्ही रात्री टुरिंग टॉकिजवर रात्री सिनेमा पाहून घरी जाताना प्रचंड भीती वाटत होती. त्या सिनेमाचं नाव आठवत नाही. पण आशुतोश राणा भयानकच.
<< तो सिनेमा 'संघर्ष'
अरे स्केरी मुव्हीज म्हनजे
अरे स्केरी मुव्हीज म्हनजे पॅरेडी रे.
विनोदी हाताळणी आहे..
तु म्हणतोयस तो स्क्रीम..
दुश्मन हा आशुतोश राणा चा
दुश्मन हा आशुतोश राणा चा पहिला ( ? ) मुव्ही होता अॅज ए विलन......पण त्याने जब्बरदस्त अभिनय केला होता....या मुव्ही वरुन पोस्ट्मन आला की लोकं एकदम सावध व्हायची आमच्या इथे.....आई बाबांनी सांगुन ठेवलं होतं की असे पोस्ट्मन वगैरे येतिल. तेव्हा दार बिर उघडायचं नाही....सांगतील तुझ्या आई चं किंवा बाबांचं अॅक्सिडन्ट झालंय किंवा असं काहीही पण दरवाजा उघडायचा नाही....
अमित, धन्यवाद सिनेमाचं नाव
अमित, धन्यवाद सिनेमाचं नाव सांगितल्याबद्दल. खरं तर काही सिनेमे व्हिलनच्या अभिनयावरूनच लक्षात राहतात. या सिनेमात अक्षय कुमारपेक्षाही जास्त फुटेज आशुतोष राणाला होतं. सिनेमाचा क्लायमॅक्स तर अतिशय भयानक.
अनिष्का, निलिमा, दुश्मनमध्ये आशुतोष राणाच्या एंट्रीला दिलेलं ते बॅकग्राऊंड म्युझिक (की त्याचा स्वतःचाच विचित्र आवाज) खरोखरंच भयानक होतं ... बाप रे!
आदिती,
<<आपली रेणुका शहाणे कशी राहात असेल त्याच्याबरोबर तीलाच ठाउक.>>
बायकांपुढे भले भले महापुरूष हात टेकतात, तेथे आशुतोष राणा अपवाद कसा असेल?
संघर्ष >> आशुतोष राणाचा अभिनय
संघर्ष >> आशुतोष राणाचा अभिनय खरंच घाबरवणारा ... अमरत्व मिळ्वण्यासाथी लहान मुलांचा बळी देत असतो अशी काहीशी लाईन आहे चित्रपटाची.फक्त त्याच्या अनि त्याच्या अभिनयामुळेच "दुश्मन"पण तितकाच भयपट कॅटेगिरीत
अनिष्का, निलिमा, दुश्मनमध्ये
अनिष्का, निलिमा, दुश्मनमध्ये आशुतोष राणाच्या एंट्रीला दिलेलं ते बॅकग्राऊंड म्युझिक (की त्याचा स्वतःचाच विचित्र आवाज) खरोखरंच भयानक होतं ... बाप रे!>>>>>>>>... आठवत नाही नीटसं पण घशातली घरघर टाईप आवाज होता ना तो??? आणि त्याचे डोळे....
मला वाटले लिंका असतील पण
मला वाटले लिंका असतील पण पिंकाच त्यामूळे भयपट पाहता आला नाही !
दुश्मन खरोखर भयानक होता, त्या
दुश्मन खरोखर भयानक होता, त्या वरून मला "Stoneman Murders" आठवला. तो पण भयानक आहे. १९८० च्या सीरीयल किलींग वर आहे. त्यात सायन सबवे मधील एक सीन आहे , आता तेथून जाताना नेहेमी तो सीन आठवतो.
बिपाशा बसूचा राज थेटरात
बिपाशा बसूचा राज थेटरात पाहतानाही खरोखर घाबरलो होतो. मागच्या बाजूने तो केस उडण्याचा सीन आणि ती किंकाळी... तोही एक चांगला भयपट होता. (काही दृश्ये वगळून!:))
दुश्मन हा चित्रपट एका ईंग्रजी
दुश्मन हा चित्रपट एका ईंग्रजी चित्रपटावरून कॉपी केलाय...अगदी सेम टू सेम...आता नाव आठवत नाही.
दुश्मन ="Eye for an Eye
दुश्मन ="Eye for an Eye
भूत - रामूचा ... कॉलेजात
भूत - रामूचा ...
कॉलेजात असताना रात्रीचा शेवटचा शो पाहिला होता... चित्रा टॉकिज परेळ.. थिएटरच्या बाहेर आरामात आलो आणि अचानक झालेली सामसूम बघून आम्हा तीनही मित्रांची आपापल्या घरी एकट्याने जायची टरकली.. तर आम्ही कॉलेजात्च झोपायला गेलो.. वीजेटीआय, माटुंगा... ती रात्र तर मित्रांच्या गप्पात गेली.. पण दुसर्या रात्री घरी झोपलेलो असताना मला त्यातील भूतीण चे असले बेक्कार स्वप्न पडले.. सेम टू सेम.. तीच तशीच दिसली....... त्यानंतर आजवर थेटरात भयपट बघायचा आगाऊपणा नाही केला..
मी पण भुत चित्रा लाच बघितला.
मी पण भुत चित्रा लाच बघितला. पण डे शो. लेक्चर बंक करके
सहिये.. माझे कॉलेज दादर,
सहिये.. माझे कॉलेज दादर, राहायला माझगाव आणि मित्रपरीवार परेळ,लालबाग म्हणून बरेच चित्रपट चित्राला झालेत.. आज सतरा मल्टीप्लेक्स उघडलेत तरी कधीतरी एखादा चित्रपट बघतो तिथे.. बरे वाटते.. नॉस्टेल्जिक वगैरे.... पण पुन्हा कधी भूत नाही बाबा..
आज सतरा मल्टीप्लेक्स उघडलेत
आज सतरा मल्टीप्लेक्स उघडलेत तरी कधीतरी एखादा चित्रपट बघतो तिथे.>>>>>>>>>>> मी तर चित्रा , प्रीमीयरलाच बहुतेक पिक्चर बघते. प्रवासखर्च वाचतो. कधीतरीच प्लाझा.
स्केअरी मुव्ही विनोदी
स्केअरी मुव्ही विनोदी आहेत..
मी स्केअरी मुव्ही म्हणुन पाहीलेले मुव्हीज तरी खुपच विनोदी होते.
रादर त्यात ठरवुन काही प्रसिद्ध मुव्हींचे विडंबन करुन विनोदनिर्मिती केली आहे.
संघर्ष हा Silence of ... ची
संघर्ष हा Silence of ... ची भ्रष्ट नक्कल होती.
the conjuring
the conjuring बघितला.....जेवढा हाईप केलाय तेवढा भितीदायक नाहीय...पण दोन सीन्स असे आहेत ज्यात दचकायला झालं..........एक वेळ बघायला छान आहे....१९७० चा काळ , गाड्या , वातावरण चांगलं दाखवलयं.....
Amityville Horror - ऑल टाईम
Amityville Horror - ऑल टाईम फेवरिट!
द ग्रज - the grudge
द ग्रज - the grudge
द कन्जुरिंग कुणी पाहीलाय का ?
द कन्जुरिंग कुणी पाहीलाय का ?
conjuring बघितला.....जेवढा
conjuring बघितला.....जेवढा हाईप केलाय तेवढा भितीदायक नाहीय...पण दोन सीन्स असे आहेत ज्यात दचकायला झालं..........एक वेळ बघायला छान आहे....१९७० चा काळ , गाड्या , वातावरण चांगलं दाखवलयं.....
मी ही पाहिला conjuring.
मी ही पाहिला conjuring. चांगला वाटला.
दुसर्या धाग्यावर एक लिंक
दुसर्या धाग्यावर एक लिंक दिली आहे चिनुक्सने. त्यात 20-must-see-horror-movies-of-the-last-decade ही पण लिंक दिसली. त्यातला फक्त Insidious पाहिलाय तो आवडला होता. पण बाकी बद्दल काहीच माहीत नाही, 'सॉ' सारखे किळसवाणे सोडुन बाकीचे पहाता येतील. कोणी पाहिलेत?
http://www.zergnet.com/news/103550/20-must-see-horror-movies-of-the-last...
Pages