Submitted by सीमा on 11 March, 2013 - 11:50
अमेरिकेतील बागकामासाठीचा यावर्षीचा (२०१३ चा )धागा.
अमेरिकेत कडिपत्ता लावण्याविषयी माहिती
अमेरिकेत मोगरा लावण्याविषयी माहिती
भारतीय बीया ऑर्डर करण्यासाठी http://www.seedsofindia.com/
तुमच्या झिप कोड एरिया मध्ये सध्या कोणती झाडे, बीया रुजवावीत यासाठी ही साईट पहा
वेळ होईल त्याप्रमाणे अधिक लिंक्स देवून धागा अपडेट करेन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा धागा खुपच आवडला. आमच्या
हा धागा खुपच आवडला. आमच्या बागेतिल आजच्या भाज्या ... आन्जिर, पेरु, कलिन्गड, वान्गि, रन्गित ढोबळि मिरच्या पण आल्या आहेत
मीपुणेकर , एवढी व्हरायटी !!!!
मीपुणेकर , एवढी व्हरायटी !!!! आप महान हो _/\_
बाकीच्यांची मेहनतपण वाखाणण्याजोगी आहे, मस्त फोटोज.
माझ्याकडच्या टोमटोच्या
माझ्याकडच्या टोमटोच्या झाडांना इतके फळं लागत नाहीत ते का? अन बेलपेपर पण दोन तीन काढल्यावर परत आले नहित। मी चांगल्या दर्जाचं कंपोस्ट वापरते अन पाणी पण व्यवस्थित देते ।प्रत्येक झाडाला एक ५- १० ग्यालनचि कुंडी आहे.
चाफ्याच्या बागेतले कापे* आणि
चाफ्याच्या बागेतले कापे* आणि ब्लाँएगोचे* टोमॅटो भारी आहेत. किंक्रिबे* आधी बघितली नव्हती.
*चाफ्याला अॅक्रोनिम्स आवडत नाहीत असं वाचलंय.
"तुमचे" प्रयोग छान आहेत चाफा.
"तुमचे" प्रयोग छान आहेत चाफा.
आम्ही त्याला पर्पल बेसिल म्हणतो.
द्राक्ष्यांबद्दल प्लीज सांगा
द्राक्ष्यांबद्दल प्लीज सांगा ना!!! माझ्या सासुबाईंनी वाइन टेस्टींगला गेलेलो तिथल्या बागेतनं एक दांडा तोडून आणलेला.
मनी, http://ucanr.edu/sites/g
मनी,
http://ucanr.edu/sites/gardenweb/Growing_Grapes_in_the_California_Garden/
मी पुणेकर.. मस्त फोटो !!
मी पुणेकर.. मस्त फोटो !! पूर्ण बागेचे फोटो टाका..
स्वाती..तुमच्याही भाज्या मस्त ! केव्हड्या आहेत !
चाफा. छान..
कौतुकाबद्दल थँक्स सगळ्यांना.
कौतुकाबद्दल थँक्स सगळ्यांना. मेधा, हो या मिरच्या भयानक तिखट आहेत. मधे चिरल्यावर नुसते बोट लावून चाटले तरी तोंडात आग पसरते!


"मृ",
लोला, आम्हाला ही क्रिम्सन किंग बेसिल आमच्या बोटॅनिकल गार्डनने दिली. त्याबरोबर दिलेल्या माहितीपत्रकाप्रमाणे इतर पर्पल बेसिल्सना आधी ग्रीन शूट्स येतात आणि मग नंतर ती पानं पर्पल होतात. पण याची शूट्स पर्पलच येतात त्यामुळे म्हणे ही अॅड केली तर तुमच्या अर्ब गार्डनला "रिच कलर" मिळतो.
>>मधे चिरल्यावर नुसते बोट
>>मधे चिरल्यावर नुसते बोट लावून चाटले तरी तोंडात आग पसरते!

हे उद्योग कशाला करायचे?
हे उद्योग कशाला करायचे? >>
हे उद्योग कशाला करायचे? >>
खुप मस्त फोटो आहेत
खुप मस्त फोटो आहेत सगळ्यांच्या भाज्यांचे. फुलझाडांचे पण टाका कि.
कोल्हापूर , सांगली कडे हिरवी कार्ली चांगली समजली जात नाहीत. पोपटीच पाहिजेत असा आग्रह असतो. ते आठवून मी अगदी ठरवून, seeds of india वरुन पोपटी कारल्याच्या बीया ऑर्डर केलेल्या.
रुनी , पोपटी कार्ली.
माझ्याकडे यावेळी फक्त दोडका आणि अळु आहे. भारतात गेल्यामुळ काहीही शिल्लक राहिल नाही सशांच्या तावडीतून आणि उन्हातून. आता थोडा लेट्युस ,लसून लावेन.
वेलकम बॅक सीमा. ट्रिप कशी
वेलकम बॅक सीमा. ट्रिप कशी झाली ? चिल्लर पार्टीचा जेट लॅग उतरला का ? किती हंक दिसले कोल्हापुरात
बरं त्या मिस्टरी वेलाला
बरं त्या मिस्टरी वेलाला चांगले ७-८ दोडके लागले आहेत.
अचानक ट्यूब पेटली की मला दोडके काही आवडत नाहीत. आत्तापर्यंत आयुष्यात एकदाही विकत आणून दोडक्याची भाजी केलेली नाही.
पण आता दैवदयेने दोडका फार फोफावला त्यामुळे हेही करणार आणि खाणार. न खाउन सांगते कोणाला.
तर भाज्या लावताना आवडीच्या भाज्या लावा अशी एक आपली टिप द्यायची होती. हौसेच्या आणि उत्साहाच्या भरात नावडीच्या भाज्या भरभरुन उगवतील.
अरे वा दोडकी एकदम छान दिसत
अरे वा दोडकी एकदम छान दिसत आहेत .. आमटीत, सांबार्यात छान लागतात .. भाजी चांगली लागते .. ह्याच्या शिरांची(?) चटणीही करतात बहुतेक ..
भारी दिसताहेत दोडकी. भरली
भारी दिसताहेत दोडकी. भरली दोडकी पण मस्त लागतील.
आज शिरांची चटणी आणी भरली
आज शिरांची चटणी आणी भरली दोडकी करणार आहे.
दोडकी एकदम मस्त. मी कारली आणि
दोडकी एकदम मस्त. मी कारली आणि दोडकी लावलेली. कारल्याचा वेल जळून गेला मी भारतात होते तेव्हा. दोडक्याला चुकून फुलझाडांचं खत घातल्यामुळे की काय खूप फुलं आली पण फळं नाहीत. आता इतक्या उशीराने बारकी दोडकी लागलीत. पण रोज १-२ जळून जातात. असो, यंदा चाफा, चिनी गुलाब आणि डेझर्ट रोझची फुलं बघून दिल खुश कर लिया
आमच्याकडे अगदी दीर्घ इंतजारला
आमच्याकडे अगदी दीर्घ इंतजारला शेवटी एकदाची हळदीची दोन चार पानं उगवलीत. नागपंचमीला नाही जमलं तरी गणपती पर्यंत दोन चार पातोळे करता येतील अशी आशा आहे.
आदित्यने दिलेल्या तुळशीला डझनावारी पिल्लं झाली आहेत.
सिंडे, माझ्यापण दोडक्याला
सिंडे, माझ्यापण दोडक्याला दोडकी उशीरानेच लागली. आधी नुसतीच भरमसाठे फुलं यायची पण पुढे काय नाही. त्यामुळेच त्याला मिस्टरी वेल असं नाव पडलं. फायनली आत्ता उगवली दोडकी. हिंमत मत हारो.
असो, आमचा अनंता ठेविले अनंते तसाच राहिलाय. हे मी मागे पण विचारलं. त्याला काय झालं असेल?
>> त्याला काय झालं
>> त्याला काय झालं असेल?
त्याला सडाफटींग रहायचं असेल ..
त्याला सडाफटींग रहायचं असेल
त्याला सडाफटींग रहायचं असेल .. >> हत मेल्या... आता तू आणि तुझं नशिब... (असं मी त्याला सांगीन)
माझ्याकडचं अनंताच रोप जळालं.
माझ्याकडचं अनंताच रोप जळालं. आता त्या कुंडीत चाफ्याचं रोप बनवणार अजून एक.
कडिपत्त्याला अजून धाड भरलेलीच आहे. त्याला आता फॉस्टर केयरमध्ये टाकला.
शूम्पी, दोडकी मस्त दिसताहेत.
शूम्पी, दोडकी मस्त दिसताहेत. त्याची भाजी व सालांची चटणी(तीळ घालून ) खूप आवडते पदार्थ आहेत.
तू कधी करत नाहीस म्हणून एक टीप: वापरण्याआधी कडेचा छोटासा तुकडा काढून कडू नाही ना बघून घ्यायचं. काकडीचं बघतो तसं. (आधीच माहित असेल तर इग्नोर माडी.)
(आधीच माहित असेल तर इग्नोर
(आधीच माहित असेल तर इग्नोर माडी.)>> नाही नाही आधीच माहित नव्हतं. धन्यवाद सांगितल्याबद्दल.
कडेचा तुकडा कडू नाही ना बघायला कोणी गिर्हाइक मळणार नाही असं वाटतय. ते पण मलाच करावं लागणार. भरल्या वांग्यासारखे मस्त मसाले बिसाले लावून दोडका खायची मानसिक तयारी केली होती पण हे नविनच संकट
तीळ घालून चटणी माझी पण आवडती.
दोड्का कडू नसेल तर चवीला
दोड्का कडू नसेल तर चवीला गोडसर असतो. चव बघणं संकट न वाटण्याएवढा तर नक्कीच. गुड लक!
शूम्पे, काय भारी दोड्की आहेत,
शूम्पे, काय भारी दोड्की आहेत, इंग्रो मध्ये कध्धी मिळणार नाहीत. एन्जॉय
चाफा कसा वाढवलास सिंडे? मी जमिनीत लावाय्॑ची हिम्मत केली नाही अजून, माझा चाफा ३ फूट उंच आहे, नवीन पालवी आलीये त्याला. फुले कधी येतात?
दोडकी देखणी आहेत हां शूम्पे.
दोडकी देखणी आहेत हां शूम्पे. रेस्पी हवी आहे का?
शूम्पी, इतकी सुंदर दोडकी
शूम्पी, इतकी सुंदर दोडकी मिळालीत तुम्हाला...
भजी करा... मस्त लागते.
वरचे एकएक भन्नाट फोटो बघुन मी
वरचे एकएक भन्नाट फोटो बघुन मी किती आळशी आहे ह्याची पुन्हापुन्हा जाणीव होते.
पुर्ण बागेचा फोटो का टाकत नाही तुम्ही कोणी?
Pages