Submitted by सीमा on 11 March, 2013 - 11:50
अमेरिकेतील बागकामासाठीचा यावर्षीचा (२०१३ चा )धागा.
अमेरिकेत कडिपत्ता लावण्याविषयी माहिती
अमेरिकेत मोगरा लावण्याविषयी माहिती
भारतीय बीया ऑर्डर करण्यासाठी http://www.seedsofindia.com/
तुमच्या झिप कोड एरिया मध्ये सध्या कोणती झाडे, बीया रुजवावीत यासाठी ही साईट पहा
वेळ होईल त्याप्रमाणे अधिक लिंक्स देवून धागा अपडेट करेन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मीपूणेकर, तुमची कारली चायनिज
मीपूणेकर, तुमची कारली चायनिज आहेत. फार्मर्स मार्केटात ढीगाङीगाने येते, चवीत ठीक्ठाकच असतात.
शुम्पी, या कारल्याच्या बीया साठवून ठेवा, बे-एरियात च असाल तर मला द्याल कां २-३ बीया?
मी जन्म्भर ऋणी राहीन. माझ्या आईकडे यायचे असे कारले. खुपच छान लागतात चवीला.
माझ्याकडे गोफर भरपूर आहेत, घुशीसारखे बिळं काढतात, त्यासाठी काही उपाय आहे का?
मी सगळीकडे लाद्या लावून घेणार आहे पण माझ्या झाडांसाठी कडेकडेने २ फुट जागा ठेवणार आहे, मी ऐकलंय की गोफर, झाडांची मुळं खाऊन टाकतात आणि मोठी झाडंपण मरतात. गोफर कुठली झाडं खात नाही ते सांगाल कां? जसं झेंडू, etc
जरूर ठेवीन बीया.
जरूर ठेवीन बीया.
पण आपण कश्या घेणार?
पण आपण कश्या घेणार?
येस सीमाकडे नसतील तर तू पण
येस सीमाकडे नसतील तर तू पण प्लीज ठेव बीया शूम्पी बॅकअप म्हणून.
नक्की ठेवीन बीया. पण त्यासाठी
नक्की ठेवीन बीया. पण त्यासाठी नक्की काही तंत्र आहे का? वाळवून ठेवायच्या का? उन्हात की सावलीत?
शूम्पी ..... OMG मझी कार्ली
शूम्पी ..... OMG मझी कार्ली ditto अशीच दिसतात. पण मला ज्यान्च्याकडन मिळाली त्यान्ची छान हीरवी-गार आहेत. ह्म्म्म...
शुम्पी, एक-दोन कार्ली वेलीवर
शुम्पी, एक-दोन कार्ली वेलीवर तशीच ठेवा. कारली पिकली की त्यातल्या लाल बिया काढून हवेवर ठेवा म्हणजे ओलसरपणा जाइल मग त्या एखाद्या बाटलीत ओल लागणार नाही अश्या ठेवायच्या. पुढ्च्या वर्षी पेराय्च्या.
मला प्लीज प्लीज हव्यात या बिया. तुम्ही किंवा सीमा दोघींपैकी कोणीही दिल्या तरी चालतील. तुम्हाला कुठल्या बिया हव्या असतील तर सांगा. माझ्याकडे असतील मी मेल करू शकेन.
इंतजारला आलेली फुलं. पहिलं
इंतजारला आलेली फुलं. पहिलं आहे ते डेझर्ट रोझ. ६ वर्षांत पहिल्यांदाच फुलं आलीत. दुसरा चाफा.
सगळ्यांनी कार्ली आणि फुलं
सगळ्यांनी कार्ली आणि फुलं मस्त !!
आमच्या एकाच वेलाला दोन
आमच्या एकाच वेलाला दोन वेगळ्या रंगाची कारली आलीत.
![karle2.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u26225/karle2.jpg)
![karle3.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u26225/karle3.jpg)
आणि हा कुंडीतला वेल, त्यानं शेजारच्या कुंडीच्या स्टँडला पकडलंय आणि आता त्याला कारली येऊ लागलीत..
वांगे व वांग्याचे फूल
![vange1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u26225/vange1.jpg)
![vange2.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u26225/vange2.jpg)
हार्डी कोथिंबीर, दरवर्षी आपोआप येते..
![kothi.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u26225/kothi.jpg)
ढबू- कुंडीतच फास्ट आली होती गेल्या वर्षी. आमच्याकडे भुसभुशीत जमीन नाही, लगेच दगड लागतो त्यामुळं बरंच खणून दगड काढून माती घालून जमीन तयार करावी लागते. त्यामुळे मी मोठ्या कुंडीत लावते कधीकधी. एक असा तयार केलेला पॅच स्ट्रॉबेरीनं टेकओव्हर केला आहे. यावेळी दुसरा केला.
![dhabu.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u26225/dhabu.jpg)
लोला, भाज्या मस्त फ्रेश दिसत
लोला, भाज्या मस्त फ्रेश दिसत आहेत.
हे आमच्या बागेतून -
मी विकत तुळस आणलेली , ३ ४
मी विकत तुळस आणलेली , ३ ४ आठवडे टिक ते
आता आणल्या आणल्या लाउन त्यात calcium गोळ्यं चे पाणी टाकले
कुणी असे प्रयोग करत आहे का?
लोला मस्त भाज्या! मीपु, गुड
लोला मस्त भाज्या!
मीपु, गुड गॉड! प्लीज सगळ्या बागेचे फोटो टाक ना मागच्या पानांवर धनश्रीने टाकले तसे म्हणजे कुठे काय कसं प्लॅनिंग केलं आहे ते नीट कळेल.
फारच मस्त प्रोड्यूस आहे तुमच्या बागेचं.
शूम्पी +१
शूम्पी +१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शूम्पी +१
शूम्पी +१
मस्त फुलं, भाज्या आणि फळं!
मस्त फुलं, भाज्या आणि फळं!
(No subject)
स्वाती२, त्या टॉप राइट
स्वाती२, त्या टॉप राइट कॉर्नरमध्ये कॄष्णाकाठची बिन्बियांची वांगी आहेत की काय?
कृष्णाकाठची नसावीत. सीड्स ऑफ
कृष्णाकाठची नसावीत. सीड्स ऑफ इंडीया कडून बीया मागवल्या होत्या.
स्वाती२ भारी!
स्वाती२ भारी!
लोला, पुणसास, स्वाती
लोला, पुणसास, स्वाती तुमच्या
भाज्याबघुन तोंडाला पाणी सुटल.
मीपु, स्वाती, लालु
मीपु, स्वाती, लालु जबरदस्त!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्हा नवशेतकर्यांसाठी मार्गदर्शनपर लेखही लावावा ही नम्र विनन्ती
काय अफलातून भाज्या आहेत
काय अफलातून भाज्या आहेत पब्लिकच्या. मीपुणेकर - बागेचे फोटो टाकाच. मळ्याची भेट होईल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वाती - खूप सुंदर फोटो. रसरशीत हा एकच शब्द शोभतोय.
लोला - तुझ्या बागेचे पण फोटो हवेत.
सिंडी - फुलं क्युट आहेत.
लोला, स्वाती२, भाज्या सुंदर
लोला, स्वाती२, भाज्या सुंदर दिस्तात.
मी पुणेकर, तुमच्या बागेतली द्राक्षं, खरबूज, टरबूज, अंजिरं सही आहेत. बीन्स कितीदा खाव्या लागल्या?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मीपु, स्वाती२ मस्त
मीपु, स्वाती२ मस्त भाज्या!
एखादी तोडून ताजी ताजी शिजवायची.
स्वाती, सगळ्या एकदम कशाला तोडल्या?
धनश्री, तण काढावे लागतील आधी.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त फोटो आहेत . मीपु ,
मस्त फोटो आहेत .
मीपु , स्वाती- तुमच्या बागेचा प्लॅन टाका ना सविस्तर .
लोला, सगळ्यांना वाटून
लोला, सगळ्यांना वाटून उरलेल्या भाज्यांचा फोटो काढला.
तसेही बेलपेपर आणि वांगी सोडल्यास बाकी भाज्या एक दिवसाआड काढल्या नाहीत तर भल्या मोठ्ठ्या आणि जून होतात.
मेधा, मी स्के. फूट मधे एक याप्रमाणे झाडे लावली रो मधे.माझा प्लॅन - रोमा टोमॅटो, बनाना पेपर, बेल पेपर, भेंडी, वांगी, भेंडी, देशी मिरच्या, बीफ स्टेक टोमॅटो. दुसर्या भागात काकडी, दुधी, झुकीनी, यलो स्क्वाश, बटरनट स्क्वाश यांच्या हिल्स त्यातच बीन्स. तसेच वाफ्यात उत्तर दिशेला उंच झाडे आणि दक्षिण दिशेला लहान झाडे. म्हणजे वाफ्यातील सगळ्या झाडांना ऊन मिळते. यावर्षी कम्युनिटी गार्डन प्रोजेक्ट मुळे अजून एक गोष्ट कळली. बटाट्याला ६९-७० F टेंप लागते म्हणून उन्हाळा वाढला की झाडाच्या बुंध्यात पेंढा पसरायचा.
मीपुणेकर, द्राक्षाबद्दल
मीपुणेकर, द्राक्षाबद्दल माहीती द्या ना. माझ्याकडे द्राक्षाचा वेल आहे पण त्याचे प्रुनिंग कसे करावे आणि तो वेलाचे वय आता १ वर्ष आहे. प्लीज माहीती द्या.
तुमच्या सगळ्यांच्या बागांचे
तुमच्या सगळ्यांच्या बागांचे आणि भाज्यांचे फोटो पाहून खूप मजा येते व नवशिक्यांचा उत्साह वाढतो!
हे आमचे काही प्रयोग.
कायान पेपर्स.. लाल व्हायला लागल्या मिरच्या
![Peppers.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u139/Peppers.jpg)
टोमेटोज पिकायला लागले.
![Sweeties.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u139/Sweeties.jpg)
हे ब्लाँडकॉफ्शेन एअरलूम गोल्डन चेरी टोमेटोज. दरवर्षी त्यांच्याच बियांनी उगवतात. पण अजून पिवळे व्हायचेत. अशी साधारण दिडशे फळं लागल्येत चार झाडांवरची मिळून!
![blondkopfchen.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u139/blondkopfchen.jpg)
पुदीना
![Pudina.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u139/Pudina.jpg)
किंग क्रिम्सन बेसिल
![Basil.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u139/Basil.jpg)
मस्त आहेत कायेन पेपर्स तिखट
मस्त आहेत कायेन पेपर्स तिखट आहेत का ? - माझ्याकडे एका वर्षी अगदी बिन -तिखट निघाल्या होत्या.
क्रिम्सन बेसिल पण मस्त आहे
Pages