सर्वात भीतीदायक चित्रपट

Submitted by उद्दाम हसेन on 30 July, 2013 - 14:29

तुम्हाला आवडलेल्या (घाबरवलेल्या) हिंदी / इंग्लीश/ मराठी भीतीदायक चित्रपटाबद्दलचं हितगुज इथे करावं.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॅल्लो ब्रदर्स................
.
.

आजही हिंम्मत होत नाही हा भुताचा चित्रपट पुर्ण बघण्याची

शिंडलर्स लिस्ट / किनयारवांडा / समटाईम्स इन एप्रिल / सेराफिना.... पडद्यावर दिसतेय ते वास्तव आहे हि कल्पनाच सहन होत नाही.

नो स्मोकिंग >> शाहीर सहमत. काय म्हणून तो पिक्चर बनवलाय देवास ठाऊक. स्वतःचीच चीड आली तो पुर्ण बघितल्यावर "का बघितला" म्हणून...

तो एक्झॉर्सिस्ट तर होताच भितीदायक. पण सगळ्यात पांचट शिणुमा ( भूताचा म्हणून ) होता जानी दुष्मन्.:फिदी: त्या भूताचे डोके फिरले माझी बोबडी वळायची. अयायाया! काहीही आचरट कल्पना होत्या त्यात. आहट पण बेक्कार सिरीयल होती , भिती वाटली तरी उत्सुकतेपोटी मी पहातच होते ती सिरीयल.

कौन - थिएटरमध्ये पाहिला होता. ६ ते ९, मंगला ला... तिथून बालगंधर्व ब्रिजवर बसले होते, घरी जायची भिती वाटत होती.

एक्झॉरसिस्ट - घरी सीडीवर... म्युझिक सिस्टिम जबरी आहे माझी. त्यावर फक्त आवाजाने माझी गाळण उडाली होती. मी पांघरूणात गुडुप होते. छातित धडधड.

एक्झॉरसिझम ऑफ एमिलि रोज - सेम अवस्था

रागिने एम एम एस - घरी एकटी असताना पहायचा प्रयत्न केलेला, फसला.. झोपच आली नाहे २ तास. Sad

हा खेळ सावल्यांचा...
"काजळ रातीने ओढुन नेला" वरचा संजीवनी बिडकरचा केस उडवत केलेला डान्स.. "नरसूचे भूत"..

एवढ्यात पाहिलेला म्हणजे ऑर्फन! सायकोलॉजिकल हॉरर आहे, त्यामधल्या मुलीचे काम बघून फार भीती वाटली होती Sad
'पॅरानॉर्मल अ‍ॅक्टीवीटी' कसे वाटले आहेत कोणाला? मी एकही पूर्ण पाहिलेला नाही.

शाळेत असताना एक्स्-झोन म्हणून सिरियल लागायची झी टिव्हीवर. त्याचा एक भाग पाहिला होता, श्रेयस तळपदे होता त्यात. मुंबईत घडलेली सत्यघटना! एका माणसाला रात्री घरी परतताना एक बाई लिफ्ट मागते. तो तिला गाडीत घेतो. नंतर तिचा स्टॉप आल्यावर पाहतो तर ती गाडीत नसते आणि मग त्यांच्या घरी चित्र्-विचित्र घटना सुरू होतात. ती बाई आधी त्या माणसाच्या शरिरात शिरून त्याचा जीव घेते मग त्याच्या वडिलांचा. तिला त्या घरातून ३ बळी हवे असतात. हे बघून मोठा भाऊ अमेरिकेला निघून जातो, लहान भाऊ म्हणजे श्रेयस तळपदे एकटाच त्या घरात राहतो, असा एन्ड होता. मला फार भीती वाटली होती ते बघून. ते बघून मी ठरवले होते की मी गाडी घेतली की अशी कोणालाही लिफ्ट देणार नाही म्हणून.

याला "भितीदायक" म्हणतां येईल कीं नाही माहीत नाही पण 'वेजीस ऑफ फिअर' [ Wages of Fear ] हा सिनेमा [ १९५०-६० दशकातला- B&W ] आठवला कीं अजूनही मला त्यातला थरार जाणवून अंगावर शहारे येतात.
[अत्यंत स्फोटक अशा नायट्रोग्लिसरीनचे दोन ट्रक एका कच्च्या, अवघड व निर्जन रस्त्यावरून एका ऑईल फिल्डवर तांतडीने पोचवणं आवश्यक असतं. त्या कामातला जीवघेणा प्रचंड धोका स्पष्ट करून त्यासाठी जाहीरपणें नांवं मागवली जातात. अर्थात भल्या मोठ्या रकमेचं अमिष दाखवूनच[ Wages of Fear ]. कोणत्याही क्षणीं प्रचंड स्फोट होईल असं भयावह वातावरण त्या दोन ट्रक्सच्या संपूर्ण प्रवासात भयानक प्रभावीपणें निर्माण केलं आहे. ]

१००% द रिंग माझ्यामते सही सर्वात भितीदायक पिक्चर.
ग्रज वगैरे पिक्चरची स्टाइल रिंगने पहिल्यांदा आणली. पुढचे सर्व चित्रपट ही video effects style कॉपी करतात.
विशेषतः ती फोटोतली माशी बाहेर येते का असा काही शॉट आहे तो सहीच. आता पहिला तर विशेष वाटणार नाही पण आजच्या भयपटांचा ring हा ओरिजिनल ब्लु प्रींट आहे.

२०१२ हा भयपट नाही हे मला माहीत आहे. पण तो बघताना त्यातल्या काही सीन्सना माझ्या पोटात भीतीने गोळा आला होता.
१. कोसळणार्‍या दोन इमारतींच्या मधुन तो विमान नेतो
२. रेडिओवाल्याच्या व्हॅनमधुन नकाशा मिळाल्यावर विमान पकडण्यासाठी धावत असताना मागुन जमीन धसत जाते आणि हिरो दिसेनासा होतो.... त्यानंतर तो जिवंत आहे अस समजल्यावर टाकलेला उसासा मी अजुन विसरु शकत नाही....

रात जो शाळेत असताना पिंपरीच्या विशाल थेटरात पाहिला होता. बाल्कनीतली सर्वात मागची तिकट काढली होती. त्यामुळे सगळेच आवाज नुसते कानावर आदळत होते (त्यातल्या त्यात रो. ह्ट्टंगडी मिक्सर चालू करते तो आवाज तर एक्दम डेंजर वाटला होता) किमान १० दिवस तरी टरकलेली होती.. असाच इव्हील डेड आणि दरवाजा पण ..

मला नाव आठवत नाहीये पण दिव्या भारतीचा एक चित्रपट बघुन माझी लहानपणी खुप फाटायची..
त्यात एका दृष्यात तिच्या गाडीखाली येऊन एक मांजर मरते आणि मग ते तिला घरात दिसते.
एका प्रसंगात ती संपूर्ण सिनेमागृहात एकटीच बसलेली असते.

कोणी नाव सांगेल का?

एक्झॉर्सिस्ट बद्दल वाचून आता बघावासा वाटतोय्...मग मी पुन्हा नव्याने घाबरायला मोकळी.
नाईटमेअर ऑन एल्म स्ट्रीट पण भयानक वाटलेला.
आहट मधे एका लहान मुलाचा एपिसोड होता ...तो लाल रंगाचा बॉल घेऊन खेळत असतो. किती तरी दिवस झोपताना तो मुलगा च आठवायचा. आहट चे सुरवातीचे काही भाग खरोखर भयानक होते.

Pages