बागकाम (अमेरिका) सीझन २०१३

Submitted by सीमा on 11 March, 2013 - 11:50

अमेरिकेतील बागकामासाठीचा यावर्षीचा (२०१३ चा )धागा.

गेल्यावर्षीचा (२०१२ चा)धागा

अमेरिकेत कडिपत्ता लावण्याविषयी माहिती

अमेरिकेत मोगरा लावण्याविषयी माहिती

भारतीय बीया ऑर्डर करण्यासाठी http://www.seedsofindia.com/

तुमच्या झिप कोड एरिया मध्ये सध्या कोणती झाडे, बीया रुजवावीत यासाठी ही साईट पहा

http://sproutrobot.com/

वेळ होईल त्याप्रमाणे अधिक लिंक्स देवून धागा अपडेट करेन.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त भेंड्या.
माझ्याकडे एक (अजून एक ) मिस्ट्री झाड उगवलं आहे. ते मी पेरलं नाही.
कशाचं आहे? वाल पापडीच्या शेंगा की नुस्तच वीड?
whatisIt.jpg

मस्त भेंडी!
माझ्या टोमॅटोला छान २० एक टोमॅटो आले आहेत पण २ आठवडे झालीत अजुन हिरवीच आहेत. काकडीला पण खुप फुलं आली आहेत. वाट बघते आहे Happy

वाल पापडी सारख्याच दिसत आहे शेंगा .. वास घेऊन बघितला का?

(तुमच्यापैकीच कोणीतरी भाजी निवडताना एखादी बी फेकली असेल बाहेर .. Wink

वालपापडी(!?)च आहे<< दिसतं तरी तस आहे. पण वाल अशी रॅन्ड्म उगवते का? आधी कधी लाव्ली होतीस का? की बीया पडल्या असतील?

वास? वालपापडी ला वास येतो काही विषेशसा? मी नाही घेतला.
मी खाते भाजी करुन. जगले वाचले तर भेटू इथे.

>>वालपापडी(!?)च आहे>> +१

>> कढी, रायतं किंवा लोणच्यापुरतीच आहे>>
भेंडी भरपुर आलेय. पण फोटो नीट यायला थोडीच घेतली ट्रे मधे. Happy

वालपापडीच्या बीया चुकोन मातीत पडण्याची शक्यता शून्य आहे. कारण मी फ्रोझन भाजी आणते आणि पाकिट उघडून कढैत रिकामं करते नेहेमी.

हो , वालपापडी ला वास असतो असं मला वाटतं .. शेंग मोडून बघितली तर कळेल .. पण तेच त्याचं डिस्टिंक्टिव्ह फीचर असतं का ते माहित नाही ..

शुम्पी, भेंडीच्या बिया भारतातल्या होत्य कां? एकडे मिळणारी भेंडी अगदी बुटकी असते ना? आणि केव्हा पेरलेले आणि केव्हा भेंडी लागली?

मने, भेंडी माझ्या परसातली नाही. स्वाती च्या आहे. ती सांगेल.

अजून एक विचारायचं होतं. अनंताला फुलं कधी येतात? आमचा अनंता ठेविले अनंते तैसेची राहिलाय. फुलायचं नाव नाही घेते.

मनी, भेंडीच्या बीया इथेच गावातल्या शेतमालाच्या दुकानातून घेतल्या - ferry morse seeds च्या.
मेच्या शेवटच्या आठवड्यात बागेत बीया लावल्या, जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात घरच्या भेंडीची भाजी. Happy
मी खरेतर मिरच्यांना आणि वांग्याला सावली म्हणून भेंडी लावली. माझा प्लॅन - रोमा टोमॅटो, बनाना पेपर्स, बेल पेपर्स, भेंडी, वांगी, भेडी, देशी तिखट मिरच्या, बीफ स्टेक टोमॅटो असा आहे. दुसर्‍या भागात काकडी, दुधी, झुकीनी, बटर नट स्क्वाश आणि त्याच्या जोडीला बीन्स.

ओह..स्वाती, तुच दे उत्तर.
शुम्पी, तुझ्या बागेतले सफरचंदाचे झाड तर केव्ह्डंसं आहे. त्याला आली सफरचंदं? झाड लावल्यानंतर किती वर्ष लागली?

छान, मी पण लावेन भेंडी पण आत्ता उशिर झालाय, परत एक प्रश्न आहे..भेंडीचं झाड विंटरमध्ये जातं कां?? की एक्दा लावला की १-२ वर्ष राहतं??

झोन ९ मधे दुधी कधीपासुन लावायचा? कारण कंपोस्टमधुन उगवलेले बरेच रोपटे आहेत पण नेमका पेरणीचा सिझन कोणता?

दुसरं म्हणजे कारल्याचा वेल वाढतोय पण कारले अगदी ३नच आलेत...छोटुसे..त्यातलं एक खारीने खाल्लं.

माझ्या कार्ल्याच्या वेलावर सतत मेल्या (जिवंत) पाली/लिझर्ड्स असतात. टर्मिनेक्स ला बोलवायला हवय.
मला जो वेल कार्ल्याचा वाटत होता तो कार्ल्याचा नहीच्चे. दुसरा छोटावाला कार्ल्याचा निघाला. एक जो नुस्ता सुंभासारखा वाढतोय पण फळ देत नाही तो कसला कोण जाणे..

श्रीमती शुम्पीबै, तुम्हाला एक नम्र प्रश्न विचारला होता वर... तुमच्याकडे एक कंदील आहे असं ऐकलं... तो कसा आहे, बरा आहे का .... तुम्ही त्याचं उत्तर देणं टाळता आहात हे आमच्या ध्यानी आलं आहे याची नोंद घ्यावी...

माझ्या काकडीला भरपुर फुल आली आहेत. अगदी ५०+. दोन काकड्या चांगल्या मोठ्या झाल्यात म्हणुन काढल्या. त्या जरा काटेरी असल्यामुळे वरची साल काढुन कापुन खायला घेतल्या. अतिशय कडू चव लागली. झाड उपटुन टाकावे का?? Sad

कंदील आहे दिवा त्याला आठवते चिवा.
घरी ये की एकदा मग दाखवते कंदील तुला.

ही घ्या घरची कार्ली. काचर्‍या केल्या होत्या. फार डार्क हिरवी नाहीत. का बरं?
karlee.jpg

शूम्पी वॉव या कार्ल्याच्या बिया कुठे मिळाल्या? आम्ही नेहमी याच कारल्याची भाजी करतो. हिरव्या कारल्यापेक्षा ही जास्त रसरशीत आणि कमी कडवट असतात, याचे लोणच खूप मस्त होते. हिरवी कारली बोर असतात. इथे इंग्रोत फक्त हिरवी कारलीच दिसतात मला.

ह्या बीया मला धागाकर्तीने पाठवल्या होत्या Happy धन्यवाद सीमा!

मी तर ह्या रंगाची कार्ली आधी पाहिलिईच नव्हती त्यामुळे त्या ग्रेप टोमॅटो सारखी अजून राहुदेत वेलीवर मग गडद हिरवी झाली की काढू असं वातत होतं एक्दा पण शेवटी काढलीच Happy
पण अशी फिकट रंगाची कार्ली असतात हे आत्ताच कळलं. भाजी मस्तच लागली. परतून काचर्‍या केल्याने चोरटी झाली , पोट भरलं नाही Wink

याच्या काचर्‍या नुसत्याच खाऊन संपतात आमच्याकडे. माझे उलटे आहे, लहानपणापासून मी हीच कारली बघितली आहेत. हिरवी कारली खूप नंतर बघितली.
सीमा पुढच्या वर्षी ह्या बिया मला हव्यात. नंबर लावून ठेवतेय.

आदिती, काकडीला रोज भरपूर पाणी मिळते ना?

शूम्पी, कारली मस्त आहेत.
आज मी पण कारल्याच्या काचर्‍या आणल्या आहेत Happy

माझ्याकडची कारली वेगळी दिसत आहेत, ही अशी

"

Pages