भटक्यांचा सह्य मेळावा...

Submitted by सेनापती... on 28 June, 2013 - 05:23
ठिकाण/पत्ता: 
केळद, मढे घाट.

सह्य मेळावा संपन्न झालेला आहे.
*******************************************

नमस्कार मंडळी,

मुंबई, नाशिक आणि पुणेकर भटक्यांचा सह्य मेळावा शनिवार १३-जुलै-२०१३ रोजी मढे घाटात आयोजीत करण्यात आलेला आहे. सगळ्या भटक्यांनी शनिवारी रात्री नसरापूर - वेल्हे मार्गे केळदला जमायचे आहे. रात्रीचा मुक्काम केळदच्या शाळेत करायचा आहे.

दुसर्‍या दिवशी रविवारी १४-जुलै-२०१३ला केळद - मढे घाट - कर्णवाडी मार्गे शिवथर घळ गाठायची. दुपारचे जेवण करुन मुंबईकर महाड मार्गे परतणार आहेत. तर नाशिक आणि पुणेकर वरंधा मार्गे परतणार आहेत.

भटकंती कट्ट्यावरील १३ मावळ्यांनी या ट्रेकसाठी नावनोंदणी केलेली आहे. या सह्य मेळाव्याच्या निमित्ताने मायबोली वरिल सर्व भटक्यांचा एकत्रीत ट्रेक करण्याचा मानस आहे. तरी ज्या भटक्यांना या ट्रेकला येण्याची इच्छा आहे त्यांनी इथे प्रतिसाद मधे तसे नमूद करावे. जेणे करुन आयोजक तुम्हाला संपर्क करुन सविस्तर माहिती देऊ शकतील.

धन्यवाद...

तारीख/वेळ: 
शुक्रवार, July 12, 2013 - 15:01 to रविवार, July 14, 2013 - 14:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दर्शनचं "तुम्ही माझं लाईफ डिस्कस करू नका" "तुम्ही आधी एक काय ते ठरवा आणि नंतर मला सांगा" आणि मढे उतरताना आम्ही चुकल्यावर आशु फोटो काढत असताना "मी रात्री झोपलेलो ते तुम्हाला कळत नाही का…. तुमच्या हसण्याने माझे कान फाटले होते !!!" हे डायलॉग जब्ब्बरदस्तच !!!!! >> त्या छोटया रावणचा मी कधीच पंखा झालोय !

गोप्या गावातल्या त्या आजींनी केळदला जायला "GPS" ला लाजवील असा तो रुट सांगीतल्यावर आमचे अवसान गळाले नसते तर नवलच पण मायबोलीकर अस्सल भटके हार जातील काय? >> +१

हेपण तुम्हाला जमत नसेल तर (अतीशय दयाबुद्धीचे भाव चेहर्‍यावर आणून) हिथच र्‍हावा. >> Lol

नदीच्या पलीकडे पुणेकर मायबोलीकर आणी अलिकडे मुंबईकर मायबोलीकर असला असला भन्नाट सह्यमेळावा व्हायची शक्यता निर्माण झाल्यावर >> मला हेच नको होते अन्यथा रसभंग झाला असता.. ट्रेक काय तिथपर्यंत बराच झाला होता.. फक्त एकत्र येणं बाकी होतं.. पण नदी ओलांडलीच..

आणि हो योचा अप्सरा डान्स राहिला राव… >> त्या डान्सला जो अवतार होता त्याच अवतारात मी भरपावसात भर रस्त्यात (अर्थात सुनसान) थोडेफार अगदी मनसोक्त नाचून घेतले हं.. ते पण पावसाच्या तालावर.. नैसर्गिक संगीत..!

विन्या... तुला आंबा कळतो का? Rofl
पण आंबा ( झाड) तीथे नव्हते म्हणजे आंबा हा काहीतरी वेगळाच प्रकार असावा जो आपल्याला नाही कळला. Wink

या मेळाव्यातले एक एक डायलॉग घेतले तरी धमाल धागा होईल....>>>>अगदी अगदी Happy

बोंबील जाळुन झाले असेल तर लाकडं भाजा Rofl

बोंबील जाळुन झाले असेल तर लाकडं भाजा >> Lol
तुमचे ते काष्ठशिल्प झाले का. >> Lol

आंबा Lol नि त्या एका छोटया गावात घराच्या भिंतीवरील फिरंगी युवत्यांचा तो पोस्टर नि सर्वांच्या उंचावलेल्या भुवया.. !! विन्याला वाटले गावात सर्कस आलीय Lol तर सेना आपले त्या पोस्टरवर लिहीलेला 'पार्टीचा' मजकूर उत्सुकतेने वाचतोय.. मग कळले जल्ला त्या घराच्या खिडकीला बंद करुन ठेवायला पोस्टर लावलाय !! Lol

सेन्या, इंद्रा, यो, चँप्या.. एक एक का बदला लिया जायेगा. लेको इतकी धमाल केलीत तर शब्द न शब्दाचा वृत्तांत हवा Wink ( जो एडीटेड असेल तो इमेल केला तरी चालेल ) आणि फोटो तर घरी नेताच कसे रे... वाटेतच कुठूनतरी इथे डकवायचे Proud

घास - फूस खाणाऱ्या माणसाला बोंबील भाजायला लावावे का ?

पुढच्या स्नेह मेळाव्यात रात्री घोरण्याच्या स्पर्धा पण घेतल्या जातील असे स्पष्ट लिहा कांही लोक आत्ता पासूनच तयारी लागतील... आणि आपल्याला सोबतच जागरण - गोंधळ घालायला येईल ...

छोटा चाम्प उपान्ड्या घाट चढताना म्हणतो कसा ...
तू माझ्या पाठीमागे उभार आणि जरा खाली वाक म्हणजे सर्वांना वाटेल मी
तुला पाठीवर घेऊन चालतोय ....

सगळ्यात खतरनाक किस्सा म्हणजे
"तो बघ.. लावणी महोत्सव ...." ..... आयला कुठे ? कुठे ?

कोकण्या ने बनवलेल काष्टशिल्प हे संयोजकांना त्यांच्या परिश्रमाकरता अवॉर्ड म्हणून देण्यात याव ....

लैच धम्माल केलेली दिसतेय ... कोणि तरी सविस्त वृतांत टाका राव लवकर .. आणि खुप सारे फोटो पण येऊ द्यात Happy

Pages