तुझं माझं जमेना

Submitted by sonalisl on 29 May, 2013 - 09:07

महेश मांजरेकरांची झी मराठी वर सुरु झालेली मालिका ...'तुझं माझं जमेना'. त्यांच्याच 'मातीच्या चुली' या सिनेमा सारखी आहे. संपुर्ण कथा माहित आहे तरी ही मालिक बघायला (तूतिमी बघून कंटाळलेल्या मला) छान वाटते.....

Tuza-Maza-Jamena-New-Serial-Zee-Marathi-Serial.jpg

ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रीमंत असण्याचा आणि एकत्र रहाण्याचा / न रहाण्याचा काय संबंध?
पण मध्ये एक सासु-सासर्‍यांच्या खोलीतून कपाट हलवायचा सीन पाहिला. तेंव्हा वाटलं की एवढे श्रीमंत आहेत, तर ते कपाट तिथेच राहु द्यायचं होतं आणि ह्यांच्या खोलीत नविन घ्यायचं होतं. पण मग रिमा लागूचा मूड घालवायला अजून एक कारण कसं मिळालं असतं? Happy

कुलकर्ण्यांची सून बिथरलीये. Biggrin
असा बदल अतिच वाटतोय. असं ओव्हरनाईट कोणी बदलतं का? आणि तिची सासू अतिच चांगली दाखवलीये. जर जुनाट विचारांची सासू असेल तर असं उप्पीट, घरकाम वगैरे करणार नाही.

आज रीमा लागूने कहर केला, उगाच काही कारण नसताना खुसपट काढत होती जेवणात.
सुनेने एवढा स्वयंपाक केला कोणाला धड जेवू दिलं नाही :रागः

मला पण रिमा लागूचा रागच आला. कित्ती ते भावनिक संवाद ...अन रडारड...वैभवने पण लगेच शाहरुख मोड मध्ये जाऊन आईला गोड-गोड बोलुन डोळ्यात पाणी आणून समजावले पाहिजे होते ....कि आपल्या बायकोने काहिही येत नसताना एवढा स्वयंपाक केला...ती पण काही वाईट नाही...तिची पण नाळ तिच्या आईशी कशी जोडली गेली आहे ..म्हणुन ती तिच्या आईला भेटायला जाते...आणि ती सुद्धा माझ्यासारखीच तिच्या आई-वडिलांची एकुलती एक आहे...तिने तिच्या आईसाठी कधी स्वयंपाक केला नसेल पण तुझ्यासाठी केला कि नाही? ...तु भेळ खाऊन आलीस पण मी तर उपाशीच आहे अजुन... चल मला भरव बरं.....

यस. मूळ सीन वंदनाताईंनी फार सुरेख केला आहे सिनेमात. पर अपने नसीबमें इन्होंइच है सासुमा
क्यायकी. ज्या पद्धतीने ते कॅरेक्टर मुलाचे भावनिक शोषण करते ते भयानक वाटले. २५ - २७ वर्शाच्या मुलाला जो म्यानेजर आहे हपिसात त्याला तुझी लाळ गळत होते खांद्यावर वगैरे सांगाय्ला गेले ना तर तो फ्रीज आउट करेल. घरातल्या मुलीबाळी आणि मुले देखील पहिल्यांदा काही करतात तेव्हा आपण त्यांना उत्तेजन देतो कि नाही. पण सासू/ सून भूमिकेतून बघणार्‍या प्रत्येकीला नक्की कॅथार्सिस चा अनुभव आला असणार कालचा सीन बघून.

२५ - २७ वर्शाच्या मुलाला जो म्यानेजर आहे हपिसात त्याला तुझी लाळ गळत होते खांद्यावर वगैरे सांगाय्ला गेले ना तर तो फ्रीज आउट >> Rofl

कालचा तो प्रसंग, त्यातले संवाद, रीमाताईंना एकदाची मिळालेली अभिनयदर्शनाची संधी, सगळे फारच सुंदर होते. लाळ गळण्यानंतर आणखीही काही डिटेल्स येतील असे वाटले होते, पण निराशा झाली.
हेच संवाद घनाच्या आईने म्हटले असते, तर घनाने अमेरिकेला जाणं काय, घराबाहेर पाय टाकणेही सोडलं असतं. काल अनेक प्रेक्षकांची या मालिकेशी नाळ पक्की जोडली गेली असेल.

मुलांच्या बचतीतून (संपूर्ण कुटुंबासाठी) इन्व्हेस्टमेंट्स करणारे पालक पाहून मला तर अगदी भरून आले. ग्लिसरीन न मिळाल्याने रिमाचा मुलगा आणि नवरा यांच्यासारखा अश्रूपात करता आला नाही.
मनवाच्या चेहर्‍यावरून तिच्या मनात काय आहे ते अज्जिबात कळत नाही. पक्की आतल्या गाठीची आहे.

अमा मारणार मला, पण वंदना गुप्तेंपेक्षा रिमा लागू अगदीच आवडतात़़.
वं गु किती वसवस्स आहे..

चिवा - अगदी सहमत! कालचा प्रसंग वास्तवादी वाटला. आपला मुलगा आता आपल्या एकट्याचा राहिला नाही अन आता आपली सत्ता/महत्व (असुरक्षिततेची भावना)राहिली नाही हे ह्या प्रसंगातून जाणवलं ..

कालचा सीन, संवादलेखन, रिमाताईंचा अभिनय छानच होता पण त्या प्रसंगाची जागा चुकली असे मला तरी वाटले. म्हणजे इतकं मोठं लेक्चर ऐकवण्यासारखं काय झालंय असे काहीतरी. वर त्या ज्या प्रकारे जेवणात चुका काढत होत्या तेपण बळंच होतं. एकतर सुनेने पहिल्यांदा खपुन स्वयंपाक केलाय तर डिनर सेट कशाला काढला, सुप आवडत नाही, भाजी अशी अन तशी या कमेंट्स, स्वतःपण जेवायचं नाही आणी बाकीच्यांचाही हिरेमोड. वर लेकाला इनोशनल डोस. ती सून हडबडुन जाणार नाही का की असं काय चुकलं तिचं म्हणुन. Uhoh

अजून एक. चपाती-पोळी, भाजीत गुळ घालणे,काकु-काकी अशा गोष्टीत कमेंट करणारी व्यक्ती दुसर्‍या दिवशी त्या शेजारच्या मुलाला स्वतःच्या निर्णयाबद्दल सांगताना पटले नाही. सुनेला बदलुन टाकायचा अट्टाहास का मग?

अरे चिवा नै नै फिकर नॉट. आप लिखो. माझं सगळं फू बै फू मोड मध्ये असतं.

मातीच्या चुली मधला सासुरवास शरिरात आत खोल चरत जाणार्‍या कॅन्सरस जखमे सारखा आहे. वरून माणूस छान दिसला तरी. तर इथे तो जरा खोक पडल्यासारखा झाला आहे एवढेच. रीमाताईंच्या वाक्यापैकी तुला आता दुसरे माणूस भेटले आहे ह्याला मी पण रडून घेतले. मुलांच्यातली ओढ एकदम डिलीट कशी करायची अश्या संभ्रमातील स्त्री आहे ही.

त्या वडिलांचे हा फॅमिली पॅक वितळतोय हे वाक्य ही असेच टडोपा. यू कॅन लिटरली फील द फॅमिली मेल्टिंग अवे. सून जास्तितजास्त वेळ चांगले वागायचा अन्न वाढायचा प्रयत्न करते ते ही फार केविलवाणे वाट्ले.

हो, ड्रामा जरा जास्तच झाला काल. किमान मनवाला 'मनापासून केलेस म्हणून आनंद झाला' इतके तरी म्हणायला हवे होते. परत दुसर्‍या दिवशी मस्त. तुम्ही विसरत असाल. सूनेने का विसरावे?

अमा वंदना गुप्तेंना सोडत नाहीत Biggrin

सिरियल नेमाने बघत नाही.( मातीच्या चुली बरेचदा पाहिला आहे. :)) पण जेवढी पाहिली आहे त्यावरून,
बरेचसे डायलॉग्ज हे 'मातीच्या चुली'मधून अगदी जसेच्या तसे उचलले आहेत.
उदा. कालच्या एपि.मधला 'श्रावण'बाळ डायलॉग.
प्रोमोजमध्ये दाखवत असलेले 'कंगवा कुठे आहे...'वाले डायलॉग.
डिनरसेटवाले डायलॉग्ज.

आता सकाळी परत 'मा.चु.' लागला होता. पाहताना अगदी प्रकर्षाने जाणवले.

प्राची, अगदी अगदी..

तो " फॅमिली पॅक वितळतोय" वाला डायलॉग पण जसाच्या तसा उचलला आहे.

मला एक जेन्युईन डाऊट आहे -

कालच्या एपिसोडमधले अनेक डायलोग्ज, प्रसंग अगदी सेम टू सेम 'मातीच्या चुली'मधले होते. असं चालतं? आय मीन ढापूबाजीबद्दल कायदेशीर कारवाई वगैरे?

मातीच्या चुलीमध्ये कितीतरी पटीने परिणामकारक प्रसंग जमले होते. काल अगदी कीव वाटली. आईस्क्रीम, सूपात मीठ नसणे, भाजीत गूळ नसणे, 'माझा पगार, तुझा पगार'.. एवढं सेम टू सेम?? 'फॅमिली पॅक वितळतोय' हा डायलॉगही????'

त्या पिक्चरचीच सिरिअल करणार नाहीत ना?

मी कुठलीच सिरीयल सीरीयली आणि सिरीयसली पाहत नाही. पण मातीच्या चुली आता पाठ झाला असल्याने इथली चर्चा वाचते. वंदना गुप्तेला तोड नाहीच.
पण काल दाखवलेला प्रसंग सहज घडू शकतो. आणि काही जणीं/णांच्या नाही येत लक्षात हे की पहिल्यांदाच बनवलंय अन आपण त्याला निदान 'बरे' म्हणून वेळ मारुन नेली पाहिजे. मग कधीतरी हा मुद्दा स्पष्ट झाला की प्रत्येक वेळेस आठवण ठेवून केल्या जाणार्‍या तोंडदेखल्या कौतुकापेक्षा आधीचंच बरं म्हणायची वेळ येते. काही गोष्टी 'फर्स्ट टाईम राईट' व्हाव्याच लागतात.
आणि अमा, यू आर व्हेरी स्वीट. Happy

आता मांजरेकर काकस्पर्श, कोकणस्थ या सर्वांवर एक-एक मालिका काढतील ..>>>> चांगल्या दर्जाच्या मालिका बघायला मिळणार असतील तर काय हरकत आहे? Happy

रिमाच्या मनात मनवाविषयी राग होताच, तोच तिने बाहेर काढला.. स्वयंपाकाचं निमित्त झालं इतकंच.. चुकीच्यावेळी, चुकीच्या कारणासाठी आणि चुकीच्या पद्धतीने काढलेल्या तिच्या रागाचा परिणाम वैभववर होईल, असं मात्र वाटलं नव्हतं. तो आईवर चिडला असता, तर जास्त रिअ‍ॅलिस्टिक वाटलं असतं.

Achchha! Hi serial Manjrekaranchi ahe he mahit navhata... Happy

Pan tari? Wink

Pages