मुलासाठी नाव

Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15

नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्‍याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.

- रचनाशिल्प

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सना आणि साना दोन्ही नावाचे अर्थ माहित नाहीत. कर्नाटकामधे सहना हे नाव खूप फेमस आहे. त्याच अर्थ मला मुळीच आवडत नसल्याने ते कन्सिडर केलं नव्हतं. मला समुद्र, नाविक, खलाशीयांच्याशी संबंधितच नाव हवं होतं.

रिया अगं, धनुष्याला ताणून धरणारी दोरी... अशा अर्थाला किती प्रगल्भं बनवता येईल? मलातरी कायतरीच वाटला. आणि ते नावही मी विसरले म्हणा... पण म्हणायलाही सोप्पं नव्हतं असं आठवतय.

कालच इथे भेटलेल्या दोन पोरांना नांव विचारली तर एकाचे मोहाक्ष आणी दुसर्‍याचं हृत्विक होतं..
मला नांव आवडली.. पण त्यांच्या चायनीज मित्रां ना ही नांव उच्चारताना प्रचंड ततपप होत होतं

श्रद्धा, सहना असं पण नाव ठेवतात. सहाना/सहना स्पेलिंगमधे सेमच दिसतं. सहाना नाव उच्चारताना लहान मुली हमखास "शाना" सांगतात. Happy
सहाना म्हणजे चंदन असं सांगितलंय मला...

रिया, दादच्या पाऊलखुणांमधे जा, आणि नावात काय आहे? असा एक लेख आहे. तो वाच... तो लेख ऑफिसमधे बसून वाचू नये या कॅटेगरीतला विनोदी लेख आहे हा डिस्क्लेमर आधीच देऊन ठेवते Wink

सहना नाही ऐकलं कधी. सहाना ऐकलं आहे तेही वर लिहिलेल्या अर्थाने.
इथे आहे त्या रागाची माहिती. http://en.m.wikipedia.org/wiki/Sahana_(raga)
माझा एकदा 'सहाना' आणि 'शहाना' या दोन नावांत गोंधळ झाला होता तेव्हा मैत्रिणीने माहिती पुरवली होती.

मुलीने जिम्नॅस्टीक्स किंवा सिंक्रोनाईज्ड स्विमिंग किंवा बॅले डान्स <<<<<
असे असते तर 'काळे' घराण्यात जन्म कोणी घ्यायचा..?
'शंकर महादेवन' ने देवळातच रहायचे...
बिल नावाच्या माणसाच्या नावाने सगळ्यांनी बिलं फाडायची....

शेवटी नांव हे फक्त नावापुरतेच असते ना.. Happy

(आणि माझे नाव विनय आहे.... आहे का कुठे विनय या पोस्टीत Proud )

मी एक नवीन नाव ठरवलय.
.
"पुष्यमित्र "

(अवांतर : घरात नाही तुरी , अन भट भटणीला मारी :फिदी:)

मला लहान मुलासाठी टोपणनाव हवयं प्लिज सुचवा.
काकीच्या मुलाचे नाव प्रसन्न ठेवलयं पण सगळे त्याला परसु बोलतात. म्हणुन त्याला टोपननाव ठेवायच आहे. सहज बोलता येइल असं

टोपणनाव ईतर कुणी सुचवण्यापेक्षा स्वतःला आवडेल ते ठेवावे. शक्यतो नावाचा अपभ्रंश करू नये.

टोपण नांव ठेवताना खूप विचार व्हावा.. आयुष्यभर चिकटते. लहानपणी बेबी, बाळू, बबलू लाडात वाटलं तरी 'बेबी-आजी', 'बाळू-आजोबा' , 'बबलू-काका' वगैरे विचित्र वाटतं.... त्यापेक्षा टोपणनांव ठेवूच नये..

Nitish

इब्लिस,

>> अनिमेष म्हणजे काय?

माझ्या कयासाप्रमाणे ते नाव अनिमिष असे असावे. चूभूदेघे. पापण्या लवतात त्यास निमिष म्हणतात. ज्याच्या पापण्या लवत नाहीत त्यास अनिमिष म्हणतात. उच्च कोटीचे योगी अनिमिष असतात.

आ.न.,
-गा.पै.

गा पै, धन्यवाद.
अनिमेष (p. 027) [ animēṣa ] a S That closes not or twinkles not the eyes;--used of a god, a fish &c.
हा अर्थ मोल्सवर्थ शब्दकोषात आहे. (कर्टसी स्वाती आंबोळे)

निमिष म्हणजे पापणी लवण्यास लागणारा वेळ असाही अर्थ आहे.

ही मोल्सवर्थची लिंक : http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%85%E0%A4%...

आधी मलाही अनिमेष चुकले असे वाटले होते, बाईंनी कालच तो शब्दही आहे व त्याचा अर्थ सांगितला.

ही अधिक माहिती.

निमिष (p. 468) [ nimiṣa ] m (S) निमेष m (S) A twinkling of the eye. निमेष as contrad. from उन्मेष is the movement downwards. 2 A twinkling considered as a measure of time.

निमिषोन्मेष or निमेषोन्मेष (p. 468) [ nimiṣōnmēṣa or nimēṣōnmēṣa ] or निमिषोन्मिष m S Twinkling of the eye. 2 Used as ad In a twinkling.

गम्मत म्हणजे मोल्सवर्थ मध्ये अनिमिष ह शब्द सर्च करुन सपडला नाही.

इब्लिस,

स्पष्टीकरणाबद्दल आभार! Happy तुमच्या वक्तव्यावरून मला वाटतं की निमिष हा कालमापनाचं एकक आहे, तर निमेष म्हणजे पापण्यांची एक उघडझाप. म्हणून अनिमेष म्हणजे पापण्या न लवणारा असा अर्थ होतो. साहजिकच अनिमिष हा शब्द निरर्थक ठरतो.

आ.न.,
-गा.पै.

Pages