Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15
नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.
- रचनाशिल्प
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाल्मिकी ने रामायण लिहिले
वाल्मिकी ने रामायण लिहिले त्यात नावे सोपी होती, अज, दशरथ, राम भरत अशी.
व्यासांनी विचार केला नाव कसे हटके पाहिजे म्हणून महाभारतात खालील नावे सापडतात -
धृष्टद्युम्न, बृहद्रथ, धृतराष्ट्र, धृष्टकेतु, गृत्स्यमद, श्रीकृष्ण, अश्वत्थामा, इ.
रोनित आणि रिहा
रोनित आणि रिहा
हटके नावे हवी असतील तर
हटके नावे हवी असतील तर
रेवत आणि रोमती / रोमिता
रेवंत - मल्लिका साराभाईंच्या
रेवंत - मल्लिका साराभाईंच्या मुलाचं नाव.
रियान , रेवान , रेयांश ,
रियान , रेवान , रेयांश , रिहान , रिवान
रिहा , रेहा , रेवा , रिधिमा
सल्ला मागतात , पण नाव काय
सल्ला मागतात , पण नाव काय ठेवले कोणी कळवत नाही नंतर
तेच तर.... काय नाव ठेवलंय
तेच तर.... काय नाव ठेवलंय तेही सांगत जा इथे. लोकांची कल्पकता सार्थकी लागली की नाही ते कळेल. आणि अजून छान नावंही कळतील. वाटल्यास virtual पेढेही वाटा.
मस्त बारशाला गेल्यासारखं वाटेल. ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
स्वस्ति, मी चिन्मयी + ३
स्वस्ति, मी चिन्मयी + ३
सुधा(अमृत) + अब्धी(सागर)
प्रकाटाआ
आप म्हणजे पाणी ज्याचा धी म्हणजे साठा. अब्धी. माझ्या डोक्यात दी आलं होतं धी ऐवजी.
नावराशीवरून रेवा आणि रौनक.
नावराशीवरून रेवा आणि रौनक. सगळ्यांचे आभार.
रेवा रौनक छान नावं, अभिनंदन
रेवा रौनक छान नावं, अभिनंदन.
<<रियान , रेवान , रेयांश ,
<<रियान , रेवान , रेयांश , रिहान , रिवान, रिहा , रेहा , रेवा , रिधिमा>>
यातल्या एकाहि नावाचा अर्थ कुणाला माहित आहे का? की आपली एक दोन अक्षरे एकत्र करून काहीतरी नाव बनवले.
त्यापेक्षा रफू, रंधा हे निदान अर्थ माहित असलेले तरी शब्द आहेत.
रेवाचा माहितेय हो, माझ्या
रेवाचा माहितेय हो, माझ्या पहिल्याच पोस्टमध्ये लिहिलंय बघा मी. नर्मदा नदीचं एक नाव रेवा आहे.
नावाचा अर्थ लावण्याचा
नावाचा अर्थ लावण्याचा अट्टाहास सोडून द्या.
अर्थ एक आणि त्या नावाचे लोक करतात भलतेच.
ग वरुन मुलाचे नाव सुचवायला
ग वरुन मुलाचे नाव सुचवायला मदत हवी आहे.
ग वरून मुलाचे वेगळे असे नाव
ग वरून मुलाचे वेगळे असे नाव सुचवायला मदत हवी आहे
ग्रिश्मा
.
गंधार
गंधार
गगन, गश्मीर, गमक, गुलाब
गगन, गश्मीर, गमक, गुलाब
गजोधर
गजोधर
धन्यवाद
धन्यवाद
अजुन काही नविन मुलांची नाव ग
अजुन काही नविन मुलांची नाव ग वरून पाठवा.
गौतम, गोपी, गौरेश, गिरीन,
गौतम, गोपी, गौरेश, गिरीन, गन्धर्व, गरीन, गरीम,
गीत, गुपीत, गोगा
गौरव ,गौरीश,गोविंद
गौरव ,गौरीश,गोविंद,गिरीश ,गजेन्द्र,गिरीधर
गुपित?
गुपित?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपल्या मुलाचे गुपित नाव कोण ठेवेल?
गुफ़्तगू नाव कसं वाटतंय?
गुफ़्तगू नाव कसं वाटतंय?
नाव काहीपण ठेवा, पण शेवटी
नाव काहीपण ठेवा, पण शेवटी गाढवा आणि गधड्या या नावांनी हाक मारली जाईलच.![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
धन्यवाद
धन्यवाद
या धाग्यावरून आठवले, काही
या धाग्यावरून आठवले, काही दिवसांपूर्वी एक नाव वाचले Akant. म्हटले आकांत कसले नाव? त्याला विचारले तो म्हणाला "एकांत". हे नाव सुद्धा प्रथमच ऐकले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपल्या मुलाचे गुपित नाव कोण
आपल्या मुलाचे गुपित नाव कोण ठेवेल? >>
आजकाल बरेच लोक नावाच्या अर्थाचा विचार करत नाहीत. काही तरी नवीन हवे असते. गुप्त सुचवणार होत, त्यापेक्षा गुपित बरे वाटले ; )
अजून एक : गौरंग
याच्याही अर्थात न गेलेले बरे, गाई सारखा रंग असणारा वगैरे.
Pages