Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15
नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.
- रचनाशिल्प
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अर्जुन , आरव , अश्मक , अर्णव
अर्जुन , आरव , अश्मक , अर्णव , अगस्त्य,
कसली वेदकालांतली नावांची
कसली वेदकालांतली नावांची फ्याशन आली आहे सध्या. जुनी राम, शाम, माधव वगैरे पण गोड वाटतील आता ऐकायला...
नमस्कार मला माझ्या भावाच्या
नमस्कार
मला माझ्या भावाच्या मुलीसाठी नाव हवं आहे. राशी अक्षर " ह " आहे.थोडेसे हटके/unique नाव सांगा...
कनन | माझ्या लेकीलाही "ह"
कनन |
माझ्या लेकीलाही "ह" अक्षरच आले होते. हर्षा, हर्षनंदा, हर्षदा, होलीका इत्यादी नावांचा आम्ही विचार केला होता. पण यातले कोणातेच न ठेवता आवडीचे ठेवले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हास्य कसे वाटले?
हास्य कसे वाटले?
हास्य छान आहे पण ते मुलाला
हास्य छान आहे पण ते मुलाला शोभेल. अस मला वाट्त........
हरिणी, हनी, हसरी, हेमांगी,
हरिणी, हनी, हसरी, हेमांगी, हीमा, हिमगौरी.
१.हेतल २.हिरण्या असेही एक नाव
१.हेतल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
२.हिरण्या असेही एक नाव ऐकले होते पण त्याचा उच्चार हिरण्ण्या असा झाला तर ठिक!
नाहीतर गिरण्या सारखं हिरण्या वाटतं
नाहीतर गिरण्या सारखं हिरण्या
नाहीतर गिरण्या सारखं हिरण्या वाटतं ........ स्मित: स्मित:
हसीना, हंसिका, हर्षिता,
हसीना, हंसिका, हर्षिता, हंसिनि,हरिता,हर्पिता,हर्षिका
होलिका मुलीचं नाव? ती राक्षसी
होलिका मुलीचं नाव? ती राक्षसी होती. हिरण्यकश्यपूची बहीण. अर्थात कुणी काय नाव ठेवावं ही ज्याची त्याची आवड आहे पण नावाचा हा पर्याय फारच वेगळा वाटला.
ह वरून मुलाचं नाव ? हहपुवा,
ह वरून मुलाचं नाव ?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
हहपुवा, हहगलो हे नाही सुचवत, हावरा पण नकोच. हॉर्न पण नको. हंबीरराव असं नाव होतं. पण आता नाही चालायचं. हासरा जरा बरं आहे. पण अडचणीचं आहे.
हर्षवर्धन, हर्ष कसं वाटतं ?
हिमानी, हिरण्मयी, हंसा,
हिमानी, हिरण्मयी, हंसा, हर्षदा, हर्षल, हर्षला, हर्षिता, हिमाली, हरिप्रिया.
ह वरून मुलाचं नाव ?
ह वरून मुलाचं नाव ? नाही--------------------- मुलीच हवय..........
मुलाचं नाव हर्ष, हर्षल,
मुलाचं नाव
हर्ष, हर्षल, हर्षद.
हिरेन, हीरेंद्र , हिमेंद्र ही नावं पण ऐकलीत (हिरेंन भिमानी, हीरेंद्र पाटील आणि हिमेंद्र पटेल बहुतेक)
श्रद्धा, आम्हाला सांगीतले
श्रद्धा, आम्हाला सांगीतले होते की होळीची देवी पण होलीका असते.
आम्हाला सांगीतले होते की
आम्हाला सांगीतले होते की होळीची देवी पण होलीका असते.>> हो. त्या होलिकादेवीला जाळायचा विधी म्हणजेच होळी पेटवणे. हिरण्यकश्यपूची बहिण होलिका. तिला अग्नीकडून जळून मृत्यू येणार नाही असा वर मिळालेला असतो. म्हणून प्रह्लादला (हिरण्यकश्यपूचा मुलगा) घेऊन ती आगीमधे बसते. प्रल्हद हरिनाम जपत असल्याने त्याला काही इजा होत नाही, मात्र होलिका जळून जाते.
होलिका हे नाव मुलीचं ठेवलेलं मी आजवर ऐकलं नाही.
होलिका? बापरे उद्या शूर्पणखा
होलिका? बापरे उद्या शूर्पणखा ठेवतिल....
नीट अर्थं विचारून घ्या. हे नाव प्रकर्णं डेंजरस असतय. माझ्या(मुलाच्या) वेळेला (मुलगा होणार माहीत नव्हतं) कुणीतरी सुचवलेलं नाव... ते तर आठवतच नाहीये... अर्थं नीट आअठवतोय... कायतरीच होता.."प्रत्यंचा"!
आता ह्या अर्थाचं नाव कितीही मस्तं?, वेगळं/हटके, युनीsssक अस्लं तरी कोण ठेवेल?
तेव्हा अर्थ आधी महत्वाचा...
उच्चारही मह्त्वाचाच... माझं नाव... 'शकालाका' नाही का?.. नक्की नाही ना? असंही विचारतात लोक. इथे ऑस्ट्रेलियाच्या तोंड वेंगाडून बोलायच्या पद्धतीत (हाsssय माssय्ट)... शलाका ला अत्यंत वेगाडणं होईल... शक्यच नाही म्हणूनच बरं ऐकू येतं...
बाकी एकीने.. श्रीलंका म्हटलं होतं... मी सुधारल्यावर... इंडियन ना तू? मsssग? चालेल...
असं म्हणाली होती... फोनवर होती म्हणून वाचली.
असो...
अर्थं... अर्थं!
दाद, ते नाव वाचल्यावर मला
दाद, ते नाव वाचल्यावर मला तुझाच 'नावात काये?' लेख आठवला होता. कीचक, कंस.. व्हिलन्सची नावं.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
गावाकडचा किस्सा आहे.
गावाकडचा किस्सा आहे. कुणालातरी दुसराही मुलगा झाला. पहिल्याचं नाव ठेवलं होतं अविनाश. याचं नाव काय ठेवायचा याचा खल चालला होता. एकाने सजेशन दिलं - सत्यानाश
दाद, अगदी बरोबर. नाव हटके
दाद, अगदी बरोबर. नाव हटके युनिक वगैरे असण्यापेक्षा अर्थपूर्ण आणि सोप्पं असणं जास्त गरजेचं. एका भाचीचं नाव शरण्या ठेवलंय, तिला पुण्याच्या प्रीस्कूलमधे सर्रास शरण्या (जस्ट लाईक बरण्या), शारन्या, श्रन्या अशी हाक मारली जाते म्हणून वैतागून तिच्या आईने तिचं नावच बदललं.
मला मुलगी झाल्यावर एका बंगाली मैत्रीणीने मला फोन करून मुलीचं नाव सना ठेवा असा सल्ला दिला. कारण काय, तर सतिश - नंदिनी मधली SANA
नवर्याला सांगितलं तर म्हणे तरी बरंय, नंदिनी - सतिश अशी अक्षरं घेतली नाहीत.
हिरकणी. आमच्या कडे आहे एक.
हिरकणी. आमच्या कडे आहे एक.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रत्यंचा म्हणजे धनुष्याची
प्रत्यंचा म्हणजे धनुष्याची दोरी ना?
मग चांगलं आहे की नाव
< बाकी एकीने.. श्रीलंका
< बाकी एकीने.. श्रीलंका म्हटलं होतं... मी सुधारल्यावर... इंडियन ना तू? मsssग? चालेल...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
असं म्हणाली होती... फोनवर होती म्हणून वाचली.>....
होलिका हे नाव मुलीचं ठेवलेलं
होलिका हे नाव मुलीचं ठेवलेलं मी आजवर ऐकलं नाही>>> आम्ही पण नाहीच ठेवले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रिया, प्रत्यंचाचे स्पेलिंग
रिया, प्रत्यंचाचे स्पेलिंग लिही आणि वाचायला दे दुसर्या कुणालातरी...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नंदिनी, सना आणि साना हे
नंदिनी, सना आणि साना हे दोन्ही नावे ऐकली आहेत. अर्थ काय?
प्रत्यंचा म्हणजे धनुष्याची
प्रत्यंचा म्हणजे धनुष्याची दोरी ना?
मग चांगलं आहे की नाव
>>
रिया., मग प्रत्यंचा नाव असणार्या मुलीने जिम्नॅस्टीक्स किंवा सिंक्रोनाईज्ड स्विमिंग किंवा बॅले डान्स हे प्रोफेशन निवडावं का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला 'सत्व' नाव खूप आवडतं, पण
मला 'सत्व' नाव खूप आवडतं, पण त्याचं सॅटवा होईल ना!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
ते सटवा ऐकु येइल
सटवा .....
सटवा .....![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Pages