निसर्गाच्या गप्पा (भाग - १२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 January, 2013 - 02:12

निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मात्र आमची मांजरी जागेपणी बोलते, झोपेत बोलल्याचे मी तरी अजून पाहिले नाही

घोरल्याचे पाहिलेय का???

ए कोण रे ते शशांकलीला पिळतंय!
असो.......आमचा लुई सुद्धा साधनेने जे जे लिहिलंय ते ते सगळं झोपेत करतो. पळतो, गातो, बोलतो(अर्थातच भुंकतो) , भांडतो इ.इ.!

............ फोटो अपलोड होत नाहीत.........कारण कळत नाही.

जिप्सी अरे ते केळफुल त्याच्या देठामुळे वाटते नाहीतर वरचा भाग तर जणु कमळ कळाच , सुंदर प्रचि Happy
सावरी सुद्धा छानच,
ससा मस्त प्रचि Happy

दा त्या मिरच्यां कम दिवाळीचे तोरणच वाट्तय.
साधनाताई एस पुराण Lol
शोभा१२४ .. +१ Happy

साधनाताई, आमची बिलू आहे लग्नाची..पांढरीशुभ्र,निळ्या डोळ्यांची आहे.डोक्यावर एकच काळा नाम ओढलाय..तुमच्या एस च्या अपेक्षा काय आहेत सांगा.. :p

अरे, मी पण आता ईथे हेच लिहिणार होते. ज्याच्याकडे लग्नाळू मांजरी आहेत त्यांनी लगेच नाव नोंदणी करा ! शशांकजी, ऐकताय ना? पिशी अबोलीने नाव नोंदणी केली आहे. Wink

साधनाताई, आमची बिलू आहे लग्नाची..पांढरीशुभ्र,निळ्या डोळ्यांची आहे.डोक्यावर एकच काळा नाम ओढलाय..तुमच्या एस च्या अपेक्षा काय आहेत सांगा..

एसचे माहित नाही पण आमच्या अपेक्षेत मात्र ही मांजर पुर्णपणे फिट होते. लगेच पत्ता कळवा, व-हाड घेऊन हजर होतो आम्ही २० मार्चनंतर.... एक पांढरीशुभ्र मांजरी एसला सोबतीण म्हणुन आणायची हा हट्ट कधीपासुन घरात सुरू आहे. Happy

जिप्स्या काय मस्त आहे रे फोटो, मी पाहिलेय हे पण मला नाव माहित नाहि.

मी फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री आणलेय, मी रेड मधे शोधले पण ह्या भागात हे फुल नाहीय, पहिल्यात असावे कदाचित.

हे पुस्तक अगदी छान आहे. पण मला एक उणिव जाणवली. फक्त फुलांची माहिती आहे, बाकी सगळि माहिती लिखित आहे. फुलांची लांबीवगैरे सुद्धा दिलीय. पण तरीही ती फुले मला बाहेर ओळखता येतील याची गॅरेंटी वाटत नाही कारण मुळ फुल कुठल्या अवस्थेत दिसते रानात तेच नाहीय. पानां/खोडांच्या फक्त लिल्खित माहितीवरुन ओळख पटण्याइतके ज्ञान माझ्याकडे नाहीय.

कदाचित ही उणिव नसेल, लेखकाने जेवढे दिलेय तेवढेच अपेक्षित असेल. मला जे पाहिजेय ते छापायचे म्हणजे पुस्तकाची किंमत १६०० होईल. Happy

ब-याच दिवसांपासुन एक विचार मनात घोळतोय पण त्याला आवश्यक तितका वेळ आणि सामग्री माझ्याकडे नाहीय. एक वेबसाईट बनवायची आणि त्यात एकेक झाड घेऊन त्याची पुर्ण माहिती, वेगवेगळ्या ऋतुतले फोटो, पाना/फुलांचे अगदी सुरवातीपासुन ते पान/फुल गळेपर्यंतचे फोटो इ.इ. माहिती तिथे गोळा करायची.

ह्याच्यासाठी दुरवरचे आणि जवळचे नीट टिपणारा कॅमेरा आणि त्याच जागी परत परत वेगवेगळ्या ऋतूत भटकंतीसाठी वेळ, हे दोन्ही पाहिजे. सध्या हे दोन्ही नाहीयेत Sad

निदान जिप्स्या, तु तरी हे सुरू कर. सकाळी भटकंतीसाठी गेले होते तेव्हा तुला आज फोन करुन हे सुचवायचे ठरवलेले पण आज कदाचित वेळ मिळणार नाही. आज लॉजिकचा पेपर आहे, दादरपर्यंत भटकंती करायची. सोबत कॅमेरा ठेवेनच.. Happy

जिप्सी, ती लाल फुले (पुष्पगुच्छ) बहुधा Combretum coccineum आहेत का चेक करुन बघणार का ??

शनिवारी भांडूप पम्पिंग स्टेशनला गेलो होतो. हा तिथला फोटो Happy
सध्या ऐरोली खाडीत भरपूर फ्लेमिंगो दिसत आहेत. (खाडीपूलावर उभे राहिल्यास मस्त गुलाबी पट्टा दिसतो Happy )

जिप्सी - ते Pyrostegia venusta किंवा Combretum coccineum या दोन्हीपैकीच काही तरी आहे - बाकी पाने, कळ्या, पूर्ण उमललेली फुले वगैरे इतर डिटेल्स चेक करुन पहा....
माझ्यामते Combretum coccineum हेच असावे....

सध्या ऐरोली खाडीत भरपूर फ्लेमिंगो दिसत आहेत. (खाडीपूलावर उभे राहिल्यास मस्त गुलाबी पट्टा दिसतो स्मित )>>> म्हणजे मुलुंड - ऐरोली पुल का? सकाळी किती वाजेपर्यंत असतात ते?

म्हणजे मुलुंड - ऐरोली पुल का? सकाळी किती वाजेपर्यंत असतात ते?>>>>हो मोनाली Happy ओहोटीच्या वेळेस भरपूर दिसतील आणि भरतीच्या वेळेस खारफुटीच्या बाजुने थोडेफार दिसतील. रविवारी भरतीच्या वेळेसही चिक्कार दिसलेले. Happy

फ्लेमिंगो आणि मुंबईत म्हटल्यावर मी केवळ आश्चर्यचकितच झालो होतो .....
फोटो मस्त आहेत रे जिप्सी.......

शशांक ते फुल "Combretum rotundifolium" आहे. Happy

Combretum rotundifolium या नावाने सर्च करा. फुललेली फुले कसली मस्त दिसत आहेत. आता पुन्हा जायलाच पाहिजे, फुललेल्या फुलांचा फोटो काढायला. Happy

Combretum rotundifolium म्हणजेच मंकी ब्रश व्हाईन.... Wink Happy

अर्रे मला का दिसत नाहीयेत जिप्स्याचे आजचे फोटोज्???:अओ:

पण केळफूल्तर मोठ्या कमळाच्या कळीसारखे दिसतेय्..फारच सुरेख

साधना.. आणी उसका एस... क्या बात है

सुर्रेख माहिती आहे सर्व..

जो एस चे पक्षी ,अनिल्ची फुलं सर्व एकदम प्रसन्न वाटलं पाहून

धन्स शशांक Happy
मंकी ब्रश व्हाईन या नावाने सर्च केल्यावरही मस्त फोटोज दिसताहेत Happy

अर्रे मला का दिसत नाहीयेत जिप्स्याचे आजचे फोटोज्???>>>>भ्याआआआ Sad

Pages