निसर्गाच्या गप्पा (भाग - १२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 January, 2013 - 02:12

निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी, पारसी कॉलनीत, ( पाच गार्डन ) च्या दुसर्‍या गार्डनजवळ झाड आहे. गार्डनमधे नाही तर एका बिल्डींगच्या जवळ फुटपाथवर आहे. सकाळी लवकर गेलास तरच फुले दिसतील, नंतर गळून जातात. तिथल्या गार्डनमधला बहावा पण छान बहरला असेल आता.

दिनेशदा, तुम्ही गेल्या जन्मी काय, महाभारतातले संजय होता का? आणि तो मिळालेला वर अजून तसाच आहे? >>>> ते शरीराने जरी कुठे भारताबाहेर असले तरी मनाने कायमच मुंबई, कोकण, कोल्हापूर अशा ठिकाणीच आहेत - त्यामुळे येथील सर्व झाडे - फुलण्याचे, फळण्याचे मोसम ते पक्के जाणून आहेत - मग अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या नाही तरच नवल ....... त्यांना स्वप्नात झाडे बहुतेक सांगतही असतील - "ओ, मी फुललोय हां आता... "

खरच, असु शकते असे>>>>>>>>>>>>आता दिनेशदांची पोस्ट येणार. Happy

त्यांना स्वप्नात झाडे बहुतेक सांगतही असतील - "ओ, मी (राणीच्या बागेतला - अमुक तमुक कोपर्‍यातला) फुललोय हां आता... आणि माझ्या डाव्या साईडचा दुसरा अजून २-४ दिवसात फुलेलच..." आणि अशीच इतर झाडंही सांगत असतील
दिनेशदा हे खरे डॉ. डहाणूकरांचे वारस शोभतात - डॉ. ना मुंबईतल्या सर्व झाडांची अशीच खडा न खडा (चुकलोच पान न पान म्हणायचे होते) माहिती. त्या झाडाची पाने, फांद्या, फुले, फळे यांचे असे काही सुरेख वर्णन करतात की आपण पार अचंबित होऊन जावं ....
कित्येकदा एकदाही न पाहिलेलं झाड शांकली बरोब्बर ओळखते व मी विचारलं तर लगेच - डॉ. डहाणूकरांनी असे असे वर्णन केलंय ना या झाडाचे... अशी पाने, असे खोड, अशा फांद्या....

माझा डॉ. डहाणूकरांना लगेच मनोमन साष्टांग नमस्कार घालून झालेला असतो ....

तर अशा डॉ. डहाणूकरांचे वारस म्हणजे दिनेशदा -म्हणजे सगळं लक्षात येईल मंडळी तुमच्या......

तर अशा डॉ. डहाणूकरांचे वारस म्हणजे दिनेशदा -म्हणजे सगळं लक्षात येईल मंडळी तुमच्या......>>>>>>>>>आलं आलं. आणि त्यांचे वारसदार म्हणजे, जागू, जिप्सी, शांकली, आणि बरेच. Happy

आलो आलो... मी मागे रंगीबेरंगीच्या निमित्ताने एकेका झाडाचा असा पाठपुरावा केला होता, म्हणून लक्षात आहेत सगळी. जसजसा वेळ मिळेल तसा मुद्दाम जाऊन बघतो. मुंबईत तर बसमधून फिरतानादेखील, या वळणावर हे झाड दिसेल, असे वाटत राहते.. मला स्वप्न तर देशोदेशीच्या झाडांची पडतात आता Happy

दिनेशदा हे खरे डॉ. डहाणूकरांचे वारस शोभतात>>>>> +१००००००......

मंडळी, तुम्हाला माझी एक गंमत सांगते. इंगळहाळीकरांनी दोन वर्षांपूर्वी दै. सकाळमधे वृक्षवेध नावाची एक मालिका सुरू केली होती. त्यात ८ मार्चच्या कॉलममधे आज फुललेला वृक्ष- वरूण, कुठे बघायला मिळेल; तर नवसह्याद्री सोसायटीनवळील श्रद्धा हॉस्पिटलच्या समोर. ह्या माहिती वरून मी नवसह्याद्रीपाशी शनिवारी पोचले. पण हॉस्पिटलचे नाव विसरले! आणि टोळ हॉस्पिटलच्या नजिकच्या गल्लीत १/२ चकरा मारून वरूण कुठे दिसतोय ते बघायला लागले!
पण मंडळी मला वरूण नाही सापडला पण मिलेशिया (तुमा) हा वृक्ष मात्र अचानक भेटला! त्याचे हे फोटो.....

IMG_2353.JPG

पानं.....

IMG_2352.JPG

शेंग...

IMG_2354-001.JPG

ध्यानीमनी नसताना अचानक कोण कुठे भेटेल हे काही सांगता येत नाही हेच खरं!!

नाही शांकली, त्यांचा वारस म्हणवण्याएवढा माझा वकूब नाही.

हा गुलाबी रंगाचा तुमा, मला वाटतंय मी जांभळ्या रंगात, नायजेरियाला बघितला होता. केनयाच्या सफारी वॉकच्या बाहेर बरीच झाडे आहेत याची. पण तिथेही तो जांभळाच आहे.

आपल्याकडचा बेंगरुळ काशिद माहितीच असेल ना ? त्याचे इथे अंगोलात वेगळेच रुपडे बघायला मिळतेय.
आपल्याकडचे तूरे फारतर फुटभर असतात, इथे ते चक्क मीटरभर लांब आहेत. फुले तशीच पण लांब तूर्‍यांमूळे
खास दिसतो. ( हि त्याची वेगळी जात आहे.)

मीटरभर लांब वॉव.... काय काय मजा आम्हालाही कुठे कुठे बसल्या बसल्या पाहायलामिळतीये,,,

नि ग की जय हो!!!:)

दा, हा डार्क गुलाबी रंगाचा असला तरी जांभळ्या (किंवा मॉव कलर म्हणता येईल) रंगावरच जास्त आहे. आणि कोमेजून खाली पडलेल्या फुलांचा रंग तर चक्क तुम्ही म्हणता तसा जांभळाच होता. या फुलांवर प्रचंड संख्येनी मधमाशा होत्या. आणि खूप छान सुगंध येत होता. मधमाशा इतक्या होत्या की मी जरा घाबरून लांबून फोटो घेतले! न जाणो त्यांना फोटो सेशन नाही आवडले तर 'प्रसाद' मिळायचा!! Happy

प्रज्ञा, हे माझं नसून डॉ. डहाणूकरांचं कौशल्य आहे; की त्यांनी नुसत्या शब्दांमधे त्यांना उभं केलंय!! किती ग्रेट असाव्यात त्या!! त्या एकमेव अशा लेखिका आहेत की झाडांच्या फोटोंची जरूरीच नाही! तो डोळ्यांसमोर उभाच करतात.
त्यांच्या इतकं वृक्षांवर मनापासून (किंवा अगदी रक्तात भिनलेलं म्हणूयात) प्रेम डॉ. हेमा साने यांचंच बघितलंय!

हो मग तेच झाड असणार. हवामानाला अनुसरुन झाडे खुपदा स्वतःला अ‍ॅडजस्ट करतात. फुलांचे रंग पण तसेच ठरतात.

केनयामधे जंगलात जी बाभळीची झाडे आहेत, ती आडव्या विस्ताराची आहेत. त्यांच्या वरची बाजू सपाट असते.
आणि जिराफांना टाळण्याचा क्षीण प्रयत्न म्हणून त्यांना कडेला भरपूर काटे असतात.
पण जिराफ काही काट्यांना घाबरत नाहीत. तरी आडव्या विस्तारांमूळे जिराफ झाडाच्या मध्यभागी तोंड ( सॉरी, मान ) घालत नाहीत. आणि बाभळीला मध्यभागात काटेच नसतात !

हिच झाडे नैरोबी शहरात मात्र गोलाकारात वाढली आहेत, कारण तिथे जिराफांचा धोका नाही !

००००००००००

वर्षू ते काशिदचे झाड म्हणजे आपल्याकडे अगदी बेंगरुळ असते. झाडाला आकारही नसतो, कळाहीन फुले आणि
वेडावाकड्या शेंगा असतात.

खुपदा याचे भान मला रहात नाही. पण हे सत्य आहे फुले निसर्गाने आपल्यासाठी निर्माण केली नाहीत ( आपण
केलीत ती ट्यूलिप्स, गुलाब वगळा ) नाहीतर आपल्याला आवडणार्‍या नारळ, फणस, आंबा, काजू वगैरे फळांची फुले, एवढी लहान आणि अनाकर्षक का ? ती ज्यांच्यासाठी आहेत त्यांना तर ती आकर्षकच वाटत असणार.

नि.ग. च्या याच भागात कैलाशपती / जंगली बदाम / ब्रम्हदंड या तीन झाडांचा उल्लेख झालाय. तिन्ही फुलांचा रंग किरमिजी, ( म्हणजे चक्क मांसाचा ) दोघांना आपल्याला भयानक वाटेल असा गंध... अर्थातच आपल्यासाठी नाहीत ती. ती आहेत त्या वटवाघळांसाठी. तो रंग आणि गंध ही त्यांच्यासाठीच.

ही आमच्या कॉलनीतल्या झाडाची फणसावळ (पिल्लावळ असते तशी Happy )

एका वेळी ४० + फणस लागले आहेत खालच्या भागात, वर शेंड्याकडे असेच घोस लागले आहेत.

fanasawal.jpg

असा अंगाखांद्यावर फळे बाळगणारा फणस कोणा कविला (मला वाटतं बहुतेक इंदिरा संत ) "लेकुरवाळा" वाटतो - मस्त दिस्ताहेत फणस ....

<<<ध्यानीमनी नसताना अचानक कोण कुठे भेटेल हे काही सांगता येत नाही हेच खरं!!>>>
अगदी खरं..फर्ग्युसन रोडवर मला एकदा सुरंगीचं झाड दिसलं होतं तेव्हा खूप आनंद झाला होता.. Happy

फर्ग्युसन रोडवर मला एकदा सुरंगीचं झाड दिसलं होतं तेव्हा खूप आनंद झाला होता. >>> संभाजी महाराजांचा पुतळा / गरवारे पूल ओलांडला की लगेचच डावीकडे हॉलिवूड फोटो स्टुडिओच्या दारात आहे तेच ना ? मी आणि शांकलीने बर्‍याच वर्षांपूर्वी फुले आली असताना पाहिले होते ते झाड...... डायरेक्ट खोडावरच फुले येतात त्या झाडाच्या...

http://www.maayboli.com/node/24503 हे जागूने लिहिलेलं सुरंगी पुराण - फोटोसहित...

हो.. कोकणात त्या फुलांचा गच्च गजरा करतात..वास इतका, की गजर्‍यावर सुद्धा छोट्या माशा येतात.आणि झाडावर लाल मुंग्या (अर्थात एफ.सी. रोड्ला नसतात मुंग्या हे बरं आहे.. :p )

Pages