निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर
थांकु गौरी
थांकु गौरी
शोभा बीलेटेड विशेस ग तुला ही.
शोभा बीलेटेड विशेस ग तुला ही.
शोभा, (उशीरा का होईना)
शोभा, (उशीरा का होईना) वाढदिवसाच्या शुभेच्छा!
मोनालिप, माधवा, (असं म्हटल की
मोनालिप, माधवा, (असं म्हटल की पेशवेकाळात असल्यासारख वाटतं. ) धन्यवाद!
वर्षू आले आले मांजरी माशाच्या
वर्षू आले आले मांजरी माशाच्या वासावर येते मी जिथे मासा नाव टाइप करतात तिथे पोहोचते
शोभे तुला आणि मि. वर्षू ह्यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
वर्षू तू नक्कीच काहीतरी फिश केल असशील.
जागूच काय, पण तिची श्रावणी
जागूच काय, पण तिची श्रावणी सुद्धा 'मासा' असं उच्चारलं तरी कान टवकारेल! जागूडे, लेकीने मासा मस्त काढलाय बरं का!! तिला शुभेच्छा सांग!
बाय द वे, माझ्यातर्फे मि. वर्षू यांना आणि शोभाला वाढदिवसाच्या हार्दिक (उशीराने) शुभेच्छा!! (मी नेहमीच उशीराने देते :अरेरे:)
गौरी, शोभा, हॉलीवूड फोटो स्टुडियोच्या दारात किंवा त्याच फूटपाथवर तुला सुरंगी दिसेल. उंडी आणि सुरंगी बहिणी बहिणी शोभतील इतकं साम्य आहे दोघींच्यात!
शांकली हे वडिलांनी लावलेले
शांकली
हे वडिलांनी लावलेले कोबी. मला गुलाबाचीच फुले वाटतात.
जागुताई छान आहे प्रचि आता
जागुताई छान आहे प्रचि आता कोबीचे पराठे येऊदेत
शांकली, पुण्यातली विशेष झाडं
शांकली,
पुण्यातली विशेष झाडं आणि त्यांचे पत्ते अशी यादी तू केलीस तर किती पत्ते देऊ शकतेस?
जागू हिरवा गुलाब मस्तच!
जागू हिरवा गुलाब मस्तच!
समस्त निसर्गप्रेमी महिलांना
समस्त निसर्गप्रेमी महिलांना ...
महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा !!
जागूडे, खरंच ते गुलाबच
जागूडे, खरंच ते गुलाबच वाटताहेत गं !! वडिलांचा वारसा तू छान चालवतियेस .. वडिलांना नमस्कार सांग. आणि इतका रसरशीत कोबी बघून खूप मस्त वाटलं ते पण सांग.
अवनी, माझ्याकडे मी माझ्यापुरते हे पत्ते नोंदवून ठेवलेत. नविन एखादं झाड, वेल असं काही बघितलं की मी नोंद करून ठेवते. तुला केव्हाही लागली तर मी तुला देईन.
जागू, शांकली धन्यवाद! जागू,
जागू, शांकली धन्यवाद!
जागू, हिरवे गुलाब छान दिसतायत.
गौरी, शोभा, हॉलीवूड फोटो स्टुडियोच्या दारात किंवा त्याच फूटपाथवर तुला सुरंगी दिसेल. उंडी आणि सुरंगी बहिणी बहिणी शोभतील इतकं साम्य आहे दोघींच्यात!>>>>>>>>>>>>बघ, स्वतःला यायला नको. म्हणून पत्ता सांगून मोकळी झाली.
जागू, कोबीची जेवढी निगराणी
जागू, कोबीची जेवढी निगराणी करावी तेवढी ती रसरशीत दिसते.. आणि निगराणी अगदी जाणवतेच आहे.
काल आम्हाला सुट्टी होती, म्हणून समस्त स्त्रीवर्गाला शुभेच्छा द्यायच्या राहिल्या.. त्या आज देतोय.
दिनेशदा धन्यवाद! छान आहे
दिनेशदा धन्यवाद! छान आहे गुलाब.
व्वा....काय सुंदर कलर आहे
व्वा....काय सुंदर कलर आहे गुलाबाचा!!
किती खरा वाटतोय तो गुलाब!
किती खरा वाटतोय तो गुलाब! सुंदरच..
हे वाचून, तूम्ही सगळे मला
हे वाचून, तूम्ही सगळे मला वेड्यात काढणार.. तरीपण !
मी वाचलेल्या बहुतेक पुस्तकात / लेखात कण्हेरीचा उल्लेख विषकन्या म्हणून केलाय. डॉ किर्तीकर, प्रा. महाजन, डॉ. डहाणुकर.. सगळ्यांनीच तिच्या विखारीपणाचे वर्णन केलेय. डॉ, किर्तीकरांच्या, पॉयझनस ट्रिज ऑफ इंडिया मधे, पिवळ्या कण्हेरीचे ( बिट्टीचे झाड ) विखारीपण सविस्तर लिहिले आहे. केरळमधे आत्महत्येसाठी या झाडाची कच्ची फळे वापरतात, असाही उल्लेख वाचलाय.. आणि गाय बकर्या त्याला तोंड लावत नाहित, हे पण वाचले होते.
पण काल गँग्ज ऑफ वासेपुर ( भाग पहिला ) बघताना एक नवल दिसले. त्यातल्या शेवटाकडच्या एका प्रसंगात,
( जेव्हा सरदारचा मोठा मुलगा आणि त्याची प्रेयसी तळ्याकाठी बसलेले असतात, तो तिच्या हातावर हात ठेवतो, तो सीन ) त्यांच्या मागे एक बिट्टीचे झाड आहे, आणि त्याची पाने खायला एक बकरी उड्या मारताना दिसते.
मग हे झाड आता विषारी उरले नाही ? बकर्या विष पचवायला शिकल्या ? ती बकरी पण अभिनय करत होती ?
( झाड मात्र बिट्टीचेच होते. पिवळी फुले पण दिसतात. )
वा सुंदर गुलाब्...मला दोन
वा सुंदर गुलाब्...मला दोन हवेत
धन्स दिनेश दा
जागु ची कोबी किती रसरशीत दिसतीये..मस्त!!!
दिनेशदा, काल गँग्ज ऑफ वासेपूर
दिनेशदा, काल गँग्ज ऑफ वासेपूर मधे पण निसर्गंच बघत होतात तर !
हो ना रावी, तो हिरवा चष्मा
हो ना रावी, तो हिरवा चष्मा असतोच डोळ्यावर नेहमी !
मग हे झाड आता विषारी उरले
मग हे झाड आता विषारी उरले नाही ? बकर्या विष पचवायला शिकल्या ? ती बकरी पण अभिनय करत होती ?
कशावरुन हे सगळे?? ती बकरी कदाचित आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असेल असे का वाटत नाही तुम्हाला??/ आमचा एस आम्हाला रोज धमक्या देतो आत्महत्या करण्याच्या, मग बकरी का नाही प्रयत्न करणार????
हो तसेही असेल. दिल वगैरे
हो तसेही असेल. दिल वगैरे तुटलेले असणार तिचे !
दिनेशदा
दिनेशदा
शोनाहो निगकर, बकरीची अशी
शोनाहो निगकर, बकरीची अशी थट्टा करणं !
वर्षू, गुलाब इंदूरचाच
वर्षू, गुलाब इंदूरचाच आहे.
अवनी, छे मला तर हिरवीणीपेक्षा बकरीचीच काळजी वाटली !
दिनेशदा, धन्यवाद ! <<<ती बकरी
दिनेशदा, धन्यवाद !
<<<ती बकरी कदाचित आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असेल असे का वाटत नाही तुम्हाला??/ >>>
साधना, कल्पनाशक्तीला सलाम !
बर्याच दिवसांनी नि.ग.वर आल्याने उशिराने मि. वर्षू निल ह्यांना वा.दि.च्या शुभेच्छा !!
खुप दिवसांनी आज बैकलॉग वाचुन
खुप दिवसांनी आज बैकलॉग वाचुन काढला.. कसला धावतोय हा धागा ...
(नेहेमीसारखीच) माहिती ओसंडून वाहते आहे!
दिनेशदा,
काल गँग्ज ऑफ वासेपूर मधे पण निसर्गंच बघत होतात तर !
कदाचित कण्हेर विषारी होणं सोडुन दिल असेल ?
जागु,
घरची कोबी छान फुलली आहे
शकुन,
फणस खासच लगडलेत
शांकली,
फोटो छान आलेत
अनिल धन्यवाद
अनिल धन्यवाद शुभेच्छांसाठी.
श्रावणीच्या शाळेत गव्हांकुराचा प्रोजेक्ट दिला होता. ही गव्हाची तयार झालेली रोपे. सकाळी रोपांच्या टोकावर असे पाण्याचे थेंब जमा असायचे. छपराखाली असल्याने तो दव नसावा.
सह्हीच!! मस्त आलेत फोटो
सह्हीच!! मस्त आलेत फोटो गव्हांकुराचे.
Pages