निसर्गाच्या गप्पा (भाग - १२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 January, 2013 - 02:12

निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, मस्त चित्र !
सामी, माझी एक मैत्रिण डिसेंबर मधे अंदमान ला जाऊन आली. तिनेही असंच सगळं सांगितले. खरंच किती ग्रेट आहे ना !

फारच सुंदर चित्र काढलंय दा तुम्ही!! अजून अशी खूप चित्रं बघायला आवडतील.

सामी, मस्त आहे हं लेख! खूप आवडला. त्या पर्यटकांसारखा माझाही लेख वाचताना आ वासला होता!

दिनेशदांकडून स्फूर्ती घेऊन काही बाही काढायचा प्रयत्न करतोय - हे बॉलपेनने ५-७ मिनिटात गम्मत म्हणून काढले आहे - चिमणराव आहे हे सांगावं लागतंय यातच सगळं आलं Wink Happy

IMG_2322.JPG

गोरखचिंचेखालचा बाजार
<<

दिनेशदा,
मांडवगडाजवळ ही झाडं आहेत. हिरवे लांबुळके केसाळ (मखमली फील असलेले) फळ. त्यात पांढरी आंबट भुकटी सारखा गर. काळ्या बिया. तीच गोरखचिंच का? त्याला ते लोक 'इमली'च म्हणत होते.

अरे वा! शशांक चिमणोबा छानच!
माझ्या लिंबाच्या रोपाला अचानक कोवळी पालवी फुटायला लागलीये. ज्याची संपूर्ण पानगळ झाली होती.
याच रोपाला एक कोष लटकलेला होता. हा फुलपाखराचा असावा का?

DSCN1715_0.JPGDSCN1716.JPGDSCN1718.JPG

परवा बागेतून कढिलिंबाचे डहाळे आणले तर त्यावरून हे महाशयही माझ्या ओट्यावर आले. भलतेच अ‍ॅग्रेसिव्ह होते. पुढच्या हातानी मला मारण्याची अ‍ॅक्शन करत होते. सर म्हणतात ना.....एकत नाही का? मार देऊ?
तश्शी अ‍ॅक्शन हे करत होते. मी व्हिडिओ घेतलाय त्यांचा. आधी तू नळीवर टाकीन मग बघते इथे टाकायला जमतं का ते!

हेच ते महाशय..... >>>>> हा प्रेईंग मँटिस - प्रार्थना कीटक - भलताच अ‍ॅग्रेसिव्ह असतो - जन्मजात शिकारी असल्यामुळेच ......
तुझ्याकडील फोटोतला पिल्लू दिसतोय - पूर्ण वाढ झालेला पाहिलास तर ????.... जनरली सर्व मंडळी पळच काढतात याला बघून ..

http://www.maayboli.com/node/24610 या माझ्या एका लेखात या प्रेईंग मँटिसचे साद्यंत वर्णन आहे...

शशांकजी, चिमणराव मस्त!
मानुषी, <<<<सर म्हणतात ना.....एकत नाही का? मार देऊ? तश्शी अ‍ॅक्शन हे करत होते.>>>:फिदी:

शशांकजी, छान आलाय चिमणा. (सांगितलं नसत तरी आम्ही ओळखला असता.) Happy
सर म्हणतात ना.....एकत नाही का? मार देऊ? तश्शी अ‍ॅक्शन हे करत होते.>>>:हाहा:

मानुषी हे कोष फुलपाखराचे आहेत. माझ्या घरी पण आहेत सध्या दोन झाडावर्..लिंबाला कोवळी पालवी यावी आणि ह्यानी फस्त करावी...:-) अस गेले दोन वर्ष चालु आहे...

शशांक ,चिमणा ओळखायला येतोय.. गुबगुबीत दितोय चांगला!!
मानुषी..प्रेइंग मँटिस मस्त आलाय फोटो.. शशांक म्हणाला तसं, पिल्लू दिस्तंय..
फुलपाखराचा कोष ही मस्तंच..

प्रार्थना कीटकाचा फोटो मस्तच आहे.

सकाळी ऑफिस ला निघताना मनिमाऊ मस्त गेट मध्ये बसून उन खात होती. फोटो काढायला थांबले तरी जागची हलली नाही. फोटो मोबाईल ने काढ्ला आहे.
2013-02-19 08.59.35-1.jpg2013-02-19 08.59.28-1.jpg

नविन चित्र आणि फोटो मस्त आहेत.

पामच्या झाडाचे अपडेट्स.
बराच विचार करुन झाडाला ह्युमिडीटी मिळत नाही असे मला वाटले. मग तेव्हापासुन एक स्प्रे बॉटल आणुन त्यातुन दिवसातुन दोन तीन वेळा पाण्याच्या स्प्रे करतेय. आधीच सुकलेली पाने गेलीच. पण न सुकलेली अजुन तरी टवटवित राहिलीत. नर्सरीमधे खुप झाडे आजुबाजुला असल्याने आणि सतत पाण्याने आंघोळ होत असल्याने त्यांना चालत होते पण घरी आल्यावर ह्युमिडीटी कमी वाटायला लागली बहुधा. आता हे एक स्प्रे करायचे नवे काम वाढले मात्र.

नमस्कार Happy
गेल्या आठवड्यात नांदूर-मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात फेरफटका मारला. त्याची झलक.
IMG_3057_Sushrut_MDFD.jpgIMG_3085_Sushrut_MDFD.jpgIMG_3172_Sushrut_MDFD.jpgIMG_3184_Sushrut_MDFD.jpgIMG_3227_Sushrut_MDFD.jpgIMG_3245_Sushrut_MDFD.jpg

हो इब्लिस, तेच गोरखचिंच. आपल्याकडे अभावानेच दिसते. पण "कल्पवृक्षाचा" दर्जा द्यावा असे हे झाड आहे.

शशांक, चिमणराव छानच. तूम्ही डाव्या हाताने काढलय का ? ( मी काढलं असतं तर चोच विरुद्ध दिशेला असती.)

हो मानुषी, आमच्याकडे तो फारच मोठा असतो आणि पांढराही असतो. ( यालाच आपल्याकडे खंडोबाचा घोडा पण म्हणतात ना ? ) कोष फुलपाखराचाच आहे पण त्यातले पाखरू मेले आहे. पाखराची पुर्ण वाढ होऊन ते बाहेर पडले कि कोष वरुन झडपेसारखा उघडलेला दिसतो.

सामी / आशुतोष, मस्तच आहेत फोटो.

सावली, बहुतेक पाम हे समुद्रकिनार्‍यावरचेच त्यामूळे दमट हवामान लागणारच पण मी राहुरीला पण चांगली
वाढलेली नारळाची झाडे बघितली आहेत. ( नगर जिल्ह्यात )

आशुतोष - तू जे पक्ष्यांचे फोटो काढले आहेस ते सर्व अप्रतिम......
नावे बहुधा अशी आहेत
१] लार्क
२] गरुड - त्यातील नेमकी प्रजाती कळत नाहीये
३] ?
४] खाटिक / श्राईक
५] ग्रे हेरॉन
६] ग्रे वॅगटेल

जो_एस ने जो फोटो टाकलाय तो वेडा राघू / बी ईटर (हा फोटोही सुरेखच)

मला इंदूर विमानळावर एक छान पुस्तक मिळाले होते ( आता इथे नाही ) त्यात तिथल्या एका तलावाचे संरक्षण
कसे केले आणि मग तिथे पक्ष्यांची ये-जा कशी वाढली याचे छान वर्णन होते. त्या पुस्तकात सर्व पक्ष्यांचे फोटो,
त्यांचे वर्णन, सवयी, खाद्य, गाण्यातले शब्द, स्थलांतरीत असेल तर मूळ स्थान, अशी माहिती आहे.

अशा ठिकाणी जाताना असे पुस्तक जवळ असले तर किती छान. शिवाय या पुस्तकाची किंमत २५० रुपयेच होती.
एवढे फोटो असलेल्या मराठी पुस्तकांच्या किमती मात्र अव्वाच्या सव्वा असतात.

Pages