निसर्गाच्या गप्पा (भाग - १२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 January, 2013 - 02:12

निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय ग्रेट माहितगार लोकं आहत तुम्ही ! आणि मस्त फोटो टाकताय सगळे.
वर्षू : चायनीज फुलं भारीयत.
जिप्सी : इतक्या उंचावरचे फोटो इतके सुंदर कसे काय काढता तुम्ही नेहमी ? Happy
गुड्नाइट म्हणण्याआधी ही माझ्या बालकनीतली छोटीशी गोडुली फुलं तुमच्यासाठी :

nawin fula1.jpgnawin fula3.jpgnawin fula2.jpg

धन्यवाद शांकली Happy
ह्या लिंकवरचा फोटो पाहणार का. तो आणि मागच्या पानावरचा फोटो एकाच झाडाचा वाटतोय. आणि त्यालाच शिसव असे सांगितलेले. Sad
http://www.maayboli.com/node/24242?page=10

जिप्सी : इतक्या उंचावरचे फोटो इतके सुंदर कसे काय काढता तुम्ही नेहमी >>>>शकुन, माझ्याकडे ७०-३००एमएम ची टेलीलेन्स आहे त्यानेच. Happy

वैशाली, मी जाऊन आलो पण त्या केळीच्या झाडाला फुले नाही दिसली. हा मात्र त्याच्या भोवती जी झाडे होती ती सगळी शोभेची झाडे वाटली. Happy

शकुन सुंदर आहेत तुझ्या बाल्कनीतली फुलं.. सदासर्वदा प्रसन्न वाटतं ना फुलांकडे पाहून.. Happy

जिप्स्या.. कोडं घालणार्‍याला उत्तर पण माहीत असावं ना Wink Proud

.

यावत् भूमंडलात् धत्ते सशैलवनकाननम्
तावत् तिष्ठन्ति मेदिन्यां संतति पुत्र पौतृकी | |
देहन्ते परमं स्थानम् यतसुरैरपि दुर्लभम् |
प्राप्नोति पुऋषोनित्यं महामाया प्रसादतः ||

(वराहपुराण)

अर्थः जो पर्यंत या भूतलावर पर्वत, वने आणि सरोवरे आहेत तोपर्यंत तुम्ही, तुमची मुले व भावी पिढ्या सुखाने जगतील. ज्यांना ही गोष्ट कळेल त्यांना महामायेच्या (निसर्गदेवतेच्या) प्रसादासह देवांनाही दुर्लभ असे परमस्थान प्राप्त होईल.

(संदर्भः देशी वृक्ष)

जिप्सी नक्की कुठलं पाहिलस.. जे रोडच्य चौकात आहे ते कारंज नाही. त्या रस्त्याच्या टोकाला आहे ते कारंज. मी बहुतेक आज जाइन परत तिथुन जमल तर काढते फोटो..

ओ या फुलाचं नाव मेडशिंगी??? आधी पाहिलं होतं पण नांव नव्हतं माहीत.. Happy
बर्बरं जिप्स्या मला वाटलं ते कोडं होतं.. Happy Happy

जिप्स्या, मेढ्शिंगीचे फुल नेहमी फारच उंचावर असते त्यामूळे समोरून कधी दिसतच नाही. तूला छान मिळालाय अँगल.
वारसाचा फुलोरा बघितलाच का ? तो पण फार देखणा असतो. हेच कूळ.
तूला ते श्री विजय मोकल आठवताहेत का ? आपल्याबरोबर राणीच्या बागेत आले होते ते. त्यांना मी वारसाच्या
झाडाचा पत्ता सांगितल्यावर, चक्क गोव्यापर्यंत जाऊन आले होते. ( फक्त ते झाड बघण्यासाठी.)
पण पुण्यातही असावे एखादे !

००००

हे माझ्या खिडकीतून दिसणारे दृष्य. दिसतेय ति बहुतेक हिरवाई आंब्याच्या झाडाची आहे. आंब्याच्या झाडाची
पानगळ वर्षभर होत राहते म्हणजेच ते झाड एकाचवेळी ओकेबोके होत नाही. त्यामुळे वर्षभर, अगदी इथल्या
उन्हाळ्यातही अशी हिरवाई असतेच. इथे बहुतेक घरांच्या अंगणात आंब्याचे झाड आहे. रस्त्याच्या कडेनेही आहेत.

आपल्याकडे रस्त्याच्या कडेने अशी ( म्हणजे आंबा, चिंच, फणस ) वगैरे झाडे का लावली जात नाहीत ? भले
त्यांना देखणा फुलोरा नसेल पण वर्षभर सावली तर असतेच. आणि लहान मुलांना थोडा खाऊ मिळाला, तर
त्याला का एवढा आक्षेप ?

गॅलेरीयच्या समोर नाही त्या चौकातुन पवई तलावच्या दिशेने चालत गेल्यावर येत ते कारंज..

जर जे वि एल आर वरुन घाट्कोपर ला जायच असेल तर पहिला राइट घेतल्यानंतर परत जो राईट आहे ना ते..आजुबाजुच्या बिल्डिंग्ची नाव आज बघते

दिनेशदा, तुमच्या खिडकीतून दिसणारं दृष्य अगदी थेट भारतातलं वाटतंय. फक्त एका बाजूला उत्तरेकडे दिसणारी गच्ची/धाब्याची घरं तर दुसरीकडे थेट कोकणातल्यासारखं कौलारू घर. मजा वाटली.

शकुन, प्रसन्न वाटलं फुलं बघून.

दिनेशदा, तुमच्या खिडकीतून दिसणारं दृष्य अगदी थेट भारतातलं वाटतंय. फक्त एका बाजूला उत्तरेकडे दिसणारी गच्ची/धाब्याची घरं तर दुसरीकडे थेट कोकणातल्यासारखं कौलारू घर. मजा वाटली.>>>>+१००००

जिप्सी, मेडशिंगीच्या फुलाचा फोटो फारच अप्रतिम आलाय हं! खरंच तुला हा फोटो eye level ला मिळाला हे विशेषच आहे.
मागच्या (२ र्‍या भागात) ज्या फोटोबद्दल तू म्हणतोएस तो करंजाचा आहे. (pongamia pinnata)
या नावाने गूगलवर सर्च केलंस तर हीच फुलं दिसतील. पानं बर्‍याचदा थोडी वेगवेगळी असू शकतात. आणि त्याच फोटोंवर जो तपकिरी रंगाच्या फुलांचा फोटो आहे तो मुचकुंद/कनकचंपाचा आहे. (मुचकुंद आणि कनकचंपामधे अजून एकवाक्यता नाहीये)

फॅबॅसी फॅमिलीतली फुलं एकसारखी असतात. त्यांना छोटी टोपी असल्यासारखी असते. पण झाडानुसार त्यांची उपफांदीवरची रचना बदलते आणि रंगही बदलू शकतो. आता हेच बघ ना; करंजाचीच गुलाबी आणि जांभळ्या रंगाची दोन्ही फुलं असतात. तर शिसवाची पिवळी! Happy

दिनेशदा तुम्हाला छानच अगदी फॅमिलिअर व्यू आहे.
शकून फुलं मस्त!
जिप्सीभौ.............तुम्ही दिलेला श्लोक देवीकवचातला शेवटचा श्लोक आहे.त्यापुढे एवढी एक ओळ मग समाप्ती. ही पुढची ओळः
लभते परमं रूपमं शिवेन सह मोदते
इति वराहपुराणे हरिहरब्रह्म विरचितं देव्या कवचं समाप्तम
असा त्याचा शेवट आहे.
आणि मेडशिंगी खूपच नाजुक!

आता हळू हळू अंगोला दाखवेन तूम्हाला. दरम्यान " परत फिरा रे " ला लेख पण वाचा.

( आपल्या आपल्यात फिरवली, तर तिला रिक्षा म्हणू नये... एक संतवचन ! )

आपल्या आपल्यात फिरवली, तर तिला रिक्षा म्हणू नये... एक संतवचन !>>> Lol

बाय द वे, हा 'परत फिरा रे' लेख कुठे आहे?

दिनेशदा, पुण्यात स्पायसर कॉलेजची बेकरी आहे नं त्या बेकरीपाशी रस्त्याच्या दो बाजूंना दोन वारस उभे आहेत. मागच्या महिन्यात पूर्ण फुलले होते. आता बहर ओसरला असणार.

सध्या मोह, पाचुंदा हे फुलले आहेत. सहकारनगर नं २ मधे पांढरा शेव्हिंग ब्रश आता ८/१० दिवसांत फुलेल. तिथेच
पहिल्या वळणावर दोन बिल्डिंगच्या मधे पळस फुललाय.

वारस तसा फार नाही दिसत पण त्याचा फुलोरा खासच. गुलाबी / पांढरा / पिवळा असे सगळे रंग एकत्र आणि फुलेही भल्यामोठ्या गुच्छात.. ( हे वर्णन खास जिप्स्यासाठी ) आता त्याला मोठ्या शेंगा लागतील.

शोभाला, त्या फुलांचा चांगला फोटो मिळाला कि नाही ?

०००

हा आमचा चिमणराव !

धन्स शांकली/मानुषी Happy

जिप्सी, मेडशिंगीच्या फुलाचा फोटो फारच अप्रतिम आलाय हं! खरंच तुला हा फोटो eye level ला मिळाला हे विशेषच आहे.>>>>>ते फुल साधारण २०-२५ फूटावर असेल Happy झूम लेन्सने काढलाय. Happy

रच्याकने, एक बावळट प्रश्न, मेढशिंगीची फुले संध्याकाळी/रात्री फुलतात का? मला सकाळी झाडाखाली १-२ फुले पडलेली दिसली.

करंज/शिसवीच्या माहितीबद्दल धन्स शांकली Happy

सध्या मोह, पाचुंदा हे फुलले आहेत>>>>मी याची फुले पाहिली नाही Sad शांकली प्लीज पाचुंदाचा फोटो डकव ना इथे.

दिनेशदा, वारसचे फुल आहे ना तुमच्या लेखात (जुन्या मायबोलीवर :-)).

रच्याकने, चिमणराव एकदम झक्कास आहेत. मस्त फोटो. Happy

http://www.maayboli.com/node/41072 इथे लेख आहे.

हो जिप्स्या, पण तो फोटो संध्याकाळी काढल्याने स्पष्ट नव्हता.

ते मेढशिंगीचे झाड असेच एकांडे उभे असते. मग शेंड्याला खरेच मेंढ्याच्या शिंगासारख्या शेंगा दिसतात.
फुले आपल्याला नीट बघितली तरच दिसतात. आणि पांढरी आहेत, त्यामूळे रात्रीच फुलत असावीत.

मग शेंड्याला खरेच मेंढ्याच्या शिंगासारख्या शेंगा दिसतात. फुले आपल्याला नीट बघितली तरच दिसतात>>>>अगदी अगदी दिनेशदा. हे मेढशिंगीचे झाड सागर उपवन (कुलाबा) इथे आहे. पुढचं निसर्ग गटग इथेच करायचं. Happy

जिप्सी, अरे धन्यवाद कसले देतोस?

पाचुंद्याचे माझ्याकडचे हे फोटो. पण यात मला पानांची रचना पकडता आली नाहीये. तरी वानगीदाखल.....

1 277.jpg1 281_0.jpg

सुप्रभात Happy

मस्त, शांकली.
मी अजुन नाही पाहिलाय पाचुंदा. Happy मध्यंतरी वरूण/वायवर्णलाच पाचुंदा समजलेलो Proud

Happy "प्रेम चतुर्दर्शीच्या" सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा!!!! Happy

प्यार कोई बोल नहीं, प्यार आवाज़ नहीं
एक खामोशी है सुनती है कहा करती है
ना ये बुझती है ना रुकती है ना ठहरी है कहीं
नूर की बूँद है सदियों से बहा करती है
सिर्फ़ एहसास है ये, रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो...

दिनेशदा, मला खालील झाडे, त्यांचा फुलोरा पहायचा आहे, मुंबई परीसरात ते कुठे आहे जरा प्लीज सांगाल का? आणि त्यांच्या फुलण्याचा सीजनही. Happy

शशांक/शांकली, पुण्यात असेल तरीही नक्की सांगा. Happy

१. फालसा
२. अजानवृक्ष
३. किनई
४.कुंभा
५.खिरणी
६.टेमरू/टेंबुरी (हे म्हणजे टेंभूर्णीच का?)
७.टेटु
८. टोकफळ (Acrocarpus fraxinifolius)
९. दही वण (Cordia acleodii)
१०. नाणा
११. पाडळ
१२. पिवळा वारस Happy
१३. पेटरा
१४. बुरगुंड
१५. वारंग/भेंडक

तुलाही वेलेंटाईन डे मुबारक असो ,जिप्स्या.. कसलं सुर्रेख आहे फूल ,रंग ही राजेशाही!!!

@ दिनेश दा ,'( आपल्या आपल्यात फिरवली, तर तिला रिक्षा म्हणू नये... एक संतवचन !,'' Rofl

बघतेच आता ही लिंक..

Pages