फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!

Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28

खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अ‍ॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्‍याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का? Wink
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे मानेवर केल आहे टॅटु जाम दुखलं.... Sad परत नाही करणार.... पण पर्मनंट आहे...कॉर्पोरेट मधे टॅटु चालत नाही.... माझा मानेवर असल्याने केस मोकळे सोड्ले तर दिसत नाही....

हो ग...लिनियर लाईन वर्क असुन पण दुखलं...माझा बहिणीने तर एकदम हेवी लाइन वर्क केलयं......काय माहित कस सहन केल तिने.....माझी हौस फिटली बाबा.....

अनारकली खरंच खूप सुंदर आहे. एकदम संक्रांत स्पेशल!

पण मला वाटतं की अनारकली हा प्रकार, उंच आणि स्लिम बायकांनाच शोभून दिसतो. बुटक्या आणि स्थूल बायकांनी हा प्रकार शक्यतो टाळावा. घातलाच तर डार्क रंग घ्यावेत आणि शक्यतो फार हेवी भरतकाम नसलेले घ्यावेत. सुळसुळीत शिफोन सारखं अंगाबरोबर बसणारं मटेरियल असावं आणि हाय हील्स घालावेत.

चीकु..खरं आहे तुझ म्हणणं....पण एक प्रॉब्लेम आहे....अनारकली तर छान दिसतो उन्च मुलिंवर...पण बाकी कुठलेही पंजाबी खास दिसत नाहीत...एकतर तितक्या साइझ चे मिळत पण नाहीत...माझी उंची ५'-१०" आहे... त्यामुळे अनारकली फॅशन तशीच रहावी असं मला वाटतं...

नीधप...हो पण शिवलेल्या ड्रेस् पेक्शा रेडीमेड ड्रेस छान दिसतात...शिवलेले ड्रेस शिवलेले आहेत हे कळुन येते...पटियाला वगैरे चे दुकानात ऑप्शन सुंदर असतात.....मिक्स मॅच कॉम्बो मला अवडतात...पण उन्चीचा प्रॉब होतोच......:(
दक्षिणा>>> नाही मी बारिक नाही वजन ७५ कि आहे पण उंची मुळे कळुन येत नाही Wink

मला साड्याना पण वर एक्स्टेन्शन लावावं लागतं.... पण साड्या नेसायला अवडतात.......

पण शिवलेल्या ड्रेस् पेक्शा रेडीमेड ड्रेस छान दिसतात>>>> अज्जिब्बात नाही हं. चांगला टेलर /डिझायनर मिळाला /मिळाली तर शिवलेल्या ड्रेसेसची सर कशालाच येत नाही.
इव्हन पटियाला, मिक्स अँड मॅच पण शिवून छान करता येतं. खरंतर रेडीमेड पटियाला पेक्षा शिवलेली पटियाला जास्त छान दिसते.

Wink

अज्जिब्बात नाही हं. चांगला टेलर /डिझायनर मिळाला /मिळाली तर शिवलेल्या ड्रेसेसची सर कशालाच येत नाही. <<<
+१०००
अनिश्का तुला डबडा टेलर सापडलेला असेल Happy

खुप हेवी आहे.. ऑफिसात नाही चालणार.

मागच्या पानावरचा काळा अनारकली एकदम क्लास ..........

काळ्या सिल्कमध्ये असा शिवून घ्यायची नोंद 'मस्ट हॅव' लिस्टमध्ये केलीय. Happy

हेव्वी वाटतोय.. पण काँबीनेशन आवडलं>>>> अग्रीड
अल्पना>>> पण मला ना पेशन्स खुप कमी आहे गं......म्हणुन मी दुकानात काही अवडलं तर घेउन टाकते....शिवा बिवायच्या भानगडीत पडत नाही...जास्त करुन मी जिन्स वापरते......:) ठाण्यात कोणी चांगला टेलर असेल ड्रेस आणि ब्लाउज साठी तर कळवा.......मी राहते डोंबिवली मधे....तिथे असेल तरी चालेल....

काळ्या सिल्कमध्ये असा शिवून घ्यायची नोंद 'मस्ट हॅव' लिस्टमध्ये केलीय.>>> साधना मला पण भारी आवडलाय तो....:)

ठाण्यातल्या टेलरांचे पत्ते, खाणाखुणा याच धाग्यावर मागच्या तीन चार पानांमधे विखुरलेले आहेत.

अनिश्का, तू खूप उंच आहेस, मग रेडीमेड सलवारी तुला कशा होतात?

मी शक्यतो सलवार वाले ड्रेस घेत नाही ( अगेन लिमिटेशन्स Sad ) चुडिदार वालेच घेते...पण स्ट्रेट कट ड्रेस चे वेस्ट ला कट्स अस्तात ना ते माझा कंबरे च्या वर जातात ते चिप दिसतं.....म्हणुन मला एक्स एल वाली दुकानं शोधावी लागतात..... अनरकली ला कट बिट ची भानगड नसते, गुढग्याच्या खाली असतात ते..... पटियाला विकत घेतले तरी त्यांना ६" चा पट्टा वर लावावा लागतो दुकानवाल्यांकडुन

हो ते आहे....पण कुर्त्यांच्या कट च काय ..... लेगिन घातला तरी माझी कंबर कट मधुन दिसतेच Sad लेगिन तर एकदम कंफर्टेबल आहेत...

>>वेस्ट ला कट्स अस्तात ना ते माझा कंबरे च्या वर जातात ते चिप दिसतं...>><<

मी अनिश्का, हि भानगड असतेच असते.(माझा तोच प्रॉबलेम आहे हो, समजू शकते भावना).
(एक आठवली गोष्ट. एक असाच ड्रेस घेतला होता घरीच घालायला भारतात असताना. माझ्या आईची नजर सारखी तिथेच... . आई सारखी आठ्या पाडून. ते बघ किती वर आलाय,विचित्र दिसतं ते, बदल तो ड्रेस; कामवाली बाई पण हसेल.. काय एकेक चिंता आईला. शेवटी वैतागून बदलला. त्यातच फाटला तो. )

म्हणूनच शिवलेले कपडे उत्तम. एक चांगला शिंपी शोधाच तुम्ही.

Pages