फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!

Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28

खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अ‍ॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्‍याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का? Wink
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी काल एक डार्क पिंक कलरची नेलपेंट आणली
कधी मला वाटतय ती चांगली दिसतेय
कधी वाटतय अशा नेलपेंट गोर्‍या हातांनाच चांगल्या दिसतात Sad
माझे हात सावळे आहेत
कोणी तरी जरा चांगले रंग सुचवा की

दीपांजली सुपर्ब काँबोज +१
मी पण ट्राय करेन आता कलरफुल जीन्स...मला डार्क लाल नि ऑरेंज जास्ती आवड्लेत

रिया मला वाटते तुला नेलपेंटमधील लाइट मॅट शेड्स छान दिसतील.

अनिश्का... मी पण 'फॅब' ची अजिबात फॅन नाही.. त्यांचे कॉटन टॉप्स टोचरे असतात .. काही काही वेळा छान मऊ ही असतात म्हणा..
पण रंगाबद्दल बोंब असते.. जुने झाले तरी रंग जातोच..
नाही म्हणायला फॅब च्या सिल्क साड्या खूप सुंदर असतात.. पण सिल्कच घ्यायचं असेल तर कलानिकेतन माझा चॉईस...

रिया.. माझी एक मैत्रीण आहे.. सावळ्यापेक्षा एक शेड डार्क म्हणू शकतेस.. ती नेहमी ब्राईट पिंक, ऑरेंज असे कलर्स लावते ( लाल कधीही नाही) .. खूप छान दिसतात तिच्यावर. तू ट्राय तर करून बघ. लाईट शेड मुळे हात जास्त सावळे दिसू शकण्याची शक्यता आहे..
जाणकार सांगतीलच इथे

वरील फोटोतील शेड्स देखील छान आहेत पण मला वाटते ग्लॉसीपेक्षादेखील मॅट शेड्स जास्त छान वाटतील सावळ्या हातांना.... बाकी जाणकार सांगतीलच इथे

अंगठ्याची व्हाईट्/सिल्व्हर शेड खास आहे. ऑल टाईम फेव्हरिट. कोणत्याही स्किन टोनला चांगली दिसते.

मीरा मधलं बोट आणि अंगठा भारी आहेत. आणी नखं किति मस्त मेन्टेन्ड आहेत. त्यामुळे जास्त छान दिस्तायत.
>> व्हाईट्/सिल्व्हर शेड खास आहे. ऑल टाईम फेव्हरिट.
दक्षिणा same pinch.

वॉव किती क्युट आहे ही शेड..... रिया ही शेड तुला देखील नक्की मस्त दिसेल.

हा खालचा पण मस्त आहे. मला सगळे असले ब्राऊन कलरमधल्याच शेड्स जास्ती आवडतात.

choco.jpg

रिया ही शेड तुला देखील नक्की मस्त दिसेल.
>>mi pan tich shade lavaliye

दक्षे मी सावळ्या हातंच्या शेड विचारल्या ना Angry
गोर्‍या हातांच्या शेड्स टाकून मला कॉप्लेक्स का देतेयेस Sad

मोकामि माझा हात याहीपेक्षा (?) सावळा ( का काळाच म्हणु मग आता? ) आहे Uhoh

रिया तुझ्यासाठी
-------------------------------------------------------
For Dark Skin: Fairly dark and rich shades look good on dark skinned women. Get chocolate brown, dark green,red,dark purple and maroon colored nail polish for a regular look. You should avoid bright or too light colors like white, silver and orange.However, if your dark complexion is on account of excessive tanning, you might even like to apply light shades of brown and pink along with other warm shades. Golden color would look fabulous on you and if you want to be a bit experimental, lay your hands on a nice shade of yellow! Pearly white and peach color is also great for you if you want a natural look!

----------------------------------------------------------

autumn-1.jpgSpring-2011-nail-color-Essie-Nude-Shade-Topless-and-Barefoot-swatch.jpg

मी गेल्या विकेंडला मैत्रिणींबरोबर पेडिक्युअर ला गेले होते तर आम्ही सगळ्यांनी निळी नेलपेंट लावली आणि मस्त दिसत आहेत. आपण नेहेमी जे करत नाही ते केलं की मस्त वाटतं खरं Happy
मी नेहेमीच ब्राउन आणि पिंक च्या शेड्स सिलेक्ट करते त्यामुळे निळा रंग माझ्यासाठी तरी धाडसी होता!

नेल कलर्स साठि हे दोन ब्लॉग बघा खूप छान आयडिया मिळतिल
http://www.thepolishaholic.com/
http://chloesnails.blogspot.com
रिया सावळ्या हातासाठि burgundy,dark purple,मिन्ट्,जेड कलर छान दिसतिल, आणि पेस्ट्ल कलर मधे beige, pink, peach किंवा coral सुद्धा छान दिसतात.
पण खरे तर सावळा हात असला म्हणुन काय झाले बिनधास्त जे आवडतिल ते कलर लाव. लावल्यावर सगळे छान दिसते. गो कलरफुल!

कुणाला आर्टफिशीयल ज्वेलरी बनौन हवी आसल्यास सांगा माझी मैत्रिण सुरेख दागिणे बनवते

यशस्वीनी त्या दुसर्या शेड चे नाव काय आहे

नेल कलर्स बद्दलः
सावळ्या-डस्की स्किन ला सुध्द्दा सगळे नेल कलर्स छान दिसतात, स्वतःच्या स्किन टोनला underestimate करु नका.
कुठल्या ड्रेस वर कुठल्या ऑकेशन्स ला कलर वापरतोय ते पाहिले तर सगळॅ फॅन्सी कलर्स सुध्दा छान दिसतात सगळ्या स्किन टोन्स ना.
स्वच्छ, नीट कापलेली मॅनि -पेडि केलेली हाता पायांची छोटी नखं साध्या क्लिअर नेल कलर मधेही छान दिसतात.. फक्त देशी कुकिंग करत असाल /चमचा न वापरता जेवत असाल तर क्लिअर-लाइट कलर्स वर हळादीचे डाग दिसायला वेळ लागत नाही Proud
कलर करण्या पेक्षा 'नेल्स' हा हायजेनिक इश्यु आहे तरीही, हे ही काही सोबर आणि काही फॅन्सी नेल्स..
n4.jpgn1.jpgn2.jpgn3.jpgn5.jpgn6.jpgn7.jpg
भारतात पण आहेत आज काल बरीच नेल सलोन्स पण मी जी ट्राय केली ती इथल्या व्हिएतनामी लोकां इतक्या सफाईने नाही करताना दिसले काम :(.

डिजे मस्त टाकलियेस चित्रं.
भारतात (पुण्यात) नेल आर्ट खूप कमी सलोन्स मध्ये करून मिळते एकतर, आणि सफाईदार कुणी करतं की नाही ते माहित नाही, कधी करून पाहिलं नाहिये.
पण तू टाकलेले फोटो आहेत तसं आर्ट केलं नखांवर तर काही काम करता येणार नाही ना अजिबात? का लाँग लास्टींग आहेत हे सगळे कलर्स?

मस्त डिझाईन्स!!
दक्षिणा माझी मैत्रिण घरीच करते नेल आटर्‍ ..साधे साधे डिझाईन्स.. तिच्यामते पाण्यात जास्त हात घातले किंवा जास्ती स्वयंपाकाची कामे असली तर पट्कन खराब होते..अगदी अलगद करते ती सगळी कामं

Pages