फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!

Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28

खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अ‍ॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्‍याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का? Wink
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नी Lol

हो दक्षे. हे माझ्या मोठ्या भावाच्या बारश्यातले कानातले आहे. साधसं एक सोन्याचा मणी एक काळा मणी. पण आजपर्यंत खुप जणांनी कॉम्लिमेंट्स दिलेत.. Happy

नीधप. Lol
पण तो दक्षीणाने दिलेला कुर्डुचा फोटो आणि तु दिलेला फोटो मला सेमच दिस्तोय. फक्त तू पोझिशन मार्क केली आहेस.. का मला चुकिचे दिसतेय.. Uhoh

नी तु वेलाबद्दल बोलत असशील बहुतेक, ते आपण नॉर्मली टोचतो त्याच्यामागून कान कव्हर करतात किम्वा केसात अडकवून संपतात.

अगं पारिजाता तिने जागा कन्फर्म केलीये. पण तिथे जो दागिना घातलाय तो कुर्डु नाही. दॅटस इट

नी बरोबर सांगतेय.

हे बघा.Adhira-84634684428811334213_1.jpg

ऑथेंटिक कश्मिरी कानातले अजून मोठ्ठे असते. बहुतेक फक्त लग्न झालेल्या बायकाच घालतात असले कानातले.

.

Happy

@ प्राची आपल्याकडे मंगळसुत्र घालतात तस काश्मिरच हे मंगळसुत्रच. तिथे हा दागिना घालतात, तो पुर्ण सोन्याचा असतो. आणि कानाच्यावरच्या बाजुला( जिथे बिगबाळी असते तिथे) भोकात तो दागिना घालतात.. मागच्या तारेची/ साखळीची उंची शोल्डर पर्यंत असते.

वॉव २२०. किती जोरात चालु आहे हा धागा. पुरुषविरहित आणि म्हणुनच कदाचित काहीही वादावादी न होता किती सुरळीत चालु आहे. ( जोरदार काडी Proud )

नी तु वेलाबद्दल बोलत असशील बहुतेक, <<
दक्षे इथे कुणी फारसं न ऐकलेल्या कुर्डूबद्दल माहितीये मला आणि वेल माहित नसतील का हुशार Happy

आपल्याकडे मंगळसुत्र घालतात तस काश्मिरच हे मंगळसुत्र >> मस्तय. याच्या डिजाइन्स पहायला आवडतील.
कुर्डु कसे घालतात देवास ठाउक. ते पाहून काही अफ्रिकन फॅशन्स आठवल्या. गळ्यातल्या रिंग्ज आणि तोंडात ठेवलेल्या चकत्या.

एकेकाळी मला बुगडी घालायचीच होती. पण हिंमत नाही झाली.

मागे कुणीतरी पुण्यात नाजूक डिझाईनची इमिटेशन ज्वेलरी कुठे मिळेल असं विचारलय. कर्वे रोड ला नळस्टॉप जवळ लक्ष्मी पर्ल्स आणि कृष्णा पर्ल्स मधे मिळेल. तिथे नाजूक, मध्यम, ढमाली (मोठी) सगळी डिझाईन्स आहेत. खोटी मंगळसूत्र (खड्याचे पेंडंट आणि मॅचिंग कानातले) पण खूप सुंदर असतात तिथे.

TBZ ची एक अ‍ॅड येत होती मधे tv बर. त्यात एक अफलातून नेक्लेस आणि कानातले असा सेट दाखवला होता. हिरे आणि माणिक असं कॉम्बी. ते सेम डिझाईन कृष्णा पर्ल्स मधे इमिटेशन मधे उपलब्ध आहे. :ड

मी गाडगीळांकडे एका बाईला कानात नथ घालुन बघताना पाहिले आहे. तिला ते खूप आवडले आणि तिने दोन्ही कानांत घालण्यासाठी दुसर्‍या साईडच्या (मिरर ईमेज) नथेची ऑर्डर दिली होती.

मी वाचनमात्र.
(अशा सगळ्या फॅशनी - स्वतः करण्यासाठी - आवड निर्माण होणारी एखादी लस मिळते का ?? Wink असेल तर माझा पयला नंबर)
बघायला फार आवडतं पण.

रुणु Lol
तू डॉक्टर असल्यामुळे फॅशन बग चा त्रास होऊ नये म्हणून आधीच प्रिवेंटेव्ह लस घेतली असशील Proud मलाही टोचली होती लहानपणी.. आता तिचा प्रभाव कमी झालाय. माझ्यामते मी बरीच चमको झालेय. पण अजुनही लोकं "कित्ती साधी रहाते" वगैरे म्हणतात. अपनी अपनी स्टाइल Proud
माझ्याकडे सगळे प्रकार असतात पण नेमक्या वेळेला ते वापरायचा उत्साह अस्तोच असं नाही..ऐन वेळला टीशर्ट्-जीन्स याच पोशाखात बाहेर पडते. आमच्या घरच्या ज्येष्ठ महिला म्हणतात ती जीन्स काय पायाला शिवलीय का? Wink

न टोचलेल्या नाकामध्ये प्रेसच्या नथीशीवाय आणि रिंग शिवाय अजुन काय घालता येइल?

रुणू, मी हल्लीच ती लस घेतलीय.तू कर्नाटकात येशील तेव्हा मी तुला पाहिजे असल्यास देईन!
Happy

ते काश्मिरी मंगळसूत्र अगदी अमेरीकेत ऑफीसमध्ये घालून आलेली पहिलीय. मला बघून पण घाबरायला झाले आणि बरेच प्रश्ण पडले होते तेव्हा कारण ते मी पहिल्यांदाच जवळून पाहिलेले.

श्रीमंत काश्मिरी लोकं इतक्या इतक्या तोळ्याचे'च' हवे असे आग्रह करून बनवून घालतात ती जाड चेन(त्यांचे मं सू).

त्या वरच्या मरुन कुर्तीवर गोल्डन वर्क आहे का? मग गोल्ड सिल्क छान दिसेल. ते शिमर टाइप गोल्डन लेगिंग्जही चांगले दिसतील. पण मरुनवर काळं वर्क असेल तर खाली गोल्डन नाही चांगलं दिसणार.

बुगडीविषयी प्रश्नः कुणी टोचून घेतली आहे का? मला फार इच्छा आहे टोचायची. एकदा घातली की काढता येते की नाही?
पुण्यात कुठे मिळेल टोचून? माझे आजोबाच टोचाटोची करायचे त्यामुळे लहान्पणी हा प्रश्न नव्हता पडला.

साधारण ४ वर्षां उर्वी barefoot नावाचे एक दुकान bandra मधेय होते ... त्या आधी ते हिल रोड च्या एका बंगल्याच्या आऊट हाउस मधेय होते .. ते मला सध्या दिसत नाही आहे .. कुणाला माहिते अस्ल्यास सांगा न ...
त्यांच्या सार्ख्या shoes n cotton kurti collection आज अर्यन्त कुठेच दिसले नाहि .. they were just fantastic.. tyical kurti नसायच्या त्यांच्या ... very trendy .. i will just go on n on .. so if anyne knows abt it .. lz let me knw ..

मोठ्या वयाच्या बायकांना नाही दिसत चांगले हे शिमर लेगिंग्ज असे माझे मत
>>
पौर्णिमाजी , जबान को लगाम दो. कोण आहे इथं मेलं मोठ्या वयाचं ? Angry

Pages