फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!

Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28

खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अ‍ॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्‍याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का? Wink
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हां रे ! ये तो सोचा ही ना था. Happy माझ्याकडे बेज कलर काही नाही, म्हणुन सुचलं नसेल. एक कॉटनचा शर्ट शिवला तर काम होवुन जाइल. लेमन यलो तर पक्का झालाच आहे. नविन ट्राउजर्सवर तीन शर्टस झाले की. Happy थँक्स गं.

ममा, पिंक नाही तर सॉफ्ट लॅव्हेंडर
पिस्त्याचा एक सब्ड्युड टोन असतो तो ट्राय कर.

ब्राऊन कलर स्कीम्स असा गुगल इमेज सर्च कर. Happy

चार पानं झाली तरी अजूनही एकही मित्र फिरकला नाही की इथे..

अंकु... ज्वेलरी साठी पत्र्यामारुती चौकातून मोदी गणपती कडे जाताना उजव्याहाताला रेवणकर ज्वेलर्स आहे तिथे ट्राय कर...

भारी धागा आहे. नीधप मस्त दिलेयत ते कॉम्बोज. मी दु, ति आणि पाचवा ट्राय केलेत. चांगले दिसतात. फक्त सगळे कलर्स लाईट शेड्स चे हवेत नाहीतर वाईट दिसेल.
कान टोचायचा असेल (वरच्या बाजूला) तर किती दुखते?

नी, थँक्यु. भरभरुन दिलीस की. मला वाटलं निळा जाणार नाही, पण पहिल्या ओळीतला निळा फार आवडला ब्राउनबरोबर. दुसरी ओळ तर पुर्णच आवडली. Happy

ग्रे टोनकडे झुकणारा निळा उत्तम जातो ब्राऊन बरोबर.
पण हे सगळे कॉम्बो करणार असलीस तर सॅण्डल्स मस्त डीप ब्राऊन्सच घे ना.

आहे. सेक्सी पेअर आहे डार्क ब्राउन कलरची. डेलिकेट बेल्ट्स आहेत. Happy

त्यावरुन आठवलं पुण्यात किंवा मुंबईमधे फुटवेअर बनवुन मिळतं का? माझी पावलं अ‍ॅबनॉर्मली लहान आहेत. प्रचंड दुकानं शोधली तर एखादी पेअर मिळ॑ते. त्यामुळे फॅशनेबल कपडे आणि खाली जुनंपुरा॑णे फुटवेअर हे माझं कायमचंच दु:ख आहे. आता पर्यंत पुण्यातला मॅक्सवाला मला हवा तो पॅटर्न बनवुन द्यायचा पण त्यांनी दुकान बंद केल्यापासुन मी गेले १ वर्षं काहीच खरेदी केली नाही. हा स्टॉक संपल्यावर मला चिल्ड्रेन वेअर खरेदी करायला लागणार आहेत. फुलाफुलांच्या किंवा बटरफ्लाय नाही तर बार्बी असलेल्या पिंक सॅण्डल्स. Sad

परी, गनशॉटने अजिबात नाही, पण माझा गनशॉटचा अनुभव चांगला नाही. टुंगु आला होता मागे. पारंपारिक सोन्याच्या तारेने कर ना. सोपं आणि सेफ. थोडंसं दुखेल.

अगं बायान्नो. हो की. तारेनेच.. मी दिवाळीतल्या टिकली उडवायच्या गनला घाबरते. गन शॉट कुठला घेतेय कानावर.. पण साधारण वीस-बावीस नंतर कुठेही टोचलेले दुखते असे ऐकलेय. लहान असताना मौ असतात ना अवयव. टोचल्यावर पण दुखत रहाते का?

मग माझ्याकडे उत्तर नाही तुझ्यासाठी. माझे कान-नाक टोचायचे सगळे उद्योग विशीबाविशी फारतर २४ पर्यंतच आटपलेले होते. Happy

ये मग Happy

@मनीमाऊ: मोची, सॅनोरिटा, कॅटवॉक या ब्रँडमध्ये नाही मिळत का?

सदैव काळ्या-ब्राउन चपला घालणार्‍यांत मी पण होते. कारण तेच- टॅन. पण एकदा हिंमत करुन हिरवी अन नंतर नीळी घेतली. मलाच माझे पाय इतके सुंदर वाटायला लागले Happy अशा रंगित चपला घातल्या तर नेलपेंट मस्ट आहे पण. कारण त्या सुंदर चपलांमुळे पायाकडे लक्ष जातंच अन जर अर्धवट निघालेलं नेलपेंट किंवा नखांना अजिबात न्युड कोट सुद्धा नसेल तर खरंच वाईट दिसतं.
नेलपेंटमध्ये पण आधी मी फक्त न्युट्रल कलर्स लावायचे. इतरांचे रंगीत नेलपेंट्स बघून मस्त वाटायचे पण स्वत: लावायची हिंमत नव्हती. गोर्‍या लोकांनाच ते शोभतं असं वाटायचं. आता मात्र बिनधास्त बरेच कलर्स वापरते. मला तर आवडतातच पण चांगले दिसतात असं इतर लोकही म्हणतात Wink

नताशा इज म्हणिंग राइट. मोची, कॅटवॉक, मेट्रो, सेनोरिटा यात मिळायला हवं.
पुण्यात एस जी एस मधे मोची आहे.

गर्ल्स, यु नेम इट. मी सगळे ब्रँण्ड्स ट्राय केले आहेत. एमजी रोडवरच्या प्रत्येक दुकानात गेले आहे. अगदी प्रत्येक. पण माझा साइझच नसतो आणि कधी चुकुन मिळालाच तर इतके पोरकट पॅटर्न्स मिळतात कि १२००/१४०० रुपये देवुन न आवडलेला पेअर घेवुन यायला जीवावर येतं. मोचीचा एक आणि कॅटवॉकचा एक पेअर घेतला आहे, पण आवडलेला नाही. Inc 5 चे स्टिलेटोज घेतले जे बरोबर बसतात पण रोज ते वापरु शकत नाही. पाठीची वाट लागेल.
मॅक्सचा जुना स्टॉक संपेपर्यंत शायनिंग करायची मग M F हुसेन फॅशन करायची असा प्लॅन आहे. Happy Sad रेहवान दो. दुसर्‍या टॉपिकवर बोलुयात. Happy टॅटुज वाले कोण कोण आहेत इथे?

अरे वा!! मस्त चर्चा विषय आहे! Happy
संसाराच्या धबडग्यात माझ्यासाठी हे प्रकार कधीच संपलेत असे वाटते.
वाचायला छान वाटतय.
माझे बरेच कपडे धुरकट कॅटॅगरीत गेलेत. ते सगळे टाकून नवे घेण्याची वेळ आलीये.
इथे वाचून (माझा आकार बर्‍यापैकी बरा आहे म्हणून) दोन जेगींग्ज घ्यावेत असा विचार करतीये.
नुकतेच त्यात बरेच रंग बघायला मिळाले. काळा, हिरवा, गुलाबी, ब्राऊनमध्ये दोन शेडस् , लाल, ग्रे. त्यातला ग्रे फार आवडला.
हँड्बॅगांचाही विचार करायची वेळ झाली आहे. दोन चांगल्या आहेत. एखादी समारंभीय बरी मिळाली तर घेईन म्हणते.

मी एकदा तात्पुरतं फुलपाखरू टॅटू दंडावर करून घेतलं होतं. दोन दिवसात जवळ्जवळ सगळं आणि तीन दिवसात पूर्ण गेलं. Wink जरा वेगळं म्हणून बरं वाटलं.

पुण्यात एस जी एस मधे मोची आहे.
<<<
मोची डेक्कन थिएटर च्या जागी मल्टीप्लेक्स झालय तिथेही आहे.

मैना, पर्मनंट टॅटु गं. ते तसले स्टीकरवाले टॅटुज दररोज लावता येतील, पण मला पर्मनंट हवा आहे आणि हिंमत नाही.
मी टॅटु स्ट्युडियो मधे जावुन परत येते. इतक्या जणांबरोबर गेले आहे आणि स्वतःसाठी पण इतक्या वेळा जावुन पळुन आले आहे. मला त्यांनी सांगितलं आहे कि पुढच्या वेळेस आल्यावर मला बांधुन ठेवणार आहेत. मी त्यांच्या मागे लागते कि तुम्ही मला लोकल अ‍ॅनेस्थेशिया द्या पण ते चालत नाही म्हणे. सॅबी'ज सोडुन अजुन कोणी आहे का पुण्यात?

Pages