फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!

Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28

खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अ‍ॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्‍याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का? Wink
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनिमाऊ, लेगिंग्ज आणि ते अतिशय वाईटपणे कॅरी करणार्‍या पोस्टींना +१.
पण तुला क्वचित जराशी हाय स्लिट असलेले टॉप्स आवडतात, ह्यावरून तू स्लिम असणार असा मी अंदाज करते आहे Happy

शॉर्ट टॉप्सच्या खाली पतियाळा सलवारही छान दिसतात. पण शॉर्ट म्हणजे शर्टाइतके शॉर्ट नाहीत. (रेफः मुक्ता बर्वे इन एलदुगो- ते वाईट दिसतं!)

तुम्ही कुठल्या फॅबमधे जाता त्यावर आहे. फोर्टचं फॅब हे उत्तम आहे. बाकी सगळी फॅबलेटस...

मी फॅब फॅन आहे. मला सिंथेटिक कपडे, तयार ड्रेस मटेरियल सेटस आवडत नाहीत.
मी कॉटन्सच वापरते आणि कॉटन कॉटेज मला जरा जास्तच टीपिकल वाटतं. फॅबमधे आर्टसी, क्लासी किंवा मग न्यूट्रल वस्तू मिळतात. ज्यावर मिक्स न मॅच करत तुम्ही फॅन्सी दुपट्टे, आर्टसी ज्वेलरी वगैरे वापरू शकता.

मंजुडी, कुर्त्यावर अवलंबुन आहे, पण तरीही बॉटमवेअर पांढरं असेल तर काळे शुज्/सॅण्डलस/चप्पल अगदीच मिसमॅच दिसतात. आपण बहुतेक वेळा ड्रेस घालुन चेहरा आवरेपर्यंत आरशासमोर असतो. फुटवेअर घातलं कि पुर्ण ड्रेस अप केल्यावर आरशात पहात नाही ( कारण आपल्याकडे फुटवेअर घालुन घरात जात नाहीत). असं पाहिलं तर कळेल कि बघणार्‍याला पांढर्‍या ड्रेसवर किंवा बॉटम वेअरवर काळं फुटवेअर कसं दिसतं. अर्थात परत डोळ्यांच्या सवयीचा भाग आहे. बर्‍याच जणांना नसेलही टोचत. Happy

पण तरीही बॉटमवेअर पांढरं असेल तर काळे शुज्/सॅण्डलस/चप्पल अगदीच मिसमॅच दिसतात.>>> नॉट नेसेसरीली! हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे. Happy

मी सलवारीच्या रंगापेक्षा माझ्या पावलांना कुठला रंग शोभून दिसेल ह्याचा विचार करते.

मने मी पण अ‍ॅन्टी फॅब.
किमती कायच्या काय आणि सेम सेम प्रिंटचे मळखाऊ कपडे... Sad
त्यातल्या त्यात निळे वगैरे मिळतात बरे, पण तेच वापरून कंटाळ इलो.

किमती कायच्याकाय?
७००-८०० पर्यंत लक्ष्मी रोडला जे रेडिमेड कुर्ते मिळतात त्यापेक्षा क्लासी असतात फॅबचे.

पौर्णिमा, नाही गं मी स्लीम. दुखवु नकोस माझ्या भावना. पण मला वाटतं कि मी ते वाईट न दिसु देता चांगलं कॅरी करु शकते. ( आगावु वाटले का मी? नाहीए. Wink )

रेफः मुक्ता बर्वे इन एलदुगो- ते वाईट दिसतं! >>> नाही पतियालावर शॉर्ट कुर्ते चांगले दिसतात पण पाठीमागे ( बम्सवर) ज्या चुण्या असतात त्या तरी झाकल्या जाव्यात. जे भान मुक्ताने ठेवलं नव्हतं. पॅटर्न कोणता आहे ते पण महत्वाचं. मुक्ताने बरेच जंगली पॅटर्नस वापरले होते.

नी, अच्छा ! हे माहित नव्हतं. मला आमचं पुण्यातलं एकच फॅब माहित. ते काही मला आवडत नाही आणि प्रचंड महाग वाटतं. काही एक्सक्लुसिव ज्वेलरी किंवा कपडे ( जसे तिथले दुपट्टे आणि कॉटन स्कर्ट्स) सोडता मला ते फार ग्रेट नाही आवडत. कुर्ते तर अगदी शेपलेस सरळसोट शिवलेले असतात. रंग अजिबात टिकत नाहीत. त्यापेक्षा लिमिटेड पण एक्सक्लुसिव पॅटर्नसचे कॉटन कुर्ते घ्यायला मला Either Or आवडतं.

मंजू तु काळेच फुटवेअर का वापरतेस? एनी स्पेसिपिक रिझन?
मग पुढे बोलु.. कारण मी ही कित्येक वर्षं फक्त काळंच वापरायची, चप्पल आणि पर्स सुद्धा.

नी तु पुण्यात फॅबला गेलिच असशील, सोहराबच्या बाजूचं.. तिथलं म्हणतेय मी. मुंबईत चांगले मिळत असतील कपडे आणि व्हरायटी सुद्धा.. इथे मला तरी नाही वाटलं तसं.

सलवारीच्या, ड्रेसच्या रंगाशी अगदीच संबंध नसेल तर ते ऑड होतं कधी कधी.
क्रीम, गोल्ड, व्हाइट अश्या सगळ्या कॉम्बोत खाली ब्लॅक हे ऑड दिसू शकतं.

पण म्हणून सलवारीला मॅच करायची गरज नाही.

स्किन कलर लेदरचे किंवा हल्ली जे ट्रान्स्परंट सॅण्डल्स असतात ते सगळ्या फॉर्मल सलवार सूटसवर जातात.

मनिमाऊ, टिकली वर्क बिग नो आहे माझ्यासाठी तरी.सिल्वर एंब्रॉयडरी असेल तर स्टोन्स, डायमंड छान दिसतात.
प्लॅटिनमचं मंसू बनवून घे. हिर्याचं पेंडंट बनव. Happy

मी तरी स्टोन्सची फॅन असल्याने स्टोन्स /बीडस तेवढे खरे / कॉस्टली घेते. आणि बाकिचा माल सिल्वर गोल्डन किंबा गोल्ड प्लेटेडही चालतो.
काही ट्रॅडिशनल साड्याम्वर पोटापर्य्ंत लांब काळंभोर आणि सोन्याच्या फक्त वाट्या असलेल मंसू मस्त दिसतं.
शक्यतो ड्रेसला मॅचींग कानातलं गळ्यातलं घालत असल्याने आणि मंसू सर्वत्र व्यक्तीरूपात नेत असल्याने मंगळसूत्र घातलंच पाहिजे असं मला (ब्यक्तिशः) वाटत नाही.

मने कानातली मात्र छान मिळतात बरं का फॅबात... माझी मैत्रिण कायम हिरवी पिवळी घेते, दिसतात भडक पण क्वालिटी एकदम फर्मास...

त्यापेक्षा लिमिटेड पण एक्सक्लुसिव पॅटर्नसचे कॉटन कुर्ते घ्यायला मला Either Or आवडतं. <<
ते दिल्ली आणि पुण्यात आहे.
मी पुण्यातलं पाह्यलं तेव्हा मी दोन घेतले खरे पण मला खूप व्हरायटी नाही आवडली. कदाचित त्या दिवशी नसेल तिथे.
त्या दोन्हीतला एक ४ धुण्यात भूत झालाय.

मला लेगिंग्ज पेक्षा जेगिंग्ज आनि धोती जास्त कंफर्ट्रेबल वाटत...
जेगिंग्ज जीन च्या कापडासारख्या असल्यामुळे जास्त कंफर्ट्रेबल Happy लेगिंग्ज कधी ही फाटु शकतात अस मला सारख वाटत आनि मग मी कधी वापरत च नाही
मने एम.जी च्या पिक्स मधे गेली आहेस का कधी... ?????

नॉट नेसेसरीली! हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे. >>> तेच तर म्हटलं ना. ज्याच्या त्याच्या सवयीचा प्रश्न आहे. मी डेनिमवर पांढरा शर्ट घातला तरी पांढर्‍या सँडल्स किंवा चप्पल्स घालते. पांढरा शुभ्र ड्रेस घातल्यावर काही कारणाने पांढरं फुटवेअर नसेल तर मी ड्रेस बदलुन टाकेन. अपनी अपनी पसंद Happy

मला मुळात कुठलंही टीकली वर्क, जरी, गोटा वर्क हे संपूर्ण ड्रेसच्या ०.१ % पेक्षा जास्त असेल तर अजिबात आवडत नाही. त्यामुळे लक्ष्मी रोड (किंवा पार्ला मार्केट) नको होतो.

प्लॅटिनमचं मंसू बनवून घे. हिर्याचं पेंडंट बनव.>>> साती, मी मंगळसुत्र घालत नाही. वर्षातुन कधी तरी ५-१० वेळा घातलं जातं, त्यासाठी हिर्‍यांचं पेडंट? Happy

दक्ष, हो ते फंकी कलर्स छान दिसतात. माझ्याकडे आहे फॅबची तसली टंपड ज्वेलरी.

अनु, पिक्स मधे गेले आहे. एक पार्टी वेअर घेतला आहे, पण एखादाच बरा कपडा असतो तो. मराठी आवडीला रुचणारे कपडे कमीच आहेत तिथे. फारच भडक, चमको आणि खरं तर चिपोच कपडे असतात तिथले. कॅम्प, फातिमा नगर परिसराला ते दुकान आवडण्यासारखं आहे. Happy

एनी स्पेसिपिक रिझन?>>> मी रोजच्या रोज ड्रेसप्रमाणे मॅचिंग चपला घालण्याइतकी हौशी नाहीये गं दक्षिणा Happy ऑफिसला घालायसाठी एक सँडल जोडी, जी ड्रेस आणि जेगिंग कुर्तीवरही मॅच होऊ शकेल, सगळ्या ड्रेसवर बेधडक चालतील आणि सगळ्यात मुख्य कारण म्हणजे माझ्या मोठ्या, फताड्या आणि रापल्या पावलांवर शोभून दिसतील असे काळ्या रंगाचेच सँडल घेते.
बाकी पर्स आपल्याला कुठच्या पण रंगाची चालते. सध्याचा रंग हिरवा आहे Wink

बरं झाल सांगितल
मी तिथे भाऊच्या लग्नासाठी खरेदी करणार होते... म्हण्जे भाऊला तिथे नेऊन कापाव का ??? असा विचार ..

मंजू, पुढच्या वेळेला सॅण्डल्स घेताना एखादे टॅन किंवा स्किन कलरचे प्लेन घेऊन बघ. जे पायांवर फार वेगळे जाणवणार नाहीत.
सर्व गोष्टींवर उत्तम जातील. काळे किंवा पांढरे ज्याप्रकारे क्लॅश होतात त्यापेक्षा हे बरं.

पुढच्या वेळेला सॅण्डल्स घेताना एखादे टॅन किंवा स्किन कलरचे प्लेन घेऊन बघ. जे पायांवर फार वेगळे जाणवणार नाहीत. >>> अगदी अगदी.

मुलीनो मला सांगा ना
पुण्यात गळ्यात घालण्यासाठी नाजुक पेंडट सेट + ब्रेसलेट सिल्वर मधे ७००-१५०० च्या रेंज मधे कुठे मिळेल ????
पु.ना.गाडगीळ मधे एक पाहिला होता तो सुमारे ३५०० चा होता.. बजेट च्या बाहेर .. Sad अजुन कुठे मिळेन.. तुळशीबाग सोडुन सांगा... तिथल सध्या काही आवडतच नाही

इमिटेशन ज्वेलरीची बरीच दुकानं आहेत अंकु लक्ष्मी रोडला, दुल्हन नंतर खाली विजय टॉकिजकडे जायला लागायचं. बरीच व्हरायटी असते. वामाआहेत, जयहिंदच्या लायनीत देखील दोन दुकानं आहेत इमि. ज्वेची.

पिक्सबद्दल, अजून एकदा ममा+१! Happy

जयहिंदच्या लायनीत देखील दोन दुकानं आहेत इमि. ज्वेची. >>>नाही आवडली... काहीही नाजुक नसते ते... आनि काहीच्या काही किमती लावतात... रविवार पेठेत पण तसच... Sad

अनु, सुधन ( कॅम्पच्या भाषेत सुदान Wink ) वंडरलँडमधे आहे. महाग पण एक्सक्लुसिव पॅटर्नस मिळतात. मी बॉम्बे स्टोअर्समधुनही घेतला होता. सध्या लक्ष गेलं नाही की कलेक्शन कसं आहे.

अरे मंजूडी.. मैने ये कब बोल्या तु मॅचिंग पहन करके..

अगं आपला पाय काळा आहे, त्यामुळे काळं चप्पल घातल्यावर जरा बरं दिसेल अशा समजूतीत मी निदान १० वर्षं तरी काळी चप्पल वापरली असेल. Uhoh त्यामुळे तुझाही समज तसाच असेल तर तो थोडा दूर करावा.. (तुझी इच्छा असेल तर) म्हणून विचारलं.
खरंतर लाल्/डार्क निळी.. वगैरे सुद्धा चपलं कधीकधी काही ड्रेसवर उठून दिसतात. पण कोणत्याही ड्रेसवर जेनेरिक हवं असेल तर काळं, डार्क ब्राऊन किम्वा स्किन शिवाय कलर्स नाहित.

अगं नी/ दक्षिणा... साईज पण जेन्यूईन Wink ज्यात विविधता - पॅटर्न आणि रंग, दोन्हीत एकत्रितपणे मिळणं महामुश्किल. त्यामुळे जे मिळतात, आवडतात ते पटकन घेऊन टाकते.

अंकु, डेक्कनवर लक्ष्मी पर्ल्स आणि अजून एक काहीतरी पर्ल्स अशी दुकानं आहेत, तिकडे बघा. निश्चित स्थळ पुणेकराकडून तपासून घ्या, कारण मी पुण्याची नाहीये. माझ्या डोक्यात जे दुकान जिथे आहे असं फिट बसलंय ते मी तुम्हाला सांगतेय.

साईज पण जेन्यूईन >> १००% खरं... माझे पाय जाम फताडे आहेत आणि मला दणदण चालायची सवय आहे. तरिही खोड जात नाही. अधुन मधून हाय हिल्स घालते मी.

Pages